Geogebra/C2/Introduction-to-Geogebra/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Introduction to Geogebra
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: Geogebra
Time | Narration
|
---|---|
00:00 | Geogebra च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. येथे आपण Geogebra या सॉफ्टवेअरची प्राथमिक माहिती करून घेणार आहोत. |
00:09 | Geogebra हे गणिताचे विनामूल्य सॉफ्टवेअर www.geogebra.org वरून डाऊनलोड करता येते. |
00:17 | याद्वारे बीजगणितातील समीकरणे आणि भौमितिक आकृत्या यांचा परस्पर संबंध बघता येऊ शकतो. |
00:25 | यात भूमिती, बीजगणित व Calculus यांची सांगड घातली आहे. याद्वारे आकृत्या, समीकरणे चलसंख्या, सदिश राशींवर काम करता येते. |
00:35 | Geogebra सुरू करण्यासाठी आपण Linux operating system Ubuntu Version 10.04 LTS आणि Geogebra Version 3.2.40.0 चा वापर करणार आहोत. |
00:47 | जर आपण Geogebra इन्स्टॉल केले असेल तर Ubuntu मेनू आयटम वरील Applications मधील एज्युकेशन किंवा सायन्स वर क्लिक करून Geogebra Application वर जा. |
00:58 | जर आपण Geogebra इन्स्टॉल केलेले नसेल तर ते करण्यासाठी सिस्टीम वर जाऊन administration, synaptic package Manager मध्ये जा. |
01:08 | आता आपण Geogebra विंडोची माहिती करून घेऊ. येथे मी तुम्हाला menu bar, tool bar आणि tool view तसेच graphics view आणि algebra view, input bar आणि commands यांची थोडक्यात माहिती देणार आहे. |
01:20 | Geogebra विंडो अशा प्रकारची असते. इथेही इतर विंडोज application प्रमाणे स्टँडर्ड मेनूबार असतो. |
01:28 | Geogebraचा टूलबार हा एखाद्या कंपास बॉक्सप्रमाणे आहे. |
01:32 | tool view मध्ये कोणते टूल निवडले आहे हे तुम्ही पाहू शकता. |
01:36 | graphics view हे Geogebraचे ड्रॉईंग पॅड आहे. ह्या पॅडवर तुम्ही भौमितिक आकृत्या काढू शकता. |
01:42 | हा algebra view आहे. ह्या विंडोमध्ये तुम्ही ड्रॉईंग पॅडवर काढलेल्या सर्व भौमितिक आकृत्यांची बीजगणितीय समीकरणे पाहू शकता. |
01:50 | तुम्ही input bar मध्ये समीकरणे लिहू शकता. ही समीकरणे तुम्हाला ड्रॉईंग पॅड तसेच algebra view मध्ये दिसू शकतात. |
01:59 | यात वापरल्या जाणा-या कमांडस input barमधील ड्रॉपडाऊन मध्ये उपलब्ध आहेत. |
02:05 | Geogebraमधील ड्रॉईंग पॅड आपल्याला नेहमी दिसत राहते. ते बंद करता येत नाही. |
02:10 | ड्रॉईंग पॅड वर ग्रीड चा उपयोग करण्यासाठी view मध्ये जाऊन ग्रीड हा पर्याय निवडा. |
02:17 | त्याचप्रमाणे आपल्याला axes viewनको असल्यास तो ऑप्शन अनचेक करू शकतो. ह्या ट्युटोरियलसाठी आपण axes आणि grid viewचा उपयोग करणार आहोत. |
02:25 | त्याचप्रमाणे जर आपल्याला input bar किंवा algebra view बंद करायचा असल्यास view मेनूमध्ये जाऊन हे दोन्ही ऑप्शन अनचेक करता येतात. ह्या ट्युटोरियलमधे आपण input bar बंद करू या. |
02:38 | आता आपण टूल बार म्हणजेच कंपास बॉक्स बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. एखादे टूल वापरण्यासाठी त्या आयटमवर क्लिक करा. |
02:47 | क्लिक केल्यावर त्याभोवती सिलेक्शन दाखवणारी dark blue border आलेली दिसेल. व शेजारी tool view मध्ये टूलचे नाव व वापरण्याची पध्दत सांगितली जाते. |
02:59 | मूव्ह ड्रॉईंग पॅड हा टूल आयटम सर्वात उजव्या बाजूला आहे. त्यावर क्लिक करा आणि मग ड्रॉईंग पॅडवर क्लिक करा. माऊसचे डावे बटण दाबून ठेवून ड्रॉईंग पॅड तुम्हाला हव्या त्या ठिकाणी नेऊन ठेवा. |
03:13 | आपण कंपास बॉक्समधल्या पेन्सिलच्या सहाय्याने बिंदू काढू शकतो. |
03:19 | ही पेन्सिल टूल्स आहेत. टूलच्या कोप-यातील छोट्या लाल रंगाच्या त्रिकोणावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व पेन्सिल किंवा पॉईंट टूल्स बघायला मिळतील. |
03:29 | त्याचप्रमाणे पुढचा टूल्सचा संच हा रेषेसंबंधीचा आहे. त्याच्यापुढे लंब आणि दुभाजक, बहुभुजाकृती आणि वर्तुळ इत्यादी टूल्स आहेत. |
03:42 | या ट्युटोरियलमध्ये आपण बिंदू, रेषाखंड, समांतर आणि लंब रेषा काढणे, घटकांचे मापन, त्यातील बदल, प्रॉपर्टीज आणि फाईल सेव्ह करण्याबद्दल जाणून घेणार आहोत. |
04:01 | आता एक बिंदू काढू या. न्यू पॉईंट या पर्यायावर क्लिक करून मग ड्रॉईंग पॅडवर कुठेही क्लिक करा. तुम्हाला नवीन बिंदू मिळतील. |
04:12 | ड्रॉईंग पॅड प्रमाणेच आपल्याला algebra view मध्येही हे पॉईंटस आलेले दिसतील. |
04:19 | Geogebra मध्ये ड्रॉईंग पॅडवर काढलेल्या सर्व टूल्स आयटम्सना ऑब्जेक्ट्स म्हणतात. |
04:24 | A आणि B हे बिंदू फ्री ऑब्जेक्ट्स असून ते ड्रॉईंग पॅडवरील इतर कुठल्याही ऑब्जेक्टवर अवलंबून नाहीत. |
04:32 | segment between two points चा वापर करून आपण A आणि Bया उपलब्ध पॉईंट्सच्या सहाय्याने रेषाखंड काढू शकतो. किंवा ड्रॉईंग पॅडवर कुठेही क्लिक केल्यावर आपल्याला दोन नवीन बिंदू मिळतात. आणि बिंदूंच्या मधील रेषाखंड मिळू शकतो. |
04:51 | त्याचप्रमाणे आपण त्या बिंदूवर व नंतर रेषाखंडावर क्लिक करून लंब काढू शकतो म्हणजे आपल्याला मिळालेली रेषा ही D या बिंदूतून जाणारी आणि CD या रेषाखंडाशी लंबरेषा असेल. |
05:10 | समांतर रेषा काढण्यासाठी येथे कुठेही एका बिंदूवर क्लिक करा आणि AB रेषाखंड सिलेक्ट करा. असा प्रकारे आपल्याला E बिंदूतून जाणारी AB ला समांतर असणारी रेषा मिळेल. |
05:25 | आता दोन ऑब्जेक्ट्सचा छेदनबिंदू शोधण्यासाठी intersect two objects वर क्लिक करा. |
05:32 | जेव्हा दोन ऑब्जेक्ट्सच्या छेदनबिंदूवर आपण आपला माऊस नेऊ तेव्हा ते दोन्हीही हायलाईट होतील आणि त्यावेळी तेथे क्लिक केल्यावर आपल्याला दोन ऑब्जेक्ट्सचा छेदनबिंदू मिळेल. |
05:44 | अंतर मोजण्यासाठी टूलबारवरील उजवीकडून चौथ्या टूलवर क्लिक करा आणि Distance or length tool निवडा. |
05:52 | दोन बिंदूतील अंतर मोजण्यासाठी येथे DF या पॉईंटसवर क्लिक करून ते सिलेक्ट करू शकता किंवा संपूर्ण रेषाखंड निवडू शकता. |
06:02 | आपल्या लक्षात येईल की ग्रीडवरती कोणतेही एकक दिसत नाही. advanced topics मध्ये आपण त्या एककांची नावे जाणून घेऊ. |
06:12 | आपण लेबल तसेच प्रत्येक घटकाचा रंग अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल करू शकतो. त्यापूर्वी |
06:19 | जर तुम्हाला कोणतेही ऑब्जेक्ट रेखाटायचे नसेल तर arrow key वापरा. म्हणजेच जेव्हा तुम्ही त्याचा वापर करता तेव्हा ड्रॉईंग पॅडवर कोणतेही ऑब्जेक्ट उमटत नाही. |
06:30 | ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल करण्यासाठी माऊस त्या ऑब्जेक्टवर न्या. तो हायलाईट झाल्यावर राईट क्लिक करून ऑब्जेक्ट प्रॉपर्टीजवर क्लिक करा. |
06:41 | आपण येथे काही बेसिक प्रॉपर्टीज जाणून घेऊ. अधिक माहिती advanced topic मध्ये बघू. |
06:48 | नाव बदलण्यासाठी नवे नाव टाईप करा. तुम्ही caption देखील टाईप करू शकता. तुम्ही शो ऑब्जेक्ट हा पर्याय निवडू शकता. किंवा काढून टाकू शकता. |
07:02 | तुम्ही शो लेबल हा पर्याय काढून टाकू शकता किंवा ह्यापैकी लेबलचे पर्याय निवडू शकता. आपण caption निवडू या. |
07:11 | कलर टॅबमधील ओळीचा रंग तुम्ही बदलू शकता. |
07:14 | स्टाईल टॅबमध्ये तुम्ही लाईनची जाडी आणि स्टाईल बदलू शकता. |
07:19 | तुम्ही हे बंद केल्यावर तुम्हाला ओळीचे नवीन रूप बघायला मिळेल. |
07:25 | सर्वात डावीकडे असलेले move tool हे आयटम शिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे टूल आहे त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधता येतो.
|
07:34 | फ्री ऑब्जेक्टस सहजपणे हलवता येतात. |
07:38 | फ्री ऑब्जेक्ट हलवल्यावर त्यावरील सर्व डिपेंडंट ऑब्जेक्टस स्वतःचे गुणधर्म तसेच राखून हलतात. |
07:45 | उदाहरणार्थ जर आपण A किंवा B हे पॉईंटस हलवले, तुम्हाला लक्षात येईल की त्या समांतर रेषा सुध्दा त्यांचे गुणधर्म कायम राखून हलत आहेत. |
07:57 | फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल मेनूमधील Save As वर क्लिक करून फोल्डर निवडा. येथे मी डॉक्युमेंटस फोल्डरमधील Geogebra फोल्डरमध्ये जात आहे. आता येथे फाईलचे नाव एंटर करून सेव्ह करा. |
08:20 | पॅनेलच्या वरच्या भागात ते नाव आपल्याला दिसेल आणि इतर Geogebra फाईलप्रमाणे ते .ggb या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे. |
08:28 | आता ही फाईल ओपन करण्यासाठी मेनूमधील ओपनवर क्लिक करून कुठलीही फाईल निवडा आणि ओपन या बटणावर क्लिक करा. |
08:38 | आता एक असाईनमेंट करू या. |
08:44 | ह्या असाईनमेंटमध्ये तुम्हाला एक आयत काढायचा आहे. त्यासाठी तुम्हाला segment between two points tool चा वापर करायचा आहे. |
08:53 | त्यानंतर समांतर रेषा आणि लंबरेषा काढणा-या टूल्स चा वापर करा. नंतर ते दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना जोडा. distance or length tools चा वापर करा. |
09:00 | मूव्ह टूलचा वापर करून तुम्ही बनवलेला आयत तपासून पहा. तसेच फ्री ऑब्जेक्ट्स मूव्ह करून पहा. |
09:07 | येथे मी ही असाईनमेंट आधीच करून ठेवली आहे. मी रेषाखंड AB ने सुरूवात केली आहे आणि त्याच्या सहाय्याने ABED हा आयत काढला आहे. |
09:20 | जर मूव्ह टूल आयटमवर क्लिक करून मग फ्री ऑब्जेक्ट्स हलवल्यास, आपण काढलेला ABED हा आयत, आपली रचना अचूक असल्यास कुठल्याही ठिकाणी आयत स्वरूपातच राहिल. |
09:37 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:43 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:48 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:53 | *ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |