Java/C2/Getting-started-java-Installation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:49, 3 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Getting started with Java: Installation वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00:09 | सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन JDK इनस्टॉल करणे, |
00:13 | Java कशासाठी? Java चे प्रकार आणि एप्लिकेशन्स. |
00:17 | येथे आपण वापरत आहोत, |
00:19 | उबुंटु वर्जन 11.10 आणि |
00:21 | Java डेवलपमेंट एन्वाइरन्मेंट JDK 1.6 |
00:26 | या ट्यूटोरियलच्या अनुसरणा साठी इंटरनेट ची जोडणी असणे आवश्यक आहे. |
00:31 | तुमच्या सिस्टम वर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर इनस्टॉल असायला हवा. |
00:35 | तुम्हाला लिनक्स मधील टर्मिनल, टेक्स्ट एडिटर आणि सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर चे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:43 | जर नसेल तर कृपया spoken-tutorial.org वर उपलब्ध असलेले लिनक्स वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा. |
00:51 | java प्रोग्राम कार्यान्वित करण्यासाठी JDK म्हणजेच Java डेवलपमेंट किट इनस्टॉल करण्याची गरज आहे. |
00:57 | JDK बदद्ल आणखी शिकण्याकरिता खालील लिंक ला भेट द्या. |
01:02 | JDK आता सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन JDK इनस्टॉल करू. |
01:07 | यासाठी रूट परमिशन्स आवश्यक आहे. |
01:10 | तुम्हाला रिपॉज़िटरी निवडणे हि माहित असणे आवश्यक आहे. |
01:14 | अगोदर उल्लेख केलेल्या लिनक्सवरील आवश्यक ट्यूटोरियल मध्ये हे स्पष्ट केले आहे. |
01:19 | डेस्कटॉप च्या डाव्या कोपऱ्यावर तुम्हाला टास्कबार दिसेल. |
01:25 | सर्वात वर डॅशहोम दिसेल. |
01:28 | डॅशहोम वर क्लिक करा. |
01:31 | सर्चबार मध्ये Synaptic (सिनॅप्टिक) टाइप करा. . |
01:35 | तुम्हाला येथे Synaptic Package Manager( सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर ) दिसेल. |
01:38 | Synaptic Package Manager ( सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर ) वर क्लिक करा. |
01:42 | तुम्हाला ऑथेनटिकेशन साठी पासवर्ड विचारला जाईल. |
01:47 | पासवर्ड टाइप करून Authenticate (ऑथेनटिकेट) वर क्लिक करा.. |
01:56 | हे सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडेल. |
02:03 | आता Quick Filter (क्विक फिल्टर) बॉक्स मध्ये jdk टाइप करा. |
02:08 | आपण openjdk-6-jdk नामक पॅकेज पाहत आहोत. |
02:13 | त्यावर राइट-क्लिक करा आणि इन्स्टलेशन साठी मार्क वर क्लिक करा. |
02:17 | नंतर Apply (अप्लाइ)वर क्लिक करा. |
02:20 | तुम्हाला मार्क केलेले बदल सुनिश्चित करण्यास विचारले जाईल. |
02:24 | To be Installed (टू बी इनस्टॉल्ड )वर क्लिक करा आणि नंतर Apply (अप्लाइ)वर क्लिक करा. |
02:30 | इन्स्टलेशन काही सेकंद घेईल. |
02:38 | आता आपण पाहतो की, openjdk-6-jdk पर्याय हिरव्या रंगात आहे. |
02:48 | अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे. |
02:52 | चला आता इन्स्टलेशन पडताळू, यासाठी Ctrl , Alt आणि T किज एकत्रित दाबून टर्मिनल उघडा. |
03:03 | मी अगोदरच माझे टर्मिनल उघडले आहे. |
03:06 | कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाइप करा java space hyphen version आणि एंटर दाबा. |
03:15 | आपण पाहतो की jdk चा वर्जन नंबर प्रदर्शित झाला आहे . |
03:20 | तुम्ही वापरलेल्या वितरणा अनुसार तुमचा वर्जन नंबर वेगळा असु शकतो. |
03:26 | तर आपण यशस्वीरित्या jdk इनस्टॉल केले आहे. |
03:30 | आता एक साधा Java प्रोग्राम कार्यान्वित करून हे कार्य करते का ते पाहु. |
03:35 | मी खालील कोड अगोदरच TestProgram dot java नावाच्या फाइल मध्ये सेव केला होता. |
03:42 | हा कोड संकलित करून कार्यान्वित करू. |
03:45 | हा कोड टर्मिनल वर We have successfully run a Java Program असे प्रदर्शित करेल. |
03:53 | पुन्हा टर्मिनल वर जाऊ. |
03:57 | लक्ष द्या मी Home Directory (होम डाइरेक्टरी ) मध्ये TestProgram dot java ही फाइल सेव केली होती. |
04:03 | आणि सध्या मी Home Directory (होम डाइरेक्टरी ) मध्ये आहे. |
04:07 | कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा, javac space TestProgram dot java. |
04:19 | हे कोड संकलित करण्यासाठी आहे. |
04:21 | एंटर दाबा. |
04:25 | आता मी कोड कार्यान्वित करते. |
04:27 | टाइप करा, java space TestProgram आणि एंटर दाबा. |
04:35 | आपल्याला We have successfully run a java program असे आउटपुट मिळेल. |
04:44 | अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे. |
04:48 | आता स्लाइड्स वर परत जाऊ. |
04:51 | आता मी Java का उपयोगी आहे हे स्पष्ट करेल. |
04:55 | Java हे सोपे आहे. |
04:57 | हे "ऑब्जेक्ट ओरियेनटेड" आहे. |
04:59 | हे एक स्वतंत्र मंच आहे. |
05:01 | हे सुरक्षित आहे. Java कडे उच्च कार्य आहे. |
05:04 | Java हे मल्टी – थ्रेडड आहे. |
05:07 | आता आपण Java चे काही प्रकार आणि एप्लिकेशन्स पाहु. |
05:11 | -JSP, किंवा Java सर्वर पेजस: हे सामान्य HTML टॅग्स सहित कोड वर आधारित आहे. |
05:18 | JSP हे गतिमान वेब पेजस बनविन्यास मदत करते. |
05:22 | -Java Applets: हे वेब एप्लिकेशन्स ला इंटर एक्टिव वैशिष्ट्य पुरवीण्यास वापरले जाते. |
05:28 | -J2EE किंवा Java एंटरप्राइज़ एडिशन: J2EE कंपनीज़ वापरते. |
05:33 | हे XML संरचित डॉक्युमेंट्स बदलण्यास उपयोगी आहे . |
05:38 | -JavaBeans: JavaBeans हे पुन्हा वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर घटक आहे . |
05:43 | हे नवीन आणि प्रगत एप्लिकेशन्स बनवण्यास वापरल्या जाऊ शकते. |
05:47 | -Mobile Java: हे विविध मनोरंजक साधनांसाठी वापरले जाते, जसे की, मोबाइल फोन. |
05:53 | तर या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
05:56 | सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन JDK इनस्टॉल करणे, |
05:59 | java प्रोग्राम संकलित करून कार्यान्वित करणे, |
06:02 | Java वापरण्याचे फायदे, |
06:04 | Java चे प्रकार आणि एप्लिकेशन्स. |
06:08 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:14 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:17 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
06:22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
06:24 | स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:27 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:30 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
06:36 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:41 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि ,गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:47 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:52 | http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
06:58 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:01 | मी कविता साळवे आपला निरोप घेते. |
07:04 | सहभागासाठी धन्यवाद. |