GeoGebra-5.04/C3/Create-action-object-Tools/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration
|
0:01 | जिओजेब्रा मधील Create Action Object Tools वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
0:07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण free आणि dependent Objects बद्दल शिकू. |
0:14 | त्याचप्रमाणे आपण शिकू,
चेक बॉक्स तयार करणे insert बटण तयार करणे इनपुट बॉक्स समाविष्ट करणे |
0:23 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.
उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04 जिओजेब्रा आवृत्ती 5.0.438.0-डी |
0:36 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी.संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्या. |
0:47 | या ट्यूटोरियल मध्ये आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले tangents to a circle tool वापरू. |
0:54 | "या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आपल्याला कोड file च्या link मध्ये दिलेली झिप फाइल डाउनलोड
करणे आवश्यक आहे." |
1:00 | डाउनलोड केलेली झिप फाईल काढा.काढलेल्या फोल्डर मधून tangents-circle.ggt फाईल शोधा. |
1:10 | मी माझ्या डेस्कटॉपवर आधीपासूनच फाइल डाउनलोड केली आहे आणि काढली आहे. |
1:15 | मी त्यावर राइट-क्लिक करेन आणि Open With GeoGebra |
1:20 | Tangents to a circle tool वर क्लिक करा आणि ग्राफिक्स view मध्ये दोन बिंदू क्लिक करा. |
1:28 | वर्तुळाची स्पर्शिका ग्राफिक्स view मध्ये रेखाटली जाते. |
1:32 | आता मी फ्री आणि डिपेंडेंट ऑब्जेक्ट्स बद्दल स्पष्टीकरण देईन. |
1:37 | आकृती पूर्ण करू. |
1:40 | इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा. वर्तुळाला स्पर्शिकेचे छेदनबिंदू चिन्हांकित करा. |
1:49 | सेगमेंट टूल वापरुन आपण A C, A D आणि A B जोडू. |
2:00 | Algebra view मध्ये, रेषाखंड AC रेषाखंड AD च्या बरोबरीचा आहे.
त्या वर्तुळ c च्या त्रिज्या आहेत. |
2:09 | आता वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या संपर्क बिंदूवरील कोन मोजूया. |
2:15 | एंगल टूल वर क्लिक करा आणि बिंदू B, C, A. वर क्लिक करा आणि नंतर बिंदू A, D, B वर क्लिक करा. |
2:32 | लक्ष द्या अल्फा आणि बीटा कोन 90 अंश आहेत. |
2:37 | कारण संपर्काच्या बिंदूवर, वर्तुळातील स्पर्शिका त्रिज्याशी लंब असते. |
2:44 | Algebra view मध्ये, टॉगल स्टाईल बार नावाच्या त्रिकोण बाणावर क्लिक करा. |
2:50 | Auxillary Objects,Sort Objects by ड्रॉप-डाउन आणि fx ड्रॉप-डाउन दिसेल. |
2:58 | Sort Objects by ड्रॉप-डाउन वर क्लिक करा.Sort by मेनू उघडेल. |
3:05 | या मेनूमध्ये, Dependency, Object Type, Layer आणि Construction Order check-boxes आहेत. |
3:15 | आधिपासूनच ऑब्जेक्ट टाइप चेक बॉक्स निवडला गेला आहे. |
3:19 | इतर ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक वेगळा चेक बॉक्स निवडला जाऊ शकतो. |
3:24 | डिपेंडेंसी चेक बॉक्स निवडू. |
3:28 | "लक्षात घ्या की केवळ A आणि B बिंदू Free Objects अंतर्गत आहेत. इतर सर्व ऑब्जेक्ट्स डिपेंडेंट
ऑब्जेक्ट्स अंतर्गत आहेत." |
3:38 | आपण इतर चेकबॉक्स निवडू शकता आणि ऑब्जेक्ट्सची क्रमवारी कशी आहे हे पाहू शकता. |
3:45 | आता आपण चेक बॉक्स कसा तयार करावा ते शिकू. |
3:49 | चेक बॉक्स टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
3:56 | Check Box to Show/hide Objects dialog box उघडेल |
4:00 | Caption Text बॉक्स मध्ये, मी Angles टाइप करेन. |
4:04 | सिलेक्ट ऑब्जेक्ट्स ड्रॉप-डाउन मधून, Angle Alpha आणि Angle Beta निवडू. |
4:12 | नंतर बॉक्समधील अप्लाय बटणावर क्लिक करा. |
4:16 | अँगल्स चेक बॉक्स ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दिसते. |
4:20 | ग्राफिक व्यू मध्ये इतर ऑब्जेक्ट्स क्लिक करणे टाळण्यासाठी मूव्ह टूल वर क्लिक करा. |
4:27 | Angles check-box बुलियन व्हॅल्यू a म्हणून views मध्ये दर्शविले गेले आहे. |
4:33 | हा चेक बॉक्स वापरुन आपण अल्फा आणि बीटा कोन दर्शवू किंवा लपवू शकतो. |
4:39 | Algebra view मध्ये, कोन दर्शविल्यावर Boolean Value true आहे. |
4:44 | जेव्हा ते लपवले जातात तेव्हा Boolean Value false होते. |
4:49 | आता आपण इनपुट बॉक्स समाविष्ट करू. |
4:51 | इनपुट बॉक्स टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
4:59 | इनपुट बॉक्स ग्राफिक्स व्यू मध्ये दिसते. |
5:02 | बॉक्समध्ये, caption म्हणून circle टाइप करा. |
5:06 | लिंक्ड ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउन मध्ये, circle c निवडा. आणि बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा. |
5:14 | सर्कल इनपुट बॉक्स, त्याच्या निर्देशांकासह, ग्राफिक्स व्ह्यूमध्ये दिसते. |
5:20 | ते निवडण्यासाठी मूव्ह टूलवर क्लिक करा. |
5:23 | इनपुट बॉक्समध्ये, ए च्या जागी बी टाइप करा आणि एंटर दाबा. |
5:29 | स्पर्शिका, कोन आणि सर्व संबंधित objects अदृश्य होतील. |
5:34 | वर्तुळाची स्थिती देखील बदलली आहे |
5:38 | हे घडते कारण सर्व objects बिंदू A वर अवलंबून असतात. |
5:44 | असाईनमेंट म्हणून,
circle इनपुट बॉक्समध्ये (A,B) ते (B,A) आणि (A,A) बदला आणि काय होते ते पहा. आपले निरीक्षण समजावून सांगा. |
5:57 | बदल पूर्ववत करण्यासाठी Undo वर क्लिक करा |
6:01 | आता आपण बटण कसे तयार करायचे ते शिकू. |
6:04 | बटण टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
6:10 | बटण डायलॉग बॉक्स उघडेल. |
6:13 | Caption म्हणून व्हॅल्यू टाइप करा. |
6:16 | GeoGebra स्क्रिप्ट बॉक्स मध्ये खालील स्क्रिप्ट टाइप करा. |
6:20 | आता मी स्क्रिप्ट समजावून सांगते. |
6:23 | ही ओळ A च्या निर्देशांकांची स्थिती A -1 मध्ये बदलेल.याचा अर्थ असा की A चे x निर्देशांक x -1 होईल आणि A चे y निर्देशांक y-1 होईल. |
6:37 | त्याचप्रमाणे ही ओळ B च्या निर्देशांकांची स्थिती B + 2 मध्ये बदलेल. |
6:43 | ही ओळ रेषाखंड j चा निळा रंग सेट करेल. |
6:47 | ही ओळ रेषाखंड h चा हिरवा रंग सेट करेल. |
6:51 | ही ओळ रेषाखंड i चा लाल रंग सेट करेल. |
6:55 | तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. |
6:58 | व्हॅल्यू बटण ग्राफिक्स व्ह्यू मध्ये दिसते. |
7:02 | मूव्ह टूल निवडा आणि व्हॅल्यू बटणावर क्लिक करा. |
7:08 | ग्राफिक्स व्ह्यू मधील बदल पहा. |
7:11 | लक्षात घ्या की बिंदू A आणि बिंदू B चे निर्देशांक बदलले आहेत. |
7:16 | त्यानुसार रेषाखंडाचे रंग बदलले आहेत. |
7:20 | झूम आउट टूल वर क्लिक करा आणि झूम कमी करण्यासाठी ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा. |
7:26 | मी पुन्हा व्हॅल्यू बटणावर क्लिक करेन. बिंदू ए आणि B च्या निर्देशांकातील बदल पहा. |
7:35 | असाईनमेंट म्हणून,
एक नवीन बटण तयार करा. A आणि B बिंदूंचा रंग आणि स्थिती बदलण्यासाठी जिओजेब्रा स्क्रिप्ट लिहा. |
7:46 | आता आपण action tools एकत्र करू आणि काय होते ते पाहू. |
7:51 | मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडली आहे. |
7:55 | स्लाइडर टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा |
8:01 | स्लाइडर डायलॉग बॉक्स उघडेल. |
8:04 | आधिपासूनच, नंबर रेडिओ बटण a Name ने निवडलेले आहे.
आपण जसे आहे तसे सोडून देऊ. |
8:13 | आपण Min चे मूल्य 1, Max चे 10 आणि Increment चे 1 सेट करू. |
8:21 | तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. ग्राफिक व्यू मध्ये a नंबर स्लाइडर दिसेल. |
8:28 | आता रेग्युलर पॉलीगॉन टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू मध्ये दोन बिंदू क्लिक करा. |
8:36 | "Regular Polygon Text बॉक्स उघडेल. Vertices Text बॉक्समध्ये, टाइप करा a आणि बॉक्समधील
ओके बटणावर क्लिक करा." |
8:46 | अल्जीब्रा व्यू मध्ये पहा, Polygon अंतर्गत आपल्याकडे poly1 undefined आहे. |
8:52 | स्लाइडर ड्रॅग केल्यावर लक्षात घ्या की वेगवेगळ्या बाजूंनी बहुभुज दिसतात. |
9:05 | आता आपण इनपुट बॉक्स समाविष्ट करू. |
9:08 | इनपुट बॉक्स टूल वर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
9:15 | इनपुट dailog बॉक्स उघडेल. |
9:18 | बॉक्स मध्ये Caption म्हणून Number of sides टाइप करा. |
9:22 | लिंक्ड ऑब्जेक्ट ड्रॉप-डाउनमध्ये a = 1 निवडा. टेक्स्ट बॉक्स मधील ओके बटणावर क्लिक करा. |
9:30 | ग्राफिक्स व्यू मध्ये Number of sides input box दिसेल. |
9:35 | अल्जीब्रा व्यू मध्ये , स्लाइडर लपविण्यासाठी number स्लाइडर a = 1 अनचेक करा. |
9:41 | Number of sides input box मध्ये, टाइप करा 4 आणि एंटर दाबा. आपल्याला एक चौरस दिसेल. |
9:50 | त्याचप्रमाणे, आपण 3 ते 10 दरम्यान कोणतीही संख्या टाइप करू शकता आणि संबंधित बहुभुज पाहू शकता. |
9:57 | असाईनमेंट म्हणून,
स्लाइडर आणि इनपुट बॉक्स दर्शविण्यासाठी आणि लपविण्यासाठी एक चेक बॉक्स तयार करा. |
10:04 | चला थोडक्यात पाहू.
या ट्यूटोरियल मध्ये आपण free आणि dependent objects बद्दल शिकलो आहोत. |
10:12 | तसेच आपण शिकलो,
चेक बॉक्स तयार करणे insert बटण तयार करणे इनपुट बॉक्स समाविष्ट करणे |
10:22 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा. |
10:30 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी,कृपया आम्हाला लिहा." |
10:38 | कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा. |
10:42 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे." |
10:54 | मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद.
|