Java/C2/Array-Operations/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:40, 16 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:02 Java तील Array Operationsवरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:07 येथे शिकणार आहोत,
00:09 Arrays class import करणे आणि,
00:12 arrays वरील प्राथमिक operations.
00:15 त्यासाठी

Ubuntu 11.10,

JDK 1.6 आणि

Eclipse 3.7.0 वापरणार आहोत.

00:25 आपल्याला Java तील arrays बद्दल माहिती असायला हवी.
00:30 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:35 Arrays वर कार्य करणा-या मेथडस Arrays नावाच्या class मधे उपलब्ध आहेत.
00:40 त्या वापरण्यासाठी class आयात करावा लागेल.
00:43 त्यासाठी स्टेटमेंट लिहू import java.util.Arrays semicolon
00:50 आता class मधील मेथड वापरू शकतो.
00:52 त्यासाठी मेथड नेमच्या आधी dot देतात.
00:56 म्हणून Arrays dot toString म्हणजे Arrays class मधीलtoString मेथड.
01:05 आता eclipse वर जाऊ.
01:08 आपण ArraysDemo नावाचा class आधीच तयार केला आहे.
01:13 आता class Arrays आयात करू.
01:16 import स्टेटमेंट class घोषित करण्यापूर्वी लिहावे लागते.
01:22 म्हणून public class आधी टाईप करा.
01:26 import java.util.Arrays semicolon
01:46 ह्या स्टेटमेंटचा अर्थ java मधे util नावाचे package असून त्यातील Arrays class आयात करा असा आहे.
01:59 आता array समाविष्ट करू.
02:01 main function मधे टाईप करा,
02:03 int marks open and close square brackets equal to महिरपी कंसात 2 comma, 7, 5, 4, 8
02:20 आता Arrays class मधील मेथड वापरून प्रिंट करण्यासाठी array चे रूपांतर string मधे करू.
02:28 त्यासाठी टाईप करा String mStr equal to Arrays dot toString आणि कंसात array चे नाव म्हणजेच marks लिहू .
02:50 ह्यातील toString मेथड array चे रूपांतर string मधे करेल.
02:56 आपण marks प्रिंट करू.
02:58 त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात mStr
03:12 आऊटपुट पाहण्यासाठी प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:18 आऊटपुटमधे दिसेल की toString मेथडमुळे array चे रूपांतर string मधे झाले आहे.
03:26 आता array तील घटक sortकरून बघू.
03:31 त्यासाठी 'Arrays dot toString ओळीच्या आधी टाईप करा Arrays dot sort कंसात Array चे नाव म्हणजेच marks.
03:46 Arrays class मधील sort मेथडने त्याकडे दिलेल्या arrayचे घटक सॉर्ट केले आहेत.
03:53 आपण marks ह्या array चे घटक sort करत आहोत आणि string मधे रूपांतर करून प्रिंट करत आहोत.
04:04 आऊटपुट पाहण्यासाठी प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:11 आपल्याला आऊटपुटमधे दिसेल sort मेथडने array चढत्या क्रमाने sort केला आहे.
04:19 sort मेथडमुळे array मधेच बदल झाला आहे.
04:22 ह्या प्रकारच्या sorting ला inplace sorting म्हणतात.
04:26 म्हणजे ज्या array तील घटक आपण sort करत असतो तोच sorting मुळे बदलतो.
04:33 आपण fill ही पुढची मेथड बघणार आहोत.
04:38 या fill मेथडला दोन arguments आहेत.
04:43 प्रोग्रॅममधील sorting line काढून टाका.
04:50 टाईप करा Arrays dot fill कंसात array चे नाव म्हणजेच marks
05:05 हे आपले पहिले argument आहे आणि दुसरे argument, array कुठल्या व्हॅल्यूने भरायचा ती किंमत. आपण ती 6 घेऊ. शेवटी semicolon देऊ. सेव्ह करून कार्यान्वित करा.
05:24 दिसेल की fill मेथड तिच्या नावानुसार array मधील सर्व घटक 6 या दिलेल्या किमतीने भरते.
05:32 copyOf ही पुढील मेथड पाहणार आहोत.
05:37 array marks मधील सर्व घटक आपण array marksCopy मधे कॉपी करू.
05:44 arrays dot fill ही ओळ काढून टाका.
05:48 आणि टाईप करा int marksCopy []; open and close square brackets semicolon
05:59 पुढील ओळीवर टाईप करा marksCopy = arrays. CopyOf कंस semicolon
06:25 ह्या मेथडला दोन arguments आहेत.
06:29 पहिले argument हे arrayचे नाव असते ज्यातून आपल्याला घटक कॉपी करायचे आहेत. म्हणजेच marks,
06:39 दुसरे argument किती घटक कॉपी करायचे ती संख्या. आपण 5 घटक कॉपी करू.
06:47 arrays dot toStrings मधे marks च्या जागी marksCopy लिहा.
06:55 सेव्ह करून कार्यान्वित करा.
07:01 आपल्याला दिसेल की marks ह्या array मधील घटक marksCopy ह्या array त कॉपी झाले आहेत.
07:10 कॉपी करण्याच्या घटकांची संख्या बदलून पाहू.
07:15 5 च्या जागी 3 लिहा.
07:19 सेव्ह करून कार्यान्वित करा.
07:24 आपल्याला दिसेल की फक्त पहिले तीन घटक कॉपी झाले आहेत.
07:31 array मधील एकूण घटकांच्या संख्येपेक्षा जास्त घटक कॉपी करण्यास सांगितल्यास काय होते ते पाहू.
07:39 3 च्या जागी 8 लिहा.
07:44 सेव्ह करून कार्यान्वित करा.
07:48 आपल्याला दिसेल की जास्तीचे घटक 0 ह्या default किंमतीने भरले गेले आहेत.
07:54 व्हॅल्यूजची range कॉपी कशी करतात ते पाहू.
07:58 copyOf च्या जागी copyOfRange लिहा आणि 8 च्या जागी 1 comma, 4 लिहा.
08:15 ही मेथड 1 ने सुरू करून 3 क्रमांकापर्यंतचे घटक कॉपी करेल.
08:27 सेव्ह करून कार्यान्वित करा.
08:31 आपल्याला दिसेल की घटक क्रमांक 1 ते 3 कॉपी झाले आहेत.
08:39 लक्षात घ्या की आपण 1, 4 ही arguments दिली होती.
08:47 तरी 4 क्रमांकाचा घटक कॉपी झाला नाही.
08:50 फक्त 3 क्रमांकापर्यंतचे घटक कॉपी झाले आहेत. range समाप्त करणा-या पॅरामीटरपेक्षा एक ने कमी अंकावर कॉपी होणे थांबते.
09:01 ही पध्दत वापरल्याने range ची सलगता अबाधित राहते.
09:07 (0, 4) मुळे 0 ते 3 अनुक्रमांकाचे घटक लिहिले जातील.
09:12 (4, 6) मुळे 4 ते 5 अनुक्रमांकाचे घटक लिहिले जातील.
09:17 त्यामुळे (0, 4) + (4, 6) = (0, 5) अशी range ची बेरीज नीट जुळते.
09:26 हा पाठ येथे संपतो.
09:31 आपण शिकलो,
09:33 Arrays class import करणे आणि,
09:36 arrays वरील प्राथमिक operations जसे की to string , sort, copy, fill.
09:44 असाईनमेंट.
09:46 Arrays.equals मेथड बद्दल वाचा आणि ती काय करते ते शोधा.
09:53 प्रकल्पाची अधिक माहिती
09:55 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:05 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:10 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:16 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
10:22 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:31 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:39 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:43 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana