LibreOffice-Suite-Writer/C2/Introduction-to-LibreOffice-Writer/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 19:36, 2 December 2012 by 10.21.2.99 (Talk)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Introduction to Writer

Author: Manali Ranade

Keywords: Writer

Visual Clue
Narration
0:01 लिबर ऑफिस रायटरच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: Writer ची प्राथमिक ओळख
0:10 रायटर मधील विविध टूलबार
0:13 नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे.
0:17 डॉक्युमेंट सेव्ह करणे.
0:20 रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे.
0:22 लिबर ऑफिस रायटर हा Libre Office Suite मधील वर्ड प्रोसेसर घटक आहे.
0:27 रायटरचे साम्य मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड सॉफ्टवेअरशी आहे.
0:33 हे एक विनामूल्य व मुक्तपणे उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे आपण त्याचे वितरण, देवघेव व वापर कुठल्याही निर्बंधांशिवाय करू शकतो.
0:41 लिबर ऑफिसचा वापर करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क द्यावे लागत नाही.
0:47 Libre Office Suite आपल्या संगणकावर सुरू करण्यासाठी आपल्या संगणकावर Microsoft Windows 2000 किंवा त्यानंतर आलेल्या विंडोज XP किंवा विंडोज7 ह्यापैकी Operating System असावी. अन्यथा GNU/Linux सारख्या Operating System चा वापरही तुम्ही करू शकता.
1:04 आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
1:16 जर आपल्या संगणकावर Libre Office Suite ची स्थापना केलेली नसेल तर आपण Synaptic Package Manager चा वापर करून Writer ची स्थापना करू शकता.
1:24 Synaptic Package Manager वरील अधिक माहितीसाठी कृपया उबंटु लिनक्सवरील ट्युटोरियल पहावे. तसेच Libre Office Suite डाऊनलोड करण्यासाठी सदर वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
1:37 यासंबंधी तपशीलवार सूचना Libre Office Suite च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत.
1:43 Writer ची स्थापना करताना आपल्याला “Complete” ह्या पर्यायाची निवड करावयाची आहे हे लक्षात ठेवा.
1:50 जर आपल्याकडे 'Libre Office Suite' आधीपासून स्थापित असेल तर
1:54 तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे 'Applications' वर क्लिक केल्यावर तुम्हाला लिबर ऑफिस रायटर दिसेल.
2:02 'Office' वर क्लिक करून नंतर 'Libre Office' या ऑप्शनवर क्लिक करा.
2:08 लिबर ऑफिसमधील विविध घटकांसहित नवीन डायलॉग बॉक्स उघडेल.
2:13 लिबर ऑफिस रायटर मध्ये जाण्यासाठी वर्ड प्रोसेसर घटक असलेल्या 'Text Document' या ऑप्शनवर क्लिक करा.
2:23 मुख्य रायटर विंडोमध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडले जाईल.
2:28 रायटर विंडोमध्ये विविध टूलबार्स आहेत. जसे की, टायटल बार,
2:33 मेनूबार, स्टँडर्ड टूल बार, फॉरमॅटिंग बार आणि स्टेटस बार.
2:36 या टूलबार्सवरील प्रामुख्याने वापरले जाणारे ऑप्शन्स या ट्युटोरियलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत.
2:47 रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेण्यासाठी आता आपण ट्युटोरियलला सुरूवात करू.
2:53 स्टँडर्ड टूलबार वरील 'New' या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट उघडता येते.
3:00 किंवा मेनूबारवरील 'File' ऑप्शनवर क्लिक करून
3:05 नंतर 'New' ऑप्शनवर क्लिक करा आणि शेवटी 'Text Document' वर क्लिक करा.
3:12 तुम्हाला दिसेल की या दोन्ही पध्दतींनी रायटर ची नवीन विंडो उघडता येते.
3:17 आता 'Editor Area' मध्ये काही टेक्स्ट टाईप करू.
3:21 प्रथम 'RESUME' असे टाईप करू या.
3:24 एकदा डॉक्युमेंटमध्ये लिहून झाले की पुढील वापरासाठी ते सेव्ह करणे आवश्यक असते.
3:29 फाईल सेव्ह करण्यासाठी मेनूबारवरील 'File' ऑप्शनवर क्लिक करा.
3:33 आणि नंतर 'Save as' या ऑप्शनवर क्लिक करा.
3:36 तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल, तिथे 'Name' या फिल्डखाली तुम्ही फाईलचे नाव एंटर करणे अपेक्षित आहे.
3:44 आता 'resume' असे फाईलचे नाव एंटर करा.
3:48 'Name' या फिल्डखाली 'Save in folder' आहे.
3:53 ह्या फिल्डमध्ये तुम्ही फोल्डरचे नाव देणे आवश्यक आहे, ज्यात तुम्हाला तुमची फाईल सेव्ह करायची आहे.
3:58 आता 'Save in folder' च्या डाऊन ऍरोवर क्लिक करा आणि 'Desktop' या ऑप्शनवर क्लिक करा.
4:02 जिथे फाईल सेव्ह करता येईल अशा फोल्डरची यादी तुम्हाला मेनूमध्ये दिसेल.
4:08 आता 'Desktop' या ऑप्शनवर क्लिक करा. फाईल 'Desktop' वर सेव्ह होईल.
4:14 तुम्ही 'Browse for other folders' वर देखील क्लिक करू शकता.
4:18 आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा.
4:23 आता डायलॉग बॉक्समधील "File Type” या ऑप्शनवर क्लिक करा.
4:27 इथे फाईलचे प्रकार किंवा फाईलच्या एक्सटेन्शनची यादी दिसेल ज्यात आपल्याला आपली फाईल सेव्ह करता येते.
4:34 लिबर ऑफिस रायटरचा Default File Type 'ODF text Document' आहे, जे आपल्या फाईलला 'odt' हे एक्सटेन्शन प्रदान करते.
4:45 'ODT' हे 'Open Document Format' म्हणजेच 'ODF' फॉरमॅटशी संबंधित असून, वर्ड डॉक्युमेंटसाठीचे हे एक ओपन स्टँडर्ड आहे. ह्याचा जागतिक स्तरावर स्वीकार करण्यात आला आहे.
4:56 भारत सरकारने 'e-Governance' साठी स्वीकारलेल्या Standards मध्ये वरील फॉरमॅटचा स्वीकार केलेला आहे.
5:04 लिबर ऑफिस Writer मध्ये उघडण्यासाठी फाईलdot odt फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त
5:11 आपण आपली फाईल dot doc, आणि dot docx फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो जी MS Officeच्या Word प्रोग्रॅम मध्ये सुध्दा उघडता येते.
5:23 इतर बहुसंख्य प्रोग्रॅम मध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाईल एक्सटेन्शन dot rtf म्हणजे 'Rich Text Format' .
5:33 आपण 'ODF Text Document' या ऑप्शनवर क्लिक करू या.
5:37 तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शनसमोर फाईल टाईप 'ODF Text Document' आणि कंसात 'dot odt' असे आलेले दिसेल.
5:48 सेव्ह बटणावर क्लिक करा.
5:50 हे तुम्हाला पुन्हा Writer विंडोवर घेऊन जाईल जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल.
5:58 आता रायटर मध्ये डॉक्युमेंट बनवण्याठी आपण तयार झालो आहोत.
6:03 वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त डॉक्युमेंट, dot html या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते, जे वेब पेज फॉरमॅट मध्ये असते.
6:13 ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते.
6:17 आता मेनूबार वरील 'File' या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save as' या ऑप्शनवर क्लिक करा.
6:24 आता 'File Type' या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर 'HTML Document' आणि कंसातopen office dot org Writer या ऑप्शनवर क्लिक करा.
6:35 हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला dot html हे एक्सटेन्शन देईल.
6:40 सेव्ह बटणावर क्लिक करा.
6:42 आता डॉयलॉग बॉक्समधील 'Ask when not saving in ODF format' हा ऑप्शन सिलेक्ट करा.
6:50 शेवटी 'Keep current format' या ऑप्शनवर क्लिक करा.
6:55 तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट dot html ह्या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे.
7:00 स्टँडर्ड टूलबार वरील 'Export directly as PDF' या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट PDF फॉरमॅट मध्ये export करता येते.
7:10 पूर्वी केल्याप्रमाणे प्रथम तुम्हाला तुमची फाईल जिथे सेव्ह करायची आहे ती जागा निवडून घ्या.
7:15 हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग 'Export as pdf' या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता.
7:24 तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील 'Export' ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save' बटणावर क्लिक करा.
7:32 अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटची एक pdf फाईल बनेल.
7:35 आता मेनूबारवरील 'File' आणि मग 'Close' ऑप्शनवर क्लिक करून हे डॉक्युमेंट बंद करू या.
7:40 पुढे आपण लिबर ऑफिस रायटर मध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत.
7:47 'resume.odt' हे डॉक्युमेंट उघडू या.
7:51 अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करा आणि नंतर 'Open' या ऑप्शनवर क्लिक करा.
8:00 स्क्रीनवर तुम्हाला डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल.
8:04 जिथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेव्ह केले आहे तो फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे.
8:08 त्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये डाव्या बाजूला वरच्या कोप-यात छोट्या पेन्सिल बटणावर क्लिक करा.
8:14 त्याचे नाव 'Type a file name' असे आहे.
8:16 'Location Bar' हे फिल्ड उघडेल
8:19 तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव इथे टाईप करा.
8:24 आता आपण 'resume' असे फाईलचे नाव लिहू या.
8:27 आता फाईलच्या नावांत 'resume' असे असलेली यादी दिसेल. त्यातून 'resume dot odt' निवडा.
8:34 आता 'Open' या बटणावर क्लिक करा.
8:37 तुम्हाला 'resume.odt' ही फाईल उघडलेली दिसेल.
8.41 त्याशिवाय वरील टूलबार मधील आयकॉनवर 'Open' या आयकॉनवर क्लिक करून आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रिया करून तुम्ही उपलब्ध असलेली फाईल उघडू शकता.
8:52 तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरल्या जाणा-या dot doc आणि dot docx या एक्सटेन्शनच्या फाईल देखील रायटर मध्ये उघडू शकता.
9:03 आता आपण बघणार आहोत की फाईलमध्ये बदल करून ती त्याच नवाने कशी सेव्ह करावी.
9:10 आता प्रथम माऊसचे डावे बटण क्लिक करून ते "RESUME” या टेक्स्टवर ड्रॅग करा.
9:17 अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाईट होईल. आता माऊसचे डावे बटण सोडून द्या.
9:24 टेक्स्ट हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे.
9:26 आता स्टँडर्ड टूलबारवरील 'Bold' या आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे टेक्स्ट बोल्ड झालेले दिसेल.
9:33 टेक्स्टला पानाच्या मध्यभागी आणण्यासाठी टूलबार वरील "Centered” या आयकॉनवर क्लिक करा.
9:41 तुम्हाला टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल.
9:45 आता आपण टेक्स्टचा फाँट साईज वाढवू या.
9:48 त्यासाठी टूलबार वरील 'Font Size' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करू.
9:53 ड्रॉप डाऊन मेनूतील '14' वर क्लिक करू या.
9:57 त्यामुळे टेक्स्टच्या फाँटचा साईज '14' पर्यंत वाढलेला दिसेल.
10:01 आता 'Font Name' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा. आणि नंतर 'Un Dotum' हा फाँट सिलेक्ट करा.
10:09 टूलबारवरील 'Save' या आयकॉनवर क्लिक करा.
10:13 तुम्हाला दिसेल की फाईलमध्ये बदल केल्यानंतरही ती फाईल त्याच नावाने सेव्ह झालेली आहे.
10:21 एकदा तुमचे डॉक्युमेंट सेव्ह झाल्यानंतर जर तुम्हाला ते बंद करायचे असेल,
10:25 तर केवळ मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करून 'Close' या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची फाईल बंद होईल.
10:33 आपण लिबर ऑफिस Writer वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण काय शिकलो ते थोडक्यात :
10:43 Writer ची प्राथमिक ओळख.

रायटर मधील विविध टूलबार.

10:45 नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे.

डॉक्युमेंट सेव्ह करणे.

10:52 रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे.
10:55 COMPREHENSIVE ASSIGNMENT.

रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा.

11:01 practice.odt या नावाने ती सेव्ह करा.
11:05 'This is my first Assignment' असे टेक्स्ट त्यात लिहा. फाईल सेव्ह करा. टेक्स्टला अंडरलाईन करा.
11:13 हेडिंग्जचा फाँट साईज 16 पर्यंत वाढवा.

फाईल बंद करा.

11:18 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:24 *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण तो download करूनही पाहू शकता.
11:29 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:38 *यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.
11:45 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
11:48 *यासाठी National Misssion on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
11:56 *यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे.
12:07 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज ............ नी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana