PERL/C2/Blocks-in-Perl/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:41, 11 June 2014 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Blocks-in-Perl

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration


00.01 पर्लमधील BLOCKS वरील पाठात आपले स्वागत.
00.06 यात पर्लमधील उपलब्ध ब्लॉक्स बद्दल जाणून घेणार आहोत.
00.13 येथे मी उबंटु लिनक्स12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहे.
00.21 मी gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00.26 तुम्ही तुमच्या आवडीचा एडिटर वापरू शकता.
00.31 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटसचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.
00.38 पर्लमधील डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00.44 संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.50 पर्ल पाच विशेष ब्लॉक्स प्रदान करते.
00.53 हे ब्लॉक्स पर्ल प्रोग्रॅमच्या वेगवेगळ्या पायरीवर कार्यान्वित होतात.
00.59 हे ब्लॉक्स असे आहेत:
01.01 BEGIN
01.02 END
01.03 UNITCHECK
01.04 CHECK
01.05 आणि INIT
01.06 BEGIN ब्लॉकपासून सुरूवात करू.
01.10 कंपायलेशनच्या वेळी BEGIN ब्लॉक कार्यान्वित होतात.
01.15 त्यामुळे ह्या ब्लॉक्समधील कुठलाही कोड कंपायलेशनच्या वेळी प्रथम कार्यान्वित होईल.
01.22 पर्ल स्क्रिप्टमधे अनेक BEGIN ब्लॉक्स असू शकतात.
01.26 हे ब्लॉक्स त्यांच्या घोषित केलेल्या क्रमानुसार कार्यान्वित होतात.
01.31 म्हणजे प्रथम घोषित प्रथम कार्यान्वित होईल अशा पध्दतीने.
01.35 BEGIN ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
01.40 कॅपिटल अक्षरात BEGIN space महिरपी कंसात
01.45 एंटर दाबा.
01.47 कंपायलेशनच्या वेळी कार्यान्वित करायचा कोड
01.51 एंटर दाबा.
01.52 महिरपी कंस पूर्ण
01.55 आता BEGIN ब्लॉक्सचे उदाहरण पाहू.
01.59 टर्मिनल उघडून टाईप करा
02.02 gedit beginBlock dot pl space ampersand
02.08 आणि एंटर दाबा.
02.10 हे gedit मधे beginBlock dot pl ही फाईल उघडेल.
02.15 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा
02.20 आता स्क्रिप्टच्या आत लिहिलेला कोड समजून घेऊ.
02.24 येथे BEGIN ब्लॉक्सच्या आधी आणि नंतर काही प्रिंट स्टेटमेंटस् लिहिली होती.
02.31 तसेच मी प्रत्येक BEGIN ब्लॉकमधे एक प्रिंट स्टेटमेंट लिहिले आहे.
02.37 मी BEGIN ब्लॉक्स नंतर सेमीकोलन दिलेले नाही हे लक्षात ठेवा.
02.42 तो दिल्यास प्रोग्रॅम कार्यान्वित करताना सिंटॅक्स एरर मिळेल.
02.49 Ctrl+s दाबून फाईल सेव्ह करा.
02.53 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
02.58 perl beginBlock dot pl
03.01 आणि एंटर दाबा.
03.04 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
03.09 लक्षात घ्या पहिल्या BEGIN ब्लॉकमधे लिहिलेली ओळ प्रथम प्रिंट होईल
03.16 स्क्रिप्टमधील पहिले प्रिंट स्टेटमेंट प्रत्यक्षात BEGIN ब्लॉक स्टेटमेंटस नंतर प्रिंट होईल.
03.25 BEGIN ब्लॉक्स ते त्याच्या घोषित केलेल्या क्रमानुसार कार्यान्वित होतात.
03.31 ह्या उदाहरणावरून असे स्पष्ट होते
03.34 BEGIN ब्लॉक्समधे लिहिलेला कोड प्रथम कार्यान्वित होतो.
03.40 हे पर्ल स्क्रिप्टमधील BEGINब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते.
03.46 BEGIN ब्लॉक्स नेहमी First In First Outपध्दतीने कार्यान्वित होतात.
03.52 त्यामुळे या ब्लॉकचा एक उपयोग पर्ल स्क्रिप्टचे कार्य सुरू होण्याआधी त्यात include filesसमाविष्ट करण्यासाठी होतो.
04.01 आता END ब्लॉक समजून घेऊ.
04.04 END ब्लॉक हा पर्ल प्रोग्रॅमच्या शेवटी कार्यान्वित होतो.
04.09 पर्ल प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर ह्या ब्लॉकमधे लिहिलेला कोड कार्यान्वित होतो.
04.17 पर्ल स्क्रिप्टमधे अनेक END ब्लॉक्स असू शकतात.
04.21 हे घोषित केलेले ब्लॉक्स उलट्या क्रमाने कार्यान्वित होतात.
04.26 म्हणजेच शेवटी घोषित प्रथम कार्यान्वित ह्या पध्दतीने.
04.30 END ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
04.35 कॅपिटल अक्षरातE N D महिरपी कंसात
04.39 एंटर दाबा.
04.40 पर्ल स्क्रिप्टच्या शेवटी कार्यान्वित करायचा कोड
04.45 एंटर दाबा.
04.46 महिरपी कंस पूर्ण
04.49 आता END ब्लॉक्सचे उदाहरण पाहू.
04.53 टर्मिनल उघडून टाईप करा
04.56 gedit endBlock dot pl space ampersand
05.00 आणि एंटर दाबा.
05.03 हे gedit मधे endBlock dot pl ही फाईल उघडेल.
05.08 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
05.13 आता या स्क्रिप्टमधे काय लिहिले आहे ते पाहू.
05.17 येथे END ब्लॉकच्या आधी आणि नंतर काही प्रिंट स्टेटमेंटस लिहिलेली आहेत.
05.23 तसेच प्रत्येक END ब्लॉकमधे एक प्रिंट स्टेटमेंट लिहिले आहे.
05.29 मी END ब्लॉक नंतर सेमीकोलन दिलेला नाही हे लक्षात घ्या.
05.34 तो दिल्यास कंपायलेशनच्या वेळी सिंटॅक्स एरर मिळेल.
05.41 Ctrl+s द्वारे फाईल सेव्ह करा.
05.45 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
05.50 perl endBlock dot pl
05.53 आणि एंटर दाबा.
05.55 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
06.00 END ब्लॉकच्या आत लिहिलेली ओळ शेवटी प्रिंट होईल हे लक्षात घ्या.
06.06 स्क्रिप्टमधील शेवटचे प्रिंट स्टेटमेंट हे प्रत्यक्षात END ब्लॉक स्टेटमेंटच्या आधी प्रिंट होईल.
06.13 END ब्लॉक्स हे त्यांच्या घोषित केलेल्याच्या उलट क्रमाने कार्यान्वित होईल.
06.20 उदाहरणाद्वारे असे स्पष्ट होते,
06.23 END ब्लॉकमधे लिहिलेला कोड शेवटी कार्यान्वित होतो.
06.29 हे पर्ल स्क्रिप्टमधील END ब्लॉकच्या पोझिशनवर अवलंबून नसते आणि
06.36 END ब्लॉक Last In First Out पध्दतीने कार्यान्वित होतो.
06.41 त्यामुळे END ब्लॉकचा एक उपयोग प्रोग्रॅममधे तयार झालेली ऑब्जेक्टस् बाहेर पडण्यापूर्वी नष्ट करणे.
06.49 तसेच पर्लमधे UNITCHECK, CHECK आणि INIT ब्लॉक्स आहेत.
06.55 हे ब्लॉक्स क्वचितच वापरले जातात आणि समजायला थोडे अवघड आहेत.
07.02 त्यामुळे मी ते थोडक्यात सांगणार आहे.
07.06 UNITCHECK, CHECK आणि INIT ब्लॉक्सचा उपयोग
07.10 प्रोग्रॅम कंपायलेशन झाल्यावर आणि कार्यान्वित करण्यापूर्वी लागणा-या काही बाबी पूर्ण करण्यासाठी होतो.
07.18 उदाहरणार्थ कंपायलेशन नंतर काही गोष्टी तपासणे आणि प्राथमिक व्हॅल्यूज देणे इत्यादी.
07.24 UNITCHECK आणि CHECK ब्लॉक्स Last in First out पध्दतीने,
07.31 तर INIT ब्लॉक First In First Out पध्दतीने कार्यान्वित होतो.
07.37 UNITCHECK ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
07.41 कॅपिटल अक्षरात UNITCHECK space महिरपी कंसात
07.46 एंटर दाबा.
07.48 कार्यान्वित करायचा कोड
07.50 एंटर दाबा.
07.52 महिरपी कंस पूर्ण.
07.54 CHECK ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
07.58 कॅपिटल अक्षरातCHECK space महिरपी कंसात
08.03 एंटर दाबा
08.04 कार्यान्वित करायचा कोड
08.07 एंटर दाबा
08.08 महिरपी कंस पूर्ण.
08.11 INIT ब्लॉकचा सिन्टॅक्स असा आहे.
08.15 कॅपिटल अक्षरातINIT space महिरपी कंसात
08.20 एंटर दाबा.
08.21 इनीशियलायजेशनचा कोड
08.24 एंटर दाबा.
08.26 महिरपी कंस पूर्ण
08.28 नीट समजून घेण्यासाठी तुमच्या पर्ल स्क्रिप्टमधे ह्या ब्लॉक्सद्वारे काही प्रयोग करून पहा.
08.36 थोडक्यात,
08.37 या पाठात आपण शिकलो
08.40 BEGIN आणि END ब्लॉक्सबद्दल सविस्तर जाणून घेतले.
08.44 सँपल प्रोग्रॅमद्वारे UNITCHECK, CHECK
08.48 आणि INIT ब्लॉक्स बद्दल जाणून घेतले.
08.52 आता असाईनमेंट,
08.54 खालील कोड पर्ल स्क्रिप्टमधे टाईप करा.
08.58 स्क्रिप्ट कार्यान्वित करून आऊटपुट बघा.
09.02 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.06 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.09 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.14 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.20 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.24 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.32 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09.37 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09.45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09.57 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10.00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
10.02 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya, Ranjana