Scilab/C2/Matrix-Operations/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:06, 16 May 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00.02 | Matrix Operations वरील पाठात स्वागत. |
00.06 | ह्या पाठाच्या शेवटी तुम्ही शिकाल, |
00.10 | Matrix चे घटक एक्सेस करणे. |
00.13 | matrix चा determinant, inverse आणि eigen व्हॅल्यू निर्धारित करणे. |
00.18 | विशिष्ट matrices घोषित करणे. |
00.22 | प्राथमिक row ऑपरेशन्स करणे. |
00.25 | “linear equations” चे सिस्टिम सोडवणे. |
00.28 | prerequisites आहे. |
00.30 | तुमच्या संगणकावर, Scilab इन्स्टॉल केलेले असणे गरजेचे आहे. |
00.34 | या पाठाआधी Getting started आणि Vector Operations हे पाठ बघितलेले असावेत. |
00.42 | निर्देशनासाठी मी Windows 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Scilab 5.2.2 वापरत आहे. |
00.50 | डेस्कटॉप वर उपस्थित असलेल्या Scilab आयकॉन वर डबल क्लिक करून Scilab सुरू करा. |
00.59 | हा पाठ मधे मधे थांबवून त्याचा सराव Scilab वर जरूर करा. |
01.08 | 'Vector Operations' पाठातील गोष्टी आठवा. |
01.12 | matrix E घोषित करण्यासाठी E is equal to कंसात 5 space 19 space 15 semicolon 8 space 22 space 36 टाईप करून एंटर दाबा. |
01.37 | आता matrix मधील घटक वेगवेगळे कसे access करायचे ते पाहू. |
01.42 | पहिली row आणि दुस-या कॉलम मधील एलिमेंटस मिळवण्यासाठी टाईप करा E कंसात 1 कॉमा 2 आणि एंटर दाबा. |
01.56 | Scilab मधे matrix ची संपूर्ण row किंवा संपूर्ण कॉलम एक्सट्रॅक्ट करणे अगदी सोपे आहे. |
02.03 | उदाहरणार्थ E ची पहिली row मिळवण्यासाठी खालील कमांड टाईप करा: E1 = E कंसात 1 कॉमा कोलन आणि एंटर दाबा. |
02.23 | ह्या कमांडद्वारे पहिल्या row मधील सर्व एलिमेंटस ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने दाखवले जातील. |
02.30 | कॉलम किंवा रो मधील सर्व एलिमेंटस मिळवण्यासाठी कंसात अनुक्रमे पहिली किंवा दुसरी एंट्री म्हणून फक्त कोलनची खूण लिहिली जाते. |
02.44 | तसेच matrix चा कोणताही subset कोलन (“:”) द्वारे एक्सट्रॅक्ट करता येतो. |
02.49 | उदाहरणार्थ matrix E च्या दुस-या कॉलमपासून तिस-या कॉलमपर्यंतच्या सर्व एलिमेंटसचा संच खालील कमांडद्वारे मिळवता येतो. |
03.00 | E2 = E कंसात कोलन कॉमा 2 कोलन 3 आणि एंटर दाबा. |
03.18 | या कमांडमधे कंसातील दुसरा भाग म्हणजे "2 colon 3" दुस-या कॉलमपासून तिस-या कॉलमपर्यंतचे घटक दाखवतात. |
03.28 | matrix चा आकार माहित नसल्यास $ (dollar ) चिन्हाच्या मदतीने matrix ची शेवटची row किंवा त्या मेट्रिक्स चा कॉलम एक्सट्रॅक्ट होतो. |
03.38 | उदाहरणार्थ matrix E च्या शेवटच्या कॉलममधील घटक एक्सट्रॅक्ट करण्यासाठी टाईप करा, |
03.46 | Elast col= E कंसात कोलन कॉमा डॉलर चिन्ह आणि एंटर दाबा. |
04.06 | आता “det” कमांडद्वारे square matrix चे determinant कसे काढायचे ते पाहू. |
04.13 | Vector Operations वरील पाठात matrix A अशाप्रकारे घोषित केले होते. |
04.19 | A = चौकटी कंसात 1 space 2 space minus 1 semicolon -2 space - 6 space 4 semicolon -1 space -3 space 3 टाईप करून एंटर दाबा. |
04.50 | A चा determinant काढण्यासाठी det कंसात A ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
05.00 | matrix चा inverse आणि eigen व्हॅल्यू काढण्यासाठी अनुक्रमे “inv” आणि “spec” ह्या कमांड वापरल्या जातात. |
05.09 | उदाहरणार्थ inv कंसात A आपल्याला matrix A चा inverse आणि spec कंसात A आपल्याला matrix A ची eigen व्हॅल्यू देते. |
05.29 | ह्या कमांडद्वारे eigen vectors कसे मिळवता येतात हे बघण्यासाठी 'help spec' बघा. |
05.35 | matrix A चा वर्ग किंवा घन केवळ अनुक्रमे A चा वर्ग किंवा A चा घन टाईप करून काढता येतो. |
05.52 | इतर गणिती क्रियांप्रमाणेच caret ही खूण matrix चा घात दर्शवण्यासाठी वापरतात. आपल्या कीबोर्डवर ही खूण shift+6 दाबून मिळते. |
06.05 | आता पाठ थांबवून exercise 1 दिलेल्या video सह सोडवण्याचा प्रयत्न करा. |
06.17 | काही विशिष्ट matrices सुध्दा Scilab मधे बनवता येतात. |
06.24 | उदाहरणार्थ 3 rows आणि 4 कॉलम्स मधे शून्य असलेले matrix “zeros” कमांडद्वारे बनवता येते. |
06.36 | zeros कंसात 3 comma 4 आणि एंटर दाबा. |
06.47 | सर्व एलिमेंटस एक असलेले matrix बनवण्यासाठी “ones” कमांड अशी लिहा, |
06.53 | ones कंसात 2 comma 4 ही सर्व एलिमेंटस 1 असलेले matrix देईल. |
07.01 | आयडेंटिटी matrix “eye” कमांडद्वारे बनवणे अगदी सोपे आहे. |
07.07 | ' e y e' कंसात 4 कॉमा 4 आपल्याला 4 गुणिले 4 चा आयडेंटिटी matrix देईल. |
07.16 | युजरला pseudo random संख्या असलेल्या matrix ची गरज भासू शकते. ते “rand” कमांडद्वारे मिळते. |
07.25 | P = rand कंसात 2 कॉमा 3 आणि एंटर दाबा. |
07.39 | linear systems मधे वापरला जाणारा matrices वरील महत्त्वाच्या क्रियांचा संच म्हणजे रो आणि कॉलम्सवरील प्राथमिक क्रिया होय. |
07.55 | या क्रियांद्वारे matrix वरील रो ऑपरेशन्स करून शून्य नसलेल्या घटकांच्या खालील घटक शून्य करून घेता येतात. हे Scilab मधे सोप्या रितीने करता येते. |
08.07 | Vector Operations हा पाठ आठवा. आपण matrix P असे घोषित केले होते. |
08.17 | P = चौकटी कंसात 1 space 2 space 3 semicolon 4 space 11 space 6 टाईप करून एंटर दाबा. |
08.33 | उदाहरणार्थ, दुसरी row व पहिल्या कॉलम मधील एलिमेंट, प्राथमिक row आणि कॉलम क्रियांच्याद्वारा बदलून शून्य करू. |
08.44 | ही क्रिया करण्यासाठी पहिल्या row ला 4 ने गुणून ती दुस-या row मधून अशी वजा करू शकतो. |
08.56 | P कंसात 2 कॉमा कोलन is equal to P कंसात 2 कॉमा कोलन वजा 4 गुणिले P कंसात 1 कॉमा कोलन टाईप करून एंटर दाबा. |
09.28 | हीच पध्दत मोठ्या सिस्टीम्ससाठी आणि इतर प्राथमिक column क्रिया वापरून करता येते. |
09.35 | Rows आणि कॉलम्स सहजपणे matrices ला जोडता येतात. |
09.39 | उदाहरणार्थ, [5 5 -2] ही रो P या matrix ला जोडण्यासाठी पुढील कमांड वापरता येते. |
09.48 | T = चौकटी कंस उघडून P सेमीकोलन, आणखी एका चौकटी कंसात 5 5 -2 हे एलिमेंटस टाईप करून चौकटी कंस बंद करून एंटर दाबा. |
10.14 | P नंतरच्या सेमीकोलनपुढे जे टाईप करू ते पुढील row वर लिहिले जाईल. |
10.20 | अपेक्षित असलेले matrix बनले आहे. |
10.24 | येथे थांबा. exercise म्हणून आत्ता कार्यान्वित केलेल्या कमांडमधे नव्या row साठी वापरलेले कंस गरजेचे आहेत का ते तपासा. |
10.34 | समीकरणे सोडवताना Matrix notations चा वापर केला जातो. |
10.40 | ही रेषीय समीकरणे सोडवू. |
10.44 | x1 + 2 x2 − x3 = 1 |
10.48 | −2 x1 − 6 x2 + 4 x3 = −2 |
10.54 | आणि − x1 − 3 x2 + 3 x3 = 1 |
11.00 | वरील समीकरणांचा संच Ax = b रूपात देखील लिहिता येतो. |
11.05 | नंतर A चा inverse गुणिले b असे उत्तर मिळेल. |
11.11 | ही समीकरणे सोडवू. |
11.15 | A घोषित करण्यासाठी टाईप करा A = चौकटी कंसात 1 space 2 space -1 semicolon -2 space -6 space 4 semicolon -1 space -3 space 3 आणि एंटर दाबा. |
11.46 | B घोषित करण्यासाठी टाईप करा b is equal to चौकटी कंसात 1 semicoln -2 semicolon 1 आणि एंटर दाबा. |
12.04 | उत्तर x मिळवण्यासाठी लिहू x = inv (A ) गुणिले b |
12.19 | 'inv' कमांडमधील 'i'हा कॅपिटल नाही हे लक्षात घ्या. |
12.26 | याऐवजी Scilab मधे backslash द्वारे तोच रिझल्ट मिळवू शकतो. |
12.33 | Scilab मधे हे करण्यासाठी टाईप करा x is equal to A backslash b आणि एंटर दाबा. |
12.44 | हे आपल्याला तोच रिझल्ट देईल. Scilab "help backslash" आणि "help inv" टाईप करून त्याचे फायदे व तोटे याबद्दल जाणून घ्या. |
12.55 | उत्तराचा ताळा करून पाहण्यासाठी Ax-b हे समीकरण करून पाहू. |
13.05 | A गुणिले x वजा b |
13.10 | याद्वारे उत्तर बरोबर आहे हे दिसले. |
13.14 | लक्षात घ्या की कधीकधी आपल्याला घटकांसाठी हवे असणारे शून्य उत्तर न मिळता अंतर्गत floating point ऑपरेशन्समुळे खूप छोट्या संख्या दिसतील. |
13.27 | अर्थात ह्या संख्या खरोखरच खूपच लहान म्हणजेच 10 चा -16 वा घात यासारख्या असतील. |
13.34 | व्हिडिओ थांबवा आणि exercise 2 सोडवण्याचा प्रयत्न करा. |
13.49 | Matrix Operation पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
13.53 | Scilab मधील अनेक फंक्शन्सबद्दल पुढील पाठात जाणून घेऊ. |
13.59 | Scilab links पाहत रहा. |
14.02 | या पाठात शिकलो, |
14.04 | colon ऑपरेटरद्वारे matrix चे एलिमेंट access करणे. |
14.07 | 'inv' कमांड किंवा बॅकस्लॅश द्वारे matrix चा इनव्हर्स काढणे. |
14.14 | 'det' कमांडद्वारे matrix चा derterminant काढणे. |
14.18 | 'spec' कमांडद्वारे matrix ची eigen व्हॅल्यू काढणे . |
14.23 | सर्व एलिमेंटस एक असलेले matrix, Null Matrix, Identity matrix आणि random एलिमेंटस असलेले matrix अनुक्रमे ones(), zeros(), eye(), rand() ह्या फंक्शनद्वारे घोषित करणे. |
14.39 | रेषीय समीकरण सोडवणे. |
14.42 | हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे. |
14.51 | FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा scilab.in द्वारे मिळवू शकता. |
14.58 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
15.05 | अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या. |
15.14 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
15.18 | सहभागाबद्दल धन्यवाद. |