Netbeans/C3/Connecting-to-a-MySQL-Database/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:09, 28 April 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00.00 नमस्कार.
00.02 MySQL डेटाबेसला जोडणी करण्याच्या पाठात स्वागत.
00.07 या पाठात पाहू,
00.09 MySQL सर्व्हर प्रॉपर्टीज कॉनफिगर करणे.
00.14 MySQL सर्व्हर सुरू करणे.
00.17 डेटाबेस तयार करून त्याच्याशी जोडणी करणे.
00.20 डेटाबेस टेबल्स बनवणे. ज्याच्या दोन पध्दती पाहू.
00.26 sql एडिटरद्वारे आणि,
00.29 क्रीएट टेबल डायलॉग बॉक्सद्वारे.
00.33 आणि शेवटी, SQL स्क्रिप्ट कार्यान्वित करणे.
00.37 ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु v12.04,
00.44 आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00.48 तसेच आपल्याला जावा डेव्हलपमेंट कीट (JDK) v6
00.54 आणि MySQL डेटाबेस सर्व्हरची गरज आहे.
00.57 हा पाठ जाणून घेण्यासाठी डेटाबेस मॅनेजमेंटचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
01.03 अधिक जाणून घेण्यासाठी दाखवलेल्या लिंकवरील PHPआणि MySQL वरील स्पोकन ट्युटोरियल बघा.
01.10 या पाठात सर्वमान्य प्रोग्रॅमिंग परिभाषा वापरली आहे.
01.16 नेटबीन्स IDEमधून MySQL डेटाबेसला जोडणी करण्याची पध्दत येथे दाखवली जाईल.
01.24 एकदा जोडणी झाली की IDE च्या डेटाबेस एक्सप्लोरर द्वारे MySQL सोबत कार्य करू.
01.31 आता IDE वर जाऊ.
01.36 नेटबीन्स IDE मधे MySQL RDBMS चा आधार अंतर्भूत आहे.
01.42 नेटबीन्समधे MySQL डेटाबेस सर्व्हर ऍक्सेस करण्यापूर्वी त्याच्या सर्व्हर प्रॉपर्टीज कॉनफिगर करणे गरजेचे आहे.
01.51 Services विंडोमधे डेटाबेसेस नोडवर राईट क्लिक करा.
01.56 MySQL सर्व्हर प्रॉपर्टीजचा डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी Register MySQL Server निवडा.
02.05 सर्व्हरच्या होस्ट नेम आणि पोर्ट योग्य असल्याची खात्री करा.
02.10 IDE ने डिफॉल्ट रूपात सर्व्हरचे होस्ट नेम localhost असे दिले आहे.
02.18 3306 हा सर्व्हरचा डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे.
02.23 ऍडमिनीस्ट्रेटर युजरनेम दिलेले नसल्यास ते टाईप करा.
02.27 आपल्या सिस्टीमवर ऍडमिनीस्ट्रेटर युजरनेम root आहे.
02.33 ऍडमिनीस्ट्रेटर पासवर्ड द्या.
02.36 सिस्टीमवर पासवर्ड ब्लँक आहे.
02.40 डायलॉग बॉक्सच्या वरती असलेल्या Admin Properties टॅबवर क्लिक करा.
02.45 हे MySQL सर्व्हर नियंत्रित करण्यासाठी माहिती भरण्याची परवानगी देते.
02.51 Path/URL to admin toolफिल्डमधे,
02.56 टाईप करा किंवा MySQL ऍडमिनीस्ट्रेशन ऍप्लिकेशनचे लोकेशन ब्राऊज करा.
03.02 आपल्या सिस्टीमवर टूलचे लोकेशन /usr/bin/mysqladmin आहे.
03.12 Arguments फिल्डमधे adminटूलसाठी कोणतेही अर्ग्युमेंट टाईप करा .
03.18 हे रिकामे देखील ठेवता येते.
03.22 Path to start commandफिल्डमधे
03.25 टाईप करा किंवा MySQL स्टार्ट कमांडचे लोकशन ब्राऊज करा.
03.29 आपल्या सिस्टीमवर /usr/bin/mysqld_safe आहे.
03.38 स्टार्ट कमांडच्या Arguments फिल्डमधे कोणतेही अर्ग्युमेंट टाईप करू शकता.
03.42 येथे आपण -u space root space start टाईप करत आहोत.
03.51 Path to stop commandफिल्डमधे
03.54 टाईप करा किंवा MySQL स्टॉप कमांडचे लोकेशन ब्राऊज करा.
03.58 हा mysqladmin वर जाण्याचा पाथ ब-याचदा MySQL इन्स्टॉलेशनच्या bin फोल्डरमधे असतो.
04.06 आपल्या सिस्टीमवर ते /usr/bin/mysqladmin आहे.
04.14 mysqladminही कमांड असल्यास Arguments फिल्डमधे टाईप करा -u space root space stop.
04.27 हे पूर्ण झाल्यावर Admin Properties टॅब स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दिसला पाहिजे.
04.33 OK क्लिक करा.
04.36 प्रथम आपल्या मशीनवर MySQL डेटाबेस सर्व्हर सुरू असल्याची खात्री करू.
04.42 सर्व्हिस विंडोतील MySQL सर्व्हर नोड, MySQL डेटाबेस सर्व्हर कनेक्ट झाला आहे की नाही ते दर्शवते.
04.52 तो कार्यान्वित होत असल्याची खात्री झाल्यावर Databases खाली MySQL सर्व्हर नोड वर राईट क्लिक करून Connect निवडा.
05.05 MySQL सर्व्हर नोड एक्सपांड केल्यावर सर्व उपलब्ध MySQL डेटाबेसेस दिसतील.
05.13 डेटाबेसेस बरोबर देवाण-घेवाण करण्याची सर्वसामान्य पध्दत म्हणजे SQL एडिटर.
05.19 त्यासाठी नेटबीन्सकडे बिल्ट इन SQL एडिटर आहे.
05.23 कनेक्शन नोडवर राईट क्लिक करून हे ऍक्सेस करू शकतो.
05.29 SQL एडिटर द्वारे नवा डेटाबेस इन्स्टन्स बनवू .
05.34 Services विंडोमधे MySQL सर्व्हर नोडवर राईट क्लिक करून Create Database निवडा.
05.44 Create Database डायलॉग बॉक्समधे नव्या डेटाबेसचे नाव टाईप करा.
05.50 mynewdatabase नाव देऊ.
05.56 दिलेल्या युजरला पूर्ण ऍक्सेस तुम्ही प्रदान करू शकता.
06.01 डिफॉल्ट रूपात केवळ ऍडमिन युजरला विशिष्ट कमांडस कार्यान्वित करण्याची परवानगी असते.
06.08 ड्रॉप डाऊन लिस्टद्वारे तुम्ही या परवानगी विशिष्ट युजरला देऊ शकता.
06.13 drop tables या शिवाय बहुतांश परवानगी युजरला देणे योग्य ठरते.
06.18 फक्त त्यांच्या ऍप्लिकेशन्सने बनवलेले डेटाबेसस मॉडिफाय करण्याची परवानगी युजरला मिळेल.
06.25 आपण हा चेकबॉक्स सिलेक्ट करणार नाही.
06.30 OKक्लिक करा.
06.34 आता टेबल्स बनवून त्यात डेटा भरू. डेटामधे थोडे बदल करू.
06.41 आत्ता mynewdatabase रिकामा आहे.
06.44 टेबल्समधे डेटा भरण्याची पहिली पध्दत बघू.
06.48 डेटाबेस एक्सप्लोररमधे mynewdatabase कनेक्शन नोड एक्सपांड करा.
06.58 त्यामधे तीन सब फोल्डर्स आहेत.
07.00 Tables, Views आणि Procedures.
07.04 Tables फोल्डरवर राईट क्लिक करून Execute Command निवडा.
07.11 मुख्य विंडोच्या SQL एडिटरमधे एक रिकामा कॅन्व्हास उघडेल.
07.16 आता SQL एडिटरमधे एक साधी क्वेरी टाईप करू.
07.30 आपण SQL एडिटरमधे एक साधी क्वेरी टाईप केली आहे.
07.36 ही आपण बनवत असलेल्या Counselor टेबलची टेबल डेफिनेशन आहे.
07.42 ही क्वेरी कार्यान्वित करण्यासाठी वरील टास्कबार मधीलRun SQL आयकॉनवर राईट क्लिक करा.
07.51 किंवा SQL एडिटर मधे राईट क्लिक करून Run Statement निवडा.
08.00 IDE डेटाबेसमधे Counselor नामक टेबल बनवेल.
08.04 आऊटपुट विंडोमधे हा मेसेज बघू शकतो.
08.12 जे आपल्याला कमांड यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याचे दाखवत आहे.
08.17 केलेले बदल तपासण्यासाठी डेटाबेस एक्सप्लोरर मधे Tables नोडवर राईट क्लिक करा.
08.25 Refresh निवडा.
08.28 हे दिलेल्या डेटाबेसची चालू स्थिती अपडेट करेल.
08.32 आता Counselor हे नवे टेबल Tables पर्यायाखाली दिसेल.
08.40 टेबल नोड एक्सपांड केल्यास आपण बनवलेले कॉलम्स दिसतील.
08.46 आता टेबल्समधे डेटा भरण्याची पुढील पध्दत पाहू,
08.51 म्हणजेच क्रीएट टेबल डायलॉग बॉक्स वापरू.
08.54 डेटाबेस एक्सप्लोरर मधे Tables नोडवर राईट क्लिक करून Create Table निवडा.
09.03 Create Table डायलॉग बॉक्स उघडेल.
09.06 Table नेमच्या टेक्स्ट फिल्डमधे Subject असे टाईप करा.
09.13 Add Column क्लिक करा.
09.16 Add Column डायलॉग बॉक्समधील नेम फिल्डमधे idअसे टाईप करा.
09.22 टाईपच्या ड्रॉप डाऊन मेनूतून SMALLINT हा डेटा टाईप निवडा.
09.30 Add Column डायलॉग बॉक्समधील Primary Keyचा चेकबॉक्स सिलेक्ट करा.
09.35 हे टेबलची प्रायमरी की घोषित करण्यासाठी आहे.
09.39 तुम्ही की चा चेकबॉक्स सिलेक्ट केल्यावर Index आणि Unique चे चेकबॉक्स आपोआप सिलेक्ट झालेले आहेत.
09.49 तसेच Null चेकबॉक्स डिसिलेक्ट झालेला आहे.
09.53 कारण प्रायमरी की चा उपयोग डेटाबेसमधील युनिक रो शोधण्यासाठी होतो.
09.59 OKक्लिक करा.
10.03 हीच कृती करून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उरलेले कॉलम्स समाविष्ट करा.
10.09 आता Name, Description, आणि Counselor ID चा डेटा ठेवण्यासाठी Subject नावाचे टेबल बनवले आहे.
10.20 OKक्लिक करा.
10.23 डेटाबेसवर SQL क्वेरीज कार्यान्वित करून त्यात डेटा समाविष्ट करू शकतो तसेच ते मॉडिफाय आणि डिलिट करू शकतो.
10.32 आता Counselor टेबलमधे नवे रेकॉर्ड समाविष्ट करू.
10.35 Tables नोडच्या कॉन्टेक्स्ट मेनूतून Execute कमांड निवडा.
10.43 मुख्य विंडोमधे नवे SQL एडिटर उघडेल.
10.47 SQL एडिटरमधे ही क्वेरी टाईप करा.
11.00 ही क्वेरी कार्यान्वित करण्यासाठी सोर्स एडिटर मधे राईट क्लिक करून Run स्टेटमेंट निवडा.
11.07 आता नवे रेकॉर्ड टेबलमधे समाविष्ट झाले की नाही ते तपासू.
11.12 Counselor टेबलवर राईट क्लिक करून View Data निवडा.
11.18 नवा SQL एडिटर मुख्य विंडोमधे उघडेल.
11.21 टेबलमधील सर्व डेटा सिलेक्ट करण्यासाठीची क्वेरी आपोआप लिहिलेली दिसेल.
11.27 ह्या स्टेटमेंटचे आऊटपुट वर्कस्पेसच्या खाली टेबल व्ह्यू मधे दाखवले जाईल.
11.41 आत्ता दिलेल्या डेटासहित नवीन रो समाविष्ट झालेली दिसेल.
11.46 तसेच बाहेरील SQL स्क्रिप्ट थेट IDE मधून कार्यान्वित करू शकतो.
11.52 येथे दाखवण्यासाठी आपल्याकडे SQL क्वेरी आहे.
11.59 ही स्क्रिप्ट आधी पाहिल्याप्रमाणे दोन टेबल्स बनवेल.
12.04 म्हणजेच Counselor आणि Subject
12.09 स्क्रिप्ट ही टेबल्स ओव्हराईट करेल त्यामुळे,
12.12 आधीपासून उपलब्ध असल्यास दोन्ही टेबल डिलिट करू.
12.16 टेबल्स डिलिट करण्यासाठी Counselor टेबलवर राईट क्लिक करा.
12.21 Delete निवडा.
12.24 Confirm Object table Deletion डायलॉग बॉक्समधे Yes क्लिक करा .
12.31 हेच Subject टेबलसाठीही करा.
12.38 तुमच्या सिस्टीमवरील उपलब्ध असलेली SQL क्वेरीची फाईल उघडा.
12.43 File मेनूतील Open Fileनिवडा.
12.48 फाईल असलेले लोकेशन ब्राऊज करा.
12.54 स्क्रिप्ट आपोआपSQL एडिटरमधे उघडेल.
12.59 mynewdatabase साठी कनेक्शन सिलेक्ट केल्याची खात्री करा.
13.03 हे एडिटरच्या वरच्या भागात असलेल्या टूलबारमधील कनेक्शनच्या ड्रॉपडाऊनमधे तपासा.
13.13 टास्कबारमधील Run SQL बटण दाबा.
13.17 आणि सिलेक्ट केलेल्या डेटाबेसवर स्क्रिप्ट कार्यान्वित झाले आहे.
13.22 mynewdatabase कनेक्शन नोडवर राईट क्लिक करून Refresh दाबा.
13.28 हे दिलेल्या डेटाबेस घटकाची चालू स्थिती अपडेट करेल.
13.34 आता ह्यापैकी कुठल्याही टेबलवर राईट क्लिक करून View Data निवडा.
13.41 आणि वर्कस्पेसमधे खाली नव्या टेबल्समधे असलेला डेटा दिसेल.
13.52 या पाठात शिकलो,
13.54 संगणकावर MySQL कॉनफिगर करणे.
13.57 IDE मधून डेटाबेस सर्व्हरशी कनेक्शन सेट अप करणे.
14.02 डेटा बनवणे, डिलिट आणि मॉडिफाय करणे.
14.06 SQL क्वेरीज कार्यान्वित करणे.
14.10 असाईनमेंट म्हणून,
14.11 टेबल्स असलेला आणखी एक डेटाबेस इन्स्टन्स बनवा.
14.15 तुमच्या पुस्तकांच्या लायब्ररीची देखभाल करण्यासाठी टेबल्समधे आवश्यक डेटा समाविष्ट करा.
14.21 डेटा बघण्यासाठी SQL स्टेटमेंटस कार्यान्वित करा.
14.29 आपण अशाचप्रकारचा डेटाबेस बनवला आहे. ज्यात मुव्ही लायब्ररीची माहिती संचित केली आहे.
14.37 तुमची असाईनमेंट अशी दिसायला हवी.
14.44 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
14.48 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14.51 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
14.56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15.01 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
15.04 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
15.10 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
15.15 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15.20 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15.27 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
15.30 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana