Geogebra/C3/Theorems-on-Chords-and-Arcs/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:20, 25 June 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Theorems-on-Chords-and-Arcs

Author: Manali Ranade

Keywords: Geogebra


Visual Clue
Narration
00:01 नमस्कार. Geogebra मधील जीवा( Chords) आणि कंस(Arcs) या वरील प्रमेयांच्या(Theorems) पाठात स्वागत.
00:08 ह्या पाठाच्या शेवटी तुम्ही,
00:10 वर्तुळाच्या जीवा आणि

कंस तपासण्यास सक्षम व्हाल.

00:19 Geogebra चे प्राथमिक ज्ञान आपल्याला आहे असे समजू.
00:23 नसल्यास संबंधित पाठासाठी http://spoken-tutorial.org ह्या वेबसाईटला भेट द्या.
00:30 ह्या पाठासाठी आपण,
00:33 Ubuntu Linux OS Version 11.10, Geogebra Version 3.2.47.0 वापरत आहोत.
00:43 आपण पुढील Geogebra टूल्स वापरू.
00:47 * Circle with Center and Radius
00:50 * Circular Sector with Center between Two Points
00:53 * Circular Arc with Center between Two points
00:56 * Midpoint आणि
  • Perpendicular line


01:00 GeoGebra ची नवीन विंडो उघडू .
01:02 Dash home मधील Media Apps वर क्लिक करा.
01:07 Type खालील Education वर क्लिक करून GeoGebra वर क्लिक करा.
01:15 आता प्रमेय मांडू.
01:18 वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो.
01:23 वर्तुळमध्य A मधून BC या जीवेवर टाकलेला लंब ती जीवा दुभागत.
01:32 प्रमेय तपासून पाहू.
01:37 ह्या पाठासाठी Axes ऐवजी 'Grid layout' वापरू.
01:42 ड्रॉईंग पॅड वर राईट क्लिक करा.
01:44 'Graphic view' मधे
01:45 'Axes' अनचेक करून
01:47 'Grid' निवडा.
01:52 आता वर्तुळ काढू.
01:54 टूलबारवरील Circle with Center and Radius हे टूल निवडा.
01:58 ड्रॉईंग पॅडवर बिंदू 'A' काढा.
02:01 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
02:03 त्रिज्येसाठी( Radius) '3' टाईप करा.
02:06 OK क्लिक करा.
02:07 मध्यबिंदू 'A' आणि त्रिज्या '3सेंटीमीटर' असलेले वर्तुळ तयार होईल.
02:14 बिंदू 'A' हलवून वर्तुळाच्या हालचाली पाहु.
02:19 “Segment between two points” हे टूल निवडा.
02:22 वर्तुळाच्या परीघावर 'B' आणि 'C' हे बिंदू काढा.
02:27 जीवा 'BC' तयार होईल.
02:30 जीवा 'BC' वर बिंदू 'A' मधून जाणारा लंब काढू.
02:36 टुलबार वरील "Perpendicular line" टूलवर क्लिक करा.
02:39 जीवा 'BC', आणि बिंदू 'A' वर क्लिक करा.
02:45 बिंदू 'B' हलवून, बिंदू 'B' सोबत लंब देखील हलताना आपण पाहु.
02:52 लंब आणि जीवा 'BC', एका बिंदूत छेदतात.
02:57 “Intersect Two objects” वर क्लिक करा,
02:59 छेदनबिंदू 'D' म्हणून मार्क करा.
03:04 D हा जीवा BC चा मध्यबिंदू आहे का ते तपासू.
03:09 "Distance" tool... वर क्लिक करा
03:12 बिंदू 'B' 'D' आणि 'D' 'C' वर क्लिक करा.
03:19 'BD' आणि 'DC' हे अंतर समान असल्याचे लक्षात येईल.
03:24 हे सुचवते, 'D' हा जीवा 'BC' चा मध्यबिंदू आहे.
03:29 आता कोन 'CDA' मोजू.
03:33 Angle tool वर क्लिक करा.
03:36 बिंदू 'C','D', 'A' वर क्लिक करा.
03:42 'CDA' हा 90 अंशाचा कोन आहे.
03:46 प्रमेय सिध्द झाले आहे.
03:50 आता बिंदू 'C' हलवू.
03:52 बिंदू 'C' सोबत अंतर देखील बदलताना दिसेल.
04:03 फाईल सेव्ह करू.
04:05 “File”>> "Save As" वर क्लिक करा.
04:08 फाईलला "circle-chord" हे नाव देऊन “Save” वर क्लिक करा.
04:21 आता पुढील प्रमेय पाहू.
04:28 समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात.
04:34 BC या कंसाने आंतरलिखित केलेले BDC आणि BEC हे कोन समान असतात.
04:44 हे प्रमेय तपासून पाहू.
04:51 नवी Geogebra विंडो उघडू,
04:54 “File” खालील "New" वर क्लिक करा.
04:55 एक वर्तुळ काढू.
04:57 टूलबारवरील " Circle with Center through point टूल वर क्लिक करा.
05:01 मध्यबिंदू म्हणून बिंदू 'A' काढा.
05:04 बिंदू 'B' आणि 'C' मिळवण्यासाठी परिघावर पुन्हा एकदा क्लिक करा.
05:09 आता कंस 'BC' काढू.
05:13 "Circular Arc with Center between Two points" वर क्लिक करा.
05:18 परिघावरील बिंदू 'A' आणि बिंदू 'B' आणि 'C' वर क्लिक करा.
05:24 कंस 'BC' तयार झाला आहे.
05:27 कंस 'BC' च्या प्रॉपर्टीमधे बदल करू.
05:30 "Algebra View" मधे
05:32 object 'd' वर राईट क्लिक करा.
05:35 "Object Properties" निवडा.
05:38 हिरवा रंग निवडून close वर क्लिक करा.
05:46 new point टूल वर क्लिक करा. वर्तुळाच्या परिघावर बिंदू 'D' आणि 'E' काढा.
05:56 कंस BCवरून बिंदू 'D' आणि 'E' शी दोन कोन तयार करू.
06:04 "Polygon" टूलवर क्लिक करा.
06:05 बिंदू 'E', 'B', 'D', 'C' आणि आकृती पूर्ण करण्यासाठी पुन्हा 'E' वर क्लिक करा.
06:18 कोन 'BDC' आणि 'BEC' मोजू.
06:27 "Angle" टूलवर क्लिक करा.
06:29 बिंदू 'B', 'D', 'C' आणि 'B', 'E', 'C' वर क्लिक करा.
06:40 कोन 'BDC' आणि 'BEC' हे समान असल्याचे दिसेल.
06:52 पुढील प्रमेय पाहू.
06:55 कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो.
07:06 BC या कंसाने A शी केलेला BACहा कोन त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या BEC आणि BDC या कोनांच्या दुप्पट असतो.
07:22 हे प्रमेय तपासून पाहू.
07:26 वर्तुळखंड 'ABC' काढू.
07:30 "Circular Sector with Center between Two Points" टूल वर क्लिक करा.
07:35 बिंदू 'A', 'B', 'C' वर क्लिक करा.
07:45 वर्तुळखंड 'ABC' चा रंग बंदलू.
07:48 वर्तुळखंड 'ABC' वर राईट क्लिक करा.
07:51 "Object Properties" निवडा.
07:54 हिरवा रंग निवडून "Close" वर क्लिक करा.
08:00 कोन 'BAC' मोजू.
08:04 "Angle" टूल वर क्लिक करा. बिंदू 'B', 'A', 'C' वर क्लिक करा.
08:15 कोन 'BAC' हा कोन 'BEC' आणि 'BDC' च्या दुप्पट आहे.
08:28 बिंदू 'C' हलवून पाहू.
08:32 कोन 'BAC' हा कायमच 'BEC' आणि 'BDC' च्या दुप्पट आहे.
08:41 अशाप्रकारे ही प्रमेय सिध्द झाली आहेत.
08:45 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08:48 थोडक्यात,
08:53 ह्या पाठात आपण सिध्द केले,
08:57 * वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो.
09:00 * समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात
09:06 * कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो.
09:15 असाईनमेंट म्हणून तुम्ही हे तपासून पाहा.
09:19 वर्तुळाच्या समान जीवा मध्यबिंदूपासून समान अंतरावर असतात.
09:24 वर्तुळ काढा.
09:26 Segment with Given length from point टूल निवडा.
09:29 हे टूल दोन समान आकाराच्या दोन जीवा काढण्यासाठी वापरा.
09:33 त्या जीवांवर मध्यबिंदूपासून लंब काढा.
09:37 छेदनबिंदू मार्क करा.
09:40 लंबांचे अंतर मोजा.
09:44 असाईनमेंट अशाप्रकारे दिसणे गरजेचे आहे.
09:48 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:53 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:00 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:03 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:14 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:29 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana