Java-Business-Application/C2/Java-servlets-and-JSPs/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:06, 9 July 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Java-servlets-and-JSPs

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration


00.01 Java Servlets आणि JSPsवरील पाठात आपले स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत:
00.09 Web server
00.10 Web container
00.12 तसेच आपणJava Servlet आणि JSP बनवणार आहोत.
00.18 आपण वापरणार आहोत,
00.20 उबंटु वर्जन 12.04
00.23 नेटबीन्स IDE 7.3
00.27 JDK 1.7
00.29 फायरफॉक्स वेबब्राऊजर 21.0
00.33 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00.37 ह्या पाठासाठी तुम्हाला,
00.41 नेटबीन्स IDE मधून Core Java वापरण्याचे आणि
00.45 HTML चे ज्ञान असावे.
00.42 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.52 Servlets आणि JSPला जाण्यापूर्वी आपण वेब सर्व्हरची माहिती घेऊ.
00.58 वेब सर्व्हर म्हणजे इंटरनेटवरील युजरला माहिती पुरवणारी प्रणाली.
01.05 ह्याला इंटरनेट सर्व्हरसुध्दा म्हणतात.
01.10 वेब कंटेनर हा वेब सर्व्हरचा घटक असून Java servletsशी संवाद साधतो.
01.18 ह्याला सर्व्हलेट कंटेनरसुध्दा म्हणतात.
01.22 सर्व्हलेट कंटेनर त्याच्या आतservletsकार्यान्वित करण्याची परवानगी देतो.
01.28 आता साधी servlet कशी लिहायची ते पाहू.
01.32 नेटबीन्स IDE वर जाऊ.
01.35 IDEच्या डावीकडे असलेल्या प्रोजेक्टस टॅबवर क्लिक करा.
01.40 मागे आपण MyFirstProject नावाचे एक साधे प्रोजेक्ट बनवले होते.
01.46 तुम्ही IDEच्या डावीकडे ते बघू शकता.
01.50 आपण प्रोजेक्टच्या आत servletबनवू.
01.55 MyFirstProjectवर राईट क्लिक करा.
01.59 New खालील Servlets वर क्लिक करा.
02.03 New Servlet विंडो उघडेल.
02.05 Class Nameम्हणून MyServlet द्या.
02.09 Package Name म्हणून org.spokentutorial असे टाईप करा.
02.16 Next वर क्लिक करा.
02.18 Add information to deployment descriptor (web.xml) क्लिक करा.
02.23 आपण org.spokentutorial.MyServlet हे क्लासनेम पाहू शकतो.
02.30 Servlet नेम हे क्लासनेम प्रमाणे आहे जे MyServlet आहे.
02.37 URL pattern देखील क्लासनेम प्रमाणेच MyServlet आहे.
02.45 आपण हे बदलून MyServletPath करू शकतो.
02.50 Finish वर क्लिक करा.
02.53 IDEने MyServlet.java साठी बनवलेला सोर्स कोड सोर्स एडिटर विंडोमधे बघता येतो.
03.01 आपल्याला MyServlet.javaहे पॅकेज org.spokentutorial मधे बनलेले दिसेल.
03.09 servlet हे इतर Java class प्रमाणेच असते.
03.14 फक्त servlet मधे main मेथड नसते.
03.19 आता Glassfish सर्व्हर बद्दल अधिक जाणून घेऊ.
03.24 सर्व्हलेट कंटेनरमधे servlet ठेवली जाते.
03.28 आपण सर्व्हर म्हणून Glassfish वापरत आहोत.
03.32 सर्व्हलेट कंटेनर हा Glassfishचा घटक असून servlets शी संवाद साधतो.
03.39 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
03.42 लक्षात घ्या, MyServlet हा HttpServletचा विस्तार करतो.
03.48 कोडच्या शेवटी HttpServlet मेथडस बघू शकतो.
03.54 ह्या मेथडस बघण्यासाठी डाव्या बाजूच्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करा.
03.59 doGet, doPost आणि getServletInfo मेथडस बघू शकतो.
04.09 ह्या मेथडस ओव्हरराईड करता येतात.
04.12 आपल्याकडे वर processRequestनावाची आणखी मेथड आहे.
04.18 गोंधळ टाळण्यासाठी processRequest आणि getServletInfo ह्या मेथडस डिलिट करणार आहोत.
04.25 आपल्याकडे doGet आणि doPost या दोन मेथडस उरल्या आहेत.
04.31 आता doGet मेथड पाहू.
04.35 कुठल्याही साध्या URL रिक्वेस्टसाठी doGetही डिफॉल्ट मेथड असते.
04.41 doGet मेथड मधे काही कोड टाईप करू.
04.45 आपण processRequest मेथड आधीच डिलीट केली होती.
04.49 त्यामुळे processRequest मेथडसाठीचा मेथड कॉल काढून टाकू.
04.54 तसेच doPost मेथडनधून देखील काढून टाकू.
04.58 आता doGet मेथडवर जाऊ.
05.01 आपण doGet मेथडला दोन पॅरॅमीटर्स पास केलेली आहेत.
05.07 request हे पहिले आणि response object हे दुसरे.
05.12 लक्षात घ्या request हे HttpServletRequest टाईपचे आहे.
05.18 आणि response ऑब्जेक्ट HttpServletResponseटाईपचे आहे.
05.22 आपण response object हे क्लायंटला HTML response परत देण्यासाठी वापरू.
05.30 त्यासाठी PrintWriter object बनवणे आवश्यक आहे.
05.35 आपण PrintWriter classआधीच इंपोर्ट केला आहे.
05.40 आता doGet method मधे टाईप करा PrintWriter space writer equal to response dot getWriter open and close brackets semicolon
05.57 एंटर दाबा.
05.59 पुढच्या ओळीवर टाईप करा
06.02 writer dot println कंसात आणि डबल कोटसमधे welcome.
06.09 Ctrl S दाबून फाईल सेव्ह करा.
06.14 आता सर्व्हलेट कार्यान्वित करू.
06.17 त्यासाठी डाव्या बाजूला Projects टॅब मधे MyServlet dot java राईट क्लिक करा.
06.24 Run File वर क्लिक करा.
06.27 Set Servlet Execution URL डायलॉग बॉक्स उघडेल.
06.32 OK क्लिक करा.
06.35 ब्राऊजर विंडो उघडल्यावरURL कडे लक्ष द्या.
06.39 येथे localhost colon 8080 slash MyFirstProject slash MyServletPath असे दिसेल.
06.47 येथे MyFirstProject हे context नेम आणि MyServletPath हा आपण सेट केलेला URL पॅटर्न आहे.
06.55 ब्राऊजरवर welcomeहे टेक्स्ट प्रिंट झालेले दिसेल.
07.00 नेटबीन्स IDE वर जाऊ.
07.03 आपण println मेथडमधे html कोड पास करू शकतो.
07.07 उदाहरणार्थh3 टॅगमधे welcome लिहा.
07.12 फाईल सेव्ह करा.
07.14 हे सर्व्हलेट आधीच डिप्लॉय केलेले असल्यामुळे पुन्हा कार्यान्वित करण्याची आवश्यकता नाही.
07.20 वेब कंटेनर हे आपोआप शोधतो.
07.23 आता browser वर परत जा.
07.27 रिफ्रेश करा.
07.28 Welcome हा मेसेज वेगळ्या फॉरमॅटमधे बघू शकता.
07.32 IDE वर परत जा.
07.35 अशारितीने आपण सर्व्हलेट बनवले आहे.
07.39 सर्व्हलेट्स वापरून कुठलेही वेब अॅप्लिकेशन बनवू शकतो.
07.45 HTML कोड दाखवण्यासाठी सर्व्हलेटचा वापर केला आहे.
07.49 HTML कोड Java कोडमधे आहे हे लक्षात घ्या.
07.54 हे शक्य असले तरी, मोठ्या वेब अॅप्लिकेशनसाठी लिहिणे कठीण होऊ शकते
08.00 आणि म्हणून वापरले जात नाही.
08.03 त्याऐवजी जावा सर्व्हर पेजेस (JSP) वापरणे योग्य ठरते.
08.10 servlets आणि jspsचा उपयोग पाहू.
08.13 प्रेझेंटेशन कंटेंट पासून वेगळे करण्यासाठी Servlets आणि JSPs एकत्रित वापरले जातात.
08.20 Servlets कंट्रोलर म्हणून आणि JSPs व्ह्यू म्हणून कार्य करते.
08.25 Servlets मधे जावा कोडमधे HTML कोड असतो.
08.30 JSPमधे HTMLकोडच्या आत Java चा समावेश होतो.
08.35 याबद्दल अधिक पुढील पाठांत जाणून घेणार आहोत.
08.39 आता नेटबीन्स IDEवर जाऊ.
08.42 आपण साधे JSP पेज बनवू.
08.47 MyFirstProject वर राईट क्लिक करा.
08.50 New वर जा.
08.51 आणि JSP क्लिक करा.
08.54 नवी JSPविंडो उघडेल.
08.57 Welcome असे फाईलनेम द्या.
09.01 Finish वर क्लिक करा.
09.04 डावीकडील Projects tab वर क्लिक करा.
09.07 वेब Pages फोल्डरमधे Welcome.jsp बघू शकतो.
09.13 आता एडिटरमधे Hello World च्या जागी Welcome करू.
09.19 Welcome हे h1 टॅग्जमधे आहे.
09.23 आता फाईल सेव्ह करा.
09.25 Browser वर जाऊ.
09.27 url मधे MyFirstProject slash च्या पुढे welcome.jsp असे टाईप करा.
09.35 Welcome असे आऊटपुट दिसेल.
09.38 म्हणून प्रेझेंटेशनसाठी jsp ला प्राधान्य दिले जाते.
09.42 थोडक्यात,
09.44 या पाठात आपण शिकलो,
09.47 वेब सर्व्हर, वेब कंटेनर
09.49 साधे सर्व्हलेट बनवणे.
09.52 साधे jsp बनवणे.
09.55 पुढे जाण्यापूर्वी हा पाठ तुम्ही समजून घेतल्याची खात्री करा.
10.01 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10.04 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.08 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10.13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10.15 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.19 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.22 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10.28 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.32 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.40 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.50 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
11.00 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
11.04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana