Xfig/C2/Feedback-control-diagram/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:08, 14 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | एक्सफिग वापरून फीडबॅक डाईग्राम तयार करणे या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | ब्लॉक डाईग्राम क्रियेशन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आम्ही खालील डाईग्राम बनवीलेला आहे. |
00:14 | आपण यास ब्लॉक ट्यूटोरियल म्हणूया. |
00:18 | कृपया या ट्यूटोरियल ची सुरवात करण्यापूर्वी ब्लॉक्स ट्यूटोरियल व्यवस्तीत समजून घ्या. |
00:22 | या ट्यूटोरियल मध्ये, आम्ही या पेज वर दाखविल्या प्रमाणे ब्लॉक डाईग्राम कसा तयार करायचा हे समजावु. |
00:31 | मी एक्सफिग वर्जन 3.2, पॅच लेवल 5 वापरेल. |
00:37 | आपण block.fig (ब्लॉक.फिग) ने सुरवात करू जे ब्लॉक्स ट्यूटोरियल मध्ये बनविले होते. |
00:43 | चला एक्सफिग वर जाऊ. |
00:47 | 'फाइल' नंतर 'ओपन' निवडू. |
00:52 | entry (एंट्री) बॉक्स मध्ये, block (ब्लॉक) एंटर करा आणि open (ओपन') दाबा किंवा “block.fig” (ब्लॉक.फिग) वर डबल क्लिक करा. |
01:04 | file (फाइल) वरील “save as” पर्याय वापरुन आपण हे फिगर feedback(फीडबॅक) नावाने सेव करू. |
01:24 | आपल्याकडे आता feedback.fig '(फीडबॅक.फिग) फाइल आहे. |
01:28 | “grids” (ग्रिड्स) वर क्लिक करून ग्रिड्स टाकु. |
01:34 | कॅन्वस, वर किंवा खाली करण्यास उजव्या बाजूचा स्क्रोल बार वापरु शकता. |
01:41 | प्रत्येक माउस बटन ना चे कार्य वर उजव्या बाजूला दाखविले आहे. |
01:46 | हि भूमिका तुमच्या क्रियेवर अवलंबुन आहे. |
01:49 | यास उदाहरणासह स्पष्ट करण्यास मी माउस उभ्या “स्क्रोल बार वर घेते. |
01:55 | डाव्या बटना पुढील टिप पहा. |
01:59 | मी हे दाखविण्यास माउस हलवू शकत नाही कारण, जर मी स्क्रोल बार वरुन कर्सर हालवेल तर बटना ची भूमिका बदलेले. |
02:08 | लेफ्ट बटन कॅन्वस ला वर घेते आणि राइट बटन खाली. |
02:17 | डावे किंवा उजवे बटन क्लिक करण्याशिवाय, आपण “centre बटनावर क्लिक करून कॅन्वस वर किंवा खाली ड्रग करू शकतो. |
02:31 | याप्रमाणे, तुम्ही वरील स्क्रोल बार वापरुन कॅन्वस ला उजव्या किंवा डाव्या बाजूला हलवू शकता. |
02:44 | आता मी मिड्ल बटना वर क्लिक करेल, कॅन्वस पकडून आणि ड्रॅग करून बॉक्स ला मध्यभागी आणेल. |
02:57 | जसे मी माउस सोडते, बॉक्स मध्य भागी येतो. |
03:03 | चला आता या बॉक्स ने सुरवात करून फीडबॅक डाइग्राम तयार करू. |
03:08 | हा बॉक्स कॉपी करू. |
03:13 | बॉक्स वर क्लिक करून त्यास निवडा. |
03:16 | माउस ला नवीन जागेवर घेऊन क्लिक करा |
03:27 | आता काही टेक्स्ट टाकु. |
03:29 | आता “Text box”(टेक्स्ट बॉक्स) वर क्लिक करू, जे डाव्या बाजूच्या पॅनल वरुन 'T' द्वारे निर्देशित आहे. |
03:37 | टेक्स्ट चा आकार निवडू. |
03:43 | माउस ला वॅल्यू बॉक्स वर घ्या आणि 16 एंटर करा. |
03:51 | “Set” (सेट) वर क्लिक करा. |
03:53 | आट्रिब्यूट्स पॅनल, मधील “Text Just” ( “टेक्स्ट जस्ट”) बटनावर क्लिक करू. |
04:02 | सेंटर अलाइनमेंट निवडू. |
04:05 | पहिल्या बॉक्स च्या मध्य भागी क्लिक करू. |
04:11 | ओहो, मी बरोबर स्थान निवडलेले नाही. |
04:15 | कर्सर काढून टाकण्यासाठी मी वेगळ्या स्थानावर क्लिक करेल. |
04:19 | त्या नंतर मी बरोबर स्थानावर क्लिक करेल. |
04:27 | “Control” (कंट्रोल) हा टेक्स्ट टाइप करून माउस क्लिक करा. |
04:35 | आता आपल्याला बाणा सह काही ओळी एंटर करायच्या आहेत. |
04:40 | “polyline ” (पॉलीलाइन) बटन निवडू. |
04:43 | आट्रिब्यूट्स पॅनल वरुन “Arrow Mode” (एरॉ मोड) बटन निवडून दुसरा पर्याय निवडू. |
04:53 | “Arrow Type” (एरॉ टाइप) बटन आणि arrow head (एरॉ हेड) वर क्लिक करू. |
05.00 | अशा एका पॉइण्ट वर क्लिक करा जेथून तुम्हाला ओळीची सुरवात करायची आहे. |
05:08 | हव्या असलेल्या ओळी च्या अंतिम भागावर माउस आणा. |
05:14 | आता मधल्या माउस बटना सह तेथे क्लिक करू. |
05:20 | ओळ बाणा सह तयार झाली आहे. |
05:25 | मला एक वर्तुळ (circle)ठेवायचा आहे. |
05:27 | डाव्या बाजूच्या पॅनल वरुन “circle on the left” निवडू. |
05:33 | आपण यास पहिल्या बॉक्स च्या डाव्या बाजूस ठेऊ. |
05:37 | माउस क्लिक करा. जसे मी माउस सरकवेल वर्तुळ मोठा होईल. |
05:47 | जेव्हा आपल्याला बरोबर आकार मिळेल तेव्हा माउस चे बटन सोडू. |
05:54 | ओहो... मला हवा असलेल्या वर्तुळा पेक्षा हा वर्तुळ मोठा आहे. |
05:57 | मी या क्रियेला वरील एडिट बटन वापरुन undo (अंडू) करू शकते. |
06:02 | आपण डाव्या बाजूच्या पॅनल वरील डिलीट बटन वापरुन हा ऑब्जेक्ट डिलीट ही करू शकतो. |
06:10 | हे आता करूया. |
06:14 | क्रॉस हेयर्स सह हाडांचा सापळा दिसेल. |
06:18 | सर्व आब्जेक्ट्स चे की पॉइण्ट्स ही दिसतील. |
06:22 | क्रॉस हेयर्स ला की पॉइण्ट्स वर घेऊन जा, जे वर्तुळ दर्शित करते आणि क्लिक करा. |
06:32 | समजा चुकीचा ऑब्जेक्ट डिलीट झाल्यास चिंता करण्याची गरज नाही. |
06:35 | तुम्ही यास अंडू करू शकता: edit (एडिट) बटना वर क्लिक करा. माउस पकडा, Undo (अंडू) वर जा आणि माउस सोडा. |
06:44 | काही ऑब्जेक्ट्स जवळ ठेवल्यास त्यांना निवडण्यास त्रास होऊ शकतो. |
06:49 | तुम्ही ही समस्या zoom (झूम) फीचर द्वारे सोडवू शकता. |
06:55 | डाव्या बाजूला वरील “View” (व्युव्ह )बटना वर क्लिक करा. त्यास पकडून एखादा ज़ूम पर्याय निवडा. |
07:00 | मी “Zoom to fit the canvas” वर येऊन माउस सोडते. |
07:04 | आता ऑब्जेक्ट्स मध्ये फरक करणे सोपे आहे. |
07:08 | आता मी वर्तुळ डिलीट करते. |
07:12 | अनझूम करू. |
07:20 | स्क्रोल बटन्स चा वापर करून मी डाइग्राम मध्य भागी घेणार आहे. |
07:35 | मला डिलीट सिंबल ऑन ठेवणे आवडत नाही, कारण, चुकीने माझ्याकडून काही डिलीट होऊ शकते. |
07:41 | मी कोणतेही दुसरे बटन निवडून यास बदलू शकते. |
07:44 | मी डावे वर्तुळ निवडते. |
07:47 | मी पुन्हा वर्तुळ काढते. |
08:00 | मला या ओळीवरुन आणखीन एक ओळ टाकायची आहे. |
08:04 | या साठी अगोदर आपण ओळी वर डॉट (“dot”) टाकु. |
08:07 | डाव्या बाजूच्या पॅनल वरील library (लाइब्ररी) वर क्लिक करू. |
08:11 | लाइब्ररी पुस्तकांच्या ढिगा द्वारे दर्शविलेली आहे. |
08:15 | एक डायलॉग विंडो उघडेल. |
08:17 | लाइब्ररी च्या बाजूला “None Loaded” (“नन लोडेड”) सांगत आहे. |
08:20 | त्यावर क्लिक करून पकडून ठेवा. |
08:22 | उपलब्ध लाइब्ररी ची सूची दिसेल. |
08:25 | माउस ला “Logic library” (लॉजिक लाइब्ररी) वर घेऊन जा आणि सोडा. |
08:31 | स्मॉल डॉट (लहान बिंदू) वर डबल क्लिक करून त्यास निवडा. |
08:36 | डायलॉग विंडो बंद होईल. |
08:38 | आपण लहान डॉट सोबत क्रॉस हेअर पाहत आहोत. |
08:42 | क्लिक करून डॉट ला ओळी वर ठेऊ. |
08:51 | कर्सर आणि लहान डॉट पुन्हा दिसत आहे आणि सुचवत आहे की, आपण यास इतर स्थानावर ही ठेऊ शकतो. |
08:57 | आपल्याला तो डॉट इतर स्थानावर ठेवायचा नाही. |
09:00 | माउस चे उजवे बटन क्लिक करून यास बंद करू. |
09:05 | उजवे बटन undo (“अंडू”) चे कार्य करते. |
09:08 | या मध्ये, डॉट ची निवड काढून टाकली आहे. |
09:10 | चला या डॉट पासून वर्तुळ पर्यंत ओळ कढूया. |
09:15 | polyline(पॉलीलाइन ) निवडू. |
09:18 | अगोदरच्या निवडी जसे की, “arrow mode” (एरॉ मोड) आणि “arrow type” (एरॉ टाइप) लक्षात ठेवल्या आहेत. |
09:24 | एक्सफिग एक सेशन मध्ये पॅरमीटर वॅल्यूस लक्षात ठेवतो. |
09:28 | डॉट वर क्लिक करा. |
09:34 | माउस ला खाली घ्या आणि क्लिक करा. |
09:41 | माउस ला डाव्या बाजूला , वर्तुळाच्या खाली पोहेचेपर्यंत वळवा, क्लिक करा. |
09:47 | माउस ला वर्तुळा वर घ्या आणि माउस च्या मधल्या बटना वर क्लिक करा. |
09:54 | वर्तुळाच्या डाव्या बाजूला, कॉपी द्वारे आणखीन एक ओळ काढू. |
10:08 | एक्सफिग च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात असलेले “file button” ( “फाइल बटन”) वापरुन ही आकृती “save” (सेव ) निवडून सेव करू. |
10:19 | आता फाइल ला एक्सपोर्ट करू. |
10:22 | पुन्हा एकदा file(फाइल) बटना वर क्लिक करू आणि “export” (एक्सपोर्ट)निवडू. |
10:30 | आता “language”(लॅंग्वेज) निवडू आणि नंतर “PDF”. |
10:36 | आपल्याला “feedback.pdf” फाइल मिळेल. |
10:43 | “open feedback.pdf” या कमांड द्वारे फाइल उघडू. |
10:56 | आपल्याकडे आपल्याला हवा असलेला ब्लॉक डाइग्राम आहे. |
11:00 | आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे. |
11:04 | तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे. |
11:08 | ब्लॉक मध्ये वेग वेगळे ऑब्जेक्ट ठेवा. |
11:13 | रोटेट आणि फ्लिप या क्रिया करण्याचा प्रयत्न करा. |
11:19 | एडिटर मधील feedback.fig ( फीडबॅक.फिग),फाइल पहा आणि विविध घटक ओळखा. |
11:25 | लाइब्ररी चा वापर करून , संपूर्ण वेगळा ब्लॉक डाइग्राम तयार करा. |
11:32 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे. |
11:44 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:53 | आम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सहभागाचे स्वागत करतो. |
11:57 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |