Time
|
Marathi Narration
|
0:01
|
गर्भधारणापूर्व पोषण विषयी स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
|
0:05
|
या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रजनन वयाच्या दरम्यान आणि गर्भधारणेच्या पूर्व काळातील पौष्टिक आहाराच्या गरजांबद्दल शिकू.
|
0:14
|
प्रथम आपण प्रोटीनपासून सुरुवात करूया.
|
0:17
|
स्नायूंच्या ऊतींच्या वाढीसाठी आणि देखभाल करण्यासाठी Protein आवश्यक असते.
|
0:22
|
हे पेशींच्या दुरुस्ती आणि हाडांच्या विकासामध्ये तसेच सांध्यासाठी मदत करते.
|
0:27
|
हे रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यात आणि निरोगी यकृत राखण्यास मदत करते आणि ऊर्जा देखील देते.
|
0:34
|
Protein अशी रसायने बनवतात जी पचनक्रिया, शरीरातील विषारी पदार्थांचे विभाजन करण्यास मदत करते
|
0:41
|
रक्तातील साखरेची देखभाल करणे आणि मेंदूकडे संदेश घेऊन जाणे आणि परत आणण्याचे काम करते
|
0:47
|
Protein च्या कमतरते मुळे - गर्भाची वाढ त्याच्या वयाच्या मानाने कमी होते ,
|
0:52
|
बाळामध्ये कमी उंची, स्मरणशक्ती आणि हालचाल कौशल्यांसह संक्रमणाचा उच्च धोका उद्भवतो.
|
1:00
|
प्रौढांमधे, त्वचेवरील सुरकुत्या, केस गळणे,
|
1:05
|
थकवा आणि अशक्तपणा,
|
1:08
|
असे संक्रमण वारंवार होणे आणि स्नायू नष्ट होणे यास कारण ठरते.
|
1:11
|
केराटिन नावाची आणखी एक protein केस, नखे आणि त्वचेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
|
1:18
|
विशेष म्हणजे, protein अमीनो acids नावाच्या वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेले असतात.
|
1:24
|
एकूण 22 अमीनो acids आहेत त्यापैकी 9 अमीनो acids आहारातून घ्यावे लागतील.
|
1:33
|
आता आपण प्रोटीनचे दोन प्रकार पाहूया - संपूर्ण प्रोटीन आणि अपूर्ण प्रोटीन.
|
1:41
|
पूर्वी नमूद केलेले सर्व 9 अमीनो acids प्राण्यांच्या प्रोटीनमध्ये आहेत.
|
1:46
|
म्हणूनच प्राण्यांच्या प्रोटीनला संपूर्ण प्रोटीन म्हणतात.
|
1:51
|
दुसरीकडे, वनस्पती आधारित प्रोटीनांमध्ये यापैकी आवश्यक 9 अमीनो acids कमी प्रमाणात असतात
|
2:00
|
उदाहरणार्थ, तृणधान्यामध्ये लायझिन कमी असतात तर डाळींमध्ये मेथिनिन कमी असतात.
|
2:07
|
म्हणून वेगवेगळ्या वनस्पती प्रोटीन एकत्रितपणे खाणे महत्वाचे आहे.
|
2:13
|
उदाहरणार्थ, धान्य आणि डाळींचे मिश्रण एकत्र केले पाहिजे कारण ते दोन्ही आवश्यक प्रमाणात अमीनो acids प्रदान करतात.
|
2:23
|
आता आपण आणखी एक महत्त्वपूर्ण पोषक घटक म्हणजे Fat बद्दल शिकू.
|
2:28
|
चांगल्या आरोग्यासाठी खाद्यपदार्थांमधून चांगले fats घेणे आवश्यक आहे.
|
2:32
|
ओमेगा-3 फॅटी acid सारखे काही fats शरीराद्वारे तयार केले जाऊ शकत नाहीत. म्हणून ते आहारातून घेतले पाहिजे.
|
2:40
|
या fats मुळे हृदयाचे आरोग्य टिकते,
|
2:42
|
शरीरात दाह कमी करण्यात आणि गर्भवती होण्याची शक्यता सुधारण्यात मदत करू शकते.
|
2:48
|
तसेच ते बाळाच्या अकाली जन्म होण्याचा धोका देखील कमी करतात आणि बाळामध्ये बुद्धिमत्ता वाढवतात.
|
2:56
|
protein आणि fat बद्दल जाणून घेतल्यानंतर आपण आता व्हिटॅमिन-एबद्दल शिकू.
|
3:01
|
व्हिटॅमिन-ए निरोगी डोळे राखण्यास मदत करते.हे पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवते,
|
3:07
|
गर्भधारणेची शक्यता वाढवते आणि गर्भधारणेपूर्वीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती सुधारते.
|
3:14
|
व्हिटॅमिन ए प्रमाणेच संपूर्ण व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये महिलांच्या सामर्थ्य आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
|
3:24
|
सर्व बी-व्हिटॅमिनपैकी आपण प्रथम व्हिटॅमिन बी-6 म्हणजे पायरीडॉक्सिन पाहू.
|
3:31
|
व्हिटॅमिन बी -पायरीडॉक्सिन मज्जासंस्थेच्या कामकाजासाठी आवश्यक आहे ज्यायोगे मेंदूचा विकास सुधारित होतो.
|
3:39
|
तसेच, यामुळे गरोदरपणाशी संबंधित मळमळ होण्यापासून आराम मिळतो.
|
3:44
|
अजून एक पौष्टिक घटक म्हणजे व्हिटॅमिन बी 12 जो फोलेट आणि कोलीनबरोबर Anemia आणि Neural tube defects टाळण्यास मदत करतो.
|
3:54
|
Neural tube defects हे जन्म दोष आहे जे बाळाच्या पाठीचा कणा आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतात जे गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात तयार होतात.
|
4:04
|
लक्षात घ्या की Neural tube गर्भाचा एक भाग आहे जो मेंदू आणि पाठीचा कणा यामध्ये विकसित होतो.
|
4:11
|
म्हणूनच, गर्भवती होण्यापूर्वी शरीरात पुरेसे फोलेट, व्हिटॅमिन-बी 12 आणि कोलीन असणे आवश्यक आहे.
|
4:20
|
व्हिटॅमिन बी -12 ची कमतरता देखील Anemia, वंध्यत्व आणि गर्भपात होण्यास कारण ठरते.
|
4:27
|
आता आपण फोलेट या दुसर्या महत्त्वपूर्ण पोषक घटका विषयी शिकू.
|
4:31
|
फोलेट हे व्हिटॅमिन-बी 9 म्हणून देखील ओळखले जाते, ते शरीराला नवीन निरोगी पेशी बनविण्यास मदत करते.
|
4:38
|
या पेशी फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागात ऑक्सिजन घेऊन जातात.
|
4:43
|
गर्भवती मातांमध्ये फोलेटच्या कमतरतेमुळे होणाऱ्या Anemia आणि मेंदू आणि मणक्याच्या दोषांना Neural Tube Defects म्हणतात.
|
4:52
|
लक्षात घ्या की याच ट्युटोरियलमध्ये यापूर्वी Neural Tube Defects स्पष्ट केले आहे.
|
4:58
|
आपण आता Iron च्या कार्याविषयी शिकू.रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आणि गर्भाच्या वाढीसाठी Iron आवश्यक आहे.
|
5:07
|
गरोदरपणात कमी प्रमाणातील हिमोग्लोबिनमुळे गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब,
|
5:13
|
मुदतीच्या आधी प्रसूती होणे,
|
5:15
|
कमी वजनाचे बाळ जन्माला येणे आणि गर्भपात होण्यास कारण ठरते.
|
5:18
|
या व्यतिरिक्त, हीमोग्लोबिन इतर ऊती आणि पेशींमध्ये ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते.
|
5:25
|
हिमोग्लोबिन किंवा ironच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो.
|
5:30
|
शिवाय, मासिक पाळीमुळे, जंतांच्या प्रादुर्भावामुळे - स्त्रियांमध्ये Iron कमी असू शकते.
|
5:36
|
जंतांच्या प्रादुर्भावामुळे - स्त्रियांमध्ये Iron कमी असू शकते.
|
5:38
|
Iron आहारात कमी असणे आणि कमी शोषण हे आहारातील फायटिक acid आणि ऑक्सॅलेट्समुळे होते
|
5:45
|
फायटिक acid आणि ऑक्सॅलेट्स कमी करण्यासाठी आणि पोषक तत्वांचे शोषण वाढविण्यासाठी -
|
5:52
|
स्वयंपाक करण्यापूर्वीच्या पद्धती वापरा - जसे भिजवणे, मोड आणणे, भाजणे आणि आंबवणे.
|
6:00
|
Ironच्या कमतरतेमुळे येणाऱ्या Anemia ची पुढील लक्षणे आहेत- थकवा आणि ऊर्जेची कमतरता
|
6:06
|
दम लागणे,हृदयाची गती वाढणे
|
6:10
|
आणि त्वचा निसतेज होणे.
|
6:11
|
लक्षात ठेवा, Iron बरोबर नेहमी व्हिटॅमिन-सी समृध्द पदार्थांचे सेवन करतात जे लोह शोषणात मदत करते.
|
6:19
|
व्हिटॅमिन-सी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि त्यामुळे संक्रमण कमी करते.
|
6:25
|
पुढे आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे महत्त्व जाणून घेऊ.
|
6:30
|
हाडांच्या विकासास मदत होते म्हणून कॅल्शियमचे सेवन करण्यास सूचविले जाते.
|
6:35
|
हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी गर्भास कॅल्शियमची आवश्यकता असते.
|
6:39
|
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात.
|
6:43
|
तथापि, हे लक्षात ठेवा- शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन-डी आवश्यक आहे.
|
6:50
|
सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 दरम्यान 15 ते 20 मिनिटांकरिता सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे हा व्हिटॅमिन-डी मिळण्याचा उत्तम मार्ग आहे.
|
6:59
|
पुढे आपण कोलीन बद्दल शिकू.
|
7:02
|
बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी कोलीन महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष वाढवते.
|
7:09
|
कोलीनच्या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये यकृतामध्ये अनावश्यक चरबी वाढू शकते ,
|
7:13
|
हे गर्भपात आणि गर्भातील Neural tube defects या ट्यूटोरियल मध्ये पूर्वी उल्लेखलेले आहे.
|
7:20
|
चला पुढे जाऊया आणि झिंकचे महत्त्व जाणून घेऊ.
|
7:24
|
झिंक हे रोग प्रतिकारशक्ती आणि पेशींच्या वाढीसाठी जास्त महत्वाचे आहे. हे शरीरात अनुवांशिकता आणि protein तयार करण्यास मदत करते.
|
7:31
|
हे जखमा बरे करण्यास मदत करते. तसेच हे स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन आणि प्रजननक्षमतेमध्ये योगदान देते.
|
7:37
|
आणि गर्भाच्या वाढीसाठी हे महत्वाचे आहे.
|
7:40
|
लक्षात घ्या की आहारातील झिंकचा अभाव - चव आणि वासाच्या जाणीवेवर परिणाम करू शकतो,
|
7:46
|
तसेच नाळेच्या वाढीस उशीर करतो जे आईपासून गर्भापर्यंत पोषकद्रव्ये वाहून नेणारी दोरखंड आहे.
|
7:53
|
झिंकचा अभाव देखील गर्भाच्या वाढीवर परिणाम करते आणि परिणामी कमी वजनाचे बाळ होते.
|
8:00
|
आयोडीन हे आणखी एक महत्त्वपूर्ण पौष्टिक तत्व आपण पाहू.
|
8:05
|
थायरॉईड ग्रंथीद्वारे तयार होणार्या थायरॉईड संप्रेरकाची सामान्य पातळी राखण्यासाठी शरीरात आयोडीन आवश्यक असते.
|
8:13
|
मातांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भपात आणि मृत बाळाचा जन्म होण्याचा धोका वाढतो.
|
8:21
|
तसेच यामुळे जन्म-विकृती, बाळाचे वजन कमी होणे, वाढ खुंटणे आणि मानसिक दुर्बलता येणे देखील होऊ शकते .
|
8:30
|
मॅग्नेशियम हे आणखी एक पोषक घटक आहे जे मज्जासंस्था शांत करण्यास मदत करते.
|
8:35
|
हे मेंदूतील रक्तवाहिन्यांना आराम देऊन पेटके आणि तीव्र डोकेदुखीस प्रतिबंध करते.
|
8:41
|
हे निरोगी रक्तदाब आणि हृदयाची लय देखील राखते.
|
8:45
|
हे अनुवांशिकतेच्या निर्मितीस मदत करते आणि हाडांच्या विकासास वाढवते.
|
8:51
|
निरोगी गर्भधारणेसाठी निरोगी पोषण व्यतिरिक्त अल्कोहोल टाळणे देखील महत्वाचे आहे कारण यामुळे गर्भपात किंवा अशक्त भ्रुण होऊ शकते.
|
9:00
|
टाळण्यासारख्या इतर गोष्टी म्हणजे - तंबाखू,
|
9:03
|
सिगारेट, अंमली पदार्थ,
|
9:06
|
स्व-औषधोपचार, साखर, चहा आणि कॉफीचा जास्त वापर, जंक फूड आणि गोड पेये
|
9:15
|
कारण हे पदार्थ प्रजनन आरोग्यावर आणि गर्भधारणेवर प्रतिकूल परिणाम करतात.
|
9:20
|
लक्षात घ्या की गर्भवती होण्यापूर्वी वजन नियंत्रित करणे देखील आवश्यक आहे.
|
9:25
|
कमी वजनाच्या स्त्रिया लहान बाळांना किंवा प्रसूतीच्या मुदतीपूर्वी म्हणजेच गर्भावस्थेच्या 7 ते 8 महिन्यांच्या कालावधीत बाळांना जन्म देतात.
|
9:34
|
अशा बाळांना अकाली मृत्यूचा धोका जास्त असतो.
|
9:38
|
तथापि, दुसरीकडे, वजन वाढलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेचा मधुमेह आणि रक्तदाब जास्त असतो.
|
9:45
|
तसेच, यामुळे नवजात शिशु गुंतागुंतीचे होऊ शकते.
|
9:49
|
म्हणूनच गर्भवती होण्यापूर्वी आरोग्यदायी तज्ञांचा सल्ला महिलांनी घ्यावा.
|
9:55
|
यासह, शाकाहारी आणि / किंवा मांसाहारयुक्त आरोग्यपूर्ण, संतुलित आहाराचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे.
|
10:05
|
लक्षात ठेवा की सर्व मांसाहारी पदार्थ - प्रोटीन, ओमेगा -3 फॅटी acid, व्हिटॅमिन बी -12, व्हिटॅमिन बी -9, zinc, iron, कॅल्शियम, कोलीन आणि व्हिटॅमिन-डी ने समृद्ध आहेत.
|
10:18
|
प्राण्यांपासून मिळालेल्या अन्नपदार्थाबरोबरच वनस्पती पासून मिळालेले अन्नपदार्थ, डाळी, बाजरी, तृणधान्ये, शेंगदाणे आणि बियाणे हे देखील
|
10:30
|
रोगप्रतिकारक शक्ती, स्नायू, हाडे,
|
10:33
|
यकृत, केस, त्वचा, डोळे आणि मेंदूची वाढ होण्यास मदत करतात.
|
10:36
|
याशिवाय, दुग्धजन्य पदार्थ देखील बाळाची हाडे आणि दात तयार करण्यास मदत करतात.
|
10:43
|
वैकल्पिकरित्या, पालेभाज्या आणि बियाणे देखील कॅल्शियमने समृद्ध असतात आणि बाळाची हाडे आणि दात तयार करण्यास मदत करतात.
|
10:52
|
पालेभाज्यांप्रमाणे फळांमध्येही व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते आणि ते - रोग प्रतिकारक शक्ती सुधारणे, लोह शोषणे आणि संक्रमण प्रतिबंधित करण्यास मदत करतात.
|
11:04
|
स्त्रीच्या प्रजननासाठी आणि बाळाच्या वाढीसाठी, सोयाबीन, शेंगदाणे आणि बियाणांचे इतर मांसाहारी आहाराबरोबर सेवन करावे.
|
11:14
|
मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ सारख्या विविध मांसाहारी पदार्थांमुळे सामान्य थायरॉईड संप्रेरक राखण्यासाठी, वाढ सुधारण्यासाठी आणि शारीरिक दोष टाळण्यासाठी मदत होते.
|
11:27
|
शेंगदाणे आणि बियाणे मॅग्नेशियमने समृद्ध आहेत आणि मज्जासंस्थेचे कार्य करण्यासाठी आणि पायातील पेटके रोखण्यासाठी आवश्यक आहेत.
|
11:35
|
आता आपण गर्भधारणापूर्व पोषण विषयी tutorial च्या अंतिम टप्प्यात पोहचलो आहे. धन्यवाद.
|