PhET/C3/Membrane-Channels/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:08, 14 December 2019 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Membrane Channels PhET सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.


00:08 या पाठात, Membrane Channels, या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.


00:16 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 जावा वर्जन 1.7.0

00:29 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.


00:35 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील जीवशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:43 Membrane Channels , सिम्युलेशन च्या सहाय्याने आपण शिकणार आहोत,

पटलातून होणाऱ्या कणांच्या हालचालींचा अंदाज लावणे,

00:52 पटलावर उपस्थित असलेल्या चॅनेल्सचे(मार्गिका) प्रकार बघू,
00:56 उपस्थित चॅनेलची संख्या आणि प्रकार यावर आधारित डिफ्युजन(विसरणाचा) दर सांगणे,
01:03 Membrane Channels विषयी माहिती

Membrane Channels ही प्रथिने आहेत.

01:10 ते पटलातून द्राव्य पदार्थाचे निष्क्रीय(passive) वहन होऊ देतात.
01:15 द्राव्य पदार्थ साध्या विसरणाने पटलातून पार होऊ शकतो.
01:20 द्राव्य पदार्थ जास्त सांद्रतेच्या(concentration) विभागातून कमी सांद्रतेच्या विभागाकडे जातो.
01:27 दोन्ही विभागांतील सांद्रता समान होईपर्यंत विसरण चालू राहते.
01:34 पटलामधे दोन प्रकारचे चॅनेल्स आढळतात.
01:39 लिकेज चॅनेल्स आणि गेटेड चॅनेल्स.

लिकेज चॅनेल्स नेहमीच उघडे असतात.

01:47 गेटेड चॅनेल्स काही उत्तेजकांना प्रतिसाद देताना उघडतात.
01:53 सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.


01:58 मी डाउनलोड्स फोल्डरमधे Membrane Channels सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे.


02:05 सिम्युलेशन कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल उघडा.

प्रॉम्प्टवर, cd space Downloads टाईप करून एंटर दाबा.

02:18 नंतर java space hyphen jar space membrane hyphen channels_en.jar टाईप करून एंटर दाबा.
02:32 Membrane Channels सिम्युलेशन उघडेल.
02:36 Membrane Channels सिम्युलेशनचा हा इंटरफेस आहे.


02:41 सिम्युलेशन विंडोमधे पटलाद्वारे वेगळे झालेले दोन भाग आहेत.
02:48 प्रत्येक भागात एक द्राव्य कणांचा पंप आहे.

प्रत्येक पंपात दोन भिन्न प्रकारचे द्राव्य कण आहेत.

02:58 कण हिरव्या वर्तुळाने आणि निळ्या हिऱ्याच्या आकाराने दाखवले आहेत.
03:04 डिफॉल्ट रूपात वरील भागात हिरवे वर्तुळ निवडलेले आहे.

आणि खालील भागात निळा हिऱ्यासारखा आकार निवडलेला आहे.

03:15 कणाच्या शेजारी असलेल्या रेडिओ बटणावर क्लिक करून पार्टिकल निवडू.
03:21 खालील भागात एकच कण सोडण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा.
03:27 दोन भिन्न प्रकारचे चॅनेल्स खाली दिले आहेत.
03:32 लिकेज आणि गेटेड चॅनेल्स.

पटलावर चॅनेल्स समाविष्ट करण्यासाठी ते ड्रॅग करून ड्रॉप करा.

03:43 उजव्या पॅनेलवरील बटणांच्या सहाय्याने गेटेड चॅनेल्स उघड बंद करता येतात.
03:50 सिम्युलेशन सुरू किंवा पॉझ करण्यासाठी Play/Pause button वापरा.
03:56 Play/Pause बटण प्ले मोडमधे असताना Step बटण सक्रिय होते.

Sim speed स्लाइडरने वेग Slow पासून Fast करता येतो.

04:08 कणांची सांद्रता दाखवण्यासाठी उजवीकडील पॅनेलमधे एक चेकबॉक्स आहे.

Show Concentrations च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.

04:19 प्रत्येक भागासाठी सांद्रता दर्शविणारे बार आलेख स्क्रीनवर दिसतील.
04:26 खालील भागातील कण काढून टाकण्यासाठी Clear Particles वर क्लिक करा.
04:33 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी, Reset All बटणावर क्लिक करा.
04:38 सर्व सेटिंग्ज रिसेट करण्याची पुष्टी देण्यासाठी एक मेसेज दाखवला जाईल.
04:44 Yes बटणावर क्लिक करा.
04:47 सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Play वर क्लिक करा.
04:51 खालील भागात निळ्या रंगाचा कण निवडा.
04:56 खालील भागात निळे कण समाविष्ट करण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा.
05:01 खालील भागात 10 निळे कण समाविष्ट करण्यासाठी 10 वेळा लाल बटणावर क्लिक करा.
05:11 पटलावर 2 निळे लिकेज चॅनेल्स समाविष्ट करा.

निळे कण चॅनेलमधून वरील भागात जात आहेत.

05:22 काही सेकंद थांबा.

वरील भागातील निळ्या कणांच्या संख्येची नोंद करा.

05:30 चॅनेल्सच्या मधून कण दोन्ही दिशांना आत बाहेर करत आहेत.

कणांचे विसरण चालू आहे.

05:39 काही वेळानंतर दोन्ही भागांमधील कण जवळजवळ समान होतील.

सिम्युलेशन काही काळ थांबवण्यासाठी Pause बटणावर क्लिक करा.

05:49 Show Concentrations च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
05:53 प्रत्येक भागातील कणांची सांद्रता बार आलेखाने दाखवली आहे.
06:00 सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Play बटणावर क्लिक करा.
06:04 पटलावर एक हिरव्या रंगाचा लिकेज चॅनेल ठेवा.
06:09 हिरव्या चॅनेलमधून निळे कण दुसऱ्या बाजूला जात नाहीत हे लक्षात घ्या.
06:15 आता खालील भागात 10 हिरवे कण समाविष्ट करा.
06:20 हिरव्या कणाच्या शेजारील रेडिओ बटणावर क्लिक करा.
06:25 10 हिरवे कण समाविष्ट करण्यासाठी 10 वेळा लाल बटणावर क्लिक करा.
06:32 कणांच्या हालचालींचे निरीक्षण करा.

हिरवे कण निळ्या चॅनेल्समधून दुसऱ्या भागात जात नाहीत हे लक्षात घ्या.

06:42 ते केवळ हिरव्या चॅनेलमधून दुसऱ्या बाजूला जातील.

हे चॅनेल्स निवडक द्राव्यासाठी असल्याचे दर्शवते.

06:50 ते केवळ विशिष्ट कणाला चॅनेलमधून जाण्याची अनुमती देतात.
06:55 काही वेळाने सांद्रतेचा समतोल साधला जाईल.

सिम्युलेशन थांबवण्यासाठी Pause वर क्लिक करा.

07:03 लक्षात घ्या की या टप्प्यावर दोन्ही भागातील कणांची सांद्रता जवळजवळ सारखीच आहे.
07:11 Play बटणावर क्लिक करा.

समतोल राखण्यासाठी कण दोन्ही दिशांना फिरत राहतील.

07:20 Reset All बटणावर क्लिक करा.

सर्व सेटिंग्ज रिसेट करण्याची पुष्टी देण्यासाठी Yes वर क्लिक करा.

07:27 20 हिरवे कण वरील भागात समाविष्ट करण्यासाठी 20 वेळा लाल बटणावर क्लिक करा.
07:37 खालील भागात निळ्या कणांसाठीच्या रेडिओ बटणावर क्लिक करा.
07:42 खालील भागात 20 निळे कण समाविष्ट करा.
07:50 पटलावर प्रत्येकी एक निळा आणि हिरवा गेटेड चॅनेल ठेवा.
07:57 उजवीकडील पॅनेलवरील निळ्या Open बटणावर क्लिक करा.
08:01 पटलावरील निळा चॅनेल उघडेल.
08:05 निळे कण गेटेड चॅनेलमधून दोन्ही दिशांना ये जा करताना दिसतील.
08:10 Show Concentrations च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.

समतोल साधेपर्यंत प्रतीक्षा करा.

08:19 हिरवे कण निळ्या गेटेड चॅनेलमधून दुसऱ्या भागात जात नाहीत त्यामुळे ते वरच्या भागात तसेच राहिले आहेत.
08:28 खालील भागात एकही हिरवा कण नाही याकडे लक्ष द्या.
08:34 आता उजव्या पॅनेलवरील हिरव्या Open बटणावर क्लिक करा.

पटलावर ग्रीन चॅनेल उघडेल.

08:43 हिरवे कण हिरव्या गेटेड चॅनेलमधून खालील भागात जातील.
08:49 काही मिनिटात समतोल साधला जाईल.
08:55 पुढे हिरवा गेटेड चॅनेल बंद करण्यासाठी हिरव्या Close बटणावर क्लिक करा.
09:01 कणांच्या हालचालींचे निरीक्षण करा. लक्षात घ्या आता दोन्ही भागांमधून केवळ निळे कण आत बाहेर करत आहेत.
09:11 हिरवे कण दुसऱ्या भागात जाणार नाहीत कारण ते निळ्या चॅनेलमधून दुसऱ्या भागात जाऊ शकत नाहीत.
09:18 अशाप्रकारे द्राव्य पदार्थ किंवा आयनांचे पेशींच्या पटलांमधून विसरण होते
09:29 थोडक्यात या पाठात शिकलो,

Membrane Channels हे PhET सिम्युलेशन कसे वापरायचे,

09:38 तसेच पटलाच्या माध्यमातून कणांच्या हालचालींचा अंदाज बांधणे
09:44 पटलावर उपस्थित असलेल्या चॅनेल्सचे प्रकार बघणे
09:48 उपस्थित चॅनेलची संख्या आणि प्रकार यावर आधारित विसरणाचा दर सांगणे.


09:55 असाईनमेंट म्हणून -

वरील आणि खालील भागात निळ्या आणि हिरव्या रंगाचे समान कण भरा.

10:05 पटलावर दोन्ही रंगाचे गेटेड चॅनेल्स समाविष्ट करा.
10:10 विसरणाचा दर चॅनेल्सची संख्या वाढवल्यावर वाढतो का ते बघा.

निष्कर्षाचे स्पष्टीकरण द्या.

10:20 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:29 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

10:43 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
10:48 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


10:56 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

11:09 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali