PHP-and-MySQL/C2/Embedding-PHP/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:47, 24 July 2014 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Embedding PHP

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Time Narration
00:00 या ट्युटोरियलमध्ये आपण Php code आपल्या HTML code मध्ये कसा ठेवायचा हे शिकणार आहोत. याचा आपण अनेक ठिकाणी उपयोग करू शकतो.
00:14 उदाहरणार्थ येथे आपण Php tags बनवून Alex हे नाव echo करू या.
00:23 कार्यान्वित करण्यासाठी या फाईलवर क्लिक करा. Alex हे नाव आपल्याला दिसेल.
00:30 आता उदाहरणार्थ येथे आतमध्ये HTML code ठेवू या आणि Alex हे नाव बोल्ड टाईपमध्ये एको करू या.
00:38 आता हे उलट पध्दतीने करून बघू या.
00:45 चला. पुन्हा सुरूवात करू या. त्यासाठी HTML page बनवू या. आपले आधीचे उदाहरण वापरू या.
00:52 आता येथे आत Php tag समाविष्ट करू या. आणि Alex हे नाव echo करू या. Php tagsच्या बाहेर येथे bold आणि Php tagsच्या नंतर bold end समाविष्ट करू या.
01:13 आता रिफ्रेश केल्यावरही कुठलाही बदल न होता तोच रिझल्ट आपल्याला दिसेल.
01:20 मग आपण येथे बदल करून underline चा टॅग घालू या. आपल्याला Alex हे नाव underline झालेले दिसेल.
01:26 अशा प्रकारे हे आपण दोन्हीही पध्दतीने करू शकतो. एको करताना त्यात HTMLटॅग वापरायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. परंतु त्याचे इतरही काही फायदे आहेत.
01:39 जर तुम्ही HTMLशी परिचित असाल तर तुम्हाला हे माहित असेलच की input tag हा template tag आहे.
01:48 आता येथे टेक्स्ट असे टाईप करून name समोर name टाईप करा आणि त्याच्या व्हॅल्यू समोर Alex असे टाईप करा.
01:56 आता हे रिफ्रेश करा. आपल्याला Alexही व्हॅल्यू असलेला टेक्स्ट बॉक्स दिसेल. आता मी get variable header मिळवण्यासाठी Php चा वापर करणार आहे ज्यामुळे आपल्याला आपली input value मिळेल.
02:14 आपल्या व्हेरिएबल्सच्या मिळवलेल्या व्हॅल्यूज टेक्स्ट बॉक्समध्ये असणे काही केसेस मध्ये आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ form submission आणि error checking.
02:30 जर तुम्ही get व्हेरिएबलचे ट्युटोरियल पाहिले नसल्यास त्याबद्दल प्रथम जाणून घ्या.
02:38 आता हा कंस काही ओळी खाली घेऊ या. तरीही हा code यशस्वीरित्या कार्यान्वित होईल कारण ते त्याच पध्दतीने काम करणार आहेत.
02:48 म्हणजे आपल्याला दिसेल की आपण कुठलाच बदल केला नाही. आता मी येथे Php text समाविष्ट करणार आहे.
02:58 आता येथे आपल्याला वेगळाच brown colour दिसेल कारण आपण Php तील highlighting वापरत आहोत. जे फारसे परिचयाचे नाही.
03:08 आता आपण Alex हे नाव एको करू या.
03:12 हे केवळ एका ओळीवरच काम करत असल्यामुळे आपण हा संपूर्ण code एका ओळीतच घेऊन येऊ. अशा प्रकारे आपले embedding चे कार्य पूर्ण झाले आहे.
03:25 रिफ्रेश केल्यावर आपल्याला Alex ची व्हॅल्यू मिळेल. आपणHTML मधून Php तील व्हॅल्यू एको करत आहोत.
03:35 आपण येथे व्हॅल्यू मिळवण्यासाठी Php code वापरत आहोत.
03:40 आता येथे dollar underscore get आणि पुढे स्क्वेअर ब्रॅकेट टाईप करा आणि येथे सिंगल कोट्स मध्ये
03:50 name असे टाईप करून रिफ्रेश करा.
03:55 काहीच बदल झालेला नाही. म्हणून आता येथे name=Alex असे टाईप करा म्हणजे आपल्याला टेक्स्ट बॉक्समध्ये Alex ही व्हॅल्यू दिसेल.
04:04 आता येथे name=Kyle असे टाईप केल्यावर टेक्स्ट बॉक्समध्ये Kyle ही व्हॅल्यू दिसेल.
04:11 खरे तर आपण कुठलाही Php code येथे समाविष्ट करू शकतो.
04:16 जर आपण येथे echo Php infoहा code समाविष्ट केला तर आपल्याला खूप मजेशीर रिझल्ट मिळेल.
04:28 हा Php info डॉक्युमेंटचा HTML code आहे.
04:33 आपण बघू शकतो की येथे अनेक codeचा समावेश आहे.
04:37 आपण येथे केवळ Php embed करत आहोत. त्यामुळे आपल्याला सिंगल आणि डबल कोटसचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
04:46 अशा प्रकारे हे embedding Php code inside HTML code वरील प्राथमिक ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
04:53 आपल्याला याचा नक्की उपयोग होईल अशी आशा करू या. सहभागाबद्दल धन्यवाद.
04:56 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana