KTurtle/C3/Control-Execution/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:02, 6 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00.01 सर्वाना नमस्कार.
00.03 KTurtleमधील Control Execution वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.10 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00.13 'while' loop आणि
00.15 'for' loop शिकू.
00.17 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04 KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत आहे.
00.32 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला Kturtle ची मूलभूत माहीत आहे.
00.38 जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमच्या वेबसाइट http://spoken-tutorial.org ला भेट द्या.
00.45 चला नवीन KTurtle अप्लिकेशन उघडुया.
00.48 Dash home वर क्‍लिक करा.
00.50 Search बार मध्ये KTurtle टाइप करा.
00.53 option वर क्‍लिक करा. KTurtle अप्लिकेशन उघडेल.
00.59 सर्वप्रथम मी control execution म्हणजे काय हे स्पष्ट करते.
01.05 Control execution प्रोग्राम च्या प्रवाहास नियंत्रित करते.
01.10 प्रोग्राम execution नियंत्रित करण्यासाठी विविध परिस्थिती चा वापर केला आहे.
01.16 लूप वारंवार होणार्‍या निष्पादनाचा एक ब्लॉक कोड आहे, जोपर्यंत निश्चित कंडीशन पूर्ण होत नाही.
01.25 उदाहरणार्थ “while” loop आणि “for” loop.
01.30 चला, “while” loopसहित ट्यूटोरियल ची सुरवात करू.
01.34 “while” loop मध्ये, लूप च्या आतील कोडची पुनरावृत्ती होते, जोपर्यंत boolean 'false' मध्ये बदलत नाही.
01.42 चला मी “while” loopची रचना स्पष्ट करत.

while loop condition {

 do something  

with loop increment variable. }

01.56 माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये कोड आहे.
01.59 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
02.07 हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या Kturtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
02.13 प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरवात करा.
02.18 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
02.25 मी कोड समजावून सांगते.
02.27 # चिन्ह, त्याच्या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
02.32 याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होणार नाही.
02.38 reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते.
02.43 $x=0 x ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
02.52 प्रोग्राम मधील मेसेज दुहेरी अवतरण चिन्हात keyword message " " च्या नंतर दिलेला असतो.

“message” कमांड “string” ला इनपुट प्रमाणे घेते.

03.04 हे, स्ट्रिंग्स वरुन टेक्स्ट समाविष्ट असलेला डायलॉग बॉक्स दर्शविते.
03.11 while $x<30 “while” कंडीशन तपासते.
03.17 $x=$x+3 वेरियबल $x ची वॅल्यू 3 ने वाढविते.
03.27 fontsize 15 - print कमांडद्वारे वपारलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते
03.35 Fontsize क्रॅमांकास इनपुट च्या रूपात घेते. pixel मध्ये सेट करते.
03.42 forward 20 कमांड “Turtle” ला कॅन्वस वर 20पाऊल पुढे सरकवते.
03.52 print $x कॅन्वस वर वेरियबल x ची वॅल्यू दर्शविते.
04.01 प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्‍लिक करते.
04.05 मेसेज डायलॉग बॉक्स दर्शित होतो. मी OK वर क्‍लिक करते .
04.11 कॅन्वस वर Multiples of 3 from 3 to 30 दर्शित झाले आहे.
04.17 “Turtle” कॅन्वस वर 20 पाऊल पुढे सरकले आहे.
04.22 चला पुढे “for” loopसह कार्य करू.
04.26 “for” loop हे गणन लूप आहे.
04.29 प्रत्येक वेळी “for” loopच्या आतील कोड निष्पादीत होतो.
04.34 शेवटच्या वॅल्यू वर पोहचेपर्यंत, वेरियबल ची वॅल्यू वाढत जाते.
04.41 मी “for” loop ची रचना समजावून सांगते.
04.46 for variable = start number to end number { Statement}
04.55 मी सध्याचा प्रोग्राम क्लियर करते.
04.59 मी Clear कमांड टाइप करते आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी run करते.
05.05 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
05.14 कृपया हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
05.20 प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरूवात करा.
05.25 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
05.32 मी प्रोग्राम समजावून सांगते.
05.34 # चिन्ह, लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
05.39 reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते.
05.44 $r=0 r ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
05.52 for $x= 1 to 15 - “for” condition ला 1 ते 15पर्यंत तपासते.
06.01 $r=$x*($x+1)/2 वेरियबल r ची वॅल्यू मोजते.
06.12 fontsize 18 - print कमांड द्वारे वापरलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते .
06.19 print $r कॅन्वस वर वेरियबल r ची वॅल्यू दर्शविते.
06.26 forward 15 कमांड, Turtle ला कॅन्वस वर, 15पाऊले पुढे सरकवते.
06.34 go 10,250 Turtleला कॅन्वस च्या डाव्या बाजुवरून 10 pixels आणि कॅन्वस च्या सर्वात वरुन 250 pixels वर जाण्यास कमांड करते.
06.48 “Turtle” कोणत्याही वेळेच्या अंतरा शिवाय सर्व प्रिंट कमांड दर्शित करते.
06.54 “Wait 2” कमांड पुढील कमांड निष्पादीत करण्या अगोदर Turtle ला 2 सेकंदा साठी थांबविते.
07.04 “print” कमांड “string” ला दुहेरी अवतरण चिन्हात दर्शविते आणि वेरियबल $r ही दर्शविते.
07.13 प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्‍लिक करते.
07.17 कॅन्वस वर पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स च्या गणिता चा क्रम आणि पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स चे गणित दिसत आहे.
07.27 Turtle कॅन्वस वर 15 पाऊले पुढे सरकला आहे.
07.32 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
07.37 संक्षिप्त रूपात,
07.40 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
07.44 “while”' loop आणि “for” loop वापरणे शिकलो.
07.47 assignment रूपात, मी तुम्हाला मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम लिहिण्यास सांगत आहे.
07.54 “while” loop वापरुन 2 ला गुणा.
07.58 “for” loop वापरुन पाढ्या चा गुणाकार करा.
08.03 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08.08 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
08.12 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
08.17 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम.
08.20 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08.23 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
08.27 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08.36 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे.
08.41 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
08.48 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
08.54 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble