LibreOffice-Suite-Writer/C2/Introduction-to-LibreOffice-Writer/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:40, 21 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration
|
00:01 | लिबर ऑफिस रायटरच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: Writer ची प्राथमिक ओळख |
00:10 | रायटर मधील विविध टूलबार |
00:13 | नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे. |
00:17 | डॉक्युमेंट सेव्ह करणे. |
00:20 | रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे. |
00:22 | लिबर ऑफिस रायटर हा Libre Office Suite मधील वर्ड प्रोसेसर घटक आहे. |
00:27 | रायटरचे साम्य मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड सॉफ्टवेअरशी आहे. |
00:33 | हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो. |
00:41 | लिबर ऑफिसचा वापर करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क द्यावे लागत नाही. |
00:47 | Libre Office Suite संगणकावर सुरू करण्यासाठी Microsoft Windows 2000, विंडोज XP, विंडोज7 किंवा GNU/Linux सारख्या Operating System चा वापर तुम्ही करू शकता. |
01:04 | आपण उबंटू लिनक्स 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
01:16 | संगणकावर Libre Office Suite ची स्थापना केली नसेल तर Synaptic Package Manager वापरून Writer ची स्थापना करू शकता. |
01:24 | Synaptic Package Manager वरील माहितीसाठी उबंटू लिनक्सवरील ट्युटोरियल पहा. तसेच Libre Office Suite डाऊनलोड करण्यास वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
01:37 | यासंबंधी सूचना Libre Office Suite च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत. |
01:43 | Writer ची स्थापना करताना आपल्याला “Complete” ह्या पर्यायाची निवड करण्यास विसरू नका. |
01:50 | जर आपल्याकडे 'Libre Office Suite' आधीपासून स्थापित असेल तर |
01:54 | तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे 'Applications' वर क्लिक केल्यावर तुम्हाला लिबर ऑफिस रायटर दिसेल. |
02:02 | 'Office' वर क्लिक करून नंतर 'Libre Office' या ऑप्शनवर क्लिक करा. |
02:08 | लिबर ऑफिसमधील विविध घटकांसहित नवीन डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:13 | लिबर ऑफिस रायटर मध्ये जाण्यासाठी वर्ड प्रोसेसर घटक असलेल्या 'Text Document' या ऑप्शनवर क्लिक करा. |
02:23 | मुख्य रायटर विंडोमध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडले जाईल. |
02:28 | रायटर विंडोमध्ये विविध टूलबार्स आहेत. जसे की, टायटल बार, |
02:33 | मेनूबार, स्टँडर्ड टूल बार, फॉरमॅटिंग बार आणि स्टेटस बार. |
02:36 | या टूलबार्सवरील प्रामुख्याने वापरले जाणारे ऑप्शन्स या ट्युटोरियलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत. |
02:47 | रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेण्यासाठी आता आपण ट्युटोरियलला सुरूवात करू. |
02:53 | स्टँडर्ड टूलबार वरील 'New' या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट उघडता येते. |
03:00 | किंवा मेनूबारवरील 'File' ऑप्शनवर क्लिक करून |
03:05 | नंतर 'New' ऑप्शनवर क्लिक करा आणि शेवटी 'Text Document' वर क्लिक करा. |
03:12 | तुम्हाला दिसेल की या दोन्ही पध्दतींनी रायटर ची नवीन विंडो उघडता येते. |
03:17 | आता 'Editor Area' मध्ये काही टेक्स्ट टाईप करू. |
03:21 | प्रथम 'RESUME' असे टाईप करू या. |
03:24 | लिहिलेले डॉक्युमेंट पुढील वापरासाठी सेव्ह करावे लागते. |
03:29 | त्यासाठी मेनूबारवरील 'File' वर क्लिक करा. |
03:33 | नंतर 'Save as' वर क्लिक करा. |
03:36 | तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल, तिथे 'Name' या फिल्डखाली तुम्ही फाईलचे नाव एंटर करणे अपेक्षित आहे. |
03:44 | आता 'resume' असे फाईलचे नाव एंटर करा. |
03:48 | 'Name' या फिल्डखाली 'Save in folder' आहे. |
03:53 | यात जेथे फाईल सेव्ह करायची त्या फोल्डरचे नाव द्या. |
03:58 | 'Save in folder' मधील 'Desktop' वर क्लिक करा. |
04:02 | जिथे फाईल सेव्ह करता येईल अशा फोल्डरची यादी तुम्हाला मेनूमध्ये दिसेल. |
04:08 | आता 'Desktop' या ऑप्शनवर क्लिक करा. फाईल 'Desktop' वर सेव्ह होईल. |
04:14 | तुम्ही 'Browse for other folders' वर देखील क्लिक करू शकता. |
04:18 | आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा. |
04:23 | आता डायलॉग बॉक्समधील "File Type” या ऑप्शनवर क्लिक करा. |
04:27 | इथे फाईलचे प्रकार किंवा फाईलच्या एक्सटेन्शनची यादी दिसेल ज्यात आपल्याला आपली फाईल सेव्ह करता येते. |
04:34 | लिबर ऑफिस रायटरचा Default File Type 'ODF text Document' आहे, जे आपल्या फाईलला 'odt' हे एक्सटेन्शन प्रदान करते. |
04:45 | 'ODT' हे 'Open Document Format' म्हणजे 'ODF' फॉरमॅटशी संबंधित असून, वर्ड डॉक्युमेंटसाठी हे ओपन स्टँडर्ड आहे. हे जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे. |
04:56 | भारत सरकारने 'e-Governance' साठी स्वीकारलेल्या Standards मध्ये वरील फॉरमॅटचा स्वीकार केलेला आहे. |
05:04 | लिबर ऑफिस Writer मध्ये उघडण्यासाठी फाईलdot odt फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त |
05:11 | आपण आपली फाईल dot doc, आणि dot docx फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो जी MS Officeच्या Word प्रोग्रॅम मध्ये सुध्दा उघडता येते. |
05:23 | इतर बहुसंख्य प्रोग्रॅम मध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाईल एक्सटेन्शन dot rtf म्हणजे 'Rich Text Format' . |
05:33 | आपण 'ODF Text Document' या ऑप्शनवर क्लिक करू या. |
05:37 | तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शनसमोर फाईल टाईप 'ODF Text Document' आणि कंसात 'dot odt' असे आलेले दिसेल. |
05:48 | सेव्ह बटणावर क्लिक करा. |
05:50 | हे तुम्हाला पुन्हा Writer विंडोवर घेऊन जाईल जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल. |
05:58 | आता रायटर मध्ये डॉक्युमेंट बनवण्याठी आपण तयार झालो आहोत. |
06:03 | वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त डॉक्युमेंट, dot html या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते, जे वेब पेज फॉरमॅट मध्ये असते. |
06:13 | ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते. |
06:17 | आता मेनूबार वरील 'File' या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save as' या ऑप्शनवर क्लिक करा. |
06:24 | आता 'File Type' या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर 'HTML Document' आणि कंसातopen office dot org Writer या ऑप्शनवर क्लिक करा. |
06:35 | हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला dot html हे एक्सटेन्शन देईल. |
06:40 | सेव्ह बटणावर क्लिक करा. |
06:42 | आता डॉयलॉग बॉक्समधील 'Ask when not saving in ODF format' हा ऑप्शन सिलेक्ट करा. |
06:50 | शेवटी 'Keep current format' या ऑप्शनवर क्लिक करा. |
06:55 | तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट dot html ह्या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे. |
07:00 | स्टँडर्ड टूलबार वरील 'Export directly as PDF' या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट PDF फॉरमॅट मध्ये export करता येते. |
07:10 | पूर्वीप्रमाणे फाईल सेव्ह करायची जागा निवडून घ्या. |
07:15 | हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग 'Export as pdf' या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता. |
07:24 | तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील 'Export' ऑप्शनवर क्लिक करा आणि मग 'Save' बटणावर क्लिक करा. |
07:32 | अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटची एक pdf फाईल बनेल. |
07:35 | प्रथम 'File' आणि मग 'Close' वर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू. |
07:40 | पुढे आपण लिबर ऑफिस रायटर मध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत. |
07:47 | 'resume.odt' हे डॉक्युमेंट उघडू या. |
07:51 | अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करा आणि नंतर 'Open' या ऑप्शनवर क्लिक करा. |
08:00 | स्क्रीनवर तुम्हाला डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल. |
