Digital-Divide/D0/First-Aid-on-Snake-Bite/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:27, 28 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | गावातील मैदानात खेळणा-या मुलांचे द्रुश्य तुमच्यापैकी बहुतेकांना परिचित असेलच. |
00:09 | चेंडूच्या मागे धावणारा हा मुलगा पहा. |
00:12 | तो जवळच्या दाट झुडुपात शिरला. |
00:16 | त्याला एक साप दिसला. |
00:18 | क्षणात तो साप बिळातून सरपटत पुढे आला. |
00:21 | सापाने निघून जावे यासाठी घाबरलेल्या मुलाने त्यावर दगड भिरकवला. |
00:26 | साप मागे फिरला नाही. |
00:29 | त्याऐवजी त्याने मुलाच्या पायाला दंश केला. |
00:34 | मुलगा मदतीसाठी किंचाळला. |
00:36 | त्याचे मित्र मदतीसाठी त्याच्या दिशेने धावले. |
00:39 | त्यांना त्याच्या पायावर दोन लाल खुणा दिसल्या. |
00:42 | त्यांनी मुलाला झाडीतून बाहेर आणले. |
00:45 | आणि एकच धांदल उडाली. |
00:47 | सर्व मुले प्राथमिक उपचाराबद्दल वेगवेगळी मते देऊ लागली. |
00:52 | आता सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचारांचे महत्त्व जाणून घेऊ. |
00:57 | First Aid on Snake Bites वरील ट्युटोरियलमधे स्वागत. |
01:02 | ह्यात आपण पाहू. |
01:04 | * प्राथमिक उपचाराचे महत्त्व आणि |
01:07 | * सर्पदंश झाल्यास योग्य प्राथमिक उपचार कसे द्यायचे? |
01:11 | प्राथमिक उपचारांबद्ल जाणून घेण्यापूर्वी, |
01:15 | मित्राचे प्राण वाचवण्यासाठी इतरांनी काय केले ते पाहू. |
01:20 | त्यांनी मुलाला जमिनीवर झोपवले. |
01:22 | त्याला हॉस्पिटलमधे नेण्यासाठी मोठ्यांची मदत घेतली. |
01:28 | नंतर त्यांनी जखमेच्या वरती कापड गुंडाळले. |
01:32 | हा योग्य प्राथमिक उपचार आहे का? |
01:35 | हो! एका परीने ही योग्य पध्दत आहे. |
01:39 | ह्या बाबतीत हॉस्पिटल फार लांब नव्हते. |
01:42 | त्यामुळे मुलाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. |
01:46 | सर्पदंश झाल्यावर प्रथमोपचाराची योग्य पध्दत म्हणजे, |
01:51 | त्या व्यक्तीला सपाट पृष्ठभागावर झोपवा. |
01:55 | जखम झालेल्या भागावर कापड गुंडाळा. |
01:59 | विष शरीरात पसरू नये हा ह्या प्रथमोपचाराचा प्राथमिक उद्देश आहे. |
02:07 | जखमेवर कापड गुंडाळण्याची योग्य पध्दत काय? |
02:10 | पायाच्या वरच्या भागापासून खाली येत कापड गुंडाळा. |
02:15 | पुढील उपचारांसाठी त्या व्यक्तीला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमधे हलवा. |
02:20 | वेळेत प्रथमोपचार दिल्यास अनेक धोके टळू शकतात. |
02:26 | लक्षात ठेवा चुकीच्या प्रथमोपचारांमुळे त्या व्यक्तीची स्थिती वाईट होऊ शकते. |
02:32 | सर्पदंश झाल्यास हे करावे, |
02:34 | - प्रथम त्या व्यक्तीला आडवे झोपवा. |
02:37 | - कापड गुंडाळत असताना थोडा दाब द्या. |
02:41 | सर्पदंश झाल्यावर हे करू नये. |
02:44 | - दंश झालेल्या भागाची त्वचा किंवा मांस कापू नका. |
02:49 | - दंश झालेल्या भागावर किंवा त्याच्या भोवती बर्फ लावू नका. |
02:52 | - त्या व्यक्तीला विजेचा झटका देऊ नका. |
02:56 | - दंश झालेल्या भागातून रक्त किंवा विष तोंडाने शोषण्याचा प्रयत्न करू नका. |
03:01 | - कापड खूप घट्ट बांधू नका. त्यामुळे गँग्रीन होण्याची शक्यता असते. |
03:07 | हा व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल च्या पुढाकाराने डिजिटल डिव्हाईड मधील अंतर दूर करण्याच्या संकल्पाचा एक भाग आहे. |
03:13 | प्रकल्पाची अधिक माहिती, |
03:15 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial |
03:21 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
03:25 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
03:29 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
03:33 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
03:37 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
03:44 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
03:48 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
03:54 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. Spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
04:01 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद . |