Scilab/C2/Plotting-2D-graphs/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:37, 27 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | सायलॅबच्या प्लॉटिंग 2D ग्राफ्स वरील पाठात स्वागत . |
00:04 | संगणकावर सायलॅब इन्स्टॉल झाले असल्याचे गृहीत धरून त्यातील प्लॉट्स बद्दल चर्चा करू. |
00:10 | अनेक प्रकारचे 2D आणि 3D प्लॉट्स बनवण्याची आणि कस्टमाईज करण्याची सुविधा सायलॅब देते. |
00:15 | सायलॅब पुढील कॉमन चार्टस काढू शकते: x-y plots (x-y प्लॉट्स), contour plots(कॉंटूर प्लॉट्स), 3D plots(3D प्लॉट्स), histograms(हिस्टोग्रॅम्स), bar charts(बर चार्ट्स), इत्यादी. |
00:24 | सायलॅब कन्सोल विंडो उघडा. |
00:28 | कमांडस कट आणि पेस्ट करण्यासाठी Plotting.sce फाईल वापरू. |
00:34 | आलेख काढण्यासाठी बिंदूंचा संच आवश्यक असतो. त्यासाठी समान रेषीय अंतर असलेले बिंदू घेऊ. |
00:39 | हे linspace(लीनस्पेस ) कमांडद्वारे करता येते ज्यामुळे समान अंतर असलेला वेक्टर बनतो. |
00:45 | उदाहरणार्थ, |
00:48 | x हा 1 ते 10 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे. |
00:57 | तसेच yहा 1 ते 20 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे. |
01:08 | आपण Help द्वारे लाईनस्पेस linspace(लीनस्पेस ) बद्दल अधिक माहिती मिळवू शकतो. |
01:14 | आता प्लॉट फंक्शनद्वारे x आणि y अर्ग्युमेंटस वापरून ग्राफ काढणार आहोत. |
01:19 | हे मॅटलॅबप्रमाणेच आहे. |
01:23 | प्लॉट कंसात x, y कमांडने x verses y ग्राफ काढला जाईल. |
01:31 | ग्राफिक्स विंडोचे लेबल '0' दिसत आहे. |
01:36 | आपण xset फंक्शनद्वारे आणखी एक ग्राफिक विंडो उघडू. |
01:41 | हे बंद करू. |
01:43 | सायलॅब मधे xset फंक्शन कट करून पेस्ट करून एंटर दाबा. |
01:50 | येथे ग्राफिक विंडो नंबर 1 दिसेल. |
01:54 | ह्या फंक्शन मधे विंडो आणि 1 ही दोन अर्ग्युमेंटस पास केलेली आहेत. |
02:03 | पुढील ग्राफ ह्या विंडोवर प्लॉट करू. |
02:06 | सायलॅब मधे plot 2d हे नेटिव्ह फंक्शन 2d graphs काढण्यासाठी वापरतात . |
02:14 | plot2d कमांड x verses y ग्राफ काढतो. |
02:26 | येथे तिसरे अर्ग्युमेंट आहे स्टाईल. |
02:31 | स्टाईल अर्ग्युमेंट हे ऐच्छिक आहे. ते प्लॉटचे स्वरूप कस्टमाईज करते. |
02:36 | स्टाईलची धन व्हॅल्यू जसे की 3 असेल तर हिरव्या रंगाचा प्लेन कर्व्ह दिसेल. |
02:44 | स्टाईल ची डिफॉल्ट व्हॅल्यू 1 असते. |
02:46 | ऋण व्हॅल्यूज घेऊन ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील फरक समजून घ्या. |
02:51 | तसेच चौथे अर्ग्युमेंट देऊन x आणि y अक्षाचे सुरूवात आणि शेवटचे बिंदू सेट करू शकतो. |
02:57 | त्याला rect म्हणतात. |
03:07 | आपल्याकडे 1 ते 10 असा x अक्ष आणि 1 ते 20 असा y अक्ष आहे. |
03:14 | rect कमांड मधे अर्ग्युमेंटस चा क्रम xmin, ymin, xmax आणि ymax असा असतो. |
03:24 | आता Title(टाइटल), Axis(एक्सिस) आणि Legends(लेजेंड्ज़) बद्दल जाणून घेऊ. |
03:28 | अक्षांना लेबल देण्यासाठी आणि प्लॉटला टायटल देण्यासाठी x label, ylabel आणि title(टाइटल) ह्या कमांडस वापरतात. |
03:38 | ह्या कमांडस कट करून कन्सोलवर पेस्ट करा. एंटर दाबा. |
03:45 | x अक्षाला x, y अक्षाला y ही लेबल्स आणि my title हे ग्राफचे टायटल येथे दिसत आहे. |
03:58 | 3 वेगवेगळ्या कमांडस देण्याऐवजी एकाच कमांडने हे सर्व कॉनफिगर करू शकाल. |
04:04 | त्यासाठी 3 अर्ग्युमेंटस असलेली xtitle ही कमांड वापरू. |
04:11 | सायलॅब मधे ही कमांड कट करून पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
04:18 | x अक्षाचे लेबल X axis , तर y अक्षाचे Y axis आणि टायटल My title आहे. |
04:26 | आता clf() ह्या फंक्शनद्वारे ग्राफिक विंडो क्लियर करून घेऊ. |
04:36 | एकाच ग्राफिक विंडोवर वेगवेगळे ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे . |
04:41 | ही विंडो बंद करू. |
04:44 | कधीकधी एकाच प्लॉट वर एका x डेटासाठी y डेटाच्या दोन संचांची तुलना बघायची असते. |
04:51 | आता उदाहरण बघू. त्यासाठी खाली स्क्रॉल करू. |
04:56 | रो वेक्टर x मधे linspace(लीनस्पेस ) कमांडद्वारे x अक्षावरील बिंदू घोषित करू. |
05:03 | फंक्शन घोषित करू. |
05:05 | y1 = x square |
05:07 | plot x verses y1 |
05:10 | दुसरे फंक्शन घोषित करू. y2 = 2x square |
05:15 | plot x verses y2 |
05:17 | तसेच ग्राफला लेबल आणि टायटल देऊ. |
05:22 | येथे कर्व्हचे स्वरूप बदलण्यासाठी प्लॉट फंक्शनला, ”o-” आणि ”+ -” ह्या अतिरिक्त कमांडस दिलेल्या आहेत. |
05:33 | ही अर्ग्युमेंटस, plot2d फंक्शनचा भाग नाहीत. |
05:37 | ह्या केवळ प्लॉट फंक्शन सोबत वापरता येतात. |
05:41 | ह्या कमांडस सायलॅब कन्सोलवर कॉपी करून पेस्ट करत आहोत. |
05:49 | तुम्ही ग्राफ बघू शकता. |
05:51 | कुठला कर्व्ह कोणत्या फंक्शनचा आहे हे कळले तर खूप सोयीचे होईल. |
05:56 | हे legend(लेजेंड) कमांड द्वारे मिळवता येऊ शकते. |
06:08 | "o-" हा कर्व्ह y1=x square हे फंक्शन दाखवते. आणि "+-" हा कर्व्ह y2=2*x^2 हे फंक्शन दाखवते. |
06:19 | ही ग्राफिक विंडो बंद करू. |
06:22 | आता plot2d फंक्शन आणि subplot(सबप्लॉट) फंक्शन बद्दल जाणून घेऊ. |
06:28 | सायलॅब त्याच्या सर्व महत्त्वाच्या फंक्शन्सचे डेमो देते. |
06:31 | demonstration(डेमॉन्स्ट्रेशन) टॅबद्वारे plot2d चे डेमोज बघता येतात . |
06:39 | Graphics( ग्रॅफिक्स) वर क्लिक करून 2d_3d plots वर क्लिक करून प्रदान केलेल्या विविध डेमोज मधून डेमो सिलेक्ट करा. |
06:51 | plot2d वर क्लिक करा. |
06:54 | येथे डेमो ग्राफ बघू शकता. |
06:55 | ग्राफचा कोडदेखील येथे view code(व्यू कोड) बटणावर क्लिक करून बघता येतो. |
07:02 | ही लिंक Mac OS मधे उघडत नाही. परंतु विंडोज आणि लिन्क्समधे उघडते. |
07:07 | Mac मधे हा कोड डिरेक्टरीद्वारे बघता येतो. |
07:12 | टर्मिनलवर जाऊ. |
07:15 | आत्ता आपण सायलॅब 5.2 च्या डेमो डिरेक्टरीमधे आहोत. |
07:21 | ह्या डिरेक्टरीचा संपूर्ण पाथ येथे दाखवला आहे. |
07:27 | येथे ls टाईप करून उपलब्ध डेमोंची सूची येथे बघू शकता. |
07:36 | नंतर 2d_3d_plots ही डिरेक्टरी सिलेक्ट करून एंटर दाबा. |
07:46 | sce फाईल्स मधे उपलब्ध असलेले विविध कोड बघण्यासाठी पुन्हा ls टाईप करा. |
07:55 | आधी पाहिलेल्या डेमोचा कोड पाहू. |
08:00 | त्यासाठी टाईप करा more plot2d.dem.sce आणि एंटर दाबा. |
08:11 | येथे plot2d function फंक्शनच्या डेमो ग्राफचा कोड बघू शकतो. |
08:18 | टर्मिनल बंद करा. |
08:21 | तसेच डेमो ग्राफ आणि डेमो विंडो बंद करा. |
08:26 | तसेच इतर डेमोज बघून गोष्टी समजून घ्या. |
08:29 | आता Subplot(सबप्लॉट) फंक्शन जाणून घेऊ. |
08:33 | subplot()(सबप्लॉट) फंक्शन ग्राफिक विंडो विभागून उपविंडोजचा मॅट्रिक्स तयार करते. |
08:37 | सायलॅबमधील plotting 2D graphs वरील डेमो वापरून हे फंक्शन जाणून घेऊ. |
08:43 | उदाहरणार्थ कन्सोलवर टाईप करा plot 2d आणि ह्या फंक्शनचा डेमो plot(प्लॉट) बघा. |
08:58 | ही विंडो बंद करू. |
09:00 | subplot()(सबप्लॉट) कमांड पहिली दोन अर्ग्युमेंटस घेऊन ग्राफिक विंडो विभागते. उपविंडोजचा 2 by 2 matrix तयार करते. |
09:10 | तिसरे अर्ग्युमेंट चालू विंडो दाखवते. जिथे आपल्याला प्लॉट काढायचा आहे. |
09:15 | सायलॅब कन्सोल वर ह्या सर्व कमांडस कॉपी करून त्या कार्यान्वित करू. |
09:24 | एका प्लॉट विंडोवर 4 प्लॉट्स बघू शकतो . |
09:28 | तयार प्लॉट संगणकावर इमेज म्हणून सेव्ह करता येतो. |
09:32 | graphic(ग्रॅफिक) विंडोवर क्लिक करा. File(फाइल) मेनूतील export toसिलेक्ट करा . |
09:39 | प्लॉटला योग्य नाव द्या. |
09:50 | जिथे फाईल सेव्ह करायची आहे तो फोल्डर सिलेक्ट करा. |
09:54 | आपल्याला इमेज ज्या फॉरमॅटमधे हवी आहे तो सिलेक्ट करा. |
09:59 | JPEG फॉरमॅट सिलेक्ट करून सेव्हवर क्लिक करा. |
10:05 | इमेज सेव्ह झाली की नाही हे पाहण्यासाठी डिरेक्टरीमधे जा. |
10:11 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
10:15 | सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ. |
10:20 | सायलॅब लिंक्स पाहात रहा. |
10:22 | स्पोकन ट्युटोरियल्स हा प्रॉजेक्ट "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग असून नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया अर्थसहाय्य मिळाले आहे. |
10:29 | अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा. |
10:32 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागाबद्दल धन्यवाद. |