OpenFOAM/C3/Using-PyFoam-Utilities/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Using PyFoam Utilities वरील पाठात आपले स्वागत.
|
00:07 | या पाठात PyFoam Utilities बद्दल जाणून घेऊ. |
00:12 | PyFoam Utilites चा वापर करणे, |
00:15 | PyFoam Utilites च्या सहाय्याने shockTube केस कार्यान्वित करून डेटा प्लॉट करणे. |
00:22 | या पाठासाठी मी उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 |
00:30 | OpenFOAM वर्जन 2.3.0, |
00:34 | PyFoam 0.6.5 वापरत आहे. |
00:37 | या पाठासाठी युजरला लिनक्स टर्मिनलवर कमांडस कार्यान्वित करण्याचे प्राथमिक ज्ञान तसेच, |
00:45 | OpenFOAM केसेस कार्यान्वित करण्याचा आणि त्याचे विश्लेषण करण्याचा अनुभव असावा. |
00:51 | आता PyFoam utilities बद्दल जाणून घेऊ. |
00:55 | Utilities हे Python प्रोग्रॅम्स आहेत जे PyFoam बरोबर अंतर्भूत असतात. |
01:01 | प्रत्येक utility ला विशिष्ट कार्य आहे. |
01:05 | Utilities कमांड लाईनमधून कार्यान्वित केल्या जातात. |
01:10 | टॅब कंप्लिशनच्या सहाय्याने utilites ची सूची बघता येते. |
01:16 | टर्मिनल उघडा. |
01:18 | utilities ची सूची बघण्यासाठी pyFoam टाईप करून दोन वेळा टॅबचे बटण दाबा. |
01:29 | आता स्लाईडसवर परत जाऊ. |
01:32 | minus help या पर्यायाबरोबर प्रत्येक utility कार्यान्वित करता येते. |
01:38 | याचा उपयोग प्रत्येक संबंधित utility काय करते आणि तिचे पर्याय बघण्यासाठी होतो. |
01:44 | Shock Tube केस कार्यान्वित करण्यासाठी खालील PyFoam Utilities चा उपयोग करू. |
01:51 | आपण वापरणार आहोत – PyFoamRunner dot py, PyFoamSamplePlot dot py |
01:58 | आणि PyFoam च्या सहाय्याने नंतर आवश्यक डेटा प्लॉट करू. |
02:02 | केसेस कार्यान्वित करण्यासाठी PyFoamRunner dot py चा वापर करता येऊ शकतो. |
02:07 | नंतर वापरण्यासाठी log files देखील तयार केली जाते. |
02:12 | या utility चा उपयोग पूर्वी सेटअप केलेल्या sampleDict मधून मिळवलेला विविध प्रकारचा डेटा प्लॉट करण्यासाठी होतो. |
02:21 | Shock Tube ह्या उपकरणाचा वापर स्फोटाच्या प्रतिकृतीचे तरंग(waves) सेन्सरच्या दिशेने पाठवण्यासाठी, |
02:29 | आणि प्रत्यक्ष स्फोट व त्याचे परिणाम यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी होतो. |
02:34 | या केसमधे आयताकृती ट्युबमधे उजव्या बाजूला कमी दाब आणि डाव्या बाजूला उच्च दाब आहे. |
02:42 | दोन्ही प्रेशर झोन हे एका पातळ पडद्याद्वारे वेगळे केले गेले आहेत. |
02:47 | टर्मिनल उघडा आणि compressible solver मधील rhoCentralFoam पाथ टाईप करा. |
02:56 | ls टाईप करा. आपल्याला shockTube केस दिसेल. |
03:02 | टाईप करा cd space shockTube |
03:05 | 0 dot org , constant आणि system हे तीन फोल्डर्स दिसतील. |
03:11 | आपल्याला 0 dot org मधून 0 फाईल कॉपी करणे गरजेचे आहे. त्यासाठी टाईप करा cp space minus r space 0 dot org space 0 आणि एंटर दाबा. |
03:26 | आता cd space system टाईप करून system फोल्डरमधे जा. |
03:32 | gedit च्या सहाय्याने sampleDict फाईल उघडा. |
03:37 | फाईलच्या खालच्या भागात जाऊन U.Component(0) काढून टाका. |
03:45 | त्याजागी Ux Uy आणि Uz लिहा. rho देखील काढून टाका. |
03:53 | फाईल सेव्ह करून त्यामधून बाहेर पडा. |
03:56 | एक लेव्हल मागे जाण्यासाठी टाईप करा cd dot dot |
04:01 | जॉमेट्री मेश करण्यासाठी blockMesh कमांड कार्यान्वित करा. |
04:06 | त्यानंतर प्रेशर बाऊंडरी कंडिशन्स सेट करण्यासाठी टाईप करा setFields. |
04:13 | आता pyFoam utility of pyFoamRunner.py चा वापर करणार आहोत. |
04:19 | टाईप करा pyFoamRunner dot py space पुढे सॉल्व्हरचे नाव द्या. म्हणजेच RhoCentralFoam. |
04:28 | ही केस कार्यान्वित करून postProcessing log तयार करा. |
04:33 | टाईप करा ls |
04:35 | आपण तयार झालेल्या लॉग फाईल्स बघू शकतो. |
04:39 | सँपल युटिलिटी कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा sample. |
04:44 | यानंतर pyFoamSamplePlot dot py space dot slash space minus minus directory ie. Dir equal to postProcessing/sets space hyphen info या कमांडच्या सहाय्याने विविध टाईम स्टेप्स प्लॉट करू शकतो. |
05:10 | हे आपल्याजवळ कोणकोणती फिल्डस आहेत हे दाखवेल. |
05:14 | नंतर टाईप करा pyFoamSamplePlot.py space dot slash space minus minus dir equal to postProcessing/sets space minus minus field equal to capital T space minus minus mode equal to timesInOne space vertical pipe space gnuplot |
05:44 | मिळालेले आऊटपुट ही png फाईल असेल. |
05:48 | ls टाईप करा. आपण तयार झालेली png फाईल बघू शकतो. |
05:54 | या पाठात PyFoam Utilities बद्दल जाणून घेतले. |
05:58 | तसेच विविध pyFoam utilities बघितल्या. |
06:03 | सॉल्व्हर कार्यान्वित करण्यासाठी pyFoamRunner.py |
06:07 | तसेच png फाईल तयार करण्यासाठी pyFoamSamplePlot युटिलिटीबद्दल जाणून घेतले. |
06:13 | कृपया या फोरममधे संबंधित विषयाचे प्रश्न वेळासहित पाठवा. |
06:17 | कृपया या फोरमवर OpenFOAM वरील सर्वसाधारण प्रश्न पाठवा. |
06:22 | FOSSEE टीम TBC प्रोजेक्टचा समन्वय करते. |
06:26 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधीची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. |
06:36 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |