PERL/C2/Data-Structures/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:17, 5 June 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Data Structures

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Visual Cue Narration
00.00 पर्लमधील Data Structures या पाठात स्वागत.
00.05 या पाठात पर्लमधील डेटा स्ट्रक्चरबद्दल जाणून घेऊ.
00.11 मी उबंटु लिनक्स12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहे.
00.18 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00.22 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00.25 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्सचे प्राथमिक ज्ञान असावे.
00.29 कॉमेंटस, लूप्स आणि कंडिशनल स्टेटमेंटसचे ज्ञान अधिक फायद्याचे ठरेल.
00.36 संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
00.41 पर्लमधे डेटा स्ट्रक्चरचे तीन प्रकार आहेत.
00.44 स्केलर
00.45 ऍरे
00.46 आणि हॅश. यालाच असोसिएटीव्ह ऍरे म्हणतात.
00.50 स्केलर: ह्या टाईपचे डेटा स्ट्रक्चर कुठल्याही डेटा टाईपची व्हॅल्यू संचित करते.
00.56 डेटा टाईप स्ट्रिंग, नंबर, डबल इत्यादी असू शकतो.
01.01 हा ऍरे किंवा हॅशचा संदर्भ साठवू शकतो.
01.06 पर्लमधील रेफरन्स बद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.
01.11 स्केलर टाईपचे डेटा स्ट्रक्चर व्हेरिएबल घोषित करण्याएवढे सोपे आहे.
01.16 $count = 12 सेमीकोलन
01.20 $string = सिंगल कोटसमधे 'I am scalar of type string सेमीकोलन.
01.26 आपण स्केलर वर पुढील क्रिया करू शकतो.
01.30 त्याला व्हॅल्यू देणे,
01.32 एका स्केलरची व्हॅल्यू दुस-याला देणे.
01.35 नंबर टाईप असलेल्या स्केलर्सवर बेरीज, वजाबाकी इत्यादी गणिती क्रिया करणे.
01.41 स्ट्रिंग स्केलरवर concatenation, substr(subisteir) इत्यादी स्ट्रिंग क्रिया करणे.
01.48 आता स्केलर डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
01.52 टर्मिनलवर जाऊन टाईप करा gedit scalars dot pl space आणि एंटर दाबा.
02.01 हे scalars dot pl ही फाईल gedit मधे उघडेल.
02.05 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
02.09 येथे स्केलर घोषित करून त्याला व्हॅल्यू दिलेली आह.
02.13 ह्या काही गणिती क्रिया आहेत ज्या नंबर टाईपच्या स्केलरवर करता येऊ शकतात.
02.19 ही स्ट्रिंग ऑपरेशन्स आहेत जी स्ट्रिंग टाईपच्या स्केलरवर करता येतात.
02.25 substr हे PERL फंक्शन स्ट्रिंगचा भाग आऊटपुट म्हणून देते.
02.30 येथे index 0 स्ट्रिंगची सुरूवात दाखवतो. म्हणजेच कुठल्याच अक्षरापासून स्ट्रिंग extract करावयाचा ते सांगतो.
02.39 आणि 11 offset दर्शवते म्हणजेच आऊटपुटमधे कुठपर्यंत स्ट्रिंगची व्हॅल्यू हवी आहे.
02.46 Ctrl + S दाबा. फाईल सेव्ह करा.
02.50 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
02.55 perl scalars dot pl आणि एंटर दाबा.
03.00 टर्मिनलवर हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दाखवले जाईल.
03.05 आता पर्लमधील ऍरे डेटा स्ट्रक्चर पाहू.
03.09 ऍरे म्हणजे एलिमेंटसची सूची .
03.12 हे एलिमेंटस स्ट्रिंग, नंबर इत्यादी असू शकतात.
03.16 ह्याला एक index असतो, जो ऍरेवर विविध क्रिया करताना वापरला जातो.
03.22 Index शून्याने सुरू होतो.
03.25 इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस प्रमाणे पर्लमधे ऍरेचा आकार किंवा लांबी आधी घोषित करण्याची गरज नसते.
03.33 पर्लमधील ऍरे, त्यातील घटक कमी केले किंवा वाढवले की लहान मोठा होतो.
03.39 ऍरेचा सिन्टॅक्स असा आहे.
03.41 at the rate variableName space equal to space कंसात कॉमाने वेगळी केलेली ऍरेच्या घटकांची यादी कंस पूर्ण semicolon
03.54 आता ऍरे डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
03.57 टर्मिनलवर जाऊन टाईप करा gedit perlArray dot pl space & आणि एंटर दाबा.
04.08 हे gedit मधे perlArray dot pl ही फाईल उघडेल.
04.12 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा.
04.18 हा नंबर टाईपचे घटक असलेला नंबर ऍरे आहे.
04.23 हा स्ट्रिंग टाईपचे घटक असलेला string ऍरे आहे.
04.29 ह्या ऍरे मधे नंबर आणि स्ट्रिंग ह्या दोन्ही टाईपचे घटक आहेत.
04.34 हे उदाहरण पर्लमधील विविध प्रकारचे ऍरे दाखवते.
04.39 पर्लमधे अशाप्रकारे ऍरे प्रिंट केले जातात.
04.43 Ctrl + S दाबा. फाईल सेव्ह करा.
04.47 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
04.52 perl perlArray dot pl आणि एंटर दाबा.
04.59 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
05.04 आता पर्लमधील हॅश डेटा स्ट्रक्चर पाहू.
05.08 हॅशला असोसिएटिव्ह ऍरेही म्हणतात.
05.12 हे एक Key Value pair data structure आहे
05.15 hash मधील की (Key) ही एकमेव असते.
05.18 तीच की परत दिली असता त्या कीसाठी आधी दिलेली व्हॅल्यू नव्या व्हॅल्यूने लिहिली जाते.
05.28 एक व्हॅल्यू अनेक वेळा येऊ शकते.
05.30 की कुठल्याही डेटा प्रकारची व्हॅल्यू साठवू शकते.
05.34 हॅशचा सिन्टॅक्स असा आहे.
05.36 percentage variable name space equal to space कंस सुरू
05.41 एंटर दाबा.
05.42 single quote key Name single quote space equal to greater than sign space Value comma
05.50 एंटर दाबा.
05.52 single quote key Name single quote space equal to greater than sign space Value
05.58 एंटर दाबा.
06.00 कंस पूर्णsemicolon
06.03 आता हॅश डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण पाहू.
06.07 टर्मिनलवर जाऊन टाईप करा.
06.10 gedit perlHash dot pl space & आणि एंटर दाबा.
06.18 हे gedit मधे perlHash dot pl ही फाईल उघडेल.
06.22 स्क्रीनवर दिसणारा कोड टाईप करा.
06.27 हा हॅश एका विषयामधे मिळालेले मार्क दर्शवतो.
06.31 हे उदाहरण हॅशचा उपयोग दाखवते.
06.35 आता हॅश प्रिंट कसे करायचे ते पाहू.
06.38 आत्तापुरते मी हॅश कसा प्रिंट करते ते पहा.
06.42 सविस्तर माहिती पुढील पाठात पाहू.
06.47 Ctrl + S दाबा. फाईल सेव्ह करा.
06.50 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
06.55 perl perlHash dot pl आणि एंटर दाबा.
07.01 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
07.05 थोडक्यात,
07.06 या पाठात आपण सँपल प्रोग्रॅमद्वार' ,
07.09 पर्लमधील स्केलर,
07.10 ऍरे आणि
07.11 हॅश डेटा स्ट्रक्चर
07.13 शिकलो.
07.15 असाईनमेंट करू.
07.17 स्केलर व्हेरिएबल घोषित करा.
07.19 त्याला फ्लोट टाईपची व्हॅल्यू देऊन ती प्रिंट करा.
07.23 'Red', 'Yellow' आणि 'Green' रंगाचा ऍरे घोषित करून तो प्रिंट करा.
07.28 एम्प्लॉयी आणि त्याच्या डिपार्टमेंटसाठी हॅश ही व्हॅल्यू देऊन प्रिंट करा.
07.33 टीप: 'Employee' =>(equal to greater than sign) 'John' कॉमा
07.38 'Department' =>(equal to greater than sign) 'Engineering'
07.42 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07.46 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07.49 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
07.53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.59 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08.03 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08.10 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08.15 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
08.22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08.33 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
08.35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
08.38 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana