Java/C2/Primitive-type-conversions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:40, 23 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Title of script: Primitive-type-conversions
Author: Manali Ranade
Keywords: Java
Time | Narration |
00:01 | Java तील Type Conversion वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
00:06 | यात शिकणार आहोत, |
00:08 | * डेटा एका टाईपमधून दुस-यात convert करणे. |
00:13 | * दोन प्रकारची conversions, implicit आणि explicit. |
00:18 | * strings चे numbers मधे रूपांतर करणे. |
00:23 | यासाठी वापरत आहोत,
|
00:33 | आपल्याला Java तील data types माहिती हवेत. |
00:38 | नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:47 | Type conversion म्हणजे डेटा एका डेटाटाईप मधून दुस-यात convert करणे. |
00:53 | ते कसे करायचे ते पाहू. |
00:55 | Eclipse वर जाऊ. |
01:02 | हा Eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे. |
01:07 | मी TypeConversion क्लास बनवून त्यात main मेथड लिहिली आहे. |
01:13 | काही व्हेरिएबल्स बनवू. |
01:19 | int a equal to 5
float b b equal to a |
01:33 | मी दोन व्हेरिएबल्स बनवली आहेत. a हे integer आणि b हे float आहे. |
01:39 | integer व्हॅल्यू float व्हेरिएबलमधे संचित करत आहोत. |
01:43 | आता float व्हेरिएबलमधे काय संचित आहे ते पाहू. |
01:48 | System dot out dot println (b); |
01:58 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:07 | integer 5 हे float 5.0 मधे रूपांतरित झाले आहे. |
02:13 | ह्या प्रकाराला implicit conversion म्हणतात. |
02:17 | नावाप्रमाणे व्हॅल्यू योग्य डेटाटाईप मधे आपोआप convert होते. |
02:24 | ह्याच पध्दतीने float व्हॅल्यू int मधे convert करू. |
02:30 | येथील 5 काढून टाका. float b equal to 2.5f टाईप करा. b व्हेरिएबल a मधे संचित करून a ची व्हॅल्यू प्रिंट करा . |
02:50 | फाईल सेव्ह करा. |
02:56 | आपल्याला ही error दिसेल. |
03:00 | Type mismatch: cannot convert from float to int |
03:06 | म्हणजे फक्त int चे float मधे Implicit conversion शक्य आहे. परंतु उलट शक्य नाही. |
03:13 | float चे int मधे रूपांतर करण्यासाठी explicit conversion वापरावे लागेल. |
03:17 | कसे ते पाहू. |
03:23 | हे आपण व्हेरिएबलच्या आधी parentheses मधे int लिहून करू शकतो. |
03:34 | हे स्टेटमेंट व्हेरिएबल b मधील डेटा int डेटाटाईप मधे convert करून a मधे संचित करेल. |
03:43 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:51 | दिसेल की, float व्हॅल्यू int मधे convert झालेली आहे. |
03:56 | डेटा टाईपला अनुरूप होण्यासाठी डेटा त्यानुसार बदलला गेला आहे. |
04:01 | int डेटा float मधे convert करण्यासाठी सुध्दा Explicit conversion वापरू शकतो . |
04:07 | मागील उदाहरण करून पाहू. |
04:10 | int a =5, float b, b = (float) a |
04:32 | System.out.println(b); |
04:36 | आपण integer व्हॅल्यू float मधे convert करण्यासाठी Explicit conversion वापरत आहोत. |
04:42 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:51 | दिसेल की, int व्हॅल्यू ही float value मधे convert झाली आहे. |
04:58 | character व्हॅल्यू integer मधे convert करताना काय होते ते पाहू. |
05:06 | int a, char c equal to single quotes मध्ये m ; |
05:24 | a equal to (int) c |
05:32 | System dot out dot println (a); |
05:36 | m हे character integer मधे convert करून ती व्हॅल्यू प्रिंट करत आहोत. |
05:43 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
05:53 | 109 हे आऊटपुट दिसेल जी m ची ascii व्हॅल्यू आहे. |
05:58 | म्हणजे char व्हॅल्यू int मधे convert होतात तेव्हा त्याची ascii व्हॅल्यू संचित होते. |
06:03 | digit घेऊन करून पाहू. |
06:06 | char c = single quotes मध्ये अंक 5 |
06:11 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
06:18 | आऊटपुट 53 आहे. जी character 5 ची ascii व्हॅल्यू आहे. |
06:24 | ही संख्या 5 नाही. |
06:26 | संख्या मिळवण्यासाठी string वापरून ती integer मधे convert करावी लागेल. |
06:31 | कसे ते पाहू. |
06:33 | main function मधील सर्व काढून टाका. |
06:38 | टाईप करा. |
06:40 | String sHeight equal to double quotes मधे 6 . ह्यात उंची string रूपात लिहिली आहे. |
06:58 | int h equal to explicit conversion to int of sHeight आणि नंतर |
07:11 | System dot out dot println (h); फाईल सेव्ह करा. |
07:27 | 6 व्हॅल्यू असलेले string व्हेरिएबल आहे आणि ते integer मधे convert करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण error मिळाली आहे. |
07:37 | Cannot cast from String to int. |
07:42 | म्हणजेच strings convert करण्यासाठी implicit किंवा explicit conversion वापरू शकत नाही. |
07:48 | हे वेगळ्या पध्दतीने केले जाते. कसे ते पाहू. |
07:58 | int sHeight काढून टाका आणि टाईप करा Integer dot parseInt कंसात sHeight . |
08:21 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
08:29 | व्हॅल्यू यशस्वीरित्या integer मधे convert झाली आहे. |
08:35 | ह्यासाठी Integer module मधील parseInt method वापरली आहे. |
08:41 | संख्येत एकापेक्षा जास्त अंक असतील उदाहरणार्थ, 6543 तर काय होते पाहू. |
08:49 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
08:55 | दिसेल की, string रूपातील अशी बहुअंकी संख्या सुध्दा यापध्दतीने integer मधे convert होते. |
09:03 | जर string, floating point number असेल तर काय होते ते पाहू. |
09:10 | 6543 च्या जागी 65.43 लिहू. म्हणजेच आपल्याजवळ strings मधे floating point number आहे. जो आपण integer मधे convert करत आहोत. |
09:22 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. |
09:31 | आपल्याला एरर मिळेल. कारण string मधे लिहिलेला floating point number आपण integer मधे convert करू शकत नाही. |
09:41 | आपल्याला तो float मधे convert करावा लागेल. कसा ते पाहू; |
09:45 | प्रथम डेटा टाईप float असावा लागेल, |
09:51 | दुसरे म्हणजे आपल्याला float . parsefloat मेथड वापरावी लागेल. |
10:07 | float क्लासची Parsefloat मेथड वापरून string मधे लिहिलेल्या floating point number चे रूपांतर प्रत्यक्ष floating point number मधे करत आहोत. |
10:18 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला दिसेल string मधे लिहिलेल्या floating point number चे रूपांतर हे यशस्वीरित्या floating point number मधे झाले आहे. |
10:33 | अशाप्रकारे implicit आणि explicit conversion केले जाते. तसेच strings चे रूपांतर संख्येत केले जाते. |
10:45 | हा पाठ येथे संपत आहे. |
10:48 | यात शिकलो डेटा एका प्रकारातून दुस-यात convert करणे. |
10:54 | implicit आणि explicit conversion म्हणजे काय? |
10:57 | आणि strings चे रूपांतर संख्यांमधे करणे. |
11:01 | असाईनमेंट. Integer.toString आणि Float.toString विषयी माहिती वाचा. |
11:07 | ते काय करतात ते सांगा. |
11:14 | प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:20 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:23 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:27 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:31 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:34 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11:40 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:44 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:50 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:55 | सहभागासाठी धन्यवाद . |