Scilab/C2/Plotting-2D-graphs/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:50, 24 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:00 सायलॅबच्या प्लॉटिंग 2D ग्राफ्स वरील पाठात स्वागत .
00:04 संगणकावर सायलॅब इन्स्टॉल झाले असल्याचे गृहीत धरून त्यातील प्लॉट्स बद्दल चर्चा करू.
00:10 अनेक प्रकारचे 2D आणि 3D प्लॉट्स बनवण्याची आणि कस्टमाईज करण्याची सुविधा सायलॅब देते.
00:15 सायलॅब पुढील कॉमन चार्टस काढू शकते: x-y plots (x-y प्लॉट्स), contour plots(कॉंटूर प्लॉट्स), 3D plots(3D प्लॉट्स), histograms(हिस्टोग्रॅम्स), bar charts(बर चार्ट्स), इत्यादी.
00:24 सायलॅब कन्सोल विंडो उघडा.
00:28 कमांडस कट आणि पेस्ट करण्यासाठी Plotting.sce फाईल वापरू.
00:34 आलेख काढण्यासाठी बिंदूंचा संच आवश्यक असतो. त्यासाठी समान रेषीय अंतर असलेले बिंदू घेऊ.
00:39 हे linspace(लीनस्पेस ) कमांडद्वारे करता येते ज्यामुळे समान अंतर असलेला वेक्टर बनतो.
00:45 उदाहरणार्थ,
00:48 x हा 1 ते 10 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
00:57 तसेच yहा 1 ते 20 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
01:08 आपण Help द्वारे लाईनस्पेस linspace(लीनस्पेस ) बद्दल अधिक माहिती मिळवू शकतो.
01:14 आता प्लॉट फंक्शनद्वारे x आणि y अर्ग्युमेंटस वापरून ग्राफ काढणार आहोत.
01:19 हे मॅटलॅबप्रमाणेच आहे.
01:23 प्लॉट कंसात x, y कमांडने x verses y ग्राफ काढला जाईल.
01:31 ग्राफिक्स विंडोचे लेबल '0' दिसत आहे.
01:36 आपण xset फंक्शनद्वारे आणखी एक ग्राफिक विंडो उघडू.
01:41 हे बंद करू.
01:43 सायलॅब मधे xset फंक्शन कट करून पेस्ट करून एंटर दाबा.
01:50 येथे ग्राफिक विंडो नंबर 1 दिसेल.
01:54 ह्या फंक्शन मधे विंडो आणि 1 ही दोन अर्ग्युमेंटस पास केलेली आहेत.
02:03 पुढील ग्राफ ह्या विंडोवर प्लॉट करू.
02:06 सायलॅब मधे plot 2d हे नेटिव्ह फंक्शन 2d graphs काढण्यासाठी वापरतात .
02:14 plot2d कमांड x verses y ग्राफ काढतो.
02:26 येथे तिसरे अर्ग्युमेंट आहे स्टाईल.
02:31 स्टाईल अर्ग्युमेंट हे ऐच्छिक आहे. ते प्लॉटचे स्वरूप कस्टमाईज करते.
02:36 स्टाईलची धन व्हॅल्यू जसे की 3 असेल तर हिरव्या रंगाचा प्लेन कर्व्ह दिसेल.
02:44 स्टाईल ची डिफॉल्ट व्हॅल्यू 1 असते.
02:46 ऋण व्हॅल्यूज घेऊन ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील फरक समजून घ्या.
02:51 तसेच चौथे अर्ग्युमेंट देऊन x आणि y अक्षाचे सुरूवात आणि शेवटचे बिंदू सेट करू शकतो.
02:57 त्याला rect म्हणतात.
03:07 आपल्याकडे 1 ते 10 असा x अक्ष आणि 1 ते 20 असा y अक्ष आहे.
03:14 rect कमांड मधे अर्ग्युमेंटस चा क्रम xmin, ymin, xmax आणि ymax असा असतो.
03:24 आता Title(टाइटल), Axis(एक्सिस) आणि Legends(लेजेंड्ज़) बद्दल जाणून घेऊ.
03:28 अक्षांना लेबल देण्यासाठी आणि प्लॉटला टायटल देण्यासाठी x label, ylabel आणि title(टाइटल) ह्या कमांडस वापरतात.
03:38 ह्या कमांडस कट करून कन्सोलवर पेस्ट करा. एंटर दाबा.
03:45 x अक्षाला x, y अक्षाला y ही लेबल्स आणि my title हे ग्राफचे टायटल येथे दिसत आहे.
03:58 3 वेगवेगळ्या कमांडस देण्याऐवजी एकाच कमांडने हे सर्व कॉनफिगर करू शकाल.
04:04 त्यासाठी 3 अर्ग्युमेंटस असलेली xtitle ही कमांड वापरू.
04:11 सायलॅब मधे ही कमांड कट करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
04:18 x अक्षाचे लेबल X axis , तर y अक्षाचे Y axis आणि टायटल My title आहे.
04:26 आता clf() ह्या फंक्शनद्वारे ग्राफिक विंडो क्लियर करून घेऊ.
04:36 एकाच ग्राफिक विंडोवर वेगवेगळे ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे .
04:41 ही विंडो बंद करू.
04:44 कधीकधी एकाच प्लॉट वर एका x डेटासाठी y डेटाच्या दोन संचांची तुलना बघायची असते.
04:51 आता उदाहरण बघू. त्यासाठी खाली स्क्रॉल करू.
04:56 रो वेक्टर x मधे linspace(लीनस्पेस ) कमांडद्वारे x अक्षावरील बिंदू घोषित करू.
05:03 फंक्शन घोषित करू.
05:05 y1 = x square
05:07 plot x verses y1
05:10 दुसरे फंक्शन घोषित करू. y2 = 2x square
05:15 plot x verses y2
05:17 तसेच ग्राफला लेबल आणि टायटल देऊ.
05:22 येथे कर्व्हचे स्वरूप बदलण्यासाठी प्लॉट फंक्शनला, ”o-” आणि ”+ -” ह्या अतिरिक्त कमांडस दिलेल्या आहेत.
05:33 ही अर्ग्युमेंटस, plot2d फंक्शनचा भाग नाहीत.
05:37 ह्या केवळ प्लॉट फंक्शन सोबत वापरता येतात.
05:41 ह्या कमांडस सायलॅब कन्सोलवर कॉपी करून पेस्ट करत आहोत.
05:49 तुम्ही ग्राफ बघू शकता.
05:51 कुठला कर्व्ह कोणत्या फंक्शनचा आहे हे कळले तर खूप सोयीचे होईल.
05:56 हे legend(लेजेंड) कमांड द्वारे मिळवता येऊ शकते.
06:08 "o-" हा कर्व्ह y1=x square हे फंक्शन दाखवते. आणि "+-" हा कर्व्ह y2=2*x^2 हे फंक्शन दाखवते.
06:19 ही ग्राफिक विंडो बंद करू.
06:22 आता plot2d फंक्शन आणि subplot(सबप्लॉट) फंक्शन बद्दल जाणून घेऊ.
06:28 सायलॅब त्याच्या सर्व महत्त्वाच्या फंक्शन्सचे डेमो देते.
06:31 demonstration(डेमॉन्स्ट्रेशन) टॅबद्वारे plot2d चे डेमोज बघता येतात .
06:39 Graphics( ग्रॅफिक्स) वर क्लिक करून 2d_3d plots वर क्लिक करून प्रदान केलेल्या विविध डेमोज मधून डेमो सिलेक्ट करा.
06:51 plot2d वर क्लिक करा.
06:54 येथे डेमो ग्राफ बघू शकता.
06:55 ग्राफचा कोडदेखील येथे view code(व्यू कोड) बटणावर क्लिक करून बघता येतो.
07:02 ही लिंक Mac OS मधे उघडत नाही. परंतु विंडोज आणि लिन्क्समधे उघडते.
07:07 Mac मधे हा कोड डिरेक्टरीद्वारे बघता येतो.
07:12 टर्मिनलवर जाऊ.
07:15 आत्ता आपण सायलॅब 5.2 च्या डेमो डिरेक्टरीमधे आहोत.
07:21 ह्या डिरेक्टरीचा संपूर्ण पाथ येथे दाखवला आहे.
07:27 येथे ls टाईप करून उपलब्ध डेमोंची सूची येथे बघू शकता.
07:36 नंतर 2d_3d_plots ही डिरेक्टरी सिलेक्ट करून एंटर दाबा.
07:46 sce फाईल्स मधे उपलब्ध असलेले विविध कोड बघण्यासाठी पुन्हा ls टाईप करा.
07:55 आधी पाहिलेल्या डेमोचा कोड पाहू.
08:00 त्यासाठी टाईप करा more plot2d.dem.sce आणि एंटर दाबा.
08:11 येथे plot2d function फंक्शनच्या डेमो ग्राफचा कोड बघू शकतो.
08:18 टर्मिनल बंद करा.
08:21 तसेच डेमो ग्राफ आणि डेमो विंडो बंद करा.
08:26 तसेच इतर डेमोज बघून गोष्टी समजून घ्या.
08:29 आता Subplot(सबप्लॉट) फंक्शन जाणून घेऊ.
08:33 subplot()(सबप्लॉट) फंक्शन ग्राफिक विंडो विभागून उपविंडोजचा मॅट्रिक्स तयार करते.
08:37 सायलॅबमधील plotting 2D graphs वरील डेमो वापरून हे फंक्शन जाणून घेऊ.
08:43 उदाहरणार्थ कन्सोलवर टाईप करा plot 2d आणि ह्या फंक्शनचा डेमो plot(प्लॉट) बघा.
08:58 ही विंडो बंद करू.
09:00 subplot()(सबप्लॉट) कमांड पहिली दोन अर्ग्युमेंटस घेऊन ग्राफिक विंडो विभागते. उपविंडोजचा 2 by 2 matrix तयार करते.
09:10 तिसरे अर्ग्युमेंट चालू विंडो दाखवते. जिथे आपल्याला प्लॉट काढायचा आहे.
09:15 सायलॅब कन्सोल वर ह्या सर्व कमांडस कॉपी करून त्या कार्यान्वित करू.
09:24 एका प्लॉट विंडोवर 4 प्लॉट्स बघू शकतो .
09:28 तयार प्लॉट संगणकावर इमेज म्हणून सेव्ह करता येतो.
09:32 graphic(ग्रॅफिक) विंडोवर क्लिक करा. File(फाइल) मेनूतील export toसिलेक्ट करा .
09:39 प्लॉटला योग्य नाव द्या.
09:50 जिथे फाईल सेव्ह करायची आहे तो फोल्डर सिलेक्ट करा.
09:54 आपल्याला इमेज ज्या फॉरमॅटमधे हवी आहे तो सिलेक्ट करा.
09:59 JPEG फॉरमॅट सिलेक्ट करून सेव्हवर क्लिक करा.
10:05 इमेज सेव्ह झाली की नाही हे पाहण्यासाठी डिरेक्टरीमधे जा.
10:11 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:15 सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ.
10:20 सायलॅब लिंक्स पाहात रहा.
10:22 स्पोकन ट्युटोरियल्स हा प्रॉजेक्ट "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग असून नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया अर्थसहाय्य मिळाले आहे.
10:29 अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
10:32 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana