PERL/C2/More-Conditional-statements/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:17, 1 July 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: More Conditional-statements

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration
00:00 पर्लमधील if-elsif-else आणि switch कंडिशनल स्टेटमेंटस वरील पाठात स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:10 पर्लमधील if-elsif-elseस्टेटमेंट आणि switch स्टेटमेंट
00:15 मी उबंटु लिनक्स12.04 ऑपरेटिंग सिस्टीम आणि Perl 5.14.2 वापरणार आहे.
00:22 मी 'gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे'.
00:25 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:29 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:34 फॉर, फॉरइच, व्हाइल आणि डू-व्हाइल लूप्सची माहिती,
00:38 'तसेच if आणि if-else स्टेटमेंटचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00:43 संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:48 पर्लमधील if-elsif-else स्टेटमेंटचा उपयोग,
00:52 अनेक कंडिशन्स तपासण्यासाठी केला जातो.
00:54 सर्व कंडिशन्स फेल होतात तेव्हा else ब्लॉक कार्यान्वित होतो.
00:59 if-elsif-else स्टेटमेंटचा सिन्टॅक्स असा आहे.
01:04 if space कंसात condition कंस पूर्णspace महिरपी कंस सुरू. एंटर दाबा.
01:13 कंडिशन true असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा भाग आणि सेमीकोलन
01:18 एंटर दाबा.
01:20 महिरपी कंस पूर्ण space elsif space कंसात condition कंस पूर्ण space महिरपी कंस सुरू.
01:30 एंटर दाबा.
01:31 elsif condition true असल्यास
01:33 कार्यान्वित होणारा कोडचा भाग आणि सेमीकोलन
01:37 एंटर दाबा.
01:39 महिरपी कंस पूर्ण space else space महिरपी कंस सुरू
01:44 एंटर
01:45 वरील दोन्ही कंडिशन false असल्यास कार्यान्वित होणारा कोड आणि सेमीकोलन
01:51 एंटर दाबा.
01:52 महिरपी कंस पूर्ण.
01:55 प्रथम if कंडिशन तपासली जाईल आणि ती true असल्यास कार्यान्वित होईल.
02:01 नसल्यास else if कंडिशन तपासली जाईल आणि ती true असल्यास कार्यान्वित होईल.
02:06 अन्यथा else ब्लॉकमधील कोड कार्यान्वित होईल.
02:11 आता if-elsif-else स्टेटमेंटचे उदाहरण पाहू.
02:16 टर्मिनल उघडून टाईप करा.
02:19 gedit conditionalBlocks dot pl space ampersand
02:26 आणि एंटर दाबा.
02:28 हे gedit मधे conditionalBlocks.pl ही फाईल उघडेल.
02:33 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
02:38 आपण language ह्या व्हेरिएबलला 'Perl ही व्हॅल्यू दिलेली आहे.
02:44 लक्षात घ्या eqहे स्ट्रिंग कंपॅरिझन ऑपरेटर आहे.
02:49 आपल्याकडे असलेल्या अनेक कंडिशन्स आपल्याला तपासायच्या आहेत.
02:55 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+sदाबा.
02:58 नंतर टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करा.
03:02 टाईप करा, perl conditionalBlocks dot pl
03:09 टीप: मी कंपायलेशनची स्टेप सोडून देत आहे. ही पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक नाही.
03:16 जर कंपायलेशन एरर असल्यास,
03:18 स्क्रिप्ट कार्यान्वित होताना ते एरर देईल आणि कार्यान्वित होणे थांबेल.
03:23 आता एंटर दाबा.
03:25 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
03:27 Hi, I am Perl
03:29 आता पुढची केस पाहू.
03:31 gedit वर जा.
03:33 language व्हेरिएबलला Java' ही व्हॅल्यू द्या.
03:37 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+sदाबा.
03:40 टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करू.
03:43 टाईप करा perl conditionalBlocks dot pl
03:50 एंटर दाबा.
03:53 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. Hi, I am Java
03:59 पुन्हा gedit वर जा.
04:03 language व्हेरिएबलला 'English' ही व्हॅल्यू द्या.
04:07 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+sदाबा.
04:09 टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करू.
04:13 टाईप करा perl conditionalBlocks dot pl
04:18 एंटर दाबा.
04:19 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
04:22 I am not a computer language
04:27 तीन केसेस असे सूचित करतात,
04:29 कंडिशन पूर्ण करणारा केवळ एक if block कार्यान्वित होईल.
04:35 अन्यथा डिफॉल्ट else block कार्यान्वित होईल.
04:39 आपल्या गरजेप्रमाणे अशा अनेक elsif कंडिशन्स असू शकतात.
04:46 आता असाईनमेंट,
04:48 हे प्रिंट करण्यासाठी if-elsif-else स्टेटमेंट लिहा.
04:51 stream जर science असेल तर “I am a Science graduate”
04:55 stream जर commerce असल्यास “I am a Commerce graduate”
04:59 आणि stream जर science किंवा commerce ह्यापैकी नसल्यास I am an Arts graduate”
05:06 आता स्वीच स्टेटमेंटबद्दल जाणून घेऊ.
05:10 पर्ल 5.8 पर्यंत पर्लमधे स्वीच स्टेटमेंट उपलब्ध नव्हते.
05:14 त्यानंतर स्वीच स्टेटमेंटची फंक्शनॅलिटी प्रदान करणारे,
05:18 Switch module समाविष्ट करण्यात आले.
05:22 टीप: पर्लमधीलModules आपण पुढील पाठांत शिकणार आहोत.
05:27 स्वीचचा सिन्टॅक्स असा आहे.
05:30 use Switch semicolon
05:32 एंटर दाबा.
05:34 switch space कंसातdollar value कंस पूर्ण space महिरपी कंस सुरू
05:42 एंटर दाबा.
05:44 -redo -equal to case space 1 space महिरपी कंस सुरू dollar value equal to 1 असल्यास कार्यान्वित होईल. महिरपी कंस पूर्ण
05:53 एंटर दाबा.
05:55 case space single quote a single quote space महिरपी कंस सुरू dollar value equal to single quote a single quote असल्यास कार्यान्वित होईल. महिरपी कंस पूर्ण
06:09 एंटर दाबा.
06:10 else space महिरपी कंस सुरू dollar value वरीलपैकी कुठल्याही केसशी जुळली नसल्यास कार्यान्वित होईल.
06:18 महिरपी कंस पूर्ण
06:19 एंटर दाबा.
06:20 महिरपी कंस पूर्ण
06:22 आता सँपल प्रोग्रॅमद्वारे स्वीच समजून घेऊ.
06:26 टर्मिनल उघडून टाईप करा.
06:29 gedit sampleSwitch dot pl space ampersand
06:36 आणि एंटर दाबा.
06:38 आता स्क्रीनवर दाखवलेला सँपल प्रोग्रॅम टाईप करा.
06:43 स्वीच स्टेटमेंट कसे कार्य करते ते पाहू.
06:46 use Switch स्टेटमेंट पर्ल कोडमधे Switch मोड्युल समाविष्ट करते.
06:54 टीप: use keyword बद्दल पुढील पाठांत सविस्तर जाणून घेणार आहोत.
07:00 आता वेगवेगळ्या केसेस तपासू.
07:03 आपण $var ह्या व्हेरिएबलला 'Perl ही व्हॅल्यू दिलेली आहे.
07:08 स्वीच स्टेटमेंटमधे $var ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासली जाईल.
07:14 पहिल्या केसमधे ती 'Perl'शी जुळते.
07:19 त्यामुळे या केस समोर लिहिलेला कोड कार्यान्वित होईल.
07:24 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+sदाबा.
07:27 आता टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
07:31 perl sampleSwitch.pl
07:36 एंटर दाबा.
07:38 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
07:41 I am Perl
07:43 gedit मधे sampleSwitch.pl वर जा.
07:48 आता $var ह्या व्हेरिएबलला 'Linux ही व्हॅल्यू द्या.
07:52 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+sदाबा.
07:57 पुन्हा स्वीचमधे $var ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासली जाईल.
08:03 ही केस 'Linux बरोबर जुळेल.
08:05 त्यामुळे ह्या केससाठी लिहिलेला कोड कार्यान्वित होईल.
08:10 आता टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
08:15 perl sampleSwitch.pl
08:19 एंटर दाबा.
08:21 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
08:24 I am Linux
08:26 gedit मधे sampleSwitch.pl वर जा.
08:30 तसेच व्हेरिएबल $var ची व्हॅल्यू 'Java असेल, तर दुसरी केस तपासली जाईल.
08:38 आता व्हेरिएबल $var ला 'English व्हॅल्यू देऊ.
08:42 पुन्हा स्वीचमधे व्हेरिएबल $var ची व्हॅल्यू तपासली जाईल.
08:47 हे कुठल्याही केस स्टेटमेंटशी जुळत नाही.
08:50 त्यामुळे एल्स स्टेटमेंट कार्यान्वित होईल.
08:54 आता टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
09:00 perl sampleSwitch.pl
09:07 आणि एंटर दाबा.
09:09 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
09:12 I am not a computer language
09:17 तीन केसेस असे सूचित करतातः
09:20 एक्सप्रेशनची व्हॅल्यू कुठली केस कार्यान्वित होणार ते ठरवते.
09:25 केवळ ग्राह्य केस कार्यान्वित होईल.
09:28 केस ग्राह्य नसेल तर डिफॉल्ट else केस कार्यान्वित होईल.
09:35 else केस लिहिणे सक्तीचे नाही.
09:39 अशावेळी,
09:41 जर एकही केस जुळली नाही,
09:44 तर स्वीच स्टेटमेंट कुठलेही आऊटपुट देणार नाही.
09:48 असाईनमेंट
09:50 स्वीच स्टेटमेंट वापरून
09:53 ह्या पाठात दिलेली असाईनमेंट पुन्हा लिहा.
09:57 थोडक्यात.
09:59 या पाठात शिकलो,
10:01 पर्लमधील if-elsif-else स्टेटमेंट आणि
10:04 switch स्टेटमेंट
10:05 'सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेतले.
10:08 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:12 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:15 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
10:20 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:25 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:30 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:40 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
10:47 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:58 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
11:00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
11:03 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana