Ruby/C2/Ruby-Methods/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 22:39, 30 June 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Ruby-Methods

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00.01 Ruby Methodsवरील पाठात आपले स्वागत.
00.05 या पाठात शिकणार आहोत,
00.07 मेथड म्हणजे काय?
00.09 मेथडचा सिंटॅक्स.
00.11 आणि काही उदाहरणे पाहू.
00.13 आपण उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि रूबी 1.9.3 वापरणार आहोत.
00.21 या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00.28 आता मेथडसची ओळख करून घेऊ.
00.31 मेथड म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट करणारा स्वयंपूर्ण प्रोग्रॅम.
00.37 इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेज मधील फंक्शनप्रमाणेच रुबीतील मेथड आहे.
00.42 मेथडच्या नावाची सुरूवात लोअर केसमधील अक्षरांनी होणे आवश्यक आहे.
00.45 मेथडस कॉल करण्यापूर्वी त्या घोषित करणे आवश्यक आहे.
00.49 आता मेथडचा सिंटॅक्स पाहू.
00.52 कीवर्ड def च्या पुढे मेथडचे नाव देऊन मेथडस घोषित करता येतात.
00.57 अर्ग्युमेंटसद्वारे मेथडला व्हॅल्यूज पास करून, त्यावर कार्य केले जाते.
01.02 रुबी कोड सेक्शन हे मेथडचे मुख्य अंग योग्य ते कार्य करून देते.
01.09 मेथडचे मुख्य अंग हे वरती त्याच्या घोषणेने सुरू होऊन खाली end कीवर्डने संपते.
01.16 ह्याला अर्ग्युमेंटस असलेली मेथड म्हणतात.
01.19 मेथडचा आणखी एक सिंटॅक्स असा आहे-
01.23 कीवर्ड def च्या पुढे मेथडचे नाव आणि अर्ग्युमेंटची रिकामी सूची.
01.28 त्यानंतर रुबी कोड सेक्शन जो मेथडचे मुख्य अंग असतो .
01.32 आणि end कीवर्ड ज्याने मेथड संपते.
01.36 ह्याला अर्ग्युमेंटस नसलेली मेथड म्हणतात.
01.39 मेथड कशी वापरायची ते पाहू.
01.42 मी gedit एडिटरमधे प्रोग्रॅम आधीच टाईप करून ठेवला आहे.
01.46 तो उघडू.
01.48 येथे फाईलचे नाव method hyphen without hyphen argument dot rb आहे.
01.55 मी ही फाईल rubyprogram नामक फोल्डरमधे सेव्ह केली आहे.
01.59 ह्या प्रोग्रॅममधे मेथडद्वारे दोन अंकांची बेरीज करणार आहे.
02.03 प्रोग्रॅम समजून घेऊ.
02.05 येथे a हे ग्लोबल व्हेरिएबल घोषित केले आहे.
02.08 आणि त्याला 5 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
02.13 ग्लोबल व्हेरिएबलच्या नावाच्या आधी dollar चिन्ह ($) दिलेले असते.
02.17 रुबी प्रोग्रॅम मधे ग्लोबल व्हेरिएबल्स कुठुनही ऍक्सेस करता येते. ते कुठे घोषित केले आहे यास महत्त्व नाही.
02.25 येथे कुठलेही अर्ग्युमेंट नसलेली add मेथड घोषित केली आहे.
02.31 येथे युजरला दुसरी संख्या द्यायला सांगणार आहोत.
02.35 युजर व्हॅल्यू देईल.
02.38 gets मेथड कंसोल वरून स्ट्रिंग फॉरमॅटमधे इनपुट घेईल.
02.44 त्यामुळे ते to_i मेथडद्वारे इंटीजरमधे बदलणे आवश्यक आहे.
02.50 रूपांतरित व्हॅल्यू नंतर b व्हेरिएबल मधे संचित होईल. b हे लोकल व्हेरिएबल आहे.
02.56 ते व्हेरिएबल ज्या मेथड मधे घोषित केले आहे त्यातच उपलब्ध असते.
03.01 येथे ग्लोबल व्हेरिएबल a आणि व्हेरिएबल b च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत.
03.07 नंतर तो रिझल्ट sum ह्या व्हेरिएबलमधे संचित करू.
03.10 नंतर sum प्रिंट करणार आहोत.
03.13 स्ट्रिंगमधे व्हेरिएबल समाविष्ट करण्याची ही एक पध्दत आहे .
03.18 येथ sum मधील व्हॅल्यू ही स्ट्रिंग म्हणून परत दिली जाते. व बाहेरच्या स्ट्रिंगमधे लिहिली जाते.
03.25 end ने मेथडचा शेवट होतो.
03.28 मेथडस दोन प्रकारच्या असतात.
03.31 User-defined method – जसे की add मेथड.
03.35 Pre-defined method - जसे print, gets आणि to_i मेथड्स.
03.42 येथे add मेथड कॉल करणार आहोत.
03.45 बेरजेची क्रिया केली जाईल. रिझल्ट प्रिंट केला जाईल.
03.50 Saveवर क्लिक करा.
03.53 आधी सांगितल्याप्रमाणे हा प्रोग्रॅम rubyprogram फोल्डरमधे सेव्ह होईल.
03.59 आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04.02 Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
04.07 स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल.
04.11 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी rubyprogram सबडिरेक्टरीमधे जाणे आवश्यक आहे .
04.16 टाईप करा cd space Desktop/rubyprogram आणि एंटर दाबा.
04.26 टाईप करा ruby space method hyphen without hyphen argument dot rb आणि एंटर दाबा.
04.40 Enter the second number असे दाखवले जाईल.
04.44 मी 4 टाईप करत आहे. आता एंटर दाबा.
04.48 आपल्याला Sum of two numbers 5 and 4 is 9 हे आऊटपुट मिळेल.
04.53 आता अर्ग्युमेंस असलेल्या मेथडचे उदाहरण पाहू .
04.58 मी हा प्रोग्रॅम आधीच gedit एडिटरमधे लिहून ठेवला आहे. तो उघडा.
05.03 आपल्या फाईलचे नाव method hyphen with hyphen argument dot rb असे आहे.
05.10 मी ही फाईल rubyprogram ह्या फोल्डरमधे सेव्ह केली आहे.
05.15 हा प्रोग्रॅम समजून घेऊ.
05.18 येथे addनामक मेथड घोषित केली आहे. a, b ही add ह्या मेथडची अर्ग्युमेंटस आहेत.
05.26 येथे a आणि b च्या व्हॅल्यूजची बेरीज होईल.
05.29 आणि मेथडच्या कॉलला बेरीज परत करेल.
05.31 end ने मेथडचा शेवट होईल.
05.35 येथे युजरला इनपुट द्यायला सांगणार आहोत.
05.38 युजर a आणि bची व्हॅल्यू टाईप करेल.
05.41 त्या व्हॅल्यूज अनुक्रमे व्हेरिएबल a आणि bमधे संचित होतील.
05.46 येथे add ही मेथड कॉल करणार आहोत.
05.49 नंतर a आणि b ही अर्ग्युमेंटस देणार आहोत.
05.52 बेरजेची क्रिया झाल्यावर add ही मेथड जी व्हॅल्यू देईल ती c मधे संचित होईल.
05.59 येथे c मधे संचित असलेली बेरीज प्रिंट करणार आहोत.
06.03 कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
06.07 प्रथम टर्मिनल क्लियर करण्यासाठी क्लियर टाईप करून एंटर दाबा.
06.14 आपण आधीपासूनच rubyprogram ह्या सबडिरेक्टरीत आहोत.
06.17 मागील कमांडसाठी दोन वेळा अप ऍरो की दाबा .
06.22 method hyphen without hyphen arguments dot rb च्या जागी method hyphen with hyphen arguments dot rb टाईप करा
06.32 आणि एंटर दाबा.
06.35 Enter the values of a and b दाखवले जाईल.
06.38 मी 8 आणि 9 टाईप करणार आहे.
06.41 टाईप करा 8 आणि एंटर दाबा.
06.43 टाईप करा 9 आणि एंटर दाबा.
06.46 पुढील आऊटपुट मिळेल.
06.47 Sum of two numbers 8 and 9 is 17.
06.52 आता रुबी मेथडचे एक महत्त्वाचे फीचर बघू.
06.56 टेक्स्ट एडिटरमधील प्रोग्रॅममधे जाऊ .
06.59 return कीवर्ड डिलीट करा.
07.02 Save वर क्लिक करा.
07.05 कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
07.09 मागील कमांड साठी अप ऍरो की दाबा. एंटर दाबा.
07.14 Enter the values of a and b दाखवले जाईल.
07.18 मी 10 आणि 15 टाईप करणार आहे.
07.21 10टाईप करून एंटर दाबा. 15 टाईप करून एंटर दाबा.
07.27 पुढील आऊटपुट मिळेल.
07.29 Sum of two numbers 10 and 15 is 25.
07.33 returnहा कीवर्ड डिलीट केल्यावरही प्रोग्रॅम कुठलीही एरर न देता कार्यान्वित झाला.
07.40 याचे कारण रुबी मेथड कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आपोआप रिटर्न करतो.
07.46 रुबीच्या मेथडसमधे return हा कीवर्ड ऐच्छिक आहे.
07.50 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत.
07.53 स्लाईडस वर जाऊ.
07.55 थोडक्यात,
07.57 या पाठात शिकलो,
07.59 मेथडस म्हणजे काय?
08.01 अर्ग्युमेंटस नसलेल्या आणि
08.04 अर्ग्युमेंटस असलेल्या मेथडचा सिंटॅक्स
08.06 मेथड कडून मिळणारी रिटर्न व्हॅल्यू.
08.08 आता असाईनमेंट.
08.10 चौरसाचे क्षेत्रफळ काढणारा प्रोग्रॅम लिहा.
08.13 त्यासाठी मेथड वापरा.
08.14 युजरकडून इनपुट घ्या.
08.17 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08.20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08.23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08.28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08.30 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08.33 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08.36 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08.44 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08.49 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08.55 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09.00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
09.04 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Pratik kamble, Ranjana