08:04 | डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे. |
08:08 | त्यासाठी डायलॉग बॉक्समध्ये डाव्या बाजूला वरच्या कोप-यात छोट्या पेन्सिल बटणावर क्लिक करा. |
08:14 | त्याचे नाव 'Type a file name' असे आहे. |
08:16 | 'Location Bar' हे फिल्ड उघडेल |
08:19 | तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव इथे टाईप करा. |
08:24 | आता आपण 'resume' असे फाईलचे नाव लिहू या. |
08:27 | आता फाईलच्या नावांत 'resume' असे असलेली यादी दिसेल. त्यातून 'resume dot odt' निवडा. |
08:34 | आता 'Open' या बटणावर क्लिक करा. |
08:37 | तुम्हाला 'resume.odt' ही फाईल उघडलेली दिसेल. |
08:41 | त्याशिवाय वरील टूलबार मधील आयकॉनवर 'Open' या आयकॉनवर क्लिक करून आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रिया करून तुम्ही उपलब्ध असलेली फाईल उघडू शकता. |
08:52 | तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरल्या जाणा-या dot doc आणि dot docx या एक्सटेन्शनच्या फाईल देखील रायटर मध्ये उघडू शकता. |
09:03 | आता आपण बघणार आहोत की फाईलमध्ये बदल करून ती त्याच नवाने कशी सेव्ह करावी. |
09:10 | आता प्रथम माऊसचे डावे बटण क्लिक करून ते "RESUME” या टेक्स्टवर ड्रॅग करा. |
09:17 | अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाईट होईल. आता माऊसचे डावे बटण सोडून द्या. |
09:24 | टेक्स्ट हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे. |
09:26 | आता स्टँडर्ड टूलबारवरील 'Bold' या आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे टेक्स्ट बोल्ड झालेले दिसेल. |
09:33 | टेक्स्टला पानाच्या मध्यभागी आणण्यासाठी टूलबार वरील "Centered” या आयकॉनवर क्लिक करा. |
09:41 | तुम्हाला टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल. |
09:45 | आता आपण टेक्स्टचा फाँट साईज वाढवू या. |
09:48 | त्यासाठी टूलबार वरील 'Font Size' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करू. |
09:53 | ड्रॉप डाऊन मेनूतील '14' वर क्लिक करू या. |
09:57 | त्यामुळे टेक्स्टच्या फाँटचा साईज '14' पर्यंत वाढलेला दिसेल. |
10:01 | आता 'Font Name' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा. आणि नंतर 'Un Dotum' हा फाँट सिलेक्ट करा. |
10:09 | टूलबारवरील 'Save' या आयकॉनवर क्लिक करा. |
10:13 | तुम्हाला दिसेल की फाईलमध्ये बदल केल्यानंतरही ती फाईल त्याच नावाने सेव्ह झालेली आहे. |
10:21 | सेव्ह झाल्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला बंद करायचे असेल, |
10:25 | तर केवळ मेनूबारवरील 'File' या मेनूवर क्लिक करून 'Close' या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची फाईल बंद होईल. |
10:33 | आपण लिबर ऑफिस Writer वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण काय शिकलो ते थोडक्यात : |
10:43 | Writer ची प्राथमिक ओळख. रायटर मधील विविध टूलबार. |
10:45 | नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे. डॉक्युमेंट सेव्ह करणे. |
10:52 | रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे. |
10:55 | COMPREHENSIVE ASSIGNMENT. रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा. |
11:01 | practice.odt या नावाने ती सेव्ह करा. |
11:05 | 'This is my first Assignment' असे टेक्स्ट त्यात लिहा. फाईल सेव्ह करा. टेक्स्टला अंडरलाईन करा. |
11:13 | हेडिंग्जचा फाँट साईज 16 पर्यंत वाढवा. फाईल बंद करा. |
11:18 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:21 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:24 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:29 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:35 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:38 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
11:44 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:49 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:56 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:07 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |