Scilab/C4/Interpolation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Numerical Interpolation वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | पाठाच्या शेवटी तुम्ही शिकणार आहात: |
00:10 | वेगवेगळ्या न्युमरिकल इंटरपोलेशन अल्गोरिदम्ससाठी Scilab कोड तयार करणे. |
00:16 | दिलेल्या डेटा पॉईंटसवरून फंक्शन्सच्या व्हॅल्यू मिळवणे. |
00:21 | या पाठासाठी मी, |
00:24 | उबंटु 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम |
00:27 | आणि Scilab चे 5.3.3 हे व्हर्जन वापरणार आहे. |
00:31 | पाठाचा सराव करण्यासाठी आपल्याला, |
00:34 | Scilab चे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:36 | तसेच न्युमरिकल इंटरपोलेशनबद्दल माहिती असावी. |
00:40 | Scilab शिकण्यासाठी कृपया स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली संबंधित ट्युटोरियल्स बघा. |
00:47 | न्युमरिकल इंटरपोलेशन ही |
00:51 | नवीन डेटा पॉईंटस तयार करण्याची मेथड आहे, जे |
00:53 | ज्ञात डेटा पॉईंटसच्या discrete set च्या रेंजमधे असतील. |
00:59 | आपण न्यूमरिकल मेथडसच्या सहाय्याने इंटरपोलेशनचे प्रॉब्लेम्स सोडवू शकतो. |
01:05 | Lagrange इंटरपोलेशनमधे, |
01:07 | आपण N पॉईंटसमधून N – 1 डिग्री असलेली बहुपदी पास करतो. |
01:12 | नंतर आपण N order y of x चा युनिक पॉलिनॉमियल शोधतो जो डेटा सँपल्स इंटरपोलेट करेल. |
01:22 | आपल्याला 9, 9.5 आणि 11 यांच्या natural logarithm व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. |
01:29 | आपल्याला 9.2 च्या natural logarithm ची व्हॅल्यू काढायची आहे. |
01:35 | हा प्रॉब्लेम आपण Lagrange इंटरपोलेशन मेथडच्या सहाय्याने सोडवू. |
01:41 | Lagrange इंटरपोलेशनचा कोड पाहू. |
01:46 | आपण x zero, x, f आणि n ही अर्ग्युमेंटस असलेले Lagrange फंक्शन घोषित केले आहे. |
01:53 | X zero म्हणजे इंटरपोलेशन पॉईंट. |
01:57 | x हा डेटा पॉईंटस असलेला व्हेक्टर आहे. |
02:01 | f ह्या व्हेक्टरमधे डेटा पॉईंटसशी संबंधित फंक्शनच्या व्हॅल्यूज समाविष्ट आहेत. |
02:08 | आणि n ही इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियलची ऑर्डर आहे. |
02:14 | m आणि व्हेक्टर N इनिशियलाईज करण्यासाठी आपण n चा उपयोग करणार आहोत. |
02:19 | इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियलची ऑर्डर तयार केलेल्या नोडसची संख्या निश्चित करते. |
02:25 | नंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूज मिळवण्यासाठी, |
02:29 | Lagrange इंटरपोलेशनचे सूत्र वापरणार आहोत. |
02:35 | नंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा भागाकार करून L ची व्हॅल्यू मिळवणार आहोत. |
02:41 | आपण L चा उपयोग दिलेल्या डेटा पॉईंटसाठी y फंक्शनची व्हॅल्यू मिळवण्यासाठी करणार आहोत. |
02:48 | शेवटी आपण L आणि f of x f(x) ची व्हॅल्यू दाखवणार आहोत. |
02:53 | आता फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू. |
02:57 | हे उदाहरण सोडवण्यासाठी Scilab कंसोलवर जाऊ. |
03:02 | डेटा पॉईंट व्हेक्टर घोषित करू. |
03:05 | कंसोलवर टाईप करा: |
03:07 | x बरोबर चौकटी कंसात 9.0 comma 9.5 comma 11.0 चौकटी कंस पूर्ण. |
03:18 | एंटर दाबा. |
03:21 | नंतर टाईप करा: f बरोबर चौकटी कंसात 2.1972 comma 2.2513 comma 2.3979 चौकटी कंस पूर्ण. |
03:39 | एंटर दाबा. |
03:41 | नंतर टाईप करा x zero बरोबर 9.2 |
03:46 | एंटर दाबा. |
03:48 | आपण quadratic polynomial interpolating polynomial वापरू. |
03:53 | टाईप करा n बरोबर 2. |
03:58 | एंटर दाबा. |
04:00 | फंक्शन कॉल करण्यासाठी टाईप करा: |
04:02 | y बरोबर Lagrange कंसात x zero comma x comma f comma n कंस पूर्ण. |
04:14 | एंटर दाबा. |
04:16 | x बरोबर 9.2 यासाठी y ही फंक्शनची व्हॅल्यू दाखवली जाईल . |
04:22 | आता न्यूटन्स डिव्हायडेड डिफरन्स मेथड पाहू. |
04:26 | या पध्दतीत डिव्हायडेड डिफरन्सेस रिकर्सिव्ह मेथड वापरली जाते. |
04:32 | Lagrange मेथडपेक्षा यामधे कमी आकडेमोड करावी लागते. |
04:38 | असे असले तरी, यातही Lagrange मेथड सारखाच इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियल तयार करतात. |
04:47 | हे उदाहरण डिव्हायडेड डिफरन्स मेथड वापरून सोडवू. |
04:52 | आपल्याला डेटा पॉईंटस आणि |
04:54 | त्या डेटा पॉईंटसवरील फंक्शन्सच्या संबंधित व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. |
05:00 | आपल्याला x बरोबर 3 साठी फंक्शनच्या व्हॅल्यू मिळवायच्या आहेत. |
05:05 | न्यूटन्स डिव्हायडेड डिफरन्स मेथडचा कोड पाहू. |
05:11 | Scilab एडिटरवर Newton underscore Divided dot sci ही फाईल उघडा. |
05:18 | आपण न्यूटन अंडरस्कोर डिव्हायडेड हे फंक्शन x, f आणि x zero ह्या अर्ग्युमेंटस सहित घोषित केले आहे. |
05:29 | x हा डेटा पॉईंटस असलेला व्हेक्टर आहे. |
05:33 | f म्हणजे संबंधित फंक्शन व्हॅल्यू आणि |
05:36 | x zero हा माहित नसलेला इंटरपोलेशन पॉईंट आहे. |
05:41 | आपण व्हेक्टरची length काढून ती n ला देऊ. |
05:46 | व्हेक्टरची पहिली व्हॅल्यू a of one a(1) ला देऊ. |
05:51 | नंतर डिव्हायडेड डिफरन्स अल्गोरिदम लागू करणार आहोत आणि डिव्हायडेड डिफरन्स टेबल मिळवणार आहोत. |
05:57 | नंतर न्यूटन पॉलिनॉमियलची coefficient list मिळवणार आहोत. |
06:03 | दिलेल्या डेटा पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू मिळवण्यासाठी coefficient list ची बेरीज घेणार आहोत. |
06:10 | Newton underscore Divided dot sci ही फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू. |
06:16 | Scilab कंसोलवर जाऊ. |
06:19 | स्क्रीन क्लियर करण्यासाठी टाईप करा c l c. |
06:22 | एंटर दाबा. |
06:24 | डेटा पॉईंटस व्हेक्टर एंटर करू. |
06:27 | टाईप करा: x बरोबर चौकटी कंसात 2 comma 2.5 comma 3.25 comma 4 चौकटी कंस पूर्ण. |
06:39 | एंटर दाबा. |
06:41 | नंतर फंक्शनच्या व्हॅल्यूज टाईप करा. |
06:44 | f बरोबर चौकटी कंसात 0.5 comma 0.4 comma 0.3077 comma 0.25 चौकटी कंस पूर्ण. |
07:01 | एंटर दाबा. |
07:03 | टाईप करा x zero बरोबर 3 |
07:06 | एंटर दाबा. |
07:08 | नंतर फंक्शन कॉल करण्यासाठी टाईप कराः |
07:11 | I P बरोबर Newton underscore Divided कंसात x comma f comma x zero कंस पूर्ण. |
07:23 | एंटर दाबा. |
07:25 | x बरोबर 3 साठी y ची व्हॅल्यू येथे दाखवली जाईल. |
07:30 | या पाठाचा सारांश पाहू. |
07:33 | आपण इंटरपोलेशन मेथडससाठी Scilab कोड डेव्हलप करणे, |
07:40 | तसेच नवीन डेटा पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू कशी काढायची ते जाणून घेतले. |
07:46 | येथे दिलेला हा प्रॉब्लेम Lagrange मेथड आणि न्यूटन्स डिव्हायडेड डिफरन्स मेथडने तुम्ही सोडवून बघा. |
07:54 | खाली दिलेल्या लिंकवर व्हिडिओ पाहू शकता. |
07:57 | हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो.
|
08:00 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
08:05 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
|
08:07 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
|
08:10 | ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
|
08:14 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
|
08:22 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
|
08:26 | यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी., एम .एच. आर. डी. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
|
08:33 | अधिक माहिती http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro वर उपलब्ध आहे.
|
08:38 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे.
|
08:41 | सहभागाबद्दल धन्यवाद. |