Geogebra/C3/Tangents-to-a-circle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:26, 25 June 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Tangents to a circle

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: Geogebra


Visual Clue
Narration
00:00 "Tangents to a circle in Geogebra" वरील पाठामध्ये आपले स्वागत.
00:06 यामध्ये आपण वर्तुळाला स्पर्शिका काढणे आणि तिचे गुणधर्म समजून घेणार आहोत.
00:17 Geogebraशी आपला परिचय आहे असे समजू .
00:22 नसल्यास पुढील website वरील ट्युटोरियल बघा.
00:27 या ट्युटोरियलसाठी आपण Ubuntu Linux OS 11.10, Geogebra Version 3.2.47.0 वापरणार आहोत .
00:41 ही Geogebra टूल्स वापरणार आहोत.
    Tangents,
   .Perpendicular Bisector,
   .Intersect two Objects,
   .Compass,
   .Polygon &
   .Circle with Center and Radius.



00:58 Geogebra ची नवी विंडो उघडा.
01:01 Dash home वरील Media Applications वर क्लिक करा. Education खालील GeoGebra निवडा.
01:13 स्पर्शिकेची व्याख्या समजून घेऊ.
01:16 वर्तुळाच्या केवळ एका बिंदूला स्पर्श करणारी रेषा म्हणजे स्पर्शिका.
01:22 त्या बिंदूला स्पर्शबिंदू म्हणतात.
01:27 ह्या पाठासाठी "Axes" layout ऐवजी "Grid" वापरू. ड्रॉईंगपॅडवर राईट क्लिक करा.
01:35 "Axes" अनचेक करून "Grid" निवडा.
01:39 आता वर्तुळाची स्पर्शिका काढू.
01:42 प्रथम वर्तुळ काढू.
01:45 टूलबारवरील Circle with Center and Radius हे टूल निवडा.
01:49 'A' बिंदू ड्रॉईंग पॅडवर काढा.
01:52 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
01:53 त्रिज्या '3' टाईप करा. OK दाबा.
01:58 'A' हा मध्यबिंदू आणि '3' cm त्रिज्येचे वर्तुळ काढले आहे.
02:04 'A' बिंदू हलवा . तेवढ्याच त्रिज्येचे वर्तुळ दिसेल.
02:09 "New point" टूलने वर्तुळाच्या बाहेर 'B' बिंदू काढा.
02:15 " Segment between two points" टूल निवडून 'A' आणि 'B' बिंदू जोडा. रेषाखंड AB तयार होईल.
02:25 "Perpendicular Bisector" टूल घेऊन 'A' आणि 'B' बिंदूवर क्लिक करा. रेषाखंड 'AB' वर लंबदुभाजक काढला जाईल.
02:37 रेषाखंड 'AB' आणि लंबदुभाजक येथे छेदतात. "Intersect two objects" टूल निवडा.
02:44 'C' हा छेदनबिंदू निवडा. आता बिंदू 'B' हलवा. लंबदुभाजक आणि बिंदू 'C' हे बिंदू 'B' बरोबर कसे हलतात ते बघा.
02:59 'C' बिंदू 'AB' चा मध्य आहे हे तपासू.
03:02 "Distance" टूलवर क्लिक करा. नंतर बिंदू 'A' , 'C' आणि 'C' ,'B' वर क्लिक करा. 'AC' = 'CB' आहे असे दिसेल. म्हणजेच 'C' हा 'AB' चा मध्यबिंदू आहे.
03:20 "Compass" टूल घेऊन आकृती पूर्ण करण्यासाठी 'C', 'B' आणि पुन्हा बिंदू 'C' वर क्लिक करा.
03:30 वर्तुळे एकमेकांना दोन बिंदूत छेदतात.
03:33 "Intersect two objects" टूल घेऊन छेदनबिंदू 'D' and 'E' मार्क करा.
03:42 "Segment between two points" टूल घ्या.
03:45 बिंदू 'B', 'D' आणि 'B' , 'E' जोडा.
03:53 रेषाखंड 'BD' आणि 'BE' हे वर्तुळ 'c' च्या स्पर्शिका आहेत
03:59 वर्तुळाच्या ह्या स्पर्शिकांचे काही गुणधर्म पाहू या.
04:05 "Segment between two points" टूल घ्या.
04:08 बिंदू 'A', 'D' आणि 'A', 'E' जोडा.
04:14 त्रिकोण 'ADB' आणि 'ABE' मध्ये रेषाखंड 'AD' = 'AE' आहे. या वर्तुळ 'c' च्या त्रिज्या आहेत.

रेषाखंड 'AD'='AE' समान असल्याचे आपण Algebra व्ह्यूमध्ये बघू शकतो.

04:34 कोन 'ADB' = कोन 'BEA' आहे हे अर्धवर्तुळ 'D' चे कोन आहेत. आता ते कोन मोजू या.
04:48 "Angle" टूलवर क्लिक करून नंतर बिंदू 'A', 'D', 'B' आणि 'B', 'E', 'A' वर क्लिक करा. हे कोन समान आहेत.
05:03 'AB' हा दोन्ही त्रिकोणातील सामाईक रेषाखंड असल्यामुळे बाकोबा कसोटीनुसार त्रिकोण 'ADB' हा त्रिकोण 'ABE' शी एकरूप आहे.
05:20 ह्यावरून स्पर्शिका 'BD' आणि 'BE' समान आहेत.
05:26 हेच तुम्ही Algebra view मध्ये पाहू शकता.
05:33 लक्षात घ्या की स्पर्शिका व त्रिज्या यांच्यातील स्पर्श बिंदूशी झालेला कोन काटकोन असतो. 'B' बिंदू हलवून स्पर्शिका कशा हलतात ते पहा.
05:50 "Save As" वर क्लिक करा.
05:54 फाईलला "Tangent-circle" असे नाव देऊन "Save" वर क्लिक करा.
06:08 आता प्रमेय मांडू या.
06:11 स्पर्शिका आणि जीवा यांच्यात स्पर्शबिंदूशी झालेला कोन हा त्या जीवेने केलेल्या आंतरकोनाएवढा असतो. स्पर्शिका आणि जीवा यांच्यातील कोन DFB= जीवा BFने केलेला आंतरकोन FCB
06:34 प्रमेय तपासू या.
06:38 नवी Geogebra window उघडा. फाईल मेनूतील "New" वर क्लिक करा. आता वर्तुळ काढू.
06:48 "Circle with center through point" टूल निवडा. मध्य म्हणून 'A' बिंदू काढा आणि दुसरा बिंदू 'B' काढा.
06:59 "New point" टूल निवडा. परिघावर बिंदू 'C' आणि वर्तुळाबाहेर बिंदू 'D' काढा.
07:06 "Tangents" टूल निवडा. बिंदू 'D' वर क्लिक करून नंतर परिघावर क्लिक करा.
07:14 दोन स्पर्शिका दिसतील.
07:16 वर्तुळाला ह्या दोन बिंदूत स्पर्श करतात.
07:20 "Intersect two objects" टूल निवडून नंतर छेदनबिंदू 'E' आणि 'F' मार्क करा.
07:28 त्रिकोण काढण्यासाठी "Polygon" टूल निवडा.
07:31 बिंदू 'B' 'C' 'F' आणि पुन्हा 'B' वर क्लिक करून आकृती पूर्ण करा.
07:41 'BF' ही वर्तुळ 'c' ची जीवा आहे.
07:45 कोन 'FCB' हा जीवेने 'c' वर्तुळाशी केलेला आंतरकोन आहे.
07:53 'DFB' हा वर्तुळ 'c' ची स्पर्शिका आणि जीवा मधील कोन आहे.
08:01 कोन मोजण्यासाठी "Angle" टूल निवडा. नंतर 'D' 'F' 'B' आणि 'F' 'C' 'B' या बिंदूंवर क्लिक करा.
08:14 कोन 'DFB' = कोन 'FCB' आहे. 'D' बिंदू हलवू. 'D' बिंदू सोबत स्पर्शिका आणि जीवा देखील हलत आहे.
08:31 फाईल सेव्ह करण्यासाठी "Save As" वर क्लिक करा.
08:36 फाईलला "Tangent-angle" असे नाव देऊन "Save" वर क्लिक करा. आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08:50 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
08:57 बाह्यबिंदूवरून काढलेल्या दोन स्पर्शिका समान असतात.
09:01 स्पर्शिका आणि वर्तुळाच्या त्रिज्येमधील कोन काटकोन असतो.
09:07 स्पर्शिकेने जीवेशी केलेला कोन जीवेने केलेल्या आंतरकोनाएवढा असतो.
09:14 असाईनमेंट मध्ये हे तपासा.
09:17 एका बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकांमधील कोन हा स्पर्शबिंदू जोडणा-या रेषाखंडानी वर्तुळमध्याशी केलेल्या कोनाला पूरक असतो.
09:30 हे तपासण्यासाठी वर्तुळ काढा. बाह्यबिंदूवरून स्पर्शिका काढा.
09:37 स्पर्शिकांचे बिंदू मार्क करून ते बिंदू वर्तुळाच्या मध्यबिंदूशी जोडा.
09:44 स्पर्शिकांमधील तसेच वर्तुळमध्याशी झालेले कोन मोजा.
09:49 दोन्ही कोनांची बेरीज किती आहे? मध्य आणि बाह्य बिंदू जोडा.
09:55 ही रेषा वर्तुळमध्याशी झालेला कोन दुभागते का? Angle Bisector tool वापरून बघा.
10:05 तुमचे आऊटपुट असे दिसायला हवे.
10:08 कोनांची बेरीज सरळकोन असून रेषाखंड कोनाला दुभागत आहे.
10:16 प्रकल्पाची माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे
10:19 ज्यामध्ये प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. आपण व्हिडीओ download करूनही पाहू शकता.
10:27 स्पोकन ट्युटोरियल टीम Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:32 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:35 माहितीसाठी contact@spoken-tutorial.org ला लिहा.
10:42 हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
10:47 यासाठी MHRDयांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
10:54 अधिक माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
10:59 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून
11:04 आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana