GeoGebra-5.04/C3/Create-and-manage-Tools/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:47, 29 January 2020 by Radhika (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
0:01 Create and Manage Tools वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.

या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत, टूलबार Customize करणे एक नवीन टूल तयार करणे तयार केलेले टूल व्यवस्थापित करणे आणि

0:06 एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडणे आणि तयार केलेले टूल तपासणे

हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे. उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04

0:21 जिओजेब्रा आवृत्ती 5.0.438.0-डी

या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी.

0:34 संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्या.
0:46 मी माझ्या मशीनवर GeoGebra इंटरफेस आधीच उघडला आहे.
0:51 या ट्यूटोरियल साठी मी axes un-check करेन
0:56 आपण टूलबार Customize करण्यास सुरवात करू.
0:59 टूल्स मेनूवर क्लिक करा आणि Customize Toolbar पर्याय निवडा. Customize Toolbar विंडो उघडेल.
1:08 views निवडण्यासाठी विंडोमध्ये एक ड्रॉप-डाउन आहे. आधिपासूनच, General view निवडले आहे.
1:16 टूलबार बॉक्समध्ये संबंधित टूल्स दर्शविण्यासाठी प्रत्येक टूल्सच्या पुढे मेनू बटण आहे.
1:22 टूलबार बॉक्सच्या खाली आपल्याकडे अप आणि डाऊन एरो बटणे आहेत.
1:27 मी लाइन टूल निवडेन
1:30 ही बटणे सूचीमधील निवडलेले टूल्स वर आणि खाली हलविण्यासाठी वापरले जातात.
1:37 खाली डावीकडे, Default Toolbar  Restore करण्यासाठी आपल्याकडे Restore Default Toolbar बटण आहे.
1:43 रीस्टोर डीफॉल्ट टूलबार बटणावर क्लिक करा.
1:46 पुढे आपल्याकडे टूल्स बॉक्स आहे. This is used to separate the tools from the Toolbar' box.
1:53 टूलबार बॉक्समध्ये, संबंधित tools दर्शविण्यासाठी मूव्हच्या पुढील मेनू बटणावर क्लिक करा.
1:59 मूव्ह टूल वर क्लिक करा आणि नंतर Remove  बटणावर क्लिक करा.
2:04 लक्ष द्या की मूव्ह टूल टूल बॉक्स मध्ये हलवले आहे.
2:08 मूव्ह मेनू बंद करण्यासाठी मेनू बटणावर क्लिक करा.
2:11 संबंधित tools दर्शविण्यासाठी पुढील Perpendicular Line  असलेल्या मेनू बटणावर क्लिक करा.
2:17 आता टॅन्जेन्ट्स टूलवर क्लिक करा आणि नंतर 'रिमूव्ह' या बटणावर क्लिक करा.
2:23 लक्ष द्या टॅन्जेन्ट्स टूल देखील टूल बॉक्स मध्ये हलवले आहे.
2:28 Perpendicular Line मेनू बंद करण्यासाठी मेनू बटणावर क्लिक करा.
2:34 चला ही tools त्यांच्या संबंधित tools पासून विभक्त करूया.
2:38 "टूल्स बॉक्समधील मूव्ह टूल निवडा आणि Insert  बटणावर क्लिक करा.

मूव्ह टूल स्वतंत्र टूल म्हणून समाविष्ट केले आहे."

2:48 पुढे टॅन्जेन्ट्स टूल निवडा आणि insert बटणावर क्लिक करा.
2:54 टॅन्जेन्ट्स टूल स्वतंत्र टूल म्हणून समाविष्ट केले आहे.
2:58 बदल लागू करण्यासाठी आता अप्लाय बटणावर क्लिक करा.विंडो बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा.
3:06 लक्ष द्या, मूव्ह टूल आणि टॅन्जेन्ट्स टूल टूलबारवर स्वतंत्रपणे दर्शविलेले आहेत.
3:13 आता आपण नवीन टूल तयार करण्यास शिकू.
3:16 आपण वर्तुळात स्पर्शिका रेखाटून प्रारंभ करू.
3:20 Circle with Center and Radius  टूल वर क्लिक करा. ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा.
3:27 Circle with Center and Radius  टेक्स्ट बॉक्स उघडेल.
3:31 रेडियस फील्डमध्ये, टाइप करा 3 आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.मध्यभागी A आणि त्रिज्यासह 3 सेमी असलेले एक वर्तुळ रेखाटले आहे."
3:42 वर्तुळाचे समीकरण पाहण्यासाठी Algebra view ची सीमा ड्रॅग करा.
3:47 Algebra view स्पष्टपणे पाहण्यासाठी सीमा ड्रॅग करा.
3:51 आता पॉईंट टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू वर बाह्य बिंदू B चिन्हांकित करू.
3:58 टॅन्जेन्ट्स टूल वर क्लिक करा. नंतर बिंदू B वर क्लिक करा आणि नंतर वर्तुळ c वर क्लिक करा.
4:07 बिंदू B पासून वर्तुळ c ला दोन स्पर्शिका रेखाटल्या जातात.
4:12 टूल्स मेनूवर क्लिक करा आणि Create New Tool पर्याय निवडा.
4:18 Create New Tool dialog बॉक्स उघडेल.
4:22 बॉक्समध्ये आपल्याकडे आउटपुट ऑब्जेक्ट्स, इनपुट ऑब्जेक्ट्स आणि नेम आणि आयकॉन टॅब आहेत.
4:29 आधिपासूनच आउटपुट ऑब्जेक्ट्स टॅब उघडलेला आहे.
4:33 आउटपुट ऑब्जेक्ट्स टॅबमध्ये ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी ड्रॉप-डाउन आहे.
4:38 ड्रॉप-डाऊन मधून निवडा

Circle c with center A and radius 3 Line f: Tangent to c through B. Line g: Tangent to c through B.

4:52 पुढील इनपुट ऑब्जेक्ट्स टॅबवर क्लिक करा. या टॅबमध्ये  Point A आणि  Point B आधीच निवडलेले आहेत.
5:00  Name & Icon टॅबवर क्लिक करा. या टॅबमध्ये आपण टूल नेम आणि टूल हेल्प टाईप करू शकतो.
5:07 Tool Name साठी मी Tangents to a circle टाइप करेन
5:11 लक्ष द्या, मी Tool name टाईप केल्यावर Command name आपोआप भरते.
5:17 टूल हेल्प बॉक्समध्ये मी क्लिक टू पॉईंट टाईप करेन.
5:22 लक्ष द्या,Show in Toolbar  चेक-बॉक्स आधीच चेक केलेले आहे.
5:27 शेवटी Finish वर क्लिक करा.
5:30 Geogebra Info message box New tool created successfully! मजकूरासह दिसते
5:37 हा message बॉक्स बंद करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा.
5:41 लक्ष द्या,नवीन tool  Tangents to a circle टूलबारवर टूल टिपसह दिसते
5:47 इंटरफेसमधील सर्व ऑब्जेक्ट्स डिलिट करू.
5:51 आता आपण तयार केलेले टूल वापरू.
5:55 "Tangents to circle tool वरती क्लिक करा आणि ग्राफिक्स view मध्ये दोन बिंदू क्लिक करा.

वर्तुळातील स्पर्शिका रेखाटल्या जातात."

6:05 आपण तयार केलेले टूल कसे व्यवस्थापित करायचे ते पाहू.
6:09 टूल्स मेनूवर क्लिक करा आणि manage tools पर्याय निवडा.
6:14 मॅनेज टूल्स डायलॉग बॉक्स उघडेल.
6:17 या डायलॉग बॉक्समध्ये Delete, Open, Save As आणि Share बटणे आहेत.
6:24 आपण Tangents to a circle टूल सेव्ह करू. Saves As या बटणावर क्लिक करा.
6:31 Save as dialog बॉक्स उघडेल.
6:34 फाईल नेम टेक्स्ट बॉक्समधे मी टॅन्जेन्टस हायफन सर्कल (टॅन्जेन्टस-सर्कल) टाईप करेन.
6:39 लक्षात घ्या की  Files of type मध्ये, जिओजेब्रा टूल्स (.ggt) आधीपासून निवडलेले आहे.
6:46 फाईल सेव्ह करण्यासाठी एक स्थान निवडा. मी डेस्कटॉप निवडेन.
6:52 त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा.
6:56 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा.
7:00 आता मी Geogebra विंडो बंद करेन. मी फाईल वर क्लिक करेन आणि क्लोज सिलेक्ट करेन.
7:08 क्लोज फाइल बॉक्स उघडेल.
7:11 ते विचारते Do you want to save your changes?
7:15 बॉक्समधे मी आधीच फाईल सेव्ह केल्याने Don't save बटन निवडेन.
7:22 आता आपण सेव्ह केलेली फाईल उघडणार आहोत.
7:25 मी हे माझ्या डेस्कटॉपवर Tagents-circle.ggt म्हणून सेव्ह केले होते
7:31 "आपण फाईल वर डबल क्लिक करून उघडू शकतो. किंवा राइट-क्लिक करा आणि

 Open With GeoGebra  पर्याय निवडा."

7:40 कृपया लक्षात ठेवा,आपण तयार केलेले नवीन tools केवळ या फाईलमध्ये उपलब्ध असतील.
7:46 "आपण डॅश होम वापरुन नवीन जिओजेब्रा विंडो उघडल्यास आपल्याला तयार

केलेले टूल दिसत नाहीत."

7:55 आपण ते स्वतः तपासू शकता. नवीन जिओजेब्रा विंडोमध्ये नवीन tools उपलब्ध नाहीत.
8:02 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
8:05 या पाठात शिकलो,

टूलबार Customize करणे एक नवीन टूल तयार करणे तयार केलेले टूल व्यवस्थापित करणे आणि एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडणे आणि तयार केलेले टूल तपासणे

8:21 असाईनमेंट म्हणून,

त्रिकोणाचा शिरोलंब काढण्यासाठी आणि मध्यगा चिन्हांकित करण्यासाठी एक नवीन tool तयार करा.

8:29 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखे दिसावी.
8:39 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करा आणि पहा.
8:47 "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा."

8:55 या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
8:59 "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे."

9:10 मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika