GChemPaint/C2/Formation-of-molecules/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Formation-of-molecules
Author: Manali Ranade
Keywords: GChemPaint
Time | Narration
|
---|---|
00:01 | नमस्कार. |
00:02 | GChemPaintमधील Formation of molecules वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | यात शिकणार आहोत, |
00:11 | संयुगाची रचना समाविष्ट करणे आणि बदलणे. |
00:14 | असलेले मूलद्रव्य बदलणे. |
00:16 | Alkyl ग्रुप्स समाविष्ट करणे. |
00:18 | कार्बन साखळी समाविष्ट करणे आणि बदलणे. |
00:21 | आपण, उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू. |
00:33 | हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला, |
00:38 | GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी. |
00:41 | नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:47 | येथे स्लाईडवर प्रोपेन, ब्युटेन आणि Heptane ची रचना दाखवली आहे. |
00:54 | याप्रमाणे मी प्रोपेन आणि ब्युटेन ची रचना असलेले नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे. |
01:03 | ब्युटेनच्या रचनेत टर्मिनल कार्बन अणूच्या जागी क्लोरिनचा अणू ठेवा. |
01:10 | त्यासाठी मी Periodic table combo बटण वापरणार आहे. |
01:15 | Current element चे ड्रॉप डाऊन अॅरो बटण क्लिक करा. |
01:19 | ह्यास Periodic table combo बटण म्हणतात. |
01:23 | बिल्ट इन Modern periodic टेबलकडे लक्ष द्या. |
01:27 | टेबलमधील Cl वर क्लिक करा. |
01:30 | टूल बॉक्समधील Cl कडे लक्ष द्या. |
01:33 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
01:37 | टर्मिनल अणूंच्या जागी Clorine (Cl) चे अणू ठेवण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
01:43 | 1,2-Dichloroethane ही नवी रचना मिळाली आहे. |
01:48 | आता रचनेच्या खाली त्याचे नाव लिहू. |
01:52 | Add or modify a text टूलवर क्लिक करा. |
01:56 | Text टूलचे प्रॉपर्टी पेज उघडेल. |
01:59 | डिस्प्ले एरियामधे रचनेखाली क्लिक करा. |
02:03 | हिरव्या रंगाच्या बॉक्समधे कर्सर ब्लिंक होताना दिसेल. |
02:08 | बॉक्समधे 1,2-Dichloroethane टाईप करा. |
02:14 | टेक्स्ट टूलचे प्रॉपर्टी पेज बंद करण्यासाठी Select one or more objects टूलवर क्लिक करा. |
02:21 | पुढे प्रोपेन रचनेतील केंद्रस्थानी असलेल्या कार्बन अणूच्या जागी ऑक्सिजनचा अणू ठेवा. |
02:28 | प्रोपेन रचनेच्या मध्यभागी असलेल्या अणूवर कर्सर न्या. |
02:33 | capital O दाबा. |
02:35 | O आणि Os असलेला सबमेनू उघडेल. |
02:39 | O सिलेक्ट करा. |
02:40 | ऑक्सिजनचा अणू, कार्बन आणि हायड्रोजनच्या अणूच्या जागी ठेवा. |
02:46 | Dimethylether ही नवी रचना मिळेल. |
02:51 | रचनेच्या खाली त्याचे नाव लिहू. |
02:54 | Add or modify a text टूलवर क्लिक करा. |
02:58 | डिस्प्ले एरिया वर रचनेखाली क्लिक करा. |
03:01 | बॉक्समधे Dimethylether टाईप करा. |
03:06 | आता फाईल save करू. |
03:08 | टूलबारवरील Save the current फाईलच्या आयकॉनवर क्लिक करा. |
03:12 | Save as चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:15 | फाईलला Chloroethane-ether हे नाव द्या. |
03:20 | Save वर क्लिक करा. |
03:23 | विंडो बंद करण्यासाठी Close बटण क्लिक करा. |
03:27 | असाईनमेंट म्हणून, |
03:29 | 'Ethane आणि Pentane च्या रचना काढा. |
03:32 | Ethane च्या एका कार्बन अणूच्या जागी Br चा अणू ठेवा. |
03:36 | Pentane च्या टर्मिनल कार्बन अणूच्या जागी I ठेवा. |
03:41 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे. |
03:45 | आता Alkyl ग्रुप्स बद्दल जाणून घेऊ. |
03:49 | Alkyl ग्रुप हा Alkane चा एक भाग आहे. |
03:53 | उदाहरणार्थ: Methyl CH3 हा Methane CH4 चा एक भाग आहे. |
04:00 | Alkyl ग्रुप चा पुढील प्रत्येक सभासद CH2 ग्रुपने बदलत जातो. |
04:06 | Alkyl ग्रुप सीरिजचे होमोलोग्ज असे आहेत, |
04:10 | Methyl CH3 |
04:15 | Ethyl C2H5 |
04:20 | Propyl C3H7 |
04:23 | Butyl C4H9 आणि पुढे |
04:29 | मी Heptane ची रचना असलेले नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे. |
04:35 | आता कार्बन साखळीच्या जागेला नंबर कसे द्यायचे ते पाहू. |
04:40 | नंबर दिल्यामुळे साखळीची जागा ओळखायला मदत होते. |
04:44 | Add or modify a text टूलवर क्लिक करा. |
04:48 | डिस्प्ले एरिया मधे साखळीच्या पहिल्या जागेजवळ क्लिक करा . |
04:52 | हिरव्या बॉक्समधे 1टाईप करा. |
04:55 | पुढे साखळीच्या दुस-या जागेजवळ क्लिक करा. |
04:59 | बॉक्समधे 2 टाईप करा. |
05:02 | तसेच साखळीच्या इतर जागांना 3, 4, 5, 6 आणि 7 असे नंबर द्या. |
05:13 | आता Heptane च्या विविध Alkyl ग्रुप्स पोझिशन्सना शाखा काढू. |
05:19 | आता तिस-या जागेवर Methyl group समाविष्ट करू. |
05:24 | Add a bond or change the multiplicity of existing one टूलवर क्लिक करा. |
05:30 | पोझिशनवर क्लिक करा. |
05:32 | अणूंमधे होणा-या बदलांकडे लक्ष द्या. |
05:36 | आता पाचव्या पोझिशनवर Ethyl group समाविष्ट करू. |
05:40 | Add a chain टूलवर क्लिक करा. |
05:43 | आता पोझिशनवर क्लिक करा. |
05:46 | पुढे सर्व पोझिशनवरील अणू दाखवणार आहोत. |
05:51 | पोझिशनवर राईट क्लिक करा. |
05:53 | सबमेनू उघडेल. |
05:55 | Atomसिलेक्ट करून Display symbol वर क्लिक करा. |
05:59 | याचप्रकारे मी इतर पोझिशनवरील अणू दाखवणार आहे. |
06:06 | एका पोझिशनवर किती वेळा शाखा काढू शकतो ते बघू. |
06:12 | Add a bond or change the multiplicity of existing one टूलवर क्लिक करा. |
06:18 | चौथ्या पोझिशनवर क्लिक करा. |
06:21 | पुन्हा क्लिक करा. |
06:23 | कार्बन साखळीमधील ब्रँचिंगकडे लक्ष द्या. |
06:27 | आता तिथे तिस-यांदा क्लिक करण्याचा प्रयत्न करा. |
06:30 | आपल्याला ब्रँचिंग दिसणार नाही. |
06:33 | प्रत्येक पोझिशनवर केवळ दोन वेळा ब्रँचिंग करणे शक्य आहे हे लक्षात घ्या. |
06:39 | याचे कारण कार्बनची संयुजा म्हणजे valency चार आहे. |
06:43 | फाईल सेव्ह करण्यासाठी CTRL+ S दाबा. |
06:47 | Save as डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:50 | फाईलला Alkyl ग्रुप्स हे नाव द्या. |
06:53 | Save बटण क्लिक करा. |
06:57 | थोडक्यात, |
07:00 | या पाठात शिकलो, |
07:03 | संयुगाची रचना समाविष्ट करणे आणि बदलणे. |
07:07 | असलेले मूलद्रव्य बदलणे. |
07:09 | Alkyl ग्रुप्स समाविष्ट करणे. |
07:12 | कार्बन साखळी समाविष्ट करणे आणि बदलणे. |
07:15 | असाईनमेंट म्हणून, |
07:16 | Octane ची रचना करा. |
07:18 | साखळीच्या चौथ्या आणि पाचव्या जागेवर Propyl आणि Butyl ग्रुप समाविष्ट करा. |
07:25 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे. |
07:29 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:33 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:38 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:47 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:51 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07:57 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:02 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:09 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:15 | हा पाठ येथे संपत आहे. |
08:19 | यातील अॅनिमेशन उदया चंद्रिका यांनी केले आहे. |
08:22 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |