LibreOffice-Suite-Base/C4/Access-data-sources/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | LibreOffice Base वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:04 | आपण शिकणार आहोत, |
00:08 | इतर डेटा सोर्सेस access करणे |
00:10 | .odb databases रजिस्टर करणे |
00:15 | डेटा सोर्सेस बघणे |
00:17 | आणि Writer मध्ये डेटा सोर्सेसचा वापर. |
00:22 | Base मधे इतर डेटा सोर्सेस कसे access करायचे ते पाहू. |
00:28 | Libre Office हे Base डेटाबेसेस व्यतिरिक्त इतर डेटा सोर्सेस access करण्याची मुभा देते. |
00:37 | ते इतर Libre Office documents मध्ये जोडण्याची परवानगी देते. |
00:43 | उदाहरणार्थ LibreOffice Base मधून स्प्रेडशीट किंवा साधे टेक्स्ट डॉक्युमेंट access करू शकतो. |
00:53 | आणि ते LibreOffice Writer डॉक्युमेंट मध्ये जोडू शकतो. |
00:58 | उदाहरणार्थ LibreOffice Calc च्या सहाय्याने एक spreadsheet बनवू. |
01:06 | Start मेनूतील All Programs वर क्लिक करून LibreOffice Suite मेनू उघडा. |
01:16 | जर LibreOffice आधीच उघडलेले असेल तर नवी स्प्रेडशीट उघडण्यासाठी File मेनूतील New आणि नंतर Spreadsheet वर क्लिक करा. |
01:30 | spreadsheet मध्ये येथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे sample data टाईप करू. <pause> |
01:46 | ही स्प्रेडशीट डिरेक्टरी लोकेशनमध्ये ‘LibraryMembers’ नावाने सेव्ह करा. |
01:54 | ही फाईल नंतर आपल्या उदाहरणात वापरायची असल्याने हे लोकेशन लक्षात ठेवा. |
02:02 | Calc window बंद करू. |
02:07 | ही स्प्रेडशीट Base मधून कशी access करायची ते पाहू. |
02:15 | Windows Start मेनूतून Base उघडा. |
02:25 | जर LibreOffice आधीच उघडलेले असेल तर File मेनूतील New आणि नंतर Database वर क्लिक करा. |
02:36 | ह्याने Database Wizard उघडेल. |
02:39 | येथे ‘Connect to an existing database’ वर क्लिक करू. |
02:45 | नंतर dropdown वर क्लिक करा. |
02:48 | Base ला access करता येणारे विविध डेटाबेस सोर्सेस ह्या सूचीत पाहू शकतो. |
02:55 | येथे Spreadsheet वर क्लिक करू. |
02:59 | Next वर क्लिक करू. |
03:02 | browse च्या सहाय्याने पूर्वी सेव्ह केलेली spreadsheet शोधू. |
03:10 | spreadsheet ला पासवर्ड असल्यास तो प्रदान करणे आवश्यक आहे. |
03:16 | येथे त्याची गरज नाही. |
03:19 | Next वर क्लिक करा. |
03:22 | आता डेटा सोर्स म्हणून ही spreadsheet रजिस्टर करू. |
03:27 | एडिट करण्यासाठी ती उघडा. |
03:32 | Finish वर क्लिक करा. |
03:36 | येथे database चे नाव देऊ या. टाईप करा LibraryMembers. |
03:44 | लक्ष द्या, ही ODF डेटाबेस म्हणून सेव्ह होत आहे. आपला नेहमीचा टाईप .odb आहे. |
03:56 | ही spreadsheet असलेल्या जागीच सेव्ह करा. |
04:01 | अशाप्रकारे Base मध्ये spreadsheet डेटा सोर्स म्हणून रजिस्टर केली. |
04:07 | आता आपण मुख्य Base window मध्ये आहोत. |
04:11 | डाव्या पॅनेलमधील Tables icon वर क्लिक करा. |
04:16 | ‘Sheet1’, Sheet2, आणि Sheet3 ह्या टेबल्सकडे लक्ष द्या. |
04:23 | Sheet1 उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. हा spreadsheet मधील डेटा आहे. |
04:31 | Spreadsheet access करण्याच्या पध्दतीत आपण येथून कुठलेही बदल करू शकत नाही. |
04:39 | येथे केवळ डेटा पाहता येतो, queries आणि उपलब्ध डेटाच्या आधारे रिपोर्ट बनवू शकतो. |
04:47 | बदल करायचे असल्यास ते थेट Spreadsheet मधेच करावे लागतात. |
04:54 | .odb डेटाबेसेस रजिस्टर करणे. |
04:59 | OpenOffice.org सारखे इतर काही प्रोग्रॅम आहेत जे .odb databases बनवू शकतात. |
05:11 | LibreOffice Base मध्ये वापरण्यासाठी ते प्रथम बेसमध्ये रजिस्टर करणे आवश्यक आहे. |
05:19 | कुठलाही .odb database रजिस्टर करण्यासाठी Base उघडणे आवश्यक आहे. |
05:28 | Tools, Options, LibreOffice Base आणि Databases निवडा. |
05:36 | Registered Databases खाली New क्लिक करा. |
05:42 | डेटाबेस कुठे आहे ते शोधा. रजिस्टर केलेले नाव बरोबर असल्याची खात्री करा. |
05:51 | Ok वर क्लिक करा. |
05:55 | आता LibreOffice मध्ये Data sources कसे बघायचे ते शिकू. |
06:01 | त्यासाठी Base मध्ये आपण रजिस्टर केलेल्या spreadsheet चा वापर करू. |
06:07 | ही LibreOffice Writer किंवा Calc मध्ये वापरू शकतो. |
06:12 | उदाहरणार्थ LibreOffice Writer मध्ये कशी बघायची ते शिकू. |
06:19 | प्रथम Base window मधून Writer उघडा. |
06:24 | File खालील New आणि नंतर Text document वर क्लिक करा. |
06:33 | आपण Writer window मध्ये आहोत. |
06:36 | उपलब्ध डेटा सोर्सेस बघण्यासाठी वरील View मेनू आणि Data Sources वर क्लिक करा. |
06:46 | किंवा F4 हे बटण दाबा. |
06:52 | आता डावीकडे वरती रजिस्टर केलेल्या databases ची सूची दिसेल ज्यामध्ये आत्ता बनवलेल्या LibraryMembers चा समावेश आहे. |
07:03 | database बघण्यासाठी database name च्या डावीकडे असलेल्या प्लस चिन्हावर क्लिक करून ते उघडू. |
07:14 | आपण Tables उघडू. |
07:18 | येथे Sheet1, 2 आणि 3 आहेत. |
07:24 | Sheet 1 वर क्लिक करा. |
07:28 | Writer window च्या उजवीकडे वरती डेटा दिसत आहे. |
07:36 | हा डेटा आपल्या Writer document मध्ये कसा वापरायचा ते पाहू. |
07:43 | समजा वरील टेबलमधील सर्व डेटा वापरायचा आहे. येथील सर्व records सिलेक्ट करा. |
07:55 | पहिल्या record मधील पहिल्या कॉलमच्या डावीकडील gray cell वर क्लिक करा. |
08:05 | नंतर Shift दाबून शेवटच्या रेकॉर्डमधील पहिल्या कॉलमच्या डावीकडील gray cell वर क्लिक करा. |
08:17 | सर्व डेटा हायलाईट झालेला दिसेल. |
08:21 | आता क्लिक करून हे Writer document मध्ये खाली drag करून सोडून द्या. |
08:30 | पुढे Insert Database columns असे शीर्षक असलेली popup window दिसेल. |
08:37 | येथे वरील Table option वर क्लिक करा. |
08:42 | नंतर सर्व फिल्डस डावीकडून उजवीकडे स्थलांतरित करण्यासाठी double arrow वर क्लिक करा. |
08:52 | येथे अनेक पर्याय दिसतील. |
08:56 | आता Ok वर क्लिक करा. |
09:00 | संपूर्ण डेटा असलेले टेबल document मध्ये आले आहे. |
09:05 | पुढे स्वतंत्र फिल्डस कशी समाविष्ट करायची ते पाहू. |
09:13 | Writer document च्या वरील भागात जाऊन दोन वेळा Enter दाबा. पुन्हा डावीकडे वर जा. |
09:22 | येथे टाईप करा Member Name colon. |
09:28 | नंतर उजवीकडे वर असलेल्या डेटा सोर्सेस भागातील Name ह्या column वर क्लिक करा. |
09:36 | नंतर क्लिक करून टाईप केलेल्या text पुढे drag करून drop करा. |
09:43 | tab दाबा आणि Phone number colon असे टाईप करा. |
09:51 | आता पुढील क्रिया माहीतच आहे. |
09:55 | टाईप केलेल्या टेक्स्टपुढे Phone ह्या column वर drag करून drop करा. |
10:04 | पहिले record हायलाईट करण्यासाठी त्याच्या डावीकडील gray cell वर क्लिक करा. |
10:13 | नंतर Data to Fields ह्या icon वर क्लिक करा. |
10:19 | तो वरील Formatting toolbar च्या खाली असलेल्या Table Data toolbar मध्ये मिळेल. |
10:27 | आता Writer document मध्ये टेबलमधील data बघता येईल. |
10:35 | दुसरे record मिळवण्यासाठी केवळ वेगळा रेकॉर्ड हायलाईट करा आणि ‘Data to Fields’ हा icon पुन्हा वापरा. |
10:46 | अशाप्रकारे LibreOffice documents मध्ये डेटा सोर्सेस वापरण्यास शिकलो. |
10:54 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:01 | आपण शिकलो, |
11:05 | इतर डेटा सोर्सेस access करणे |
11:07 | .odb databases रजिस्टर करणे |
11:12 | डेटा सोर्सेस बघणे |
11:14 | Writer मध्ये डेटा सोर्सेसचा वापर. |
11:19 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:23 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:30 | ह्या प्रॉजेक्टचे संयोजन http://spoken-tutorial.org ने केले आहे. |
11:35 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:40 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
11:44 | सहभागासाठी धन्यवाद . |