Java/C2/Getting-started-Eclipse/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Getting-started-Eclipse
Author: Manali Ranade
Keywords: Java
Time | Narration |
00:01 | Getting started with Eclipse वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | आपण शिकणार आहोत, |
00:08 | eclipse मध्ये project आणि class बनवणे. |
00:12 | java program लिहिणे. |
00:14 | Eclipse मध्ये तो कार्यान्वित करणे. |
00:18 | आपण वापरणार आहोत,
|
00:25 | ह्यासाठी आपल्याकडे |
00:28 | system वर Eclipse install केलेले हवे . |
00:30 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटवर जा. |
00:39 | Eclipse हे Integrated Development Environment आहे. |
00:42 | ह्या टूलमध्ये java program लिहिता येतो, debug आणि कार्यान्वित करता येतो. |
00:50 | Eclipse उघडू. |
00:55 | Alt F2 दाबा. Dialog box मध्ये eclipse टाईप करून एंटर दाबा. |
01:08 | Workspace Launcher डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:11 | Workspace म्हणजे project चा डेटा आणि Eclipse च्या फाईल्स जिथे संचित करतात ती जागा. |
01:19 | येथे अगोदरच एक default location आहे. |
01:24 | browse ने दुसरी डिरेक्टरी निवडू शकतो. |
01:27 | default directory सहित पुढे जाऊ. |
01:30 | पुढे जाण्यासाठी OK क्लिक करा. |
01:39 | Welcome to Eclipse हे पेज उघडेल. |
01:46 | पानाच्या उजव्या कोप-यात वरती Workbench वर क्लिक करा. |
01:52 | हे Eclipse IDE आहे. आता project समाविष्ट करू. |
01:57 | File खालील New मधील Project सिलेक्ट करा. |
02:05 | Project च्या सूचीतून Java Project निवडा. |
02:10 | आपण अनेक ट्युटोरियल्ससाठी java project चा वापर करणार आहोत. Next क्लिक करा. |
02:19 | project नेममध्ये EclipseDemo टाईप करा. |
02:30 | use default location कडे लक्ष द्या. |
02:34 | हा पर्याय निवडला तर EclipseDemo project data हा default workspace मध्ये संचित होईल. |
02:41 | जर हा निवडलेल्या नसल्यास browse ने दुसरे location निवडता येते. |
02:47 | आपण Default location वापरू. |
02:52 | Wizard च्या तळाच्या उजव्या कोप-यात Finish वर क्लिक करा. |
03:00 | Open Associated Perspective हा dialog box उघडेल. |
03:04 | perspective म्हणजे Eclipse मधील विविध घटकांची रचना. |
03:09 | Dialog box , Java development साठी सोयीचा perspective सुचवीत आहे. |
03:20 | remember my decision सिलेक्ट करून Yes निवडा. |
03:28 | येथे project बरोबर EclipseIDE आहे. आता project मध्ये class समाविष्ट करू. |
03:37 | project वर राईट क्लिक करून new खालील class सिलेक्ट करा. |
03:46 | class name मध्ये DemoClass टाईप करा. |
03:55 | modifiers मध्ये public आणि default हे दोन पर्याय आहेत. |
03:59 | आपण public ठेवू. |
04:01 | दुसरा पर्याय नंतरच्या ट्युटोरियलमध्ये बघू. |
04:06 | method stubs च्या सूचीतून public static void main निवडा. |
04:15 | इतर पर्याय पुढील ट्युटोरियलमध्ये बघू. |
04:19 | wizard च्या उजव्या कोप-यात खाली असलेले Finish बटण क्लिक करा. |
04:30 | ही आपली class file आहे. |
04:35 | येथे अनेक partitions आहेत त्याला portlets म्हणतात. |
04:41 | Package Explorer portlet हे File Browser सारखे कार्य करते. |
04:46 | Editor portlet मध्ये आपण code लिहितो. |
04:50 | Outline portlet आपल्याला project ची hierarchy दाखवते. |
04:56 | प्रत्येक portlet चा आकार बदलता येतो. |
05:10 | त्यास minimize बटणाद्वारे minimize करता येते. |
05:26 | restore बटणाद्वारे ते परत आणता येतात. |
05:37 | इतर portlets minimize करून एडिटरकडे लक्ष देऊ. |
05:49 | Eclipse ने आपल्यासाठी येथे आधीच code तयार केला आहे. |
05:54 | हा code आपण class तयार करताना निवडलेल्या पर्यायांवर अवलंबून असतो. |
06:00 | येथे print statement समाविष्ट करू. |
06:08 | टाईप करा System.out.println ("Hello Eclipse"). |
06:26 | statement च्या शेवटी semicolon द्या . |
06:31 | File खालील Save वर क्लिक करून File सेव करा |
06:37 | विकल्पाने तुम्ही Control S हा shortcut ही वापरू शकता. |
06:42 | प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी एडिटरवर राईट क्लिक करा. run as वर जाऊन java application निवडा. |
06:56 | काही प्रिंट झाले तर Output आपल्याला output console वर दिसेल. |
07:04 | code मध्ये अडचण असल्यास Problems portlet मध्ये दाखवली जाते. |
07:10 | अशाप्रकारे Eclipse मध्ये Java program लिहिता आणि कार्यान्वित करता येतात . |
07:18 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:20 | या ट्यूटोरियल मध्ये आपण eclipse मध्ये प्रॉजेक्ट बनविणे आणि त्यामध्ये class समाविष्ट करणे, तसेच java source code लिहीणे आणि Eclipse मध्ये java प्रोग्राम कार्यान्वित करणे शिकलो. |
07:33 | Assignment म्हणून Display नावाचे नवे project बनवा. |
07:38 | Display project मध्ये Welcome नावाने class समाविष्ट करा. |
07:44 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:50 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:53 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
07:59 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:02 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:05 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:12 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:17 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:23 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:27 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद . |