Health-and-Nutrition/C2/Cross-cradle-hold/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:05, 6 April 2018 by Rajani st (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

|- |00:01 |नमस्कार मित्रानो, स्तनपानासाठी क्रॉस क्रेडल स्थिती या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.

|- |00:07 |या ट्युटोरिअल मध्ये आपण आज शिकणार आहोत - आई व बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे,


|- |00:16 |स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि

|- |00:20 | क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.


|- |00:24 |चला तर मग सुरुवात करूयात,


|- |00:26 |जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितीचा वापर करतात.


|- |00:32 | आई व बाळासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती तीच आहे, ज्यामध्ये आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होई पर्यंतचा काळ आरामदायक असेल,

|- |00:43 |बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल,


|- |00:48 |आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल.


|- |00:51 |आज आपण स्तनपानाच्या क्रॉस कराडले स्थिती बद्दल शिकू,


|- |00:56 | क्रॉस क्रेडल स्थिती बाळाच्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी, आईच्या स्तनाला योग्य रीतीने पकडण्यासाठी आणि बाळाला स्तनावर घट्ट पकड करण्यासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती आहे.


|- |01:06 |स्तनपान करण्यापूर्वी आईने स्वतःचे हात योग्यरीत्या स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि सुकवावेत.


|- |01:12 |मग तिने ग्लासभर उकळून थंड केलेले पाणी प्यावे.


|- |01:16 |स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये दररोज सर्वसाधारणपणे ७५०-८५० मिलिलिटर दूध बनते.


|- |01:24 |म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.


|- |01:29 |चला तर आता आपण आईने स्तनपान करताना कसे बसावे यावर चर्चा करू.


|- |01:33 |आईने पलंगावर किंवा फरशीवर मांडी घालून बसावे,


|- |01:38 |किंवा खुर्चीवर बसावे पण तिचे पाय जमिनीला टेकलेले असावेत.


|- |01:43 |जर खुर्ची इतक्या उंची वर असेल कि तिचे पाय फरशीवर टेकत नसतील तर, ती एक छोटे टेबले किंवा उशी फरशीवर ठेवून त्यावर आपले पाय टेकवू शकते.


|- |01:54 |बसताना तिने पुढील गोष्टी सुनिश्चित कराव्यात- बसताना तिची पाठ सरळ असावी जेणेकरून तिला पाठदुखी होणार नाही.


|- |02:03 |तिचे खांदे आरामशीर असावेत, वर केलेले किंवा झुकलेले नसावेत.


|- |02:08 |आणि हि आरामदायी स्थिती स्तनपान संपेपर्यंत अशीच ठेवावी.


|- |02:13 |आईने ज्या स्तना ने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे.


|- |02:19 |आईने कपडे काढताना सुनिश्चित करावे कि तिच्या ब्लॉऊस किंवा ब्रा मुले स्तनांवर दबाव येऊ नये.


|- |02:26 |व्यवस्थित बसल्यानंतर बाळाला आई जवळ आणावे.


|- |02:31 |आईने बाळाचे डोके ती बाळाला स्तनपान करेल त्याच्या दुसऱ्या बाजूच्या हाताने पकडावे.


|- |02:39 |त्याच हाताच्या काखे मध्ये बाळाचे पाय ठेवलेले असावेत.


|- |02:45 |या चित्रामध्ये, आई तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तना ने स्तनपान करणार आहे, म्हणून बाळाचे पाय आईच्या डाव्या काखेमध्ये ठेवलेले आहेत.


|- |02:57 |आणि तिने तिच्या डाव्या हाताचा अंगठा आणि बोटे यांचा वापर करून बाळाच्या डोक्याचा खालील भाग पकडला आहे.


|- | 03:05 |जर बाळाला वर उचलले असताना आईला अतिरिक्त आधाराची गरज लागल्यास ती बाळाखाली व मांडीवर उशी घेऊ शकते.


|- |03:15 |लक्षात ठेवा, आईने तिचे खांदे झुकवून स्तनाला बाळाजवळ आणू नये.


|- |03:21 |हे तिच्यासाठी त्रासदायक ठरून तिला पाठदुखी होऊ शकते.


|- |03:26 |नेहमी तिने तिची पाठ सरळ ठेवावी आणि बाळाला वर उचलून स्तनापर्यंत आणावे.


|- |03:33 |पुढे आपण आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती बघुयात.


|- |03:39 |आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानांमागे असावीत.


|- |03:46 |तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून मानेपर्यंत आणू नयेत.


|- |03:52 |तिचे मनगट बाळाच्या खान्द्यांमध्ये असावे.


|- |03:56 |आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये.


|- |04:04 |यामुळे स्तनपान करताना बाळाला आराम मिळेल.


|- |04:08 |पुढे आपण शिकू, बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती.


|- |04:15 |आईच्या शरीरावर बाळाच्या पोटामुळे थोडासा दबाव पडला पाहिजे.


|- |04:20 |जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील.



|- |04:26 |आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल.


|- |04:32 |बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये दुसरा मुद्दा आहे, बाळाच्या शरीराची संरेखना.


|- |04:37 |जेव्हा आपण अन्न खातो, आपले डोके, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असतात.


|- |04:43 |पण स्तनपान करताना बऱ्याच आई बाळाला त्यांच्या पाठीवर झोपवून फक्त बाळाचे डोके स्तनांच्या बाजूस फिरवितात.


|- |04:50 |यामुळे स्तनपान करताना बाळाला त्रास होईल.


|- |04:55 |यामुळे स्तनपान करताना बाळाचे डोके, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावेत.


|- |05:01 |यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.


|- |05:05 |आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये तिसरा मुद्द्यावर आलो आहोत.


|- |05:10 |आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा.


|- |05:14 |नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल.


|- |05:22 |पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटी च्या स्थिती बद्दल बोलू.


|- |05:28 |बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.


|- |05:33 |आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी.

|- |05:38 |यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरिओला चा खालचा भाग जास्त तोंडात घेईल .


|- |05:45 |आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.


|- |05:51 |कृपया लक्षात घ्या, एरिओला निप्प्लच्या आजूबाजूचा गडद भाग आहे.


|- | 05:57 |आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यानंतर, चला आपण शिकूया, स्तनाला कसे पकडावे -


|- |06:04 |दुसऱ्याच्या हाताच्या बोटांचा वापर करून, आईने स्वतःच्या स्तनाला खालून U आकारात पकडावे.


|- |06:12 |या चित्रामध्ये आई तिच्या उजव्या हाताने उजवे स्तन पकडेल.


|- |06:19 |अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी - कल्पना करा कि आईच्या उजव्या स्तनावर एक घड्याळ आहे ज्याच्या मध्यभागी निप्पल आहे.


|- |06:31 |आईने तिचा उजवा अंगठा या घड्याळावरील ९ या अंकावंर ठेवावा.


|- |06:38 |आणि अंगठ्याच्या बाजूची दोन बोटे ३ या अंकावर ठेवावीत.


|- |06:46 |आईची बोटे आणि बाळाचे ओठ नेहमी एका दिशेत असावेत.


असे का,


|- |06:51 |हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण बघुयात,


|- |06:56 |जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो आपण आपले ओठ आडवे उघडतो.


|- |07:02 |आपण वडापाव किंवा बर्गर आडवे पकडतो जेणेकरून आपण मोठा घास घेऊ शकू.


|- |07:08 |इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत.


|- |07:12 |जर आपण वडापाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.


|- |07:19 |तसेच इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशेकडे बघुयात.


|- |07:25 |इथे त्याचे ओठ लंबकार उघडलेले आहेत. म्हणून आईच्या बोटांना स्तनावर लंबकार ठेवणे गरजेचे आहे.


|- |07:34 |यामुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.


|- |07:39 |बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत - आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून ३ बोटे अंतरावर असावीत.


|- |07:50 |पुन्हा, वडापाव किंवा बर्गर खाताना- आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.


|- |08:00 |आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल.


|- |08:07 |म्हणून आपण मोठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो.


|- |08:12 |तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे बाळासाठी, स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे.


|- |08:20 |हे अंतर सुनिश्चित करेल कि, आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल.


|- | 08:29 |आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते.


|- |08:35 |आई एरिओला च्या खालील मोठ्या दुग्धनलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते


|- |08:42 |आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते.

|- |08:49 |आईचा अंगठा स्तनाच्या ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावा जेथे बाळाचे नाक आहे .


|- |08:59 |आणि तिची दोन बोटे निप्पल पासून ३ बोटे अंतरावर त्या बाजूस असावीत जेथे बाळाची हनुवटी आहे.


|- |09:09 |चला पुन्हा आपण वडापाव किंवा बर्गर च्या उदाहरणाकडे जाऊया,


|- |09:13 |वडापाव किंवा बर्गर योग्यरीत्या पकडल्यानंतर आपण मोठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो.


|- |09:21 |तसेच आईने स्तनाला खालून U आकारात पकडून हळुवारपणे दबाव द्यावा.

|- |09:28 |यामुळे बाळाला स्तनाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.


|- |09:34 |पण लक्षात ठेवा,आईने तिचे स्तन V आकारात दाबू नये.


|- |09:39 |v आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल.


|- |09:45 |हे सुद्धा निश्चित करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा.


|- |09:52 |नाहीतर निप्पल उजव्या किंवा डाव्या बाजूस सरकून बाळाची पकड अयोग्यरीत्या होईल.

|- |10:00 |लक्षात ठेवा, कधीही स्तनावर दबाव पडून स्तनाला बाळाकडे आणू नये.


|- |10:08 |Always bring the baby towards the breast. नेहमी बाळाला स्तनाकडे आणावे.


|- |10:12 |आता बाळ क्रॉस क्रेडल स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.


|- |10:18 |स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये सांगितली आहे.


|- |10:24 एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरीत्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील तेव्हा आईने स्तनावरील तिचे हात काढावेत आणि बाळाच्या शरीराखाली आधार देण्यासाठी आणावेत.


|- |10:40 |या स्थितीमध्ये आईने तिचे दोन्ही हात तिच्या शरीराच्या खूप जवळ आणावेत,


|- |10:46 |यामुळे तिला स्तनपान करताना आराम मिळेल / हि स्थिती स्तनपान करताना तिच्यासाठी आरामदायक असेल.


|- |10:50 |चला तर आपण या ट्युटोरिअलच्या शेवटी पोहोचलो आहोत.


|- |10:54 |या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो, बाळ व आईसाठी स्तनपानाची योग्य स्थिती निवडणे,


|- |11:03 |स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि क्रॉस क्रेडलची संपूर्ण कार्यपद्धती.


|- |11:09 |या ट्युटोरिअलला स्पोकन ट्युटोरिअल संघ, आई आई टी बॉम्बे यांचे योगदान आहे.


|- |11:15 |स्पोकन ट्युटोरिअल संघाला भारत सरकारच्या एन एम इ आई सी टी ,एम एच आर दि यांच्याकडून योगदान मिळाले आहे.


|- |11:23 |या मिशन वरील अधिक माहिती पुढील लिंक वर उपलब्ध आहे.


|- |11:28 |या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फौंडेशन यांकडूनदेखील उदार अनुदान मिळालेले आहे.


|- |11:34 |हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्ट चा भाग आहे.


|- |11:39 |या ट्युटोरिअल च्या कार्यक्षेत्र परीक्षक आहेत डॉक्टर रुपल दलाल एम डी - बालरोगचिकित्सा.


|- |11:45 |या ट्युटोरिअलचे ऍनिमेशन शीतल जोशी यांनी केले आहे.


|- | |हे ट्युटोरिअल आहार तज्ज्ञ तसनीम शेख यांनी बनविले आहे.


|- | मी रजनी सावंत, स्पोकन ट्युटोरिअल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Rajani st, Ranjana