Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-4/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Visual Cue | Narration |
00:04 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:07 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बदद्ल आहे. |
00:15 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00:28 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय? |
00:33 | प्रॉपर्टीस विंडो मध्ये Material panel म्हणजे काय? |
00:37 | प्रॉपर्टीस विंडो च्या Material panel मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे? हे शिकू. |
00:44 | मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे. |
00:49 | जर नसेल तर आमचे अगोदरचे, Basic Description of the Blender Interface हे ट्यूटोरियल पहा. |
00:57 | प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे. |
01:03 | आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे. |
01:10 | चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया. |
01:14 | प्रथम, आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया. |
01:20 | प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा. |
01:28 | आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये, पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो. |
01:33 | ब्लेंडर विंडोस चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे, How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा. |
01:43 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा. |
01:51 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर असलेल्या sphere आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा. |
01:58 | हे Material panel आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मध्ये एक मटेरियल जोडू शकतो. |
02:05 | डिफॉल्ट द्वारे स्टॅंडर्ड मटेरियल क्यूब मध्ये जोडले आहे. |
02:10 | हे मटेरियल निळ्या रंगात चिन्हांकीत असलेल्या मटेरियल स्लॉट चा एक भाग आहे. |
02:15 | नवीन मटेरियल स्लॉट जोडण्यासाठी, मटेरियल पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्लस (+) चिन्हावर लेफ्ट क्लिक करा. |
02:24 | नवीन मटेरियल जोडण्यासाठी new वर लेफ्ट क्लिक करा. डिफॉल्ट द्वारे, सर्व नवीन मटेरियल मूलभूत सेट्टिंग्स सह जोडले आहे. |
02:34 | नवीन मटेरियल स्लॉट डिलीट करण्यासाठी, प्लस (+) चिन्हाच्या खाली असलेल्या माइनस (-) चिन्हावर लेफ्ट क्लिक करा. |
02:41 | आपण आपल्या मूळ मटेरियल वर पुन्हा आलो आहोत. यास आपण White नाव देऊ. |
02:46 | मटेरियल स्लॉट बॉक्स आणि प्रीव्यू विंडो च्या मध्ये असलेल्या ID नेम बार मध्ये Material वर लेफ्ट क्लिक करा. |
02:55 | तुमच्या कीबोर्ड वर White टाइप करा आणि enter की दाबा. |
03:01 | मटेरियल आणि मटेरियल स्लॉट या दोन्हीची नावे white मध्ये बदलली आहे. |
03:06 | तुम्ही नवीन मटेरियल स्लॉट न जोडता नवीन मटेरियल जोडू शकता. |
03:12 | मटेरियल ID नेम बार च्या उजव्या बाजूला प्लस (+) चिन्हावर लेफ्ट क्लिक करा. |
03:18 | मटेरियल स्लॉट मध्ये नवीन मटेररियल जुडला आहे . यास red हे नवीन नाव देऊ. |
03:27 | आपण या मटेरियल चा रंग white वरुन red मध्ये बदलणार आहोत. |
03:31 | परंतु, प्रथम आपण मटेरियल IDनेम बार च्या खाली, रो च्या बटनांवर एक नजर टाकु. |
03:37 | Surface सक्रिय ओब्जेकटच्या मटेरियल ला त्याच्या सर्फेस च्या रूपात रेंडर करते. |
03:44 | हे ब्लेंडर मध्ये डिफॉल्ट रेंडर मटेरियल आहे. |
03:48 | Wire मटेरियल ला एक तार युक्त जाळी मध्ये रेंडर करते, जे ऑब्जेक्ट बहभूजाच्या फक्त किनार दर्शविते. |
03:55 | हे उपयुक्त असे टूल आहे, जे मॉडेलिंग आणि रेंडरिंग वरील वेळेची बचत करते. |
04:00 | आपण ब्लेंडर मध्ये, मॉडेलिंग बद्दल अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये, wired mesh, edges आणि polygons या बद्दल विस्तृत पणे शिकू. |
04:09 | Volume मटेरियल सक्रिय ऑब्जेक्ट ला संपूर्ण वॉल्यूम च्या रूपात रेंडर करते. |
04:15 | surface आणि wire साठी मटेरियल सेट्टिंग वेगळी आहे. |
04:20 | आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये Volume मटेरियल चा वापर करू, तेव्हा ही सेट्टिंग्स विस्तृत पणे पाहु. |
04:26 | Halo मटेरियल ला सक्रिय ऑब्जेक्ट च्या भोवती हॅलो कणाच्या रूपामध्ये रेंडर करते. |
04:32 | पुन्हा मटेरियल सेट्टिंग्स बदलली आहे. |
04:36 | आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये Halo मटेरियल चा वापर करू, तेव्हा ही सेट्टिंग्स विस्तृत पणे पाहु. |
04:42 | लक्ष द्या यामधील कोणताही पर्याय 3D व्यू मध्ये दर्शित नाही. |
04:47 | कारण यास फक्त रेंडर डिसप्ले मध्ये पाहिल्या जाऊ शकते. |
04:52 | रेंडर डिसप्ले बदद्ल शिकण्यासाठी Types of windows Properties part 1 हे ट्यूटोरियल पहा. |
05:02 | Surface वर पुन्हा जा. आपण Surface मटेरियल साठी सेट्टिंग्स पाहु. |
05:05 | खाली प्रीव्यू ( पूर्वेक्षण ) विंडो आहे, जे रेंडर्ड मटेरियल चे प्रीव्यू दर्शविते. |
05:17 | उजव्या बाजूला, विविध प्रीव्यू पर्यायासाठी बटनाचे कॉलम आहे. |
05:22 | Plane |
05:24 | Sphere |
05:26 | Cube |
05:29 | Monkey |
05:32 | Hair |
05:34 | आणि Sky. आता आपल्या मटेरियल चा रंग पांढऱ्या वरून लाल मध्ये बदलू. |
05:42 | Diffuse वर जा. Diffuse च्या खाली White Bar वर लेफ्ट क्लिक करा. |
05:49 | कलर मेन्यू दिसेल. आपल्याला हवा असलेला कोणताही कलर आपण या मेन्यू वरुन निवडू शकतो. मी लाल निवडते. |
05:59 | लेफ्ट क्लिक करा आणि white डॉट ला कलर सर्कल च्या मध्यभागी पकडा. |
06:05 | माउस सर्कल च्या लाल क्षेत्राच्या च्या दिशेने ड्रॅग करा. |
06:11 | Material पॅनल, मध्ये 3Dव्यू आणि प्रीव्यू विंडो मधील क्यूब चा रंग पांढऱ्या वरून लाल मध्ये बदलला आहे. |
06:22 | दुसरी पद्धत - Diffuse च्या खाली लाल बार वर पुन्हा लेफ्ट क्लिक करा. |
06:28 | तुम्हाला कलर सर्कल च्या खाली R, G आणि B नामक तीन बार्स दिसत आहेत का? |
06:35 | R. वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि enter की दाबा. |
06:43 | G वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter की दाबा. |
06:52 | B वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter की दाबा.
आता क्यूब चा कलर पूर्णपणे लाल झाला आहे. |
07:05 | याप्रमाणे, specular च्या खाली पांढऱ्या बार वर लेफ्ट क्लिक करा. color मेन्यू मधून कोणताही कलर निवडा. |
07:14 | मी हिरवा निवडते. |
07:17 | क्यूब वरील चमक पांढऱ्या वरुन फिक्कट हिरव्या मध्ये बदलली आहे. |
07:22 | आता जर मला पांढरा मटेरियल पुन्हा वापरायचा असेल, तर काय? मला ते पुन्हा कसे मिळेल? |
07:29 | Material ID name bar वर जा. येथे नेम बार च्या डाव्या बाजूला आणखीन एक स्फियर आइकान आहे. |
07:37 | sphere icon वर लेफ्ट क्लिक करा. हे Material menu आहे. |
07:43 | sceneमध्ये वापरलेले सर्व मेटीरियल्स येथे सूचीबद्ध आहे. आता येथे फक्त दोन मटेरियल दिसत आहे- Red आणि White. |
07:53 | White वर लेफ्ट क्लिक करा. पुन्हा एकदा क्यूब लाल वरुन पांढऱ्या मध्ये बदलली आहे. |
08:00 | दोन्ही Diffuse आणि specular बार खाली Intensity बार्स आहे. |
08:05 | डिफॉल्ट द्वारे, Diffuse साठी इंटेन्सिटी 0.8 आहे आणि Specularसाठी 0.5 आहे. |
08:15 | हे फिनिश मटेरियल प्रकाराच्या आवश्यकते नुसार बदलले जाऊ शकते. |
08:21 | Matt finish म्हणजे Diffuse आणि specular या दोन्हीची कमी इंटेन्सिटी |
08:27 | उदाहरणार्थ, नैसर्गिक लाकडाच्या मटेरियल मध्ये मॅट फिनिश असते. |
08:33 | Glossy finish म्हणजे Diffuse आणि specular या दोन्हीची अधिक इंटेन्सिटी. |
08:39 | उदाहरणार्थ, कारपेंट मटेरियल मध्ये ग्लॉसी फिनिश असते. |
08:46 | ' ब्लेंडर मध्ये Diffuse साठी Lambert' हे डिफॉल्ट शेडर आहे. |
08:52 | Lambert वर लेफ्ट क्लिक करा. हे Diffuse shader मेन्यू आहे. |
08:57 | येथे आपण आपल्याला आवश्यक असलेले शेडर जसे, Fresnel, Minnaert, Toon, Oren-Nayar आणि Lambert निवडू शकतो. |
09:08 | इंटेन्सिटी प्रमाणे, विविध प्रकारच्या मटेरियल साठी शेडर्स सुद्धा विविध असतात. उदाहरणार्थ, Fresnel शेडर साठी ग्लास मटेरियल वापरला जातो. |
09:19 | त्याचप्रमाणे , ब्लेंडर मध्ये specularसाठी Cooktorr डिफॉल्ट शेडर आहे. |
09:25 | Cooktorr वर लेफ्ट क्लिक करा. हे Specular Shader menu आहे. |
09:32 | Blinn आणि phong हे सर्वाधिक समान शेडर्स आहेत, जे 90% मटेरियल साठी वापरले जाते. |
09:40 | Hardness ओब्जेक्टची स्पेक्युलॅरिटी किंवा चमक ची तीव्रता निर्धारित करते. |
09:48 | Hardness 50' वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter की दाबा. |
09:57 | स्पेक्युलर क्षेत्र स्फियर च्या प्रीव्यू वर, लहान वर्तुळात रुपांतरित झाले आहे. |
10:04 | पुन्हा Hardness 100' वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 10 टाइप करा आणि enter की दाबा. |
10:13 | आता स्पेक्युलर क्षेत्र मोठे झाले आहे आणि स्फियर प्रीव्यू वर पसरले आहे. |
10:20 | ही मटेरियल पॅनेल ची मूलभूत सेट्टिंग्स होती. |
10:25 | उरलेल्या सेट्टिंग्स नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
10:29 | आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता. |
10:33 | क्यूब मध्ये नवीन मटेरियल जोडा आणि त्याचे रंग आणि नाव निळ्या मध्ये बदला. |
10:39 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
10:48 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
11:08 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
11:11 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:14 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
11:19 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
11:25 | आमच्या सह जुडण्यासाठी,
|
11:27 | धन्यवाद. |