Geogebra/C2/Spreadsheet-View-Basics/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:13, 25 June 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Spreadsheet View Basics

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: Geogebra


Time Narration
00:01 नमस्कार. Basics of Spreadsheets वरीलGeogebra ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:05 जर प्रथमच Geogebra वापरणार असाल तर वेबसाईटवरील Introduction to Geogebra हे ट्युटोरियल बघा.
00:12 Geogebra सुरू करण्यासाठी GNU/Linux Ubuntu Version 10.04 LTS आणि Geogebra Version 3.2.40.0 चा वापर करणार आहोत.
00:23 या ट्युटोरियलमध्ये Geogebraमध्ये स्प्रेडशीटचा वापर कसा करायचा हे आपण शिकणार आहोत.
00:29 basic data representation आणि आकडेमोड करणे.
00:36 स्तंभालेख काढण्यासाठी data वापरणे.
00:39 तसेच spreadsheet view वापरून आवर्ती पध्दतीने अनेक Geogebra objects उदाहरणार्थ समांतर रेषा निर्माण करणे
00:49 प्रथम, 50 मार्कांच्या परीक्षेत50 विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांचा विचार करू.
00:53 च्यापासून च्यापर्यंतची वर्गमर्यादा आणि वारंवारता येथे उपलब्ध आहे.
00:59 आता आपण ही वारंवारता क्लिपबोर्डवर कॉपी करू.
01:05 आता Geogebra विंडोवर जा.
01:09 प्रथम spreadsheet view सुरू करू.
01:13 view मेनूमधील spreadsheet view निवडा.
01:19 हा spreadsheet view येथे सरकवू या.
01:25 कॉलम A आपल्याला च्यापासूनची वर्गमर्यादा दाखवेल. तर कॉलम b मध्ये च्यापर्यंतची वर्गमर्यादा व कॉलम c वारंवारता दाखवेल.
01:36 आता कॉपी केलेली वारंवारता येथे पेस्ट करू.
01:41 आता च्यापासून आणि च्यापर्यंतच्या व्हॅल्यूज
01:46 येथे पेस्ट करणार नाही कारण मी स्प्रेडशीटचे अजून एक वैशिष्ट्य दाखवणार आहे.
01:53 आता सुरूवात करू या.
01:56 येथे प्रथम 0,
01:59 5, 5
02:04 आणि 10
02:06 जर येथे दोन cells सिलेक्ट करून हा निळ्या रंगाचा चौकोन खाली ड्रॅग केला तर अंकगणितीय श्रेणी तयार झालेली दिसेल.
02:16 हेच च्यापर्यंतच्या व्हॅल्यूजसाठी देखील करू.
02:22 आता वर्गमर्यादा सूची आणि वारंवारता सूची बनवू या. त्यासाठी येथील कॉलम B निवडा.
02:30 त्यावर राईट क्लिक करून create List हा पर्याय निवडा. L1 म्हणजेच L_1 तयार झालेले दिसेल.
02:40 काही बदल करण्यासाठी L1वर राईट क्लिक करून object properties हा पर्याय निवडा आणि पहिली व्हॅल्यू 0येण्यासाठी येथे 0टाईप करा.
02:53 आणि क्लोजचे बटण दाबा.
02:57 आता वारंवारता सूचीसाठी पुन्हा असेच करू या. त्यासाठी वारंवारता निवडून त्यावर राईट क्लिक करून create List हा पर्याय निवडा.
03:04 आता आपल्याकडे L_2 तयार आहे.
03:09 आता स्तंभालेख बनवण्यासाठी येथे इनपुट बारवर जा.
03:15 तुम्ही येथे कमांडसच्या ड्रॉपडाऊन मधून निवडा किंवा histogram असे टाईप करा.
03:22 आता येथे square brackets मध्ये एंटर केल्यावर आपल्याला विविध पर्याय सुचवले जातील.
03:28 त्यापैकी एक पर्याय म्हणजे list of class boundaries and list of raw data. आपण हा वापरू.
03:35 geogebra हे case sensetive आहे. त्यामुळे वर्गमर्यादेसाठी L_1 आणि वारंवारतेसाठी L_2 टाईप करून एंटर दाबा.
03:47 आपल्याला येथे स्तंभालेख तयार झालेला दिसेल.
03:52 आता स्तंभालेख नीट वाचता यावा म्हणून आपण मूव्ह ड्रॉईंगपॅडचा वापर करणार आहोत आणि नंतर मी येथे Drawing pad properties वर राइट-क्लिक करणार आहे आणि ही लांबी 5 मध्ये बदलून जी प्रत्येक बार ची रुंदी आहे, तसेच close वर क्लिक करू.
04:15 आता zoom out करू या.
04:22 आणि पुन्हा ड्रॉईंग पॅड हलवू या.
04:28 लक्ष द्या, आपण स्तंभालेख काढल्यावर a=250 ही व्हॅल्यू मिळाली आहे.
04:34 ही प्रत्येक बारच्या लांबी आणि रूंदीच्या गुणाकारांची बेरीज दाखवते.
04:41 ही व्हॅल्यू येथे वरती सरकवू.
04:49 आता पुढे आपण spreadsheet viewच्या सहाय्याने अनेक बिंदू व त्यातून Y अक्षाला समांतर रेषा काढणार आहोत.
04:56 Geogebra च्या नव्या विंडोवर जाऊ.
05:02 आपण Geogebra ची कुठलीही कमांड येथे सेलमध्ये लिहू शकतो.
05:07 पहिला बिंदू काढण्यासाठी आपण तो येथे अशा प्रकारे लिहू शकतो.
05:19 A1, नामक बिंदू येथे दिसेल जो कॉलम A आणि row 1 हा cell address दर्शवतो. यात 1,2हे coordinates आहेत.
05:34 त्याचप्रमाणे येथे 2,2 टाईप करून एंटर दाबा. आपल्याला A2 मिळेल.
05:45 आता हे दोन सेल्स सिलेक्ट करून तेथील निळ्या रंगाचा चौकोन ड्रॅग करा.
05:54 हे बाजूला सरकवू या.
05:56 या ट्युटोरियलमध्ये Algebra view बंद करू.
06:02 आपल्याला 10 बिंदू मिळाले आहेत.
06:08 तसेच कॉलम B मध्ये आपण
06:16 1,4 असे टाईप केल्यावर आपल्याला येथे हा बिंदू मिळेल. त्यावर राईट क्लिक करून show label हा पर्याय निवडा. आपल्याला B1 हा cell address मिळेल.
06:28 आता टाईप करा.
06:35 2,4 आणि आपल्याला b 2 मिळेल.
06:41 आता हे ड्रॅग केल्यावर आपल्याला 10 बिंदू मिळतील.
06:48 समजा आपल्याला तिस-या कॉलममध्ये रेषाखंड बनवायचा आहे.
06:56 येथे segment ही geogebra command वापरू शकतो आणि व्हॅल्यू मध्ये आपणA1 हा cell address टाईप करू या.
07:08 हे येथे सरकवून घ्या.
07:12 नंतर पुढे, B1 टाईप करून एंटर दाबा.
07:17 ही रेषाखंडाची A1 आणि B1 मधील लांबी आहे.
07:23 आता हा सेल सिलेक्ट करून ते खाली ड्रॅग करा. आपल्याला 10 समांतर रेषांचा संच दिसेल.
07:33 अजून एक म्हणजे जर आपण options मेनूमधील Algebra या पर्यायावर गेलो,
07:40 तेथे वॅल्यू पर्याय निवडल्यामुळे आपल्याला कॉलम ' C ' मध्ये लांबी दिसत आहे.
07:44 ते बदलून आपण कमांड हा पर्याय निवडू या ते आपल्याला येथे दिलेली कमांड दर्शवेल.
07:51 आता असाईनमेंट करू या.
07:55 वर्गातील 35 विद्यार्थ्यांची घरे आणि शाळा यातील अंतर सांगणारा data वापरून स्तंभालेख काढा.
08:04 येथे वर्गमर्यादा आणि वारंवारता दिलेली आहे.
08:09 data दाखवण्यासाठी स्प्रेडशीट व्ह्यू वापरा. वर्गमर्यादा आणि वारंवारता यांची सूची बनवा.
08:15 सूची सहित स्तंभालेख काढण्यासाठी इनपुट बार वापरा.
08:18 वारंवारतेत बदल करून स्तंभालेखामध्ये होणा-या बदलाकडे लक्ष द्या.
08:22 मी ही असाईनमेंट आधीच तयार केली आहे.
08:26 येथील हा
08:31 स्तंभालेख बघा.
08:33 आता पुढील असाईनमेंट बघू या.
08:36 दुस-या असाईनमेंट मध्ये आपण स्प्रेडशीट व्ह्यू च्या सहाय्याने समकेंद्री वर्तुळे काढणार आहोत.
08:43 वर्तुळाचा मध्यबिंदू काढण्यासाठी ड्रॉईंगपॅडवर A हा बिंदू काढा. आणि स्प्रेडशीट मध्ये त्रिज्येसाठी कॉलम A बनवा.
08:52 A हा मध्यबिंदू आणि कॉलमAमधील त्रिज्या घेऊन वर्तुळे काढणारी कमांड कॉलम B मध्ये लिहा.
08:58 A हा मध्यबिंदू हलवून होणारे बदल बघा.
09:02 ही असाईनमेंट मी येथे बनवून ठेवली आहे.
09:06 मध्यबिंदू हलवा आणि
09:10 वर्तुळांकडे लक्ष द्या.
09:12 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:27 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana