Java-Business-Application/C2/Servlet-Methods/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 02:57, 10 July 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Servlet-Methods

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration


00.01 ­Servlet Methods वरील पाठात आपले स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत,
00.08 JSP द्वारे साधा लॉगिन फॉर्म बनवणे
00.13 doGet मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे
00.16 doPost मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे
00.20 doGet आणि doPost मेथडस मधील फरक
00.25 येथे वापरणार आहोत
00.26 उबंटु वर्जन 12.04
00.30 नेटबीन्स IDE 7.3
00.33 JDK 1.7
00.36 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00.39 .तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता
00.43 ह्या पाठासाठी तुम्हाला
00.46 नेटबीन्स IDE मधून Core Java वापरण्याचे आणि
00.49 HTML चे ज्ञान असावे.
00.51 Java Servlets आणि JSPs चे प्राथमिक ज्ञान असावे.
00.56 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
01.00 आपण ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम हे वेब अॅप्लिकेशन बनवून सुरूवात करू.
01.06 प्रथम होम पेज बनवणार आहोत.
01.09 होम पेजमधे साधा लॉगिन फॉर्म समाविष्ट असेल.
01.14 हा नोंदणी झालेल्या युजरला ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमवर लॉगिन करण्याची परवानगी देईल.
01.20 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
01.23 index dot jsp पेजवर जाऊ ज्यात पूर्वीच आपण काही बदल केला होता.
01.30 home पेज बनवण्यासाठी हा बदल केला होता.
01.35 ह्याचे टायटल Home Page असेच ठेवू.
01.38 बॉडीमधे border equal to 1 असलेले टेबल आहे.
01.44 येथे कोड बघू शकता.
01.47 टेबलमधे Welcome to Library Management Systemअसे हेडींग्ज समाविष्ट केले आहे.
01.54 paragraph टॅगमधे This is the Home Page for Library Management System असे समाविष्ट केले आहे.
02.03 आपल्याकडे hyperlinkआहे जी visitorHomePage dot jsp हे पेज उघडेल .
02.11 आपण हे पेज नंतर बनवणार आहोत
02.13 आपल्याकडे साधा लॉगिन फॉर्म आहे.
02.18 हा फॉर्म नोंदलेल्या युजरला लॉगिन करण्याची परवानगी देईल.
02.22 हा फॉर्म बनवण्यापूर्वी तुम्हाला GreetingServlet नावाचे सर्व्हलेट बनवावे लागेल.
02.28 पाठ थांबवा आणि मागील पाठात दाखवल्याप्रमाणे नवे सर्व्हलेट बनवा.
02.35 GreetingServlet हे सर्व्हलेट चे नाव आहे.
02.39 URL पॅटर्न GreetingServletPath हा असला पाहिजे.
02.44 ह्या फॉर्ममधे दोन इनपुट एलिमेंटस आहेत – युजरनेम आणि पासवर्ड .
02.50 तसेच त्यात Sign Inनावाचे सबमिट बटण आहे.
02.55 पुढे paragraphटॅग आहे ज्यात addUser.jspला जाण्यासाठी लिंक आहे.
03.03 हे अशा युजर्ससाठी registration पेज आहे ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही.
03.09 आता GreetingServlet.java वर जाऊ.
03.14 लक्षात घ्या GreetingServlet.java हे org.spokentutorial ह्याच पॅकेजमधे बनवलेले आहे.
03.23 आता हे सर्व्हलेट, रिक्वेस्ट ऑब्जेक्टमधून form डेटा अॅक्सेस करू शकेल.
03.30 हे सर्व्हलेट कंट्रोलर म्हणून कार्य करेल.
03.33 आपण कंट्रोलरबद्दल जाणून घेतल्याचे आठवत असेल.
03.38 आता कंट्रोलर म्हणून सर्व्हलेट काय करते ते पाहू.
03.42 form डेटा हा रिक्वेस्ट ऑब्जेक्टमधे ठेवलेला असतो.
03.46 पहिले कार्य म्हणजे फॉर्म डेटा पॅरॅमीटर्स परत मिळवणे.
03.51 हे आपण रिक्वेस्ट ऑब्जेक्टवरgetParameter मेथड वापरून करणार आहोत.
03.57 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
04.02 doGet मेथडमधे टाईप करा,
04.04 PrintWriter space out equal to response dot getWriter.
04.14 आपण फॉर्म डेटा पॅरॅमीटर्स मिळवू.
04.18 त्यासाठी टाईप करा,
04.20 String space username' equal to request dot getParameter कंसात आणि डबल कोटसमधे userName semicolon.
04.35 हे युजरनेम फॉर्म टॅगमधे युजरनेमसाठी समाविष्ट केलेले नाव आहे.
04.43 तसेच आपण पासवर्ड सुध्दा मिळवू शकतो.
04.48 त्यासाठी टाईप करा, String space पासवर्ड equal to request dot getParameter कंसात आणि डबल कोटसमधे पासवर्ड semicolon.
05.03 पुढे आऊटपुटमधे युजरनेम प्रिंट करणार आहोत.
05.08 त्यामुळे पुढच्या ओळीवर टाईप करा.
05.10 out dot println' कंसात आणि डबल कोटसमधे Hello from GET Method plus username.
05.21 प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी MyFirstProject वर राईट क्लिक करा.
05.27 Clean and Build क्लिक करा.
05.29 पुन्हा MyFirstProject राईट क्लिक करून Run क्लिक करा.
05.35 सर्व्हर सुरू होऊन कार्य करीत आहे.
05.38 MyFirstProject डिप्लॉय झाले आहे.
05.41 आपल्याला ब्राऊजरमधे होम पेज उघडलेले दिसत आहे.
05.45 पेजचे टायटल Home Page आहे.
05.50 अगदी साधे लॉगिन पेज आपल्याला दिसत आहे.
05.54 येथे युजरनेम आणि पासवर्ड देऊ.
05.58 युजरनेम म्हणून arya असे टाईप करू.
06.02 आणि arya*123 असा पासवर्ड देऊ.
06.06 Sign In वर क्लिक करा.
06.09 Hello from GET Method arya असे आऊटपुट मिळेल.
06.15 आता युजर लॉगिन करू शकला कारण आपण कोडमधे कुठलेही व्हॅलिडेशन समाविष्ट केलेले नाही.
06.24 ते पुढील पाठांत करणार आहोत.
06.28 आता URL कडे लक्ष द्या.
06.31 ती localhost colon 8080 slash MyFirstProject slash GreetingServletPath question mark userName equal to arya and password equal to arya *123 अशी आहे.
06.49 आता फॉर्म डेटा पेजवरील माहितीपासून question markने वेगळा केला गेला आहे.
06.56 आपण फॉर्ममधे दिेलेले युजरनेम आणि पासवर्ड URL मधे देखील पाहू शकतो.
07.05 आता हेच POST मेथड वापरून करून बघू.
07.10 त्यासाठी IDE वर जा.
07.12 doGet मेथडसाठी लिहिलेला कोड कॉपी करून तो doPost मेथडमधे पेस्ट करा.
07.20 आता println स्टेटमेंटमधे बदल करून Hello from POST Method असे लिहा.
07.27 आता index dot jsp उघडू.
07.31 येथे form टॅगचे मेथड अॅट्रीब्यूट बदलून ते POST करणे आवश्यक आहे.
07.37 आता ह्या कोडकडे लक्ष द्या.
07.42 येथे form action equal to GreetingServletPath Method equal to POST असे आहे.
07.49 आता प्रोजेक्ट पुन्हा कार्यान्वित करू.
07.53 त्यासाठी MyFirstProjectवर राईट क्लिक करून Run क्लिक करा.
07.58 GET मेथड वापरल्यावर मिळालेले आऊटपुटच येथे मिळेल.
08.04 आता पुन्हा युजरनेम आणि पासवर्ड टाईप करू.
08.08 नंतरSign In क्लिक करा.
08.12 Hello from POST Method arya असे आऊटपुट मिळेल.
08.17 आता URL कडे लक्ष द्या.
08.19 तिथे localhost colon 8080 slash MyFirstProject slash GreetingServletPath असे दिसेल.
08.25 येथे request च्या URL मधे formडेटा दिसत नाही.
08.30 हा doGet आणि doPost मेथडस मधील मुख्य फरक आहे.
08.35 आता GET आणि POST मेथडस कधी वापरायच्या ते जाणून घेऊ.
08.42 GET मेथड वापरतात:
08.44 जेव्हा फॉर्म छोटा असतो आणि डेटा कमी असतो.
08.48 जेव्हा युजरला URLमधे डेटा दाखवायचा असतो.
08.53 POST मेथड वापरतात:
08.55 जेव्हा फॉर्म मोठा असतो डेटा जास्त असतो.
09.00 जेव्हा युजरला URLमधे डेटा दाखवायचा नसतो.
09.06 उदाहरणार्थ: पासवर्डस
09.08 थोडक्यात,
09.10 आपण शिकलो:
09.12 JSP द्वारे साधा लॉगिन फॉर्म बनवणे
09.16 doGet मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे
09.19 doPost मेथड वापरून पॅरॅमीटर्स पास करणे
09.22 doGet आणि doPost मेथडस मधील फरक
09.26 पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा पाठ पूर्ण केल्याची खात्री करा.
09.32 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.35 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.38 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09.45 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.02 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.09 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.19 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
10.28 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
10.32 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana