Digital-Divide/D0/Introduction-to-PAN-Card/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:14, 4 April 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Introduction-to-PAN-Card

Author: Manali Ranade

Keywords: Digital-Divide


Visual Clue
Narration
00:00 Introduction to PAN card वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:06 येथे शिकणार आहोत,
00:08 - PAN card विषयी,
00:10 - PAN card ची रचना आणि वैधता,
00:14 -PAN card ची आवश्यकता,
00:16 -PAN card ची माहिती.
00:18 PAN म्हणजे Permanent Account Number
00:23 PAN Card असे दिसते.
00:28 हा सर्व कायदेशीर घटकांना प्रदान केलेला दहा अक्षरी alphanumeric क्रमांक आहे.
00:35 हे भारतीय आयकर विभागाकडून अधिकृतपणे प्रदान केले जाते.
00:40 PAN card देण्याचा सर्वात महत्वाcha उद्देश आहे,
00:44 ओळखपत्र म्हणून आणि,
00:48 सदर घटकाच्या सर्व आर्थिक माहितीचा मागोवा घेणे.
00.53 पॅन कार्ड बद्दल तथ्ये.
00.55 PAN हा एकमेव, राष्ट्रीय आणि कायमस्वरूपी असतो.
01:00 पत्त्यामधे बदल झाला तरी तो अबाधित राहतो.
01:03 एकापेक्षा अधिक PAN बाळगणे बेकायदेशीर ठरते.
01:07 pan card कोणाला मिळू शकते?
01:10 व्यक्ती
01:12 कंपनी
01:15 HUF म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब.
01:19 विश्वस्त आणि इतर संस्था.
01:22 PAN card का आवश्यक असते?
01:25 कारण हा महत्त्वाचा photo-ID पुरावा म्हणून कार्य करतो.
01:30 PAN card चा उपयोग आपल्याला बँकेत खाते उघडण्यासाठी,
01:38 मालमत्तेची खरेदी-विक्री इत्यादी साठी होतो.
01:43 PAN चा उपयोग करपात्र पगाराचे उत्पन्न काढण्यासाठी खातेकरण हेतूने केला जातो.
01.50 तसेच Income Tax Returns भरण्यासाठी होतो.
01.53 शेअर ट्रेडिंगसाठी, DEMAT Accountउघडण्यासाठी ह्याचा कागदोपत्री पुरावा म्हणून वापर होतो.
01.59 तसेच बँकेतून 50, 000 रूपयांपेक्षा अधिक रोख रक्कम काढताना पुरावा म्हणून वापर होतो.
02:07 कर चुकवेगिरी रोखण्यासाठी आयकर विभागाला याचा उपयोग होतो.
02:13 याद्वारे अप्रत्यक्षरित्या लोकांच्या क्रेडिट हिस्ट्रीचा मागोवा घेतला जातो.
02:18 TDS (Tax Deductions at Source) मिळविण्यासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून याचा उपयोग केला जातो.
02:27 हा पासपोर्ट चा अर्ज करण्यासाठी, कागदोपत्री पुरावा आहे.
02:31 पत्त्यामधे बदल करण्यासाठी,
02:32 आणि अशाच प्रकारची इतर कागदपत्र मिळवण्यासाठीही होतो.
02:40 50,000 पेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवींसाठी,
02:47 हॉटेलचे बिल आणि प्रवासखर्च 25,000 पेक्षा जास्त असल्यास,
02:56 क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी,
03:05 टेलिफोन कनेक्शनचा अर्ज करण्यासाठी.
03:10 अशा प्रकारे PANची रचना असते,
03:13 पहिली पाच अक्षरे नंतर त्यापुढे चार अंक आणि शेवटी पुन्हा अक्षर.
03:21 पहिली तीन अक्षरे AAA पासून ZZZ पर्यंत अशा प्रकारचा वर्णमालेचा अनुक्रम असतो.
03.29 चौथे अक्षर हे कार्डधारक नेमक्या कुठल्या प्रकारात मोडतो ह्याबद्दल माहिती पुरवते.
03.36 P व्यक्तीसाठी
03.38 C कंपनीसाठी
03.41 HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) साठी
03.45 F फर्मसाठी
03.47 A Association of Persons (AOP) साठी
03.51 T AOP (Trust) साठी
03.53 B Body of Individuals (BOI) साठी
03.57 L Local Authority साठी
04.01 J Artificial Juridical Person साठी आणि,
04.05 G Government साठी.
04:07 PAN चे पाचवे अक्षर म्हणजे
04:10 (a) "Personal" प्रकारच्या PAN card साठी, व्यक्तीच्या आडनावाचे/शेवटच्या नावाचे पहिले अक्षर.
04:18 आकृतीत दाखविल्याप्रमाणे Yadav हे आडनाव आहे. म्हणून पाचवे अक्षर Y आहे. किंवा
04:26 (b) Company/ HUF/ Firm किंवा इतर प्रकारच्या PAN Cards मधे Entity/ Trust/ Society/ Organizationचे नाव.
04.38 आकृतीत दाखविल्याप्रमाणे Shanoz हे trust चे नाव आहे.
04.42 म्हणून पाचवे अक्षर S आहे.
04.46 शेवटचे अक्षर हे alphabetic check digit असते.
04.50 PAN card प्रदान केल्याची तारीख त्याच्या उजवीकडे उभ्या रेषेत नमूद केलेली असते.
04.59 नव्या आणि चालू PAN numbersची वैधता तपासण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या.

https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/KnowYourPanLink.html

05:10 संक्षिप्त रूपात
05:12 पाठात आपण शिकलो,
05:15 -PAN card विषयी
05:16 - PAN card ची रचना आणि वैधता
05.19 -PAN card ची आवश्यकता आणि
05.21 -PAN card ची माहिती.
05.23 प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05.27 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05.30 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:34 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
05:36 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:40 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:43 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |- | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:50 | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |- | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 05:54 | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |- | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:01 | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |- | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:11 | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हा पाठ येथे संपत आहे. |- | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:14 | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  सहभागासाठी धन्यवाद . |}

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana