Linux/C2/Desktop-Customization-16.04/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. उबंटू लिनक्स 16.04 ऑपरेटिंग सिस्टिम मधील Desktop Customization वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:11 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण 'Launcher ' बद्दल शिकणार आहोत आणि
'Launcher ' मध्ये एप्लिकेशन्सना कसे काढणे आणि जोडणे |
00:21 | विविध Desktops कसे वापरणे
Desktop चे थीम कसे बदलणे |
00:27 | 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी', 'साऊंड सेटिंग्ज' |
00:32 | 'टाइम आणि डेट' सेटिंग्ज आणि अन्य user accounts वर कसे स्विच करणे. |
00:39 | या ट्युटोरिअलसाठी मी वापरणार आहे 'उबंटू लिनक्स 16.04 ऑपरेटिंग सिस्टिम' . |
00:46 | आता लाँचर सह सुरवात करूया. |
00:49 | लाँचर, 'उबंटू लिनक्स डेस्कटॉप' मध्ये डाव्या बाजूला डिफॉल्ट पॅनल आहे,
ज्यात काही डिफॉल्ट एप्लिकेशन्स आहेत. |
00:59 | 'लाँचर' वारंवार वापरल्या जाणार्या एप्लिकेशन्स मध्ये ऍक्सेस करणे सोपे करते. |
01:05 | त्यामुळे, आपण 'लाँचर' वर त्याच्या 'डेस्कटॉप शॉर्टकट' वर क्लीक करून एक प्रोग्रॅम लाँच करू शकतो. |
01:12 | डिफॉल्टनुसार, लाँचरमध्ये काही एप्लिकेशन्स असतात. |
01:17 | आपण आपल्या आवश्यकतेनुसार 'लाँचर' कस्टमाइज करणे शिकूया. |
01:22 | माझ्या नियमित कामासाठी, मला काही एप्लिकेशन्सची गरज आहे जसे Terminal, LibreOffice Writer, gedit, आणि अन्य. |
01:34 | आता 'लाँचर' वर ह्या एप्लिकेशन्सना जोडूया. |
01:38 | असे करण्याआधी, मला नको असलेल्या काही एप्लिकेशन्सना मी काढून टाकेल. |
01:44 | समजा कि मला Launcher मधून Amazon application काढायची इच्छा आहे. |
01:49 | Amazon application icon वर जा, नंतर राईट क्लिक करा आणि Unlock from Launcher निवडा. |
01:58 | तुम्ही पाहू शकता कि Amazon application icon लाँचर मधून काढले आहे. |
02:04 | अशा प्रकारे आपण सर्व शॉर्टकट्स काढू शकतो जे आपण वारंवार वापरत नाही. |
02:11 | जसे कि तुम्ही येथे पाहू शकता, मी माझ्या लाँचर मधून काही एप्लिकेशन्स काढले आहेत. |
02:17 | आता, मी 'लाँचर' वर Terminal शॉर्टकट जोडेल. |
02:22 | Launcher च्या वरती Dash home वर क्लिक करा. |
02:26 | search bar मधेय टाईप करा “terminal”.
ते उघडण्यासाठी Terminal icon वर क्लिक करा. |
02:34 | तुम्ही Launcher वर Terminal icon पाहू शकता. |
02:38 | Launcher वर Terminal icon निश्चित(फिक्स) करण्यासाठी, प्रथम त्यावर राईट क्लीक करा. नंतर Lock to Launcher निवडा. |
02:47 | 'लाँचर' वर एप्लिकेशन शॉर्टकट्स निश्चित (फिक्स) करण्यासाठी दुसरा मार्ग ड्रग्जगिंग आणि ड्रॉपपिंगचा आहे. मी आता हे दाखवेल. |
02:57 | Dash Home उघडा आणि search bar मध्ये टाईप करा gedit. |
03:03 | Launcher वर gedit icon ड्रॅग करा. |
03:07 | आता Launcher वर gedit icon ड्रॉप करा.
तुम्ही पाहू शकता की gedit शॉर्टकट आता लाँचर मध्ये जोडले आहे. |
03:16 | अशा प्रकारे आपण 'लाँचर' वर शॉर्टकट्स जोडू शकतो. |
03:21 | 'उबंटु लिनक्स OS' मध्ये पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे multiple workspace किंवा Desktop आहे. |
03:28 | कधीकधी आपण विविध एप्लिकेशन्स वर काम करू शकतो. |
03:33 | आणि आपल्याला एका एप्लिकेशनमधून दुसऱ्या मध्ये जाण्यास कठीण वाटू शकते. |
03:38 | हे अधिक उपयुक्त करण्यास, आपण 'Workspace Switcher' वापरू शकतो. |
03:42 | आपण Desktop वर परत येऊ. |
03:45 | Ubuntu 16.04 मध्ये विविध workspaces डीफॉल्ट स्वरूपात दिसणार नाही. |
03:51 | हे सक्षम करण्यासाठी, System Settings वर क्लिक करा.
आणि नंतर Appearance वर क्लिक करा. |
03:58 | Appearance विंडोमध्ये , Behavior टॅबवर क्लिक करा. |
04:02 | येथे, Enable workspaces पर्याय निवडा.
हे लाँचर वर अनेक एकाधिक workspaces icon सक्षम करेल. |
04:11 | ही विंडो बंद करा. |
04:13 | लाँचर वर, Workspace Switcher icon शोधा आणि त्यावर क्लिक करा. |
04:19 | हे 4 Desktops सह 4 चतुर्भुज (क्वाड्रैंट्स) दर्शविते. |
04:24 | डिफॉल्ट रूपात, वरील डावा डेस्कटॉप निवडला आहे. |
04:29 | हा तो डेस्कटॉप आहे ज्यात सध्या कार्यरत आहोत. |
04:34 | आता, दुसऱ्या डेस्कटॉपवर डबल क्लीक करून ते निवडू. |
04:39 | येथे मी लाँचर मधील terminal icon वर क्लिक करून terminal उघडेल. |
04:45 | आता पुन्हा Workspace Switcher वर क्लिक करा. |
04:49 | तुम्ही दुसऱ्या Workspace वर terminal आणि पहिल्या वर आपले डेस्कटॉप पाहू शकता. |
04:55 | अशा प्रकारे, तुम्ही एकाधिक Desktops वर कार्य करू शकता. |
04:59 | आता पहिल्या Desktop वर परत येऊ. |
05:03 | Trash लाँचर वर एक अन्य महत्वपूर्ण आयकॉन आहे. |
05:07 | Trash मध्ये सर्व डिलीट केलेल्या फाइल्स आणि फोल्डर्स असतात.
जर आपण चुकून file डिलीट केली, तर आपण त्यास Trash मधून प्राप्त करू शकतो. |
05:17 | हे दाखवण्यास, मी Hello.txt डिलीट करेल, जी माझ्या डेस्कटॉप वर आहे. |
05:23 | फाइल वर राइट क्लीक करा आणि Move to Trash पर्याय वर क्लीक करा. |
05:29 | हे पुन्हा प्राप्त करण्यास, लाँन्चर मधील Trash icon वर फक्त क्लीक करा.
Trash फोल्डर उघडेल. |
05:37 | फाइल निवडा, त्यावर राईट क्लीक करा आणि Restore पर्याय वर क्लीक करा. |
05:43 | Trash फोल्डर विंडो बंद करा आणि Desktop वर परत या. |
05:48 | आपण पाहू शकतो कि जी फाइल आपण आधी डिलीट केलेली होती ती आता पुनर्संचयित झाली. |
05:53 | आपल्या सिस्टममधून कायमस्वरूपी फाइल डिलीट करण्यास, प्रथम त्यास निवडा आणि नंतर Shift+Delete कीज दाबा. |
06:01 | डायलॉग बॉक्स विचारत आहे, “Are yo u sure you want to permanently delete Hello.txt?”
Delete बटणवर क्लिक करा. |
06:12 | पुन्हा एकदा Trash आयकॉन वर क्लीक करा. |
06:15 | आपल्याला Trash फोल्डरमध्ये फाइल भेटू शकत नाही, कारण कि ती आपल्या सिस्टिममधून कायमस्वरूपी डिलीट झाली आहे. |
06:23 | आपण Desktop चे एकच थीम पाहून कंटाळले नाहीत का?
ते बदलू. |
06:28 | Launcher वर जा आणि System settings निवडा.
आणि नंतर Appearance वर क्लिक करा. |
06:35 | Appearance विंडो उघडते. |
06:38 | येथे Themes टॅब अंतर्गत, अनेक पूर्व-स्थापित थीम्स आहेत. |
06:44 | आपल्या आवडीनुसार या थीमसह खेळा. |
06:47 | जेव्हा तुम्ही कोणत्याही एकावर क्लिक करता, तेव्हा तुम्ही पाहू शकता कि Desktop वर बदल लागू होतात. |
06:54 | विंडो बंद करण्यासाठी लहानश्या X icon वर क्लिक करा. |
06:58 | आता, आपल्याला Desktop च्या वरच्या उजव्या कोपर्यात उपलब्ध असलेले काही icons दिसतील. |
07:04 | प्रथम Internet connectivity आहे. |
07:07 | जर तुम्ही कोणत्याही Lan किंवा Wifi network शी कनेक्ट असणार तर कनेक्शन स्थापित केले जाईल. |
07:13 | तुम्ही येथे हे पाहू शकता. |
07:16 | तुम्ही तो network निवडू शकता ज्यात तुम्हाला ऍक्सेस करायचे आहे . |
07:20 | नेटवर्क Enable किंवा Disable करण्यास, Enable Networking पर्याय चेक किंवा अनचेक करा. |
07:27 | आपण Edit Connections पर्याय वापरून नेटवर्क्स एडिट देखील करू शकतो. |
07:32 | पुढील आयकॉन Sound आहे. |
07:35 | तुम्ही येथे स्लायडर पाहू शकता. |
07:37 | हे आपल्या निवडीनुसार ऑडिओची पातळी वाढविण्यास किंवा कमी करण्यास मदत करते. |
07:43 | आपण Sound Settings वर क्लीक करून आपल्या सिस्टिमच्या साऊंड पातळीला आणखी समायोजित करू शकतो. या विंडोमध्ये स्वतःहून सेटिंग्ज अन्वेषण करा. |
07:53 | पुढील आयकॉन Time आणि date आहे.
जर आपण या आयकॉनवर क्लिक केले तर कॅलेंडर उघडेल. |
08:00 | आपण येथे वर्तमान तारीख, महिना आणि वर्ष पाहू शकतो. |
08:04 | आपल्या निवडीनुसार एरो बटण आपल्याला इतर महिने आणि वर्षांमध्ये जाण्याची परवानगी देतात. |
08:11 | Time & Date Settings वर क्लीक करून आपण तारीख आणि वेळ एडिट करू शकतो. |
08:16 | या पर्यायला स्वतःहून अन्वेषण करा. |
08:20 | पुढे wheel किंवा Power icon वर क्लिक करा. |
08:24 | येथे आपण Log Out आणि Shut Down पर्यायांसह काही शॉर्टकट पर्यायांना पाहू शकतो. |
08:31 | आपण आपल्या सिस्टिममध्ये उपलब्ध सर्व user accounts देखील पाहू शकतो. |
08:36 | आपण त्या विशिष्ट युजर वर क्लीक करून, आपल्या आवडीच्या user account वर जाऊ शकतो. |
08:43 | या सह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात. |
08:48 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण 'Launcher ' बद्दल शिकलो आहोत आणि
'Launcher ' मध्ये एप्लिकेशन्सना कसे काढणे आणि जोडणे |
08:55 | विविध Desktops कसे वापरणे
Desktop चे थीम कसे बदलणे |
09:01 | 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी', 'साऊंड सेटिंग्ज' |
09:04 | 'टाइम आणि डेट' सेटिंग्ज आणि अन्य user accounts वर कसे स्विच करणे. |
09:10 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
09:18 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:27 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:30 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
09:35 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
09:41 | आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
09:45 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:57 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |