Blender/C2/3D-Cursor/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:48, 19 June 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:03 ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:07 हे ट्यूटोरियल ब्लेण्डर 2.59 मधील 3D कर्सर विषयक आहे.
00:15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:25 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण 3Dकर्सर म्हणजे काय?
00:32 ब्लेण्डर मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि 3D कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय, हे शिकू.
00:46 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेण्डर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे.
00:51 जर नसेल तर कृपया आमचे Installing Blenderवरील ट्यूटोरियल पहा.
00:57 3D कर्सर क्रॉस-हेयर सोबत लाल आणि सफेद रंगाचे वृत्त आहे, जे तुम्ही ब्लेण्डर स्क्रीन च्या मध्य भागी पाहु शकता.
01:06 चला ब्लेण्डर मध्ये 3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेण्डर उघडावे लागेल.
01:12 ब्लेण्डर उघडण्याचे दोन मार्ग आहे.
01:15 पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर जा . ब्लेण्डर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर लेफ्ट क्लिक करा.
01:27 ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा.
01:42 हे ब्लेण्डर 2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे .
01:54 ब्लेण्डर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले सर्व पर्याय समजू शकता.
02:01 इंटरफेस फॉण्ट चा आकार वाढविणे शिकण्यासाठी कृपया, यूज़र प्रिफरेन्सस वरील ट्यूटोरियल पहा.
02:12 यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेण्डर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात.
02:20 स्प्लॅश स्क्रीन काढून टाकण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा, किंवा
02:25 स्प्लॅश स्क्रीन च्या शिवाय, ब्लेण्डर इंटरफेस वर इतर कुठेही माउस लेफ्ट -क्लिक करा.
02:32 आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेण्डर कार्यक्षेत्र पाहु शकता.
02:37 3D कर्सर क्यूब द्वारे वेढलेल्या स्क्रीन केंद्राच्या उजवीकडे आहे.
02:43 आपण कर्सर योग्य प्रकारे पाहु शकत नाही, म्हणून आपणास क्यूब डिलीट करावे लागेल.
02:48 डिफोल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
02:51 यास डिलीट करण्यास, कीबोर्ड वरील डिलीट बटन दाबा , डिलीट वर लेफ्ट-क्लिक करा.
02:58 येथे आता तुम्ही 3D कर्सर अधिक चांगले पाहु शकाल.
03:04 3Dकर्सर चा प्राथमिक उद्देश, 3Dसीन मध्ये जुडलेल्या नवीन ऑब्जेक्ट चे स्थान विनिर्दिष्ट करणे आहे.
03:15 ADDवर जा. Mesh वर जा. क्यूब वर लेफ्ट-क्लिक करा.
03:19 तुम्ही 3Dव्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडण्यसाठी कीबोर्ड वरील शॉर्टकट की shift आणि A बटन सुद्धा वापरु शकता.
03:27 3D व्यू मध्ये नवीन क्यूब जुडलेली आहे.
03:30 तुम्ही पाहु शकता की, नवीन क्यूब 3D कर्सर च्या रूपात त्याच स्थानावर प्रकट झाली आहे.
03:38 आता नवीन ऑब्जेक्ट नवीन स्थानावर कसे जोडायचे ते पाहु.
03:44 प्रथम आपल्याला 3D कर्सर ला नवीन स्थानावर हलविण्याची गरज आहे.
03:48 त्यासाठी 3D स्पेस मधील कोणत्याही स्थानावर लेफ्ट-क्लिक करा.
03:53 मी क्यूब च्या डाव्या बाजूस क्लिक करत आहे.
03:59 नवीन ऑब्जेक्ट जोडण्यासाठी Shift आणि A दाबा. Mesh. UV स्फियर वर लेफ्ट-क्लिक करा.
04:10 3D कर्सर च्या नवीन स्थानावर UV स्फियर दिसत आहे.
04:15 आता आपण 3Dकर्सर साठी स्नॅपिंग पर्याय पाहु.
04:22 Object वर जा. Snap वर जा. हे स्नॅप मेन्यू आहे.
04:29 येथे अनेक पर्याय आहेत.
04:31 तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट Shift आणि S सुद्धा वापरु शकता.
04:38 Selection to cursor - निवडलेले आइटम 3D कर्सर मध्ये आणते.
04:45 उदाहरणार्थ, 3D कर्सर मध्ये क्यूब ला आणू.
04:50 क्यूब वर राइट-क्लिक करा. स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा.
04:58 Selection to cursor वर लेफ्ट क्लिक करा. क्यूब कर्सर मध्ये आले आहे.
05:06 आता क्यूब उजव्या बाजूस हलवू. ग्रीन हॅंडल वर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून उजवीकडे ड्रॅग करा.
05:17 कीबोर्ड शॉर्टकट साठी Gआणि Y दाबा.
05:23 3D व्यू मध्ये मूविंग ऑब्जेक्ट्स विषयक अधिक माहिती साठी Basic description of Blender interface हे ट्यूटोरियल पहा.
05:35 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. cursor to selected वर लेफ्ट क्लिक करा.
05:43 3D कर्सर नवीन स्थानामध्ये क्यूब च्या मध्यभागी आले आहे.
05:50 समजा तुमच्याकडे एकाच वेळेला एका पेक्षा जास्त ऑब्जेक्ट निवडलेले आहेत, जसे येथे क्यूब आणि UVस्फियर आहे,
05:59 Cursor to selected- 3D कर्सर ला दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्यभागी आणते.
06:07 मी प्रत्यक्षित करून दाखविते. तुम्ही पाहु शकता की, क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
06:12 UVस्फियर निवडण्यासाठी Shift आणि राइट क्लिक करा. आता तुमच्या कडे एकावेळी दोन ऑब्जेक्ट्स निवडलेले आहे.
06:22 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. Cursor to selected वर क्लिक करा.
06:30 3Dकर्सर दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी आले आहे.
06:36 lamp वर Shift आणि राइट क्लिक करा. स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
06:47 Cursor to Selected वर क्लिक करा. तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर आले आहे.
06:58 3D कर्सर हलविण्यासाठी 3Dव्यू मधील कोणत्याही एका बिंदू वर क्लिक करा. मी उजव्या बाजूच्या तळ भागावर क्लिक करत आहे.
07:07 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
07:12 Cursor to Center वर क्लिक करा. 3Dकर्सर, 3D व्यू च्या मध्य भागी आले आहे.
07:22 ऑब्जेक्ट्स डिसेलेक्ट करण्यास कीबोर्ड वरील A दाबा.
07:28 आता UV स्फियर वर राइट-क्लिक करा. डिसेलेक्ट करण्यास A दाबा.
07:39 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
07:44 Cursor to active वर क्लिक करा.
07:47 3Dकर्सर मागील सक्रिय निवड केलेल्या स्फियर च्या मध्य भागी दिसते.
07:56 3D कर्सर अधिक लाभ पुरविते जेव्हा मॉडेलिंग करताना केन्द्रबिंदू वापरले जाते.
08:03 परंतु आपण यास नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
08:08 आता 3D व्यू मध्ये विविध स्थानी, 3D कर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडण्याचा प्रयत्न करा.
08:16 या नंतर स्नॅप मेन्यू मधील स्नॅपिंग पर्यायाचा शोध घ्या. शुभेच्छा.
08:26 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08:31 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
08:40 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09:00 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09:02 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:06 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते.
09:11 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:17 आमच्या सह जुडण्यासाठी,
09:19 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana