Spoken-Tutorial-Technology/C2/Dubbing-a-spoken-tutorial-using-Audacity-and-ffmpeg/Marathi
Time | Narration |
00:00 | नमस्कार मित्रांनो. या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
आपण पाहू कि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एका भाषेतून दुसऱ्या भाषेत कसे डब करावे. |
00:10 | यासाठी तुम्हाला फक्त एक ऑडीओ इनपुट सहित हेडसेट किंवा माइक आणि स्पीकर्सची आवश्यकता आहे ज्यास कम्प्युटरशी जोडता येईल. |
00:19 | ऑड्यासिटी ध्वनि रेकॉर्ड आणि एडिट (संपादन) करण्याकरिता एक फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. |
00:24 | ते Mac OS X, Microsoft Windows, GNU/Linux, आणि अन्य ऑपरेटिंग सिस्टम साठी उपलब्ध आहे. |
00:32 | आपण निःशुल्क या साइट वरून डाउनलोड करू शकता audacity.sourceforge.net/download link |
00:39 | मी उबंटू 10.04 वर्जन ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करीत आहे. |
00:44 | मी आधीच Audacity 1.3 वर्जन डाउनलोड केले आहे आणि ते Synaptic Package Manager द्वारा माझ्या पीसी मध्ये स्थापित केले आहे. |
00:52 | सॉफ्टवेअर उबंटू लीनक्स मध्ये इंस्टाल कसे करावे यासाठी, |
00:57 | कृपया या वेबसाइटवर उपलब्ध उबंटू वरील स्पोकन ट्यूटोरियल्स पहा. |
01:02 | सर्वप्रथम तुम्हाला जे करणे आवश्यक आहे ते हे कि मूळ म्हणजे ओरिजिनल विडिओ एकणे. |
01:09 | त्यानंतर स्क्रिप्ट याप्रकारे अनुवाद करा कि प्रत्येक वाक्याचे नरेशन टाइम तोच असावा किंवा त्यापेक्षा कमी, जो मूळ स्क्रिप्टमध्ये त्या वाक्यासाठी आहे. |
01:18 | हे प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला टिप्पणी काढल्याने करता येऊ शकते. |
01:23 | जर तुम्ही हे प्रत्येक वाक्यासाठी करू शकत नाही, तर तुम्ही हे दोन वाकये जोडण्यासाठी वापरू शकता. |
01:29 | म्हणजे, जरी पहिल्या वाक्याच्या शेवटी काही ताळमेळ नसला, तरी तो सिंक, दुसरे वाक्य पूर्ण होताना बरोबर व्हावा. |
01:37 | काही शब्द किंवा वाक्य ओरिजिनल मधून स्कीप होणे संभव आहे. |
01:42 | परंतु त्याचा अर्थ बदलणार नाही याची खात्री करून घ्या. |
01:48 | आता आपण Audacityओपन करू, Applications वर क्लिक करा. |
01:54 | Sound&Video, आणि Audacity निवडून रन करा. |
01:58 | हे आपल्या स्क्रीनवर एक एम्प्टी प्रोजेक्ट ओपन करेल.
मेनू बार वर तुम्ही विविध विकल्प पाहू शकता जसे file (फाइल), edit (एडिट) , view (व्यू), transport (ट्रांसपोर्ट), tracks (ट्रैक्स) आणि इत्यादी. |
02:11 | आपण यातील काहिंबाबत शिकणार आहोत. मेन मेनूमध्ये, तुम्ही VCR कंट्रोल्स पाहू शकता
– Pause (पॉज़), Play (प्ले) , Stop (स्टॉप) , Rewind (रिवाइंड) , Forward (फॉरवर्ड), आणि Record (रेकॉर्ड) |
02:25 | यापुढे, Audio tools toolbar आहे. |
02:30 | यात selection (सिलेक्शन) टूल आणि Time shift (टाइम शिफ्ट) टूल आहे ज्यांचा आपण या ट्यूटोरियल मध्ये उपयोग करणार आहोत. |
02:36 | व्डिफॉल्ट द्वारेselection tool सक्रिय आहे. |
02:40 | आता एक डबिंग करू. मी Scilab वरील एक ट्यूटोरियल सुरु करेन , मैट्रिक्स ऑपरेशन जी इंग्रजीत आहे. |
03:03 | आणि मला Audacity वापरून ते मराठीत डब करायचे आहे. मी आधीच त्याचे भाषांतर केले आहे आणि वेळ,
वर उल्लेख केल्याप्रमाणे नोट केली आहे. |
03:14 | आता मी येथे रेकॉर्ड करणार आहे. रेकॉर्डींगसाठी, Record बटनवर क्लिक करा आणि नरेशन सुरु करा. |
03:22 | ( Scilab वापरल्याने मैट्रिक्स ऑपरेशनच्या या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्यूटोरियलच्या अभ्यासासाठी तुमच्या सिस्टम मध्ये Scilab स्थापित करणे आवश्यक आहे.) |
03:32 | रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी Stop बटन वर क्लिक करा. तुम्हाला दिसेल Audio timeline वर दोन स्टीरियो ट्रयाक्स आहेत जेथे नरेशन दिसते. |
03:43 | स्पाइक वेवफॉर्म्स आहेत. स्टीरियो ट्रयाक्स मध्ये डावीकडे एक सिंगल लेबल एरिआ आहे तसेच दोन वेवफॉर्म्स उजवीकडे आहे. |
03:50 | जे दोन इनपुट चॅनेल आहेत - लेफ्ट चॅनेल आणि राईट चॅनेल. |
03:56 | पूर्णपणे, एकाच वेळेत रेकॉर्ड करावे त्यामुळे तुम्हाला एक सिंगल ऑडियो ट्रॅक मिळेल.
लक्षात ठेवा कि या केस मध्ये वाक्यांमध्ये एक सेकंद थांबावे. |
04:08 | आता प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीच्या क्लिपला छोट्या क्लिप्स मध्ये विभाजित करा .
ऑडियो ट्रयाक्सना क्लिप्स मध्ये विभाजित करण्यासाठी CTRL+I शोर्टकट आहे. |
04:19 | मी येथे ऑडियो स्प्लिट करेन. क्लिप ट्रैक वर स्लाइड करा, वाक्याची टाइमिंग मॅच करण्यासाठी जो आपण पूर्वी नोट केला आहे. |
04:27 | time shift tool निवडा. पहा कि कर्सर आता द्विदिशी बाण असलेला आहे. |
04:33 | मी या टाइम वर क्लिप घेते. लक्षात असू द्या, कि आपल्याला विरुद्ध दिशेला जायचे आहे म्हणजे शेवटची क्लिपने सुरुवात करून पहिली वर यायचे आहे. |
04:42 | हे यासाठी, कारण जोपर्यंत आपण जागा बनवत नाही तोपर्यंत आधीची क्लिप स्वतःच्या जागेवरून निघत नाही. |
04:49 | पुढील नरेशन करण्यासाठी, टाइमलाइनच्या कुठल्याही एका चैनल वर क्लिक करा. |
05:01 | आता सुरू करण्यासाठी Record बटन वर क्लिक करा. आता बंद करण्यासाठी Stop बटन वर क्लिक करा. |
05:12 | हे दुसरे नरेशन दुसऱ्या स्टीरिओ ट्रैक मध्ये येईल. त्याप्रमाणे तुम्ही विविध नरेशन रेकॉर्ड करू शकता जो विविध ट्रैक्स मध्ये दिसेल. |
05:22 | आता आपण पाहू कि हि सर्व नरेशंस कशी जोडावी म्हणजे मर्ज करावी किंवा त्यांना एका ट्रैक वर कसे आणावे.
time shift tool निवडा. |
05:32 | ऑडियो क्लिप वर राइट क्लिक करून निवडा आणि त्यास पहिल्या ऑडियो ट्रैकच्या शेवटी ड्रैग आणि ड्रॉप करा.
असे सर्व क्लिप्ससाठी करा. |
05:43 | आपण लेबल एरिया मध्ये X बटन वर क्लिक करून एक ऑडियो ट्रैक काढू शकतो.
मी दुसरा ऑडियो ट्रैक काढून टाकते जो रिकामी आहे. |
05:51 | क्लिप्सना पहल्या ट्रैक वर स्लाइड करताना, वेळे कडे लक्ष द्या कि क्लिपचा प्रारंभ वेळ त्याच वाक्याच्या प्रारंभ वेळ सोबत मैच व्हावा, जसे नोट केले आहे. |
06:01 | एकदा आपण वाक्याच्या सुरुवातीच्या वेळे प्रमाणे समन्वय samanvayसाधला कि आपण आपला प्रोजेक्ट सेव करू शकतो.
यासाठी, file menu मध्ये जा आणि save project as वर क्लिक करा. |
06:15 | एक डाइअलॉग बॉक्स ओपन होईल. ok वर क्लिक करा. आता तो एक फाइल नेमसाठी विचारेल.
मी हे फाइल नाव देत आहे.hindi _matrix_operation. |
06:29 | पुढे ते स्थानासाठी विचारेल जेथे ते सेव करायचे आहे.
मी Desktop निवडेल आणि Save वर क्लिक करेन. हा प्रोजेक्टला .aup ( डॉट aup) म्हणून सेव करेल. |
06:41 | शेवटी, जो ऑडियो फॉर्मेट आवश्यक आहे त्यात फ़ाइनल प्रोजेक्ट एक्सपोर्ट करा जसे कि wav, mp3 आणि अन्य. |
06:49 | असे करण्यासाठी मेनू बार वर जा, File वर क्लिक करा.
Export ऑप्शन निवडा, त्यावर क्लिक करा. |
06:58 | ते एका फाइल नेम साठी विचारेल.
मी येथे हे नाव देईन scilab_ hindi_matrix_operation. |
07:06 | त्याबरोबर ही जेथे सेव करायची आहे ते स्थान दया. |
07:12 | पुढे सेव करण्यासाठी फॉर्मेट निवडा.
मी ogg फॉर्मेट वर क्लिक करेन , आणि मग सेव वर क्लिक करेन . |
07:21 | पुढे तुम्हाला Edit Metadata नावाचा एक बॉक्स मिळेल.
येथे तुम्ही आर्टिस्टचे नाव देऊ शकता आणि आवशक्यता असल्यास अन्य माहीतीही. |
07:29 | Ok वर क्लिक करा. हे तुमची फ़ाइनल ऑडियो फाइल बनवेल. |
07:35 | ffmpeg एक ओपन सोर्स ऑडियो आणि विडियो कनवर्टर आहे जो बऱ्याच प्रमाणित कोडेक्सचे समर्थन करतो.
तो सहज आणि सोप्या रीतीने एका फाइल फॉर्मेट मधून दूसऱ्या मध्ये बदलू शकतो. |
07:48 | ।http://ffmpeg.org/ मधून ffmpeg साठी सोर्स कोड डाउनलोड करू शकता. |
07:56 | डाउनलोड वर क्लिक करा. खाली स्क्रोल करा आणि उपयुक्त असेल तो निवडा. |
08:09 | लीनक्स मध्ये प्याकेज इंस्टाल कसे करावे हे शिकण्यासाठी, कृपया या वेबसाइट वर उपलब्ध उबंटूवरील स्पोकन ट्यूटोरियल्स पहा.
जेव्हा तुम्ही ffmpeg डाउनलोड आणि इंस्टाल कराल तेव्हा, |
08:21 | तुम्ही सरळ कमांड्स द्वारे विडियो किंवा ऑडियोला एका मीडिया फाइलशी वेगळे करू शकता किंवा
ऑडियो आणि विडियोना दोन वेगळ्या मीडिया फाइल्सना एका फाइलशी जोडू शकता. |
08:37 | चला टर्मिनल विंडो वर जाऊ. |
08:41 | मी pwd “present working directory”टाइप करून Enter प्रेस करते.
हि माझी प्रेसेंट वर्किंग डाइरेक्टरी दाखवते. ls कमांड प्रेसेंट डाइरेक्टरी मधील सर्व फाइल्स आणि फोल्डर्स दाखवते. |
08:56 | मी तिला डेस्कटॉप डाइरेक्टरी (Desktop directory) मध्ये बदलते आणि टेस्ट(Test) करते.
CTRL+L टर्मिनल स्क्रीन क्लिअर करण्यासाठी आहे. ls हि कमांड डाइरेक्टरी मधील फाइल्स दाखवण्यासाठी आहे. |
09:15 | आता मी येथे कमांड टाइप करते ffmpeg -i compiling.wmv TEST0.ogv |
09:30 | -i स्विच ffmpeg ला सांगतो कि यानंतर त्वरित जी फाइल आहे ती इनपुट फाइल आहे.
येथे compiling.wmv इनपुट फाइल आहे. |
09:42 | जर -i ऑप्शन सोडला तर ffmpeg त्या फाइलला ओवरराइट करते जेव्हा ती आउटपुट फाइल बनवण्याचा प्रयत्न करते. |
09:50 | ffmpeg आउटपुट फाइलच्या एक्सटेंशनच्या प्रयोगाने वापरण्यासाठी फॉर्मेट किंवा कोडेक ठरवते.
पण असे आपण कमांड लाइन परैमीटर्स वापरुन सुद्धा करू शकतो. |
10:03 | आपण यातील काही पाहू. हि कमांड विडियोला एका फॉर्मेट मधून दूसऱ्या मध्ये बदलण्यासाठी उपयोगी आहे. |
10:12 | हि कमांड कार्यान्वित करण्यासाठी Enter दाबा. पण मी हे स्कीप करते आणि पुढे जाते. |
10:18 | टर्मिनल विंडो मध्ये ffmpeg कमांड वापरून मूळ स्पोकन ट्यूटोरियल मधून विडियो घटक वेगळे करू शकता. |
10:26 | असे करण्यासाठी, टर्मिनल विंडो मध्ये हि कमांड टाइप करा - ffmpeg -i functions.ogv -an -vcodec copy TEST1.ogv |
10:45 | '-an' स्विच स्वयंचलितपणे आउटपुट मधून ऑडियो काढतो आणि फक्त विडियो कॉम्पोनेन्ट ठेवतो.
TEST1.ogv आउटपुट फाइल आहे. |
10:59 | Enterदाबा. आता आम्ही विडियो कॉम्पोनेन्ट वेगळा केला आहे म्हणजे विडियो मध्ये आता ओरिजिनल ऑडियो नाही. |
11:09 | चला Test फोल्डर उघडू. Test1.ogv येथे आहे.
मी हि फाइल प्ले करते. < 5-6 सेकंदा साठी प्ले करा,> |
11:25 | आता मी टर्मिनल विंडो पुन्हा क्लिअर करते.
आता कमांड टाइप करु - ffmpeg -i functions_hindi.ogv minus -vn -acodec copy TEST2.ogg |
11:54 | -vn स्विच आउटपुट मधून विडियो टाकतो आणि फक्त ऑडियो कॉम्पोनेन्ट ठेवतो.
हि कमांड कार्यान्वित करण्यासाठी Enters दाबा. |
12:04 | आता आपण ऑडियो वेगळा केला आहे म्हणजे आउटपुट मध्ये आता ओरिजिनल विडियो उप्लबद्ध नाही. |
12:12 | आता ते चेक करु. Test directory पुन्हा ओपन करू.
येथे TEST2.ogg आहे. आता हे प्ले करू. ठीक आहे. |
12:26 | मी हे बंद करते . टर्मिनल विंडो वर पुन्हा जाऊ.
CTRL+L प्रेस करून स्क्रीन क्लिअर करूया. |
12:35 | आता पाहू कशा प्रकारे ओरिजिनल ट्यूटोरियलच्या विडिओ सोबत सेव केलेला ऑडियो मर्ज करता येईल. |
12:42 | टर्मिनल मध्ये आपण टाइप करत आहोत - ffmpeg -i TEST1.ogv -i TEST2.ogg -acodec libvorbis -vcodec copy FINAL.ogv
Enter दाबा. |
13:20 | ते आता एनकोड करत आहे. आता मी टर्मिनल क्लिअर करते मी Test directory ओपन करते .
येथे FINAL.ogv आहे जी आपण सेव केली होती. |
13:34 | आता हि फाईल प्ले करू. <5-6 secs चालू ठेवा> सोपे आहे, नाही का ? |
13:46 | आता, ओरिजिनल स्पोकन ट्यूटोरियलच्या उपलब्ध ऑडिओ एवजी डब केलेल्या ऑडिओला एडिटिंग प्याकेजच्या सहाय्याने वापरू शकता जसे KdenLive, Kino, LiVES आणि अन्य. |
13:59 | आमच्या डबिंग सहयोगींसाठी काम सुलभ व्हावे म्हणून, आम्ही Python मध्ये एक GUI एप्लीकेशन बनवण्याच्या प्रक्रियेत आहोत, |
14:06 | जी वर दिलेल्या साऱ्या ffmpeg कमांड्सना कार्यान्वित करते. त्या आहेत Extract Audio, Extract Video आणि Merge. |
14:15 | यासाठी एप्लीकेशन आणि स्पोकन ट्यूटोरियल लवकरच या वेबसाइट वर उपलब्ध होईल. |
14:22 | आतासाठी एवढे पुरे. चला ह्या ट्यूटोरियलचा सारांश पाहू.
Synaptic Package Manager द्वारे Audacity इंस्टाल करा. |
14:30 | ओरिजिनल ट्यूटोरियल ऐका आणि प्रत्येक वाक्याची सुरुवातीची वेळ नोट करा.
ऑड्यासिटी ओपन करा. नरेशन सुरू करा आणि लक्ष द्या कि वाक्यांमध्ये उपयुक्त पॉज़ असेल. आदर्शपणे, सलग रेकॉर्ड करा. |
14:44 | ऑडिओ वाक्यांमध्ये स्प्लिट करा.
शेवटून सुरुवात करत नोट केलेल्या टाइमिंगला मैच करण्यासाठी क्लिप्सना स्लाइड करा. |
14:52 | जेव्हा हे होईल, तेव्हा ऑडियो ogg फॉर्मेट मध्ये सेव करा.
ffmpeg कमांड्स वापरून ओरिजिनल ट्यूटोरियलने विडिओ वेगळा करा. |
15:04 | डब केलेला ऑडियो आणि पृथक विडिओ मर्ज करा याने डब्बड ट्यूटोरियल तयार होईल. |
15:11 | स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा talk to teacher प्रोजेक्टचा भाग आहे
जो www.spoken-tutorial.org द्वारा समन्वित आहे आणि आई आई टि बॉम्बे द्वारा विकसित केला आहे. |
15:25 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
15:34 | या बद्दल अधिक माहिती http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro ]. |
15:47 | सहभागासाठी धन्यवाद. |