Java/C2/Logical-Operations/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:19, 17 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 Java मधील Logical Operators वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:07 येथे शिकू logical operators. या द्वारे,
00:11 multiple expressions तपासणे. तसेच parentheses वापरून precedence override करणे जाणून घेऊ.
00:20 यासाठी वापरत आहोत,

Ubuntu 11.10,

JDK 1.6 आणि

Eclipse 3.7

00:30 आपल्याला Java तील relational operators ची माहिती असायला हवी.
00:35 नसल्यास संबधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:40 एकापेक्षा जास्त conditions तपासण्यासाठी Logical operators वापरतात.
00:48 येथे Java मधील logical operatorsची सूची उपलब्ध आहे.
00:54 and, or, not. ह्या प्रत्येकाबद्दल सविस्तर जाणून घेऊ. Eclipse वर जाऊ.
01:04 हा Eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे.
01:10 आपण LogicalOperators क्लास बनवून त्यात main मेथड लिहिली आहे.
01:15 काही व्हेरिएबल्स बनवू.
01:20 boolean b;
01:23 आपण conditions चा रिझल्ट bमधे संचित करणार आहोत.
01:29 int age is equalto 11
01:35 int weight is equalto 42
01:42 आपल्याकडे व्यक्तीचे वय आणि वजन आहे.
01:46 व्यक्तीचे वय 18पेक्षा कमी आणि वजन किमान 40किलो आहे का ते तपासू.
01:52 कसे करायचे ते पाहू.
01:57 b is equal to age less than 18 ampersand ampersand weight greater than equal to 40
02:19 ह्यात दोन expressions असून त्यांच्या मध्ये ampersand ची दोन चिन्हे आहेत.
02:24 हे वय 18पेक्षा कमी आणि वजन 40किलो किंवा त्यापेक्षा जास्त आहे का ते तपासेल.
02:31 ह्या operation ला and operation म्हणतात.
02:35 आता b ची व्हॅल्यू प्रिंट करू .
02:40 System dot out dot println(b);
02:48 सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:56 दोन्ही conditions पूर्ण झाल्या असल्यामुळे true हे आऊटपुट मिळाले.
03:02 आता एक condition पूर्ण न होण्यासाठी weight बदलून कोड पुन्हा कार्यान्वित करू.
03:08 42 च्या जागी 32 करा.
03:14 सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:21 false हे आऊटपुट मिळाले.
03:24 कारण age less than 18 ही condition पूर्ण झाली आहे.
03:29 परंतु weight greater than or equal to 40 कंडिशन पूर्ण होत नाही.
03:34 true रिझल्टसाठी and operation च्या दोन्ही कंडिशन्स true असाव्या लागतात.
03:39 त्यामुळे false हे आऊटपुट मिळाले.
03:43 अशाप्रकारे दोन ampersand च्या चिन्हांचा वापर करून and operation करू शकतो.
03:53 समजा वय आणि वजन यापैकी कोणतीही एक कंडिशन पूर्ण होणे पुरेसे आहे.
03:59 येथे पहिली किंवा दुसरी condition true आहे ते पहायचे आहे.
04:05 हे or operationद्वारे करता येते.
04:09 प्रथम आधीची कंडिशन काढून टाका.
04:15 आणि टाईप करा,
04:17 age less than or equal to 15 pipe pipe weight less than or equal to 30
04:35 येथे दोन कंडिशन्स असून त्यामधे pipe ची दोन चिन्हे आहेत.
04:40 हे स्टेटमेंट दिलेल्या दोनपैकी किमान एक कंडिशन पूर्ण होते का ते तपासेल.
04:46 आऊटपुट बघण्यासाठी कोड कार्यान्वित करू. सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:54 True हे आऊटपुट दिसेल.
04:57 कारण or operationसाठी, and operation प्रमाणे दोन्ही कंडिशन्स true असणे गरजेचे नाही.
05:03 किमान एक कंडिशन true असणे गरजेचे आहे.
05:06 जरी वजनाची कंडिशन पूर्ण झाली नसली तरी वयाची कंडिशन पूर्ण झाली आहे.
05:13 त्यामुळे true हे आऊटपुट मिळाले.
05:18 आता वय अशाप्रकारे बदला ज्यामुळे दोन्ही कंडिशन्स false होतील आणि रिझल्ट पाहू.
05:25 11 च्या जागी 17 करा.
05:30 सेव्ह करून कार्यान्वित करा.
05:36 दोन्हीपैकी कुठलीही कंडिशन पूर्ण न झाल्यामुळे false आऊटपुट मिळाले.
05:41 अशाप्रकारे आपण or operation करण्यासाठी PIPE ची दोन चिन्हे वापरतो.
05:50 आता आपण15पेक्षा जास्त वयाचे आणि 30किलो पेक्षा जास्त वजनाचे लोक बघणार आहोत.
05:57 म्हणजेच जे आत्ता केले त्याच्या विरूध्द कंडिशन तपासायची आहे.
06:03 अशावेळी not operation वापरतात.
06:07 आधी कंडिशन parentheses मधे लिहा.
06:17 आणि त्या conditionच्या सुरूवातीला उद्गार चिन्ह काढा.
06:25 उद्गार चिन्हाद्वारे आपण parentheses मधे लिहिलेल्या कंडिशनच्या विरूध्द कंडिशन तपासतो.
06:32 आधीचे आऊटपुट false असल्यामुळे आता हे trueअसायला हवे. चला पाहू.
06:38 सेव्ह करून कार्यान्वित करा.
06:44 हे आऊटपुट आधीच्या विरूध्द आहे.
06:48 उद्गार चिन्हाद्वारे आपण not operation करू शकतो. समजा आपल्याला 15पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती हव्या आहेत.
06:58 किंवा ज्या व्यक्तींचे वय18 पेक्षा कमी आणि वजन 40किलो पेक्षा कमी आहे.
07:04 ही condition कशी लिहायची ते पाहू.
07:07 आधीची condition काढून टाईप करा.
07:12 age less than 15
07:15 or age less than 18
07:24 आणि weight less than 40
07:33 ही condition गोंधळात टाकणारी आहे.
07:36 तसेच आपल्याला माहित नाही की or operation प्रथम करायचे की and operation.
07:42 हे operatorsच्या precedenceवर अवलंबून असते.
07:46 अशा वेळी precedence ओव्हरराईड करण्यासाठी parentheses वापरल्याने कंडिशन स्पष्ट होते.
07:53 म्हणून parentheses समाविष्ट करू.
08:06 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू.
08:13 आता पहिली कंडिशन age less than 15 जरी पूर्ण झाली नसली तरी,
08:20 दुसरी conditionम्हणजेच,
08:22 age less than 18 आणि weight less than 40 ही पूर्ण झाली आहे.
08:27 त्यामुळे आऊटपुट true मिळाले.
08:30 नियमानुसार, गोंधळ टाळण्यासाठी parentheses वापरून expressions स्पष्ट करावेत.
08:36 अशाप्रकारे एकापेक्षा जास्त कंडिशन्स तपासण्यासाठी logical operators वापरतात.
08:44 आपण पाठाच्या अंतिम ट्प्प्यात आहोत.
08:47 आपण शिकलो logical operators, ते वापरून एका पेक्षा जास्त expressions तपासणे,
08:54 parenthesesवापरून precedence override करणे.
09:00 असाईनमेंट,
09:02 दिलेली दोनexpressions, समानअर्थी आहेत का तपासा.
09:10 प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:30 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:40 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:46 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:52 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble, Ranjana