PhET/C2/pH-Scale/Marathi
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या pH scale या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशनवरील पाठात आपले स्वागत.
|
00:08 | या पाठात आपण, pH scale हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरायला शिकणार आहोत.
|
00:15 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे.
|
00:22 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.7, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे. |
00:38 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:
1. दिलेले द्रावण आम्ल आहे की अल्कली हे ठरवणे. |
00:49 | 2. आम्ल आणि अल्कली यांचा त्यांच्या तीव्रतेनुसार क्रम लावणे.
3. दिलेल्या pH वरून हायड्रॉक्साईड आयन, हायड्रोनियम आयन आणि पाणी यांची तीव्रता ठरवणे. |
01:01 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:
4. द्रावणाचा pH म्हणजे काय? 5. विरलीकरणाचा द्रावणाच्या pH वर होणारा परिणाम 6.Logarithmic आणि Linear scale. |
01:16 | pH स्केल हे जलीय द्रावणाची आम्लता किंवा आम्लारिधर्मिता(basicity) दाखवण्यासाठी वापरले जाणारे एक न्युमरिक स्केल आहे.
|
01:25 | pH म्हणजे हायड्रोजन आयनांची mol/L मधे मोजलेली तीव्रता(concentration). |
pH म्हणजे हायड्रोजन आयनांच्या तीव्रतेचा 10 पाया असलेल्या ऋण लॉगॅरिथम होय.
pH = - log[H] | |
01:37 | आम्लयुक्त द्रावणासाठी, pH व्हॅल्यू 7 पेक्षा कमी (< 7) असते. |
01:42 | अल्कलीयुक्त द्रावणासाठी, pH व्हॅल्यू 7 पेक्षा अधिक (> 7) असते. |
01:47 | उदासीन द्रावणासाठी, pH व्हॅल्यू 7 (= 7) असते. |
01:52 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू. |
01:57 | मी Downloads फोल्डरमधे pH Scale हे PhET सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे. |
02:02 | सिम्युलेशन उघडण्यासाठी ph-scale या html फाईलवर राईट क्लिक करा. |
02:08 | Open With Firefox Web Browser पर्याय निवडा. फाईल ब्राऊजरमधे उघडेल. |
02:16 | हा pH scale सिम्युलेशनचा इंटरफेस आहे. |
02:20 | या इंटरफेसवर 3 स्क्रीन्स आहेत-
Macro Micro My solution |
02:27 | Macro स्क्रीन वापरून सिम्युलेशन सुरू करू. त्यासाठी Macro स्क्रीनवर क्लिक करा. |
02:36 | या स्क्रीनवर डाव्या बाजूला 0 ते 14 पर्यंत
pH श्रेणी दर्शवणारे pH scale आहे. |
02:44 | pH मोजण्यासाठी स्केलला हिरव्या रंगाचा probe जोडला आहे. द्रवांचे pH दर्शवणारा एक pH meter आहे. |
02:54 | पाणी घालण्यासाठी स्क्रीनच्या उजव्या बाजूला पाण्याचा पंप आहे. |
02:59 | पाण्याच्या अंशांकित भांड्यात डीफॉल्ट रूपात चिकनचे सूप भरलेले आहे. |
03:05 | द्रव काढून टाकण्यासाठी भांड्याच्या डावीकडे खाली एक पंप जोडलेला आहे. |
03:11 | द्रव घालण्यासाठी एक ड्रॉपर आहे. |
03:14 | द्रवांपैकी एक द्रव निवडण्यासाठी एक ड्रॉपडाऊन बॉक्स आहे. डीफॉल्ट रूपात चिकन सूप निवडलेले आहे. |
03:22 | उजवीकडील कोपऱ्यात खाली Reset चे बटण दिले आहे. |
03:28 | ड्रॉपडाऊनच्या बाणावर क्लिक करा. |
03:31 | स्क्रॉल करून Battery Acid या पर्यायावर क्लिक करा. भांडे Battery Acid ने 0.50 L (0.5 लिटर्स) पर्यंत भरलेले दिसेल. |
03:42 | हिरव्या रंगाचा probe भांड्यामधे ड्रॅग करा आणि pH बघा. |
03:48 | मीटर pH ची व्हॅल्यू 1.0. दाखवत आहे. pH 7 पेक्षा कमी असल्यामुळे (<7), Battery Acid हे आम्लयुक्त द्रावण आहे. |
03:58 | अजून पाणी घालण्यासाठी पाण्याच्या पंपावर क्लिक करा. |
04:03 | पाण्याने द्रवाची पातळी 1 लिटरपर्यंत वाढवा. पाणी घातल्यावर pH मधे होणारा बदल बघा.
आता pH मीटर pH ची व्हॅल्यू 1.30 दाखवत आहे. |
04:16 | लक्षात घ्या पाणी वाढवल्याने Battery Acid चा pH वाढतो.
कारण विरलीकरणामुळे हायड्रोजन[H] आयनांची तीव्रता कमी होते. |
04:28 | आता दुसरे द्रावण निवडूया. |
04:32 | ड्रॉपडाऊनच्या बाणावर क्लिक करा. |
04:34 | स्क्रॉल करून Hand Soap या पर्यायावर क्लिक करा. भांडे Hand Soap या द्रावणाने भरेल. |
04:42 | येथे, pH मीटर pH ची व्हॅल्यू 10.00 दाखवत आहे. Hand Soap हा नैसर्गिक रूपात आम्लारी (basic) आहे. |
04:54 | Hand Soap च्या द्रावणात पाणी घालण्यासाठी पाण्याच्या पंपावर क्लिक करा. |
04:59 | 1 L, Hand Soap द्रावणासाठी pH ची व्हॅल्यू 9.70 दाखवत आहे. |
05:06 | Hand Soap द्रावणाची pH व्हॅल्यू विरलीकरणानंतर कमी झालेली दिसेल. |
05:12 | कारण विरलीकरणामुळे हायड्रॉक्साईड (OH) आयनांची तीव्रता कमी होते. |
05:18 | अर्धा लिटर Hand Soap चे द्रावण काढून टाकण्यासाठी खालील भागातील पंपावर क्लिक करा. |
05:24 | ड्रॉपरवर क्लिक करा आणि Hand Soap द्रावणाची पातळी 0.6 L पर्यंत वाढवा. pH मधील बदल बघा. |
05:34 | हायड्रॉक्साईड (OH) आयनांची तीव्रता वाढल्याने pH वाढला आहे. |
05:39 | आता आपण आम्ल आणि अल्कली त्यांच्या तीव्रतेनुसार क्रमाने लावूया. |
05:45 | त्यासाठी विविध द्रवांची pH व्हॅल्यू तपासणार आहोत. |
05:50 | ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Blood हा पर्याय निवडा. भांडे 0.50 L पर्यंत रक्ताने भरले जाईल. |
05:59 | मीटरवर 7.40 ही pH व्हॅल्यू दिसेल. pH व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त ( >7) असल्यामुळे रक्त हे अल्कलीयुक्त द्रावण आहे. |
06:09 | पुन्हा ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Orange Juice हा पर्याय निवडा. |
06:14 | 0.50 L ज्यूससाठी मीटर 3.50 ही pH व्हॅल्यू दाखवत आहे. संत्र्यांचा रस आम्लयुक्त द्रावण असल्याचे हे स्पष्ट करत आहे. |
06:26 | वरील pH व्हॅल्यूजनुसार क्रम खालीलप्रमाणे आहे.
Hand soap > Blood > Orange Juice > Battery Acid. |
06:38 | असाईनमेंट म्हणून,
प्रत्येक द्रवाचा pH तपासा आणि pH श्रेणीनुसार क्रम लावा. |
06:48 | आता Micro स्क्रीनवर जाऊ. इंटरफेसच्या खालच्या भागातील Micro स्क्रीनवर क्लिक करा. |
06:57 | या स्क्रीनवर असलेली टूल्स अशाप्रकारे आहेत-
स्क्रीनच्या डावीकडे pH scale आहे, |
07:04 | pH स्केलच्या वरील भागात Concentration आणि Quantity यामधील पर्याय निवडण्यासाठी एक स्वीच आहे,
pH स्केल बंद करण्यासाठी वजाचे चिन्ह असलेले एक लाल बटण आहे. |
07:16 | खालील भागात Logarithmic किंवा Linear scale निवडण्यासाठी एक स्वीच आहे. |
07:22 | हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साईड आयन यांचे गुणोत्तर म्हणजेच (H3O+ / OH-) व Molecule count निवडण्यासाठी चेकबॉक्स आहेत. |
07:30 | pH meter मधे pH reader आणि व्हॅल्यू बंद करण्यासाठी वजाचे चिन्ह असलेले लाल बटण आहे. |
07:38 | ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Soda Pop हा पर्याय निवडा.
भांडे Soda Pop ने भरेल. |
07:46 | pH मीटर pH ची व्हॅल्यू 2.50 दाखवत आहे. म्हणजेच Soda Pop हे आम्लयुक्त द्रावण आहे. |
07:54 | Soda Pop आम्लयुक्त असल्यामुळे हायड्रोनियम आयनची तीव्रता जास्त तर हायड्रॉक्साईडची तीव्रता कमी आहे |
08:02 | त्यानंतर Quantity(mol) वर क्लिक करा. |
08:05 | हायड्रोनियम आयन, हायड्रॉक्साईड आयन आणि पाण्याच्या moles ची संख्या दिसेल. |
08:12 | आता Logarithmic स्केल बदलून Linear निवडूया. त्यासाठी Linear पर्यायावर क्लिक करा . |
08:20 | pH स्केल Linear मोडमधे बदलेल. pH व्हॅल्यूजदेखील Linear झालेल्या दिसतील. |
08:28 | परंतु pH लॉगॅरिथमिक स्केलमधे असल्यामुळे आपण Linear वापरणार नाही. |
08:34 | हायड्रोनियम आयन टु हायड्रॉक्साईड आयन रेशो (H3O+ / OH-) या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
08:39 | भांड्यात मोठ्या संख्येने लाल ठिपके दिसतील. हे हायड्रोनियम आयन्स आहेत. |
08:46 | हायड्रॉक्साईड आयन्स (OH-) चे काही निळे ठिपके दिसतील. |
08:51 | सोडा पॉपमधील रेणूंची संख्या बघण्यासाठी Molecule count च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
08:57 | सोडा पॉप स्क्रीनवर हायड्रोनियम आयन्स, हायड्रॉक्साईड आयन्स आणि पाण्याच्या रेणूंची संख्या दिसते. |
09:05 | विरलीकरणाचा रेणूंच्या संख्येवर होणारा परिणाम पाहू. |
09:10 | पाण्याच्या पंपावर क्लिक करून भांडे 1 L पर्यंत भरा. रेणूंच्या संख्येत होणारा बदल पहा.
pH व्हॅल्यू वाढलेली दिसेल. ती 2.80 झाली आहे. |
09:25 | असाईनमेंट म्हणून: रक्ताच्या नमुन्याचा pH मोजा. |
09:30 | विरलीकरणानंतर Molecule Count आणि H3O+ / OH- रेशो यामधील बदल बघा. |
09:37 | आता My Solution स्क्रीनवर जाऊ. इंटरफेसच्या खालील भागात असलेल्या My Solution स्क्रीनवर क्लिक करा. |
09:46 | My Solution स्क्रीनमधे Macro आणि Micro स्क्रीन्स सारखीच टूल्स उपलब्ध आहेत. |
09:53 | या स्क्रीनवर काही अतिरिक्त टूल्सदेखील आहेत. जसे की- |
09:57 | स्क्रीनच्या उजवीकडे अंशांकित केलेले भांडे, pH हवा तसा बदलण्यासाठी pH meter. |
10:05 | या स्क्रीनवर pH किंवा आयन्सच्या तीव्रता हाताळता येतात. |
10:11 | या स्क्रीनवर दोन पध्दतीने आपण आपल्या पसंतीचे द्रावण बनवू शकतो-
1. pH स्केलवर H3O+ किंवा OH- स्लाईडर हलवून, 2. काळ्या रंगाचे वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला असणारे बाण क्लिक करून. |
10:28 | आता हायड्रोनियम आयन H3O+ चा स्लाईडर वरच्या दिशेला सरकवा. |
10:32 | लक्षात घ्या त्यावेळी हायड्रॉक्साईड आयन OH- स्लाईडर खालच्या बाजूला सरकेल. |
10:38 | खालच्या दिशेच्या काळ्या बाणावर क्लिक करून pH व्हॅल्यू 4.0 असलेले द्रावण बनवूया. हे आम्लयुक्त द्रावण आहे. |
10:48 | आता हायड्रोनियम आयन टु हायड्रॉक्साईड आयन H3O+ / OH- रेशो आणि Molecule count या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
10:55 | हायड्रोनियम आयनच्या H3O+ रेणूंची संख्या 3.01 x 1019 आहे. |
11:01 | असाईनमेंट म्हणून:
7.0 आणि 9.0 ह्या pH व्हॅल्यूज असलेली द्रावणे बनवा. रेणूंमधील बदलांचे निरीक्षण आणि तुलना करा. |
11:13 | थोडक्यात,
या पाठात आपण pH स्केल या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशनबद्दल शिकलो. |
11:22 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकलो-
1.दिलेले द्रावण आम्ल आहे की अल्कली हे ठरवणे. |
11:31 | 2. आम्ल आणि अल्कली यांचा त्यांच्या तीव्रतेनुसार क्रम लावणे. |
11:36 | 3. दिलेल्या pH वरून हायड्रॉक्साईड आयन, हायड्रोनियम आयन आणि पाणी यांची तीव्रता ठरवणे.
|
11:43 | 4. द्रावणाचा pH म्हणजे काय?
5. विरलीकरणाचा द्रावणाच्या pH वर होणारा परिणाम 6. Logarithmic आणि Linear scale. |
11:53 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
12:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
12:15 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
|
12:21 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे. |
12:29 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
12:41 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |