LaTeX/C2/LaTeX-on-Windows-using-TeXworks/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:40, 19 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | “LaTeX on Windows using TeXworks” ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकाल |
00:09 | MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे |
00:11 | TeXworks वापरून मूलभूत LaTeX डॉक्युमेंट्स लिहिणे |
00:15 | न सापडणारी पॅकेजेस डाऊनलोड करण्यासाठी MikTeX कॉन्फिगर करणे. |
00:19 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Windows7 ऑपरेटिंग सिस्टम आणि MikTeX2.9 वापरत आहे. |
00:27 | आपण आता TeXworks ची ठळक वैशिष्ट्ये पाहू या. |
00:31 | ते स्वतंत्र व्यासपीठ आहे |
00:33 | तो एम्बेडेड PDF रिडर आहे |
00:36 | ते भारतीय भाषा टाईपसेटिंगला सहाय्य करते. |
00:39 | आपण TeXworks सुरू करण्यापूर्वी, आपल्याला MikTeX इंस्टॉल करावे लागेल. |
00:44 | MikTeX ही एक विंडोजसाठी TeX किंवा LaTeX ची आणि संबंधित कार्यक्रमाची एक आधुनिक अंमलबजावणी आहे. |
00:52 | विंडोजवर LaTex मध्ये प्राथमिक दस्ताऐवज डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणार्या पॅकेजेसचा त्यामध्ये समावेश आहे. |
00:58 | शिवाय, TeXworks हे MikTeX इंस्टॉलेशनसोबत उपलब्ध असलेले मुलभूत एडीटर आहे. |
01:04 | www.miktex.org संकेतस्थळावर जा. |
01:10 | MikTeX इंस्टॉलरसाठी शिफारस केलेल्या लिंकवर डाऊनलोडसाठी क्लिक करा. |
01:15 | हे मिकटेक्स इंस्टॉलर डाऊनलोड करेल. |
01:18 | डाऊनलोड करून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. |
01:22 | ती, सुमारे 154 मेगा बाइट इतकी मोठी फाईल आहे. |
01:25 | त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल. |
01:27 | मी आधीच ही फाईल डाऊनलोड केलेली आहे. ती इथे आहे. |
01:32 | इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी ह्या फाईलवर दोनदा क्लिक करा. |
01:36 | चेक बॉक्स तपासा आणि Next वर क्लिक करा. |
01:40 | सर्व मुलभूत पर्याय निवडा. |
01:43 | इन्स्टलेशनसाठी जवळपास ५ ते १० मिनिटे लागतील. |
01:47 | मी आधीच माझ्या संगणकावर MikTex इंस्टॉल केले आहे. |
01:50 | त्यामुळे मी इन्स्टॉलेशन चालू करणार नाही. |
01:54 | MikTex आपल्या संगणकावर यशस्वीरीत्या इन्स्टॉल केल्यानंतर, |
01:58 | MikTeX सोबत असलेले टेक्सवर्क्स एडीटर कसे वापरायचे ते पाहूया. |
02:03 | विंडोज स्टार्ट बटणावर क्लिक करा. |
02:07 | ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा. |
02:09 | MikTeX2.9 वर क्लिक करा |
02:12 | TeXworks वर क्लिक करा |
02:15 | TeXworks एडीटर उघडेल. |
02:18 | आधीच उपलब्ध असलेले LaTeX डॉक्युमेंट उघडा. |
02:21 | मी फाईलवर क्लिक करून नंतर Open वर क्लिक करेन आणि डिरेक्टरी निवडेन. |
02:28 | मग मी फाईल hello.tex उघडेन. |
02:32 | आपण ह्या फाईलमध्ये लिखित मजकूर रंगीत आहे पाहू शकता. |
02:37 | ह्याला सिंटॅक्स हायलायटींग असे म्हणतात. |
02:41 | हे LaTeX वाक्यरचना आणि वापरकर्त्याची सामग्री ह्या दरम्यान फरक करण्यासाठी वापरकर्त्यास मदत करते. |
02:47 | LaTeX वाक्यरचना ठळक होत नसेल तर खालील प्रमाणे करा |
02:52 | टेक्सवर्क्स विंडोमध्ये, मेनू बारवर उपलब्ध असलेल्या फॉरमेट बटणावर क्लिक करा. |
02:58 | वाक्यरचना रंगीत निवडा आणि नंतर LaTeX वर क्लिक करा. |
03:03 | प्रत्येक वेळेस आपण तयार केलेल्या LaTex डॉक्युमेंटमध्ये TeXworks च्या सहाय्याने वाक्यरचना ठळक करू इच्छित असल्यास, खालीलप्रमाणे करू या. |
03:10 | मेनू बारवर, एडीटवर क्लिक करा नंतर प्रिफरेंसेसवर क्लिक करा, |
03:16 | एडीटर टॅबमध्ये, ड्रॉपडाऊन बटणावर क्लिक करा जे वाक्यरचना रंगीत करण्यासाठी पर्याय देते. |
03:22 | LaTeX निवडा आणि नंतर OK वर क्लिक करा. |
03:26 | अशा प्रकारे भविष्यात निर्माण होणार्या सर्व डॉक्युमेंट्सना, वाक्यरचना ठळक होणे लागू केले जाईल. |
03:32 | आता आपण आपले LaTeX दस्ताऐवज कंपाईल करण्यासाठी तयार आहोत. |
03:36 | कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T कीज एकत्र दाबा . |
03:42 | एकदा का कागदपत्रांची रचना अचूकपणे तयार झाली की पीडीएफ डॉक्युमेंट उघडेल. |
03:49 | हे PDF रिडर या TeXworks सोबत येते हे लक्षात ठेवा. |
03:53 | हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत PDF रिडर आहे. |
03:59 | आता आपण एक बीमर डॉक्युमेंट कंपाईल करू. |
04:02 | आपण इन्स्टॉल केलेल्या MikTex सेटअपमध्ये मुळात बीमर पॅकेजेसचा समावेश केलेला नाही. |
04:08 | ह्याचा अर्थ असा की आपल्याला |
04:10 | काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल. |
04:15 | उपलब्ध नसलेल्या पॅकेजला इंस्टॉल करण्याचे दोन मार्ग आहेत. |
04:19 | एक मार्ग म्हणजे आपण LaTex डॉक्युमेंट कंपाईल करत असतानाच ते इंस्टॉल करणे |
04:24 | MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये उपलब्ध नसलेले पॅकेजेस ह्या LaTeX दस्तऐवज मध्ये विशेषतः आवश्यक आहेत. |
04:31 | MikTex चे मॅनेजर पॅकेज स्वहस्ते निवडून इंस्टॉल करणे हा दूसरा मार्ग आहे. |
04:37 | चला आता आपण पहिली पद्धत पाहूया. |
04:40 | आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल करणे आवश्यक आहे. |
04:47 | प्रथम TeXworks एडीटर बंद करा. |
04:51 | हे आवश्यक आहे की आपण tex फाइल अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडावे. |
04:56 | स्टार्ट बटणावर क्लिक करा. |
04:59 | यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा. |
05:02 | MikTeX2.9 वर क्लिक करा |
05:05 | TeXworks वर राईट क्लिक करा आणि Run as Administrator निवडा. |
05:11 | हे टेक्सवर्क्स एडीटर अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडेल. |
05:16 | आता फाईलवर क्लिक करा. |
05:19 | मग Open वर क्लिक करा |
05:21 | beamer.tex फाईल निवडा. |
05:24 | कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T किज् एकत्र दाबा. |
05:29 | पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:33 | ते मिसींग पॅकेज beamer.cls इंस्टॉल करण्यास सूचित करेल. |
05:38 | ह्या डायलॉग बॉक्सवरील चेंज बटणावर क्लिक करा. |
05:43 | चेंज पॅकेज रेपॉजिटरी डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:47 | पॅकेजेस इंटरनेट वरून इंस्टॉल करा हा पर्याय निवडा. |
05:52 | कनेक्शन सेटिंग्जवर क्लिक करा. |
05:55 | हे प्रॉक्सी सेटिंग्ज कॉन्फिगर करण्याची सूचना करेल. |
05:59 | जर आपण प्रॉक्सी नेटवर्कवर नसाल तर युज प्रॉक्सी सर्व्हर चेकबॉक्स अनचेक सोडा. |
06:06 | मी एका प्रॉक्सी नेटवर्क वर आहे, मी चेकबॉक्सवर क्लिक करून पर्याय सक्षम करते. |
06:12 | मी प्रॉक्सी अॅड्रेस एंटर करते . |
06:16 | मी प्रॉक्सी पोर्ट क्रमांक एंटर करते . |
06:19 | मी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून आवश्यक पर्याय ऑथेंटिकेशन सक्षम करते . |
06:25 | ओके (Ok) वर क्लिक करा. आणि नंतर नेक्स्टवर (Next) क्लिक करा |
06:30 | ते मला प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड विचारेल. |
06:34 | मी माहिती दाखल करते आणि OK वर क्लिक करते . |
06:39 | ते विविध रिमोट पॅकेज रेपॉजिटरीज् यादी दर्शवेल . |
06:44 | सूचीमधून एक निवडा आणि Finish वर क्लिक करा. |
06:48 | Install वर क्लिक करा. |
06:51 | ते beamer.cls पॅकेज इंस्टॉल करेल. |
06:55 | पुन्हा एकदा पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:00 | ती मिसींग पॅकेज pgfcore.sty इंस्टॉल करण्यास सूचित करेल. |
07:06 | आपण “नेहमी पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी हा डायलॉग दाखवा” हा पर्याय अनचेक करू शकता. |
07:12 | आपण असे केल्यास, मिसींग पॅकेज आढळल्यास, MikTeX पुन्हा प्रॉमप्ट करणार नाही. |
07:19 | Install वर क्लिक करा. |
07:21 | आणखी न सापडणारी पॅकेजेस असतील तर आता, तो आपली परवानगी न विचारता आपोआप इंस्टॉल करेल. |
07:31 | इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तो कंपाइलेशन समाप्त करेल व PDF आऊटपुट उघडेल. |
07:38 | आपण पाहू शकतो की आपण Beamer डॉक्युमेंट यशस्वीरित्या कम्पाइल केलेले आहे. |
07:42 | आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू. |
07:47 | Windows start बटण क्लिक करा. |
07:50 | यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा. |
07:53 | MikTeX2.9 वर क्लिक करा |
07:55 | मेंटेनेंस अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन) |
07:58 | पॅकेज मॅनेजर अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन) |
08:02 | तो उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसची सूची दर्शवेल |
08:07 | आता या यादीवर एक लक्ष टाकू. |
08:10 | या यादीत सहा रकाने आहेत. |
08:13 | ते आहेत, नाव, वर्ग, आकार, पॅकेज तारीख, इंस्टॉलेशन केल्याची तारीख आणि शीर्षक. |
08:21 | इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. |
08:25 | ज्या पॅकेजसाठी हा कॉलम रिकामा आहे ते दर्शविते की ते पॅकेजेस इंस्टॉल केलेले नाहीत. |
08:32 | चला आता एक विशिष्ट पॅकेज इन्स्टॉल कसे करावे ते पाहू. |
08:36 | उदाहरणार्थ , मी पॅकेज abc निवडते . |
08:41 | लक्षात घ्या, मी पॅकेज निवडताक्षणीच, वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले. |
08:48 | अधिकचे बटण इंस्टॉल बटण आहे. |
08:51 | plus बटणावर क्लिक करा. |
08:53 | एक विंडो उघडेल जी आपण इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करण्यासाठी निवडलेल्या पॅकेजची यादी दाखवेल. |
09:00 | Proceed क्लिक करा. |
09:04 | मी एक प्रॉक्सी नेटवर्क कनेक्शन कॉन्फिगर केल्यामुळे, तो प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डकरीता विनंती करतो. |
09:11 | मी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड टाईप करते . |
09:14 | OK वर क्लिक करा |
09:16 | एक विंडो उघडेल जी इंस्टॉलेशनसाठी निवडलेल्या पॅकेजच्या डाऊनलोडींगची प्रगती दर्शवेल. |
09:23 | कदाचित असे होऊ शकते की आपण डाऊनलोड करत असलेले पॅकेज रीमोट सर्वरच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे डाऊनलोड होणार नाही. |
09:29 | त्या परिस्थितीत, पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा. |
09:34 | आपण पाहू शकतो की आपण निवडलेल्या पॅकेजचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले आहे. |
09:39 | close क्लिक करा. |
09:41 | पॅकेजची यादी रीफ्रेश होईल. |
09:44 | आपल्या लक्षात येईल की ABC पॅकेजच्या इंस्टॉलेशन कॉलममध्ये 11 सप्टेंबर 2013 दिसेल. |
09:52 | येथे LaTeX on Windows using TeXworks वरील ट्युटोरिअल पूर्ण होते. |
09:58 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो - |
10:00 | MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे |
10:02 | TeXworks वापरून प्राथमिक LaTeX डॉक्युमेंट लिहिणे |
10:06 | २ वेगवेगळ्या प्रकारे मिसींग पॅकेजेस डाऊनलोड करण्यास MikTeX कॉन्फिगर करणे |
10:11 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
10:14 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:17 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:21 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम |
10:23 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:27 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:30 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा |
10:36 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:40 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:48 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org / NMEICT-Intro |
10:59 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |