Ruby/C2/Hello-Ruby/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:11, 20 June 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Hello-Ruby

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00.00 Hello Rubyवरील पाठात आपले स्वागत.
00.04 पाठात आपण शिकणार आहोत,
00.06 रुबी म्हणजे काय?
00.08 त्याची वैशिष्ट्ये,
00.09 RubyGems आणि रुबी वरील मदत.
00.12 त्याचे इन्स्टॉलेशन.
00.13 रुबी कोड कार्यान्वित करणे.
00.15 कॉमेंटस समाविष्ट करणे.
00.16 puts आणि print मधील फरक.
00.19 येथे उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि Ruby 1.9.3 वापरणार आहोत.
00.27 ह्या पाठासाठी इंटरनेटची जोडणी आवश्यक आहे.
00.30 तुम्हाला लिनक्समधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00.37 रुबी म्हणजे काय ते जाणून घेऊ.
00.40 रुबी ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इंटरप्रिटेड स्क्रिप्टींग लँग्वेज आहे.
00.44 ही डायनॅमिक, ओपन सोर्स प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे.
00.48 ह्याचा सिंटॅक्स सुटसुटीत असून वाचायला आणि लिहायला सोपा आहे.
00.54 आता रुबीची वैशिष्ट्ये पाहू.
00.57 रुबी ही पोर्टेबल आहे.
00.59 रुबी कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यान्वित होते.
01.04 Smalltalk, BASIC किंवा Pythonप्रमाणे रुबीमधील व्हेरिएबलना डेटाटाईप नसतो.
01.11 ह्यातील मेमरी व्यवस्थापन आपोआप होत असते.
01.14 रुबी ही फ्री फॉरमॅट (free format) लॅग्वेज आहे.
01.17 प्रोग्रॅमची सुरूवात कोणत्याही ओळीत किंवा कॉलममधे करता येते.
01.21 रुबी इंटरनेट किंवा इंट्रानेट ऍप्लिकेशन्स लिहिण्यासाठी वापरली जाते.
01.26 रुबीच्या सर्वात महत्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे RubyGems.
01.31 RubyGems हे रुबी प्रोग्रॅमिंग लँग्वेजसाठीचे पॅकेज मॅनेजर आहे.
01.36 हे रुबीचे प्रोग्रॅम आणि लायब्ररीज वितरीत करण्यासाठी प्रमाणित फॉरमॅट प्रदान करते.
01.42 तुम्ही तुमचे gems बनवू आणि प्रकाशित करू शकता.
01.46 RubyGems वरील अधिक माहितीसाठी ह्या लिंकला भेट द्या.
01.51 रुबी संदर्भातील अधिक माहितीसाठी ह्या लिंकसना भेट द्या.
01.55 तुम्ही उबंटु सॉफ्टवेअर सेंटरद्वारे रुबी इन्स्टॉल करू शकता.
01.59 त्यावरील अधिक माहितीसाठी ह्या लिंकवर उपलब्ध असलेला उबंटु लिनक्स हा पाठ पहा.
02.07 रुबी इन्स्टॉल करण्याच्या इतर पध्दती ह्या स्लाईडवर दाखवल्या आहेत.
02.12 रुबी कोड 3 पध्दतीनी कार्यान्वित करता येतो.
02.16 कमांड लाईनद्वारे,
02.17 इंटरऍक्टीव्ह रुबी द्वारे,
02.19 फाईल म्हणून.
02.20 कार्यान्वित करण्याच्या सर्व पध्दती बघूया.
02.23 प्रथम Hello World कोड कमांड लाईनद्वारे कार्यान्वित करू.
02.28 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबा.
02.33 तुमच्या स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल.
02.37 ही कमांड टाईप करा.
02.38 ruby space hyphen e space सिंगल कोटसमधे puts space नंतर डबल कोटसमधे Hello World आणि
02.50 एंटर दाबा.
02.53 Hello World असे आऊटपुट मिळेल.
02.56 टर्मिनलवर आऊटपुट प्रिंट करण्यासाठी puts कमांड वापरतात.
03.00 hyphen e फ्लॅग एका ओळीचा कोड कार्यान्वित करण्याची परवानगी देते.
03.06 अनेक ओळींच्या कमांडस देण्यासाठी अनेक hyphen e फ्लॅग्ज वापरता येतात.
03.11 हे करून पाहू.
03.13 मागील कमांड मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा.
03.18 आणि टाईप करा space hyphen e space सिंगल कोटसमधे puts space 1+2 आणि
03.30 एंटर दाबा.
03.32 Hello World आणि 3 असे आऊटपुट मिळेल.
03.36 स्लाईडवर परत जाऊ.
03.38 इंटरऍक्टीव्ह रुबीबद्दल जाणून घेऊ.
03.42 इंटरऍक्टीव्ह रुबीद्वारे दिलेल्या कमांडसना त्वरित प्रतिसाद मिळतो.
03.48 रुबी स्टेटमेंटस दिल्यावर रिटर्न केलेल्या व्हॅल्यूज आणि आऊटपुट बघता येतो.
03.53 रुबीच्या जुन्या वर्जनसाठी irb वेगळे इन्स्टॉल करा.
03.57 आता रुबी कोड irb मधून कार्यान्वित करू. टर्मिनलवर जा.
04.03 टाईप करा irb आणि एंटर दाबा.
04.06 हे इंटरऍक्टीव्ह रुबी उघडेल.
04.09 टाईप करा puts space डबल कोटसमधे Hello World आणि एंटर दाबा.
04.19 Hello World असे आऊटपुट मिळेल.
04.22 आणि nil ही रिटर्न व्हॅल्यू मिळेल.
04.25 irb मधून बाहेर पडण्यासाठी exit टाईप करून एंटर दाबा.
04.31 फाईलमधूनही रुबी प्रोग्रॅम कार्यान्वित करता येतो.
04.34 कोड लिहिण्यासाठी तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
04.39 मी gedit टेक्स्ट एडिटर वापरत आहे. gedit टेक्स्ट एडिटरवर जाऊ.
04.45 टाईप करा puts space डबल कोटसमधे Hello World
04.54 मल्टिपल लाईन किंवा ब्लॉक कॉमेंटस कशा समाविष्ट करायच्या ते पाहू.
04.59 puts कमांडच्या आधी
05.01 टाईप करा equal to begin आणि एंटर दाबा.
05.06 'Equal to begin ने कॉमेंटची सुरूवात केली जाते.
05.10 तुम्हाला हवी ती कॉमेंट टाईप करा.
05.13 मी My first Ruby program टाईप करत आहे.
05.20 एंटर दाबा.
05.22 टाईप करा This code will print Hello world आणि एंटर दाबा.
05.30 आता टाईप करा equal to end
05.32 मल्टिपल लाईन कॉमेंटस संपवण्यासाठी equal to end चा वापर होतो.
05.37 कॉमेंटसचा उपयोग प्रोग्रॅमचे कार्य जाणून घेण्यास होतो.
05.41 डॉक्युमेंटेशनसाठी हे उपयोगी पडते.
05.45 सेव्हवर क्लिक करून फाईल सेव्ह करा.
05.50 फाईल वारंवार सेव्ह करणे हा चांगला सराव आहे.
05.53 सेव्ह ऍजचा डायलॉग बॉक्स तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
05.57 तुम्हाला जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्या लोकेशनवर जा.
06.01 डेस्कटॉपवर मी rubyprogramनावाने फोल्डर बनवत आहे.
06.06 फाईल या फोल्डरमधे सेव्ह करू.
06.10 नेम टेक्स्ट बॉक्समधे तुमच्या आवडीचे नाव टाईप करा.
06.14 मी hello.rb टाईप करत आहे.
06.17 रुबी फाईलला Dot rb हे एक्सटेन्शन दिले जाते.
06.21 सेव्हवर क्लिक करून फाईल सेव्ह करा. फाईल सेव्ह झाली आहे.
06.28 कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
06.32 प्रथम टर्मिनल क्लियर करा.
06.35 रुबी फाईल उपलब्ध असलेल्या डिरेक्टरीमधे असल्याची खात्री करा.
06.39 आपण home डिरेक्टरीत आहोत हे लक्षात घ्या. rubyprogramह्या सबडिरेक्टरीत जाणे आवश्यक आहे.
06.47 त्यासाठी टाईप करा cd space Desktop/rubyprogram आणि एंटर दाबा.
07.00 फाईल कार्यान्वित करू. टाईप करा ruby space hello dot rb आणि एंटर दाबा.
07.10 HelloWorld हे आऊटपुट मिळेल.
07.13 आता puts आणि print स्टेटमेंटमधील फरक पाहू.
07.18 हे irb द्वारे करून पाहू.
07.22 त्यापूर्वी होम डिरेक्टरीवर जाणे आवश्यक आहे. टाईप करा cd आणि एंटर दाबा.
07.31 इंटरऍक्टिव्ह रुबी उघडण्यासाठी irb टाईप करून एंटर दाबा .
07.39 टाईप करा puts space डबल कोटसमधे Hello comma डबल कोटसमधे World
07.50 येथे दोन puts कमांड एकत्र जोडण्यासाठी कॉमा वापरला आहे.
07.55 एंटर दाबा.
07.57 HelloWorld हे आऊटपुट मिळेल, परंतु वेगवेगळ्या ओळींवर.
08.03 आता हेच print स्टेटमेंटद्वारे करून पाहू .
08.06 मागील कमांड परत मिळवण्यासाठी अप ऍरोची की दाबा.
08.09 puts च्या जागी print टाईप करून एंटर दाबा.
08.14 HelloWorld हे आऊटपुट मिळेल, परंतु एकाच ओळीवर.
08.19 puts कीवर्ड आऊटपुटच्या शेवटी नवी ओळ समाविष्ट करतो. print कीवर्ड तसे करत नाही.
08.27 print जेवढे प्रदान केले आहे तेच आऊटपुट देतो.
08.31 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. स्लाईडस वर जाऊ.
08.37 ह्यात आपण
08.39 रुबी बद्दल शिकलो.
08.41 रुबीचे इन्स्टॉलेशन,
08.42 रुबी कोड कार्यान्वित करणे.
08.44 =begin आणि =end वापरून मल्टिपल कॉमेंटस समाविष्ट करणे.
08.50 puts आणि print मधील फरक.
08.53 असाईनमेंट.
08.55 तुमचे नाव आणि वय प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा.
08.58 ह्या पाठात आपण मल्टिपल लाईन कॉमेंटस वापरल्या.
09.01 तुम्ही सिंगल लाईन कॉमेंट देण्याचा प्रयत्न करा.
09.04 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.07 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.10 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09.17 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.20 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.24 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.30 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09.34 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09.41 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09.45 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
09.50 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana