OpenFOAM/C3/Creating-and-Meshing-aerofoil-in-Gmsh/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Creating and Meshing aerofoil in Gmsh या पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात शिकणार आहोत: Gmsh च्या सहाय्याने aerofoil तयार करणे, |
00:14 | आणि तयार केलेली aerofoil मेश करणे. |
00:17 | या पाठासाठी युजरला aerofoil आणि Gmsh चे ज्ञान असायला हवे. |
00:23 | नसल्यास Gmsh साठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवरील Installing and running Gmsh हा पाठ बघा. |
00:31 | या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 आणि
Gmsh वर्जन 2.8.3 वापरत आहे. |
00:42 | आता aerofoil बद्दल जाणून घेऊ. |
00:45 | Aerofoils हे स्ट्रीमलाईन आकाराचे पंख आहेत जे विमान आणि टर्बो मशिनरीमधे वापरले जातात. |
00:53 | ह्यांचे आकार असे असतात की त्यांच्यावरील drag force हा lift चा अल्पांश असतो. |
00:59 | हे aerofoil चे चित्र आहे. |
01:03 | aerofoil चे पूर्वनिर्धारित कोऑर्डिनेटस ".dat" हे एक्सटेन्शन असलेल्या साध्या टेक्स्ट फाईलमधे उपलब्ध आहेत. |
01:11 | मी .dat फाईल आणि Python स्क्रिप्ट या url वरून डाऊनलोड करणार आहे: |
01:19 | मी वेबसाईट उघडत आहे. |
01:22 | .dat फाईल आणि Python स्क्रिप्ट डाऊनलोड करा आणि डाऊनलोडस फोल्डरमधे जा. |
01:31 | डाऊनलोडस फोल्डरमधून या दोन्ही फाईल्स कॉपी करून डेस्कटॉपवर पेस्ट करा. |
01:37 | .dat फाईल उघडा. |
01:40 | या फाईलमधे प्रत्येक पॉईंटच्या गणना करून मिळवलेल्या X आणि Y च्या
को-ऑर्डिनेटसचा समावेश आहे जे aerofoil ची निश्चिती करतात. Z को-ऑर्डिनेट शून्य ठेवला आहे. |
01:51 | X, Y आणि Z चे को-ऑर्डिनेटस Gmsh मधे स्वीकृत फॉरमॅटमधे असणे गरजेचे आहे. |
01:56 | हे स्वतः करता येते परंतु ह्यात वेळ जातो. |
02:01 | आता Python स्क्रिप्ट उघडा. |
02:04 | Python स्क्रिप्ट, डेटा .dat फाईलमधे रूपांतरित करते आणि आऊटपुट Gmsh ला समजेल अशा वेगळ्या फाईलमधे देते. |
02:14 | आता टर्मिनल विंडो उघडा. टाईप करा: cd space Desktop. |
02:21 | आता python space dat2gmsh.py space पुढे dat फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा. |
02:31 | टाईप करा ls. naca5012xyz.dat .geo नावाची नवी फाईल तयार झालेली आपण बघू शकतो. |
02:43 | ही geo फाईल उघडा. |
02:46 | यामधे Gmsh फॉरमॅटमधील को-ऑर्डिनेटसचा समावेश आहे. |
02:50 | येथे nac_lc ही कॅरॅक्टरीस्टिक लेंथ आहे जी पहिल्या ओळीत 0.005 अशी निश्चित केली आहे. |
02:59 | मी ही व्हॅल्यू बदलून 0.5 करत आहे. |
03:03 | कारण आपल्याला coarser mesh ची गरज आहे. |
03:07 | तुम्ही ही व्हॅल्यू तुमच्या मेशच्या गरजेनुसार बदलू शकता. आता ही फाईल सेव्ह करा. |
03:15 | टर्मिनल विंडोमधे gmsh space आणि geo फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा. |
03:25 | हे aerofoil असलेले gmsh उघडेल. |
03:29 | आता aerofoil च्या टोकाच्या भागावर स्क्रॉल करून झूम इन करा. |
03:35 | लक्षात घ्या aerofoil चा टोकाचा भाग उघडा आहे. |
03:40 | gmsh बंद करा. आता पुन्हा geo फाईलवर जाऊन खाली स्क्रॉल करा. |
03:48 | आपण अंतिम बिंदू समाविष्ट करून ते जोडणार आहोत. |
03:53 | आता spline च्या वर टाईप करा Point open close bracket 1046 space = open close curly bracket space 1.005 comma space -0.0005 comma space 0.00000 comma space nac_lc आणि सेमीकोलनच्या सहाय्याने ही ओळ संपवा. |
04:26 | spline मधे Spline(1000) = curly braces open 1000 colon 1046 comma 1000 close the curly bracket semicolon असा बदल करा. |
04:44 | geo फाईल सेव्ह करा. |
04:47 | थोडे बदल केलेली फाईल Gmsh मधे उघडा. आपल्याला टोक जोडले गेल्याचे दिसेल. |
04:56 | आता पॉईंटसच्या सहाय्याने aerofoil भोवती बाऊंडरी तयार करू. |
05:02 | 4, 3, 0 हे को-ऑर्डिनेटस टाईप करा. prescribed mesh element size ची व्हॅल्यू बदलून 0.5 करून एंटर दाबा. |
05:17 | अशाचप्रकारे इतर पॉईंटस समाविष्ट करा.
4 -3 0 -4 -3 0 -4 3 0 |
05:29 | सरळ रेषेच्या सहाय्याने हे बिंदू जोडा. |
05:44 | आता Plane surface वर क्लिक करून सरफेस बाऊंडरी सिलेक्ट करा. |
05:52 | झूम इन करून aerofoil हे hole boundary म्हणून सिलेक्ट करा. |
05:58 | सिलेक्शन संपवण्यासाठी e चे बटण दाबा. आता आपल्याकडे आपला सरफेस आहे. |
06:04 | आता सरफेस 3D बनवण्यासाठी तो extrude करणार आहोत. त्यासाठी Translate मधील Extrude Surface वर जा. |
06:14 | ट्रान्सलेशनसाठीचे को-ऑर्डिनेटस विचारणारी नवी विंडो उघडेल. |
06:19 | आपल्याला Z डायरेक्शनमधील सरफेस extrude करायचा असल्यामुळे Z डायरेक्शनचे को-ऑर्डिनेट म्हणून 1 ही व्हॅल्यू द्या आणि सरफेसच्या बाऊंडरीवर क्लिक करा. |
06:30 | सिलेक्शन संपवण्यासाठी e हे बटण दाबा. |
06:33 | जॉमेट्री हलवण्यासाठी माऊसचे डावे बटण वापरा. |
06:37 | जॉमेट्री extrude झाल्याचे दिसेल. |
06:42 | हे बंद करा. gmsh विंडो बंद करा. |
06:45 | geo फाईल उघडा. |
06:48 | खाली स्क्रॉल करा आणि Extrude वर जा. |
06:52 | Extrude च्या आत ह्या ओळी समाविष्ट करा:
Layers{1}; एंटर दाबा. Recombine; ही फाईल सेव्ह करा. |
07:09 | ह्यामुळे मेश एक एलिमेंट जाड असल्याचे सुनिश्चित होईल. |
07:14 | आता टर्मिनल विंडोमधे geo फाईल उघडा. |
07:19 | आपल्याकडे आपली जॉमेट्री आहे. आपण मेशिंग करणार आहोत. |
07:23 | निश्चित केलेल्या जॉमेट्रीसाठी Gmsh आपोआप मेश तयार करते. |
07:28 | Mesh वर जा. |
07:30 | 1D mesh, 2D mesh आणि 3D mesh वर क्लिक करा. |
07:36 | mesh तयार झाले आहे. |
07:39 | असे दिसेल की मेश हे aerofoil जवळ बारीक असून बाऊंडरीकडे जाताना मोठे होत जात आहे. |
07:48 | मेश मेनूमधील Refine by Splitting या पॅरामीटरवर क्लिक करून मेश रिफाईन देखील करू शकतो. |
07:56 | आपले काम सेव्ह करू. |
07:59 | फाईल मेनूमधे जाऊन Save as वर क्लिक करा. |
08:05 | एक नवी विंडो उघडेल. ड्रॉपडाऊन मधील पर्याय बदलून mesh फॉरमॅट निवडा. |
08:11 | फाईलचे नाव म्हणून aerofoil.msh असे टाईप करा. |
08:17 | लक्षात ठेवा येथे msh हे mesh फाईल टाईपसाठी आहे. |
08:22 | OK वर क्लिक करा. पुन्हा OK वर क्लिक करा. |
08:26 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:29 | असाईनमेंट म्हणून वेगळ्या आकाराच्या aerofoil साठी वेगळी dat फाईल वापरून दुसरी aerofoil बनवा. |
08:37 | या पाठात शिकलो:
Gmsh मधे aerofoil तयार करणे. Gmsh मधे मेशिंग करणे. |
08:45 | URL वर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
यामधे तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
08:52 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
08:56 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम:
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. |
09:00 | ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.
|
09:03 | अधिक माहितीसाठी कृपया लिहा:
contact@spoken-tutorial.org |
09:06 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
|
09:09 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:15 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे: http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
09:19 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |