PERL/C2/Variables-in-Perl/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:44, 23 May 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Variables-in-Perl

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Visual Cue Narration
00.01 व्हेरिएबल्स इन पर्लवरील पाठात आपले स्वागत.
00.06 या पाठात पर्लमधील व्हेरिएबल्स बद्दल जाणून घेऊ.
00.12 येथे उबंटु लिनक्स12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि
00.18 पर्ल5.14.2 म्हणजेच पर्ल रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 तसेच
00.26 gedit हा टेक्स्ट एडिटर वापरू.
00.30 तुम्ही कुठलाही टेक्स्ट एडिटर निवडू शकता.
00.34 पर्लमधील व्हेरिएबल्सः
00.37 व्हेरिएबल्सचा उपयोग टेक्स्ट स्ट्रिंग्ज, नंबर्स किंवा ऍरे संचित करण्यासाठी केला जातो.
00.44 एकदा व्हेरिएबल घोषित केल्यावर ते स्क्रिप्टमधे वारंवार वापरता येतात.
00.50 स्केलर व्हेरिएबलमधे एकच व्हॅल्यू संचित करता येते जी स्केलर असते.
00.56 स्केलर व्हेरिएबल $ (डॉलर) चिन्हा द्वारे घोषित करता येतात.
01.00 व्हेरिएबल घोषित कसे करायचे ते पाहू.
01.03 जसे कीः dollar priority semicolon .
01.09 पर्लमधे व्हेरिएबलच्या नावाचे अनेक प्रकार आहेत. व्हेरिएबल्सची सुरूवात अक्षर किंवा अंडरस्कोरने व्हायला हवी.
01.18 आणि त्यात अक्षरे, अंक, अंडरस्कोर किंवा ह्या तिन्हींचे मिश्रण ह्यांचा समावेश असू शकतो.
01.24 कॅपिटल अक्षरात घोषित केलेल्या व्हेरिएबल्सला पर्लमधे विशिष्ट अर्थ असतो.
01.30 त्यामुळे कॅपिटल अक्षरात व्हेरिएबल्स घोषित करणे टाळा.
01.34 आता टर्मिनल उघडा आणि टाईप करा gedit variables dot pl ampersand
01.44 Ampersand (&) मुळे टर्मिनलवरील कमांड प्रॉम्प्ट अनलॉक केला जातो. एंटर दाबा.
01.50 ह्यामुळे variables.pl ही फाईलgedit ह्या टेक्स्ट एडिटरमधे उघडेल.
01.56 dot pl हे पर्ल फाईलचे डिफॉल्ट एक्स्टेन्शन आहे.
02.01 फाईलमधे टाईप करा dollar priority semicolon आणि एंटर दाबा.
02.10 अशाप्रकारे priority हे व्हेरिएबल घोषित केले आहे.
02.13 वापर करण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करण्याची गरज नाही.
02.18 तुम्ही कोडमधे ते थेट वापरू शकता.
02.21 आता priority ह्या व्हेरिएबलला न्युमरीकल व्हॅल्यू देऊ.
02.25 त्यासाठी टाईप करा dollar priority space equal to space one semicolon
02.32 आणि एंटर दाबा.
02.34 पुढे टाईप करा
02.36 print space double quote Value of variable is: dollar priority slash n double quote complete semicolon आणि एंटर दाबा.
02.50 slash n हे न्यू लाईन कॅरॅक्टर आहे.
02.53 आता variables.pl ही फाईल सेव्ह करा.
03.02 येथे ही फाईल home/amol ह्या डिरेक्टरीत सेव्ह होणार आहे. फाईल सेव्ह करा.
03.10 आपण बनवलेल्या variables.pl ह्या फाईल्सच्या परमिशन बदलू.
03.18 हे करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा chmod 755 variables dot pl
03.27 हे फाईल रीड, राईट आणि एक्झिक्यूट करण्याचे हक्क देईल.
03.32 ही पर्ल स्क्रिप्ट कंपाईल करण्यासाठी टर्मिनलवर
03.36 टाईप करा perl hyphen c variables dot pl
03.42 Hyphen c स्विचमुळे दिलेला पर्ल प्रोग्रॅम कंपाईल होतो. सिंटॅक्स एररसाठी तपासला जातो.
03.49 एंटर दाबा.
03.51 हे स्क्रिप्टमधे सिंटॅक्स एरर नसल्याचे आपल्याला सांगते.
03.56 आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl variables dot pl आणि एंटर दाबा.
04.06 हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दिसेल.
04.10 आपण घोषित केलेल्या व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देखील प्रदान करू शकतो.
04.15 टेक्स्ट एडिटर विंडोवर जा.
04.18 dollar priority equal to oneऐवजी टाईप करा
04.22 dollar priority equal to एकेरी अवतरण चिन्हात high
04.28 लक्षात घ्या, असाईनमेंट उजवीकडून डावीकडे इव्हॅल्युएट केले जाते.
04.34 स्केलर कुठल्याही प्रकारचा डेटा संचित करू शकतो. स्ट्रिंग किंवा संख्या.
04.38 ही फाईल सेव्ह करा. पुन्हा एकदा स्क्रिप्ट कंपाईल करण्यासाठी टाईप करा
04.45 perl hyphen c variables dot pl आणि एंटर दाबा.
04.51 हे कुठलीही सिंटॅक्स एरर नसल्याचे आपल्याला सांगते.
04.55 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl variables dot pl आणि एंटर दाबा.
05.03 आपल्याला अशाप्रकारे आऊटपुट मिळेल.
05.07 पुन्हा टेक्स्ट एडिटर विंडोवर जा.
05.10 तुम्ही स्केलर्स दुहेरी अवतरण चिन्हातील स्ट्रिंगमधे असेही वापरू शकता.
05.15 dollar priority = दुहेरी अवतरण चिन्हातString
05.19 फाईल सेव्ह करून बंद करा.
05.22 आता अनेक व्हेरिएबल्स कशी घोषित करायची ते पाहू.
05.27 त्यासाठी टेक्स्ट एडिटरमधे नवी फाईल उघडू.
05.31 टर्मिनलवर टाईप करा - gedit multivar dot pl space ampersand आणि एंटर दाबा.
05.42 हे multivar dot pl ही फाईल टेक्स्ट एडिटरमधे उघडेल.
05.48 आता टाईप करा -
05.50 dollar firstVar comma dollar secondVar semicolon आणि एंटर दाबा.
06.00 dollar firstVar ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू dollar secondVarमधे कॉपी करण्यासाठी टाईप करा
06.07 dollar firstVar space equal to space dollar secondVar semicolon आणि एंटर दाबा.
06.19 ह्या व्हेरिएबल्सवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या गणिती क्रिया करता येऊ शकतात.
06.30 हे पर्लद्वारे कसे करू शकतो ते पाहू.
06.34 टेक्स्ट एडिटरवर जा.
06.36 ह्या दोन्ही व्हेरिएबल्सला 10 ही व्हॅल्यू देण्यासाठी टाईप करा,
06.41 dollar firstVar equal to dollar secondVar equal to ten semicolon आणि एंटर दाबा.
06.51 आता व्हॅल्यूज दाखवण्यासाठी टाईप करा.
06.55 print double quote firstVar: dollar firstVar and secondVar: dollar secondVar slash n double quote complete semicolon आणि एंटर दाबा.
07.17 ही फाईल सेव्ह करा.
07.19 दोन व्हेरिएबल्स मधील व्हॅल्यूची बेरीज करू.
07.23 त्यासाठी टाईप करा.
07.25 dollar addition space equal to space dollar firstVar plus space dollar secondVar semicolonआणि एंटर दाबा.
07.43 आपण addition हे व्हेरिएबल आधी घोषित केलेले नाही.
07.47 पुन्हा एकदा additionह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा
07.53 print double quote Addition is dollar addition slash n double quote complete semicolon
08.05 ही फाईल सेव्ह करा.
08.07 फाईल पुन्हा कंपाईल करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा
08.12 perl hyphen c multivar dot pl
08.18 कुठलीही सिंटॅक्स एरर नसल्यामुळे स्क्रिप्ट कार्यान्वित करू शकतो.
08.24 त्यासाठी टाईप करा. perl multivar dot pl
08.30 हे हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दाखवेल.
08.34 अशाप्रकारे वजाबाकी, गुणाकार व भागाकार करून बघा.
08.38 मी येथे कोड लिहीला आहे.
08.41 ही फाईल सेव्ह करून बंद करू.
08.46 फाईल कंपाईल करण्यासाठी टाईप करा.
08.48 perl hyphen c multivar dot pl
08.54 कोणतीही सिंटॅक्स एरर नाही.
08.55 त्यामुळे स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी perl multivar dot pl
09.01 कार्यान्वित केल्यावर असे आऊटपुट मिळेल.
09.06 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09.11 ह्यात आपण शिकलो,
09.14 पर्लमधे स्केलर व्हेरिएबल्स घोषित करून त्यांचा वापर करणे.
09.18 असाईनमेंट.
09.20 नंबर व्हेरिएबल घोषित करा.
09.22 त्याला 10 व्हॅल्यू द्या.
09.24 घोषित केलेले व्हेरिएबल दाखवा.
09.26 दोन स्ट्रिंग व्हेरिएबल्स घोषित करा.
09.29 त्यांना “Namaste ” आणि “India” या व्हॅल्यूज द्या.
09.34 दोन्ही व्हेरिएबल्स एकापुढे एक दाखवा.
09.38 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.42 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.45 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
09.50 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09.53 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.56 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.01 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10.08 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.13 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
10.23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.29 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10.34 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana