Geogebra/C3/Theorems-on-Chords-and-Arcs/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:21, 18 February 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Theorems-on-Chords-and-Arcs

Author: Manali Ranade

Keywords: Geogebra


Visual Clue
Narration
00.01 नमस्कार. Geogebra मधील जीवा( Chords) आणि कंस(Arcs) या वरील प्रमेयांच्या(Theorems) पाठात स्वागत.
00.08 ह्या पाठाच्या शेवटी तुम्ही,
00.10 वर्तुळाच्या जीवा आणि

कंस तपासण्यास सक्षम व्हाल.

00.19 Geogebra चे प्राथमिक ज्ञान आपल्याला आहे असे समजू.
00.23 नसल्यास संबंधित पाठासाठी http://spoken-tutorial.org ह्या वेबसाईटला भेट द्या.
00.30 ह्या पाठासाठी आपण,
00.33 Ubuntu Linux OS Version 11.10, Geogebra Version 3.2.47.0 वापरत आहोत.
00.43 आपण पुढील Geogebra टूल्स वापरू.
00.47 * Circle with Center and Radius
00.50 * Circular Sector with Center between Two Points
00.53 * Circular Arc with Center between Two points
00.56 * Midpoint and
  • Perpendicular line


01.00 GeoGebra ची नवीन विंडो उघडू .
01.02 Dash home मधील Media Apps वर क्लिक करा.
01.07 Type खालील Education वर क्लिक करून GeoGebraवर क्लिक करा.
01.15 आता प्रमेय मांडू.
01.18 वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो.
01.23 वर्तुळमध्य A मधून BCया जीवेवर टाकलेला लंब ती जीवा दुभागतो.
01.32 प्रमेय तपासून पाहू.
01.37 ह्या पाठासाठी Axes ऐवजी 'Grid layout' वापरू.
01.42 ड्रॉईंग पॅड वर राईट क्लिक करा.
01.44 'Graphic view' मधे
01.45 'Axes' अनचेक करून
01.47 'Grid' निवडा.
01.52 आता वर्तुळ काढू.
01.54 टूलबारवरील "Circle with Center and Radius" हे टूल निवडा.
01.58 ड्रॉईंग पॅडवर बिंदू 'A' काढा.
02.01 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
02.03 त्रिज्येसाठी( Radius) '3' टाईप करा.
02.06 OK क्लिक करा.
02.07 मध्यबिंदू 'A' आणि त्रिज्या '3सेंटीमीटर' असलेले वर्तुळ तयार होईल.
02.14 बिंदू 'A' हलवून वर्तुळाच्या हालचाली पाहु.
02.19 “Segment between two points” हे टूल निवडा.
02.22 वर्तुळाच्या परीघावर 'B' आणि 'C' हे बिंदू काढा.
02.27 जीवा 'BC' तयार होईल.
02.30 जीवा 'BC' वर बिंदू 'A' मधून जाणारा लंब काढू.
02.36 टुलबार वरील "Perpendicular line" टूलवर क्लिक करा.
02.39 जीवा 'BC', आणि बिंदू 'A' वर क्लिक करा.
02.45 बिंदू 'B' हलवून, बिंदू 'B' सोबत लंब देखील हलताना आपण पाहु.
02.52 लंब आणि जीवा 'BC', एका बिंदूत छेदतात.
02.57 “Intersect Two objects” वर क्लिक करा,
02.59 छेदनबिंदू 'D' म्हणून मार्क करा.
03.04 D हा जीवा BC चा मध्यबिंदू आहे का ते तपासू.
03.09 "Distance" tool... वर क्लिक करा
03.12 बिंदू 'B' 'D' आणि 'D' 'C' वर क्लिक करा.
03.19 'BD' आणि 'DC' हे अंतर समान असल्याचे लक्षात येईल.
03.24 हे सुचवते, 'D' हा जीवा 'BC' चा मध्यबिंदू आहे.
03.29 आता कोन 'CDA' मोजू.
03.33 Angle tool वर क्लिक करा.
03.36 बिंदू 'C','D', 'A' वर क्लिक करा.
03.42 'CDA' हा '90अंशाचा कोन आहे.
03.46 प्रमेय सिध्द झाले आहे.
03.50 आता बिंदू 'C' हलवू.
03.52 बिंदू 'C' सोबत अंतर देखील बदलताना दिसेल.
04.03 फाईल सेव्ह करू.
04.05 “File”>> "Save As" वर क्लिक करा.
04.08 फाईलला "circle-chord" हे नाव देऊन “Save” वर क्लिक करा.
04.21 आता पुढील प्रमेय पाहू.
04.28 समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात.
04.34 BCया कंसाने आंतरलिखित केलेले BDC आणि BEC हे कोन समान असतात.
04.44 हे प्रमेय तपासून पाहू.
04.51 नवी Geogebra विंडो उघडू,
04.54 “File” खालील "New" वर क्लिक करा.
04.55 एक वर्तुळ काढू.
04.57 टूलबारवरील " Circle with Center through point टूल वर क्लिक करा.
05.01 मध्यबिंदू म्हणून बिंदू 'A' काढा.
05.04 बिंदू 'B' आणि 'C' मिळवण्यासाठी परिघावर पुन्हा एकदा क्लिक करा.
05.09 आता कंस 'BC' काढू.
05.13 "Circular Arc with Center between Two points" वर क्लिक करा.
05.18 परिघावरील बिंदू 'A' आणि बिंदू 'B' आणि 'C' वर क्लिक करा.
05.24 कंस 'BC' तयार झाला आहे.
05.27 कंस 'BC' च्या प्रॉपर्टीमधे बदल करू.
05.30 "Algebra View" मधे
05.32 object 'd' वर राईट क्लिक करा.
05.35 "Object Properties" निवडा.
05.38 हिरवा रंग निवडून closeवर क्लिक करा.
05.46 new point टूल वर क्लिक करा. वर्तुळाच्या परिघावर बिंदू 'D' आणि 'E' काढा.
05.56 कंस BCवरून बिंदू 'D' आणि 'E' शी दोन कोन तयार करू.
06.04 "Polygon" टूलवर क्लिक करा.
06.05 बिंदू 'E', 'B', 'D', 'C' आणि आकृती पूर्ण करण्यासाठी पुन्हा 'E' वर क्लिक करा.
06.18 कोन 'BDC' आणि 'BEC' मोजू.
06.27 "Angle" टूलवर क्लिक करा.
06.29 बिंदू 'B', 'D', 'C' आणि 'B', 'E', 'C' वर क्लिक करा.
06.40 कोन 'BDC' आणि 'BEC' हे समान असल्याचे दिसेल.
06.52 पुढील प्रमेय पाहू.
06.55 कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो.
07.06 BCया कंसाने Aशी केलेला BACहा कोन त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या BEC आणि BDC या कोनांच्या दुप्पट असतो.
07.22 हे प्रमेय तपासून पाहू.
07.26 वर्तुळखंड 'ABC' काढू.
07.30 "Circular Sector with Center between Two Points" टूल वर क्लिक करा.
07.35 बिंदू 'A', 'B', 'C' वर क्लिक करा.
07.45 वर्तुळखंड 'ABC' चा रंग बंदलू.
07.48 वर्तुळखंड 'ABC' वर राईट क्लिक करा.
07.51 "Object Properties" निवडा.
07.54 हिरवा रंग निवडून "Close" वर क्लिक करा.
08.00 कोन 'BAC' मोजू.
08.04 "Angle" टूल वर क्लिक करा. बिंदू 'B', 'A', 'C' वर क्लिक करा.
08.15 कोन 'BAC' हा कोन 'BEC' आणि 'BDC' च्या दुप्पट आहे.
08.28 बिंदू 'C' हलवून पाहू.
08.32 कोन 'BAC' हा कायमच 'BEC' आणि 'BDC' च्या दुप्पट आहे.
08.41 अशाप्रकारे ही प्रमेय सिध्द झाली आहेत.
08.45 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08.48 थोडक्यात,
08.53 ह्या पाठात आपण सिध्द केले,
08.57 * वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो.
09.00 * समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात
09.06 * कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो.
09.15 असाईनमेंट म्हणून तुम्ही हे तपासून पाहा.
09.19 वर्तुळाच्या समान जीवा मध्यबिंदूपासून समान अंतरावर असतात.
09.24 वर्तुळ काढा.
09.26 Select Segment with Given length from point टूल निवडा.
09.29 हे टूल दोन समान आकाराच्या दोन जीवा काढण्यासाठी वापरा.
09.33 त्या जीवांवर मध्यबिंदूपासून लंब काढा.
09.37 छेदनबिंदू मार्क करा.
09.40 लंबांचे अंतर मोजा.
09.44 असाईनमेंट अशाप्रकारे दिसणे गरजेचे आहे.
09.48 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09.51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.53 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10.00 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.03 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10.14 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.29 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana