PERL/C2/Comments-in-Perl/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:46, 28 May 2014 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Comments-in-Perl

Author: Manali Ranade

Keywords: Perl

Visual Cue Narration
00.00 कॉमेंटस इन पर्लवरील पाठात आपले स्वागत.
00.05 ह्या पाठात शिकणार आहोत,
00.08 पर्लमधील कॉमेंटस.
00.10 त्यासाठी उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल5.14.2 ,
00.18 म्हणजेच पर्ल रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 वापरू.
00.23 मी gedit टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00.27 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर निवडू शकता.
00.31 तुम्हाला पर्ल कोड कंपाईल व एक्झीक्यूट करणे आणि व्हेरिएबलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00.37 ते नसल्यास स्पोकन ट्युटोरियलवरील संबंधित पाठ पाहा.
00.43 पर्लमधील कोडचा काही भाग दोन पध्दतीने कॉमेंट करता येतो.
00.47 सिंगल लाईन,
00.48 मल्टि लाईन.
00.49 सिंगल लाईन कॉमेंटचा वापर एका ओळीच्या कोडला कॉमेंट करताना किंवा
00.55 कोडच्या एखाद्या भागाच्या फंक्शनॅलिटीची एका ओळीत माहिती देण्यासाठी होतो.
01.01 ह्या पध्दतीच्या कॉमेंटची सुरूवात # (हॅश) चिन्हाने होते.
01.05 येथे हे वापरून बघू. टेक्स्ट एडिटरमधे नवी फाईल उघडा.
01.11 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा gedit comments dot pl space &
01.19 पूर्वी सांगितलेच आहे की ampersand (& ) टर्मिनलवरील कमांड प्रॉम्प्ट मुक्त करतो. एंटर दाबा.
01.27 आता ह्या कमांडस टाईप करा.
01.29 hash Declaring count variable एंटर दाबा.
01.37 dollar count space equal to space 1 semicolon एंटर दाबा.
01.45 print space double quotes Count is dollar count slash n double quote complete semicolon space hash prints Count is 1
02.03 आता ctlr S दाबून फाईल सेव्ह करा. पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
02.08 टर्मिनलवर जाऊन टाईप करा perl hyphen c comments dot pl आणि एंटर दाबा.
02.18 हे कुठलीही सिन्टॅक्स एरर नसल्याचे दाखवत आहे.
02.21 आता perl comments dot pl टाईप करून एंटर दाबा.
02.28 Count is 1 असे आऊटपुट दाखवेल.
02.33 geditवर परत जाऊ.
02.36 त्यातील पहिल्या ओळीवर जाऊन एंटर दाबा.
02.40 पुन्हा पहिल्या ओळीवर जाऊन कमांडस टाईप करा.
02.44 Hash exclamation mark slash usr slash bin slash perl
02.52 ह्या ओळीला shebang line (शेबँग लाईन) म्हणतात आणि ही पर्ल प्रोग्रॅममधे पहिली ओळ असते.
02.59 ही आपल्याला पर्ल इंटरप्रीटर कुठे शोधायचा ते सांगते.
03.03 टीपः ह्या ओळीची सुरूवात हॅश चिन्हाने झाली असली तरी ती सिंगल लाईन कॉमेंट मानली जात नाही.
03.11 आता मल्टिलाईन कॉमेंटस बद्दल जाणून घेऊ.
03.13 Multi Line (मल्टि लाईन) कॉमेंटस,
03.17 अशा वेळी वापरतात जेव्हा युजरला प्रोग्रॅमच्या काही भागाबद्दल अधिक माहिती द्यायची असते.
03.25 ह्या प्रकारच्या कॉमेंटची सुरूवात equal to head आणि शेवट equal to cut ने होते.
03.33 gedit वर जाऊन comments dot pl फाईलमधे कमांडस टाईप करा.
03.39 फाईलच्या शेवटी equal to headटाईप करून एंटर दाबा.
03.45 print space double quote count variable is used for counting purpose double quote complete एंटर दाबा.
03.59 equal to cut
04.01 फाईल सेव्ह करून ती बंद करून पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
04.05 टर्मिनलवर टाईप करा perl hyphen c comments dot pl आणि एंटर दाबा.
04.13 सिन्टॅक्स एरर नाही.
04.15 आता कार्यान्वित करा perl comments dot pl
04.21 हे पूर्वीप्रमाणेच आऊटपुट दाखवेल. Count is 1
04.27 count variable is be used for counting purpose” हे वाक्य दिसणार नाही.
04.32 कारण आपण हा भाग equal to head आणि equal to cut द्वारे कॉमेंट केला होता.
04.40 तुम्ही =head =cut किंवा =begin =end वापरू शकता.
04.48 हे पर्ल मधील वापरले जाणारे विशिष्ट कीवर्डस नाहीत.
04.52 लक्षात घ्या की = to चिन्हाच्या आधी किंवा नंतर तसेच head, cut, begin किंवा end शब्दांनंतर space(s) दिलेली नाही.
05.02 पुन्हा टर्मिनल उघडा.
05.05 टाईप करा gedit commentsExample dot pl space & आणि एंटर दाबा.
05.15 स्क्रीनवर दाखवलेल्या काही कमांडस टाईप करा.
05.19 येथे मी firstNum आणि secondNum ही दोन व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना व्हॅल्यूज देत आहे.
05.28 नंतर हा भाग कॉमेंट केला आहे.
05.32 आता दोन्ही संख्यांची बेरीज Addition या तिस-या व्हेरिएबलमधे संचित करत आहोत.
05.39 पुढे प्रिंट कमांडद्वारे ती व्हॅल्यू दाखवायची आहे.
05.44 फाईल सेव्ह करून टर्मिनलवर पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
05.49 टर्मिनलवर टाईप करा perl hyphen c commentsExample dot pl आणि एंटर दाबा.
05.57 कोणतीही सिन्टॅक्स एरर नाही.
05.59 स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा.
06.01 perl commentsExample dot pl आणि एंटर दाबा.
06.07 हे असे आऊटपुट दाखवेल. Addition is 30
06.12 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06.16 येथे पर्लमधे कॉमेंटस समाविष्ट करण्यास शिकलो.
06.19 संख्येचा वर्ग काढणारी पर्ल स्क्रिप्ट लिहा.
06.23 सिंगल लाईन कॉमेंट आणि मल्टि लाईन कॉमेंटद्वारे लिहीलेल्या कोडच्या फंक्शनॅलिटीची माहिती द्या.
06.30 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06.34 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.37 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
06.42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
06.44 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06.48 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06.51 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
06.58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.03 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
07.11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.15 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
धन्यवाद. 

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana