Inkscape/C2/Create-and-edit-shapes/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:10, 3 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Inkscape वापरून Create and edit shapes वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्युटोरियलमध्ये, आपण Inkscape बद्दल जाणून घेऊया.
00:10 आपण Inkscape इंटरफेस बद्दल आणि मूलभूत आकृति कसे तयार करणे,
00:16 हॅंडल्स वापरून कलर फिल करणे आणि आकृती बदलणे ह्या बद्दल शिकणार आहोत.
00:20 ह्या ट्यूटोरियलसाठी मी वापरत आहे, उबंटू लिनॅक्स 12.04 OS
00:25 Inkscape वर्जन 0.48.4
00:29 Dash home वर जा आणि "Inkscape" टाईप करा.
00:34 आपण लोगो वर डबल क्‍लिक करून Inkscape उघडू शकतो.
00:38 इंटरफेस वर सर्वात वरती, आपल्याला menu bar आणि Tool controls bar सापडतील.
00:44 हे सर्वात वर आणि बाजूला rulers च्या नंतर आहे.
00:48 इंटरफेसच्या उजव्या बाजुला वर, आपल्याला Command bar आणि Snap controls bar सापडतील.
00:54 Tool box इंटरफेसच्या डाव्या बाजूला आहे.
00:58 मध्यभागी, canvas आहे. जेथे आपण आपला ग्रॅफिक्स ड्रॉ करूया.
01:03 इंटरफेस च्या तळाशी, आपण color palette आणि status bar पाहू शकतो.
01:09 आता, Inkscape मध्ये काही मूलभूत आकृत्यांना तयार आणि एडिट करणे जाणून घेऊ.
01:14 सर्व प्रथम, आपण Select आणि Transform टूल बद्दल शिकणार आहोत. ह्याला सामान्यतः Selector टूल म्हटले जाते.
01:22 हे एक अतिशय महत्वाचे टूल आहे. आपल्याला हे Tool box च्या डाव्या बाजूला सापडेल.
01:28 ह्या टूल सोबत, आपण ऑब्जेक्ट्स निवडू शकतो, canvas वर त्यांना ट्रॅन्सफॉर्म आणि मूव करू शकतो.
01:34 एक नवीन Inkscape डॉक्युमेंट उघडण्यास, File वर क्‍लिक करा आणि नंतर New निवडा आणि Default वर क्‍लिक करा.
01:41 अस्तित्वातील Inkscape' डॉक्युमेंट उघडण्यास, File वर क्‍लिक करा आणि नंतर Open निवडा.
01:47 'drawing_1.svg' फाईल उघडू, जी आपण पुर्वी बनवली होती.
01:53 मी ती Documents फोल्डर मध्ये सेव्ह केली आहे. उजव्या बाजूला खाली Open बटणावर क्‍लिक करा.
02:01 आपण पूर्वी एक आयत बनवले होते.
02:04 आता, आयत वर क्लिक करा.
02:06 डिफॉल्ट रूपात, आयताचा रंग हिरवा आहे.
02:09 रंग लालमध्ये बदलण्यास, आपण खालील color palette वापरू.
02:14 त्यामुळे, मी कर्सर तळाशी घेऊन जाईल आणि लाल रंग वर क्लिक करेल.
02:18 आयत मध्ये रंगाच्या बदलाकडे लक्ष द्या.
02:22 आता आयत हलवू. असे करण्यासाठी, आपल्याला आयत वर कुठेही क्लिक केले पाहिजे.
02:27 माऊस बटण न सोडता, canvas वर आपण जेथे हवे तेथे तो ड्रॅग करा.
02:33 नंतर माऊस बटण सोडा.
02:37 चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी जूम-इन करा. असे करण्यासाठी Ctrl की दाबा आणि माऊस वरील स्क्रोल बटणाचा वापर करा.
02:46 आयतच्या आजू-बाजूच्या एरोज वर लक्ष द्या. ह्यांना हॅंडल्स म्हटले जाते, ज्याचा उपयोग आपण स्केल आणि रोटेट करण्यासाठी करू.
02:57 जेव्हा कर्सर कोणत्याही हॅंडल्स वर जातो, तेव्हा हॅंडल्सच्या रंगात बदल होतो.
03:02 हे सूचित करते की, हॅंडल्स निवडलेले आहे आणि आकार बदलण्याकरिता तयार आहे.
03:08 आयातचे स्केल किंवा आकृती बदलण्यास, कुठल्याही एका हॅंडल्सच्या कोपर्यावर क्‍लिक करून ड्रॅग करा.
03:17 जर तुम्हाला आकृतीचा अनुपात समान ठेवायचा असेल, तर आकृती बदलण्याकरिता Ctrl कि दाबून ठेवा.
03:24 आयतची लांबी किंवा रुंदी बदलण्यासाठी, आयतच्या कोपर्यावर कोणत्याही एका हॅंडलचा वापर करा.
03:32 एकतर डाव्या किंवा उजव्या बाजूला, हॅंडल वर क्लिक आणि ड्रॅग करा.
03:39 आयतच्या रुंदीमध्ये बदलाकडे पाहा.
03:43 आता, आयतची उंची बदलू.
03:46 अशा प्रकारे आपण एकतर हॅंडलच्या वरती किंवा खाली क्‍लिक आणि ड्रग करूया.
03:51 आयतच्या उंचीमध्ये बदलाकडे पाहा.
03:54 आम्ही स्वतः Tool controls बारवर Width आणि Height पॅरमीटर्सला बदलून आयतची रुंदी आणि उंची बदलू शकतो.
04:03 मी Width 400 आणि Height 200 नि बदलेल.
04:07 आयतच्या आकरामध्ये बदलाकडे लक्ष द्या.
04:10 त्याचप्रकारे, तुम्ही X आणि Y अक्ष पोज़िशन बदलून ऑब्जेक्टला मूव करू शकता.
04:19 आता जाणून घेऊ की आयत कसे रोटेट करणे.
04:24 असे करण्यासाठी, पुन्हा एकदा आयतवर क्लिक करा.
04:27 लक्ष द्या की आता, कोपऱ्यातल्या 'हँडल' चा आकार बदलला आहे, हे दाखवते की हे रोटेशनसाठी तयार आहे.
04:34 मी हँडलच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर क्लिक करेल आणि आयत रोटेट करेल.
04:44 आपण कोणत्याही बाजूच्या हॅंडल्सवर क्लिक आणि ड्रॅग करून आयतला तिरपा करू शकतो.
04:50 मी डावीकडे मध्यम हँडल वर क्लिक करते आणि आयतला तीरपे करण्यास हे वर किंवा खाली ड्रग करते.
04:56 माझ्या द्वारे केलेल्या बदलाकडे लक्ष द्या.
04:59 आपण अन्य ट्यूटोरियलमध्ये ह्या हॅंडल्स वापरून काही अधिक तपशील जाणून घेऊ.
05:04 आता ह्या आकृतीची निवड रद्द करा.
05:06 असे करण्यास, कॅनव्हास क्षेत्रात किंवा कॅनव्हास सीमाच्या बाहेर कुठेही क्लिक करा.
05:11 माउसला परत Tool box वर घेऊन जा आणि त्याच rectangle टूलवर फिरवा.
05:17 टूल टीप म्हणतो की, आपण ह्या टूलचा वापर करून आयत आणि चौकोन काढू शकतो.
05:22 तर पहिले मी ह्या टूलवर क्लिक करेल.
05:25 एक चौकोन काढण्यास, फक्त Ctrl की दाबून ठेवा आणि Canvas वर ड्रग करा.
05:30 मी त्याचा रंग गुलाबी मध्ये बदलते.
05:32 तुमच्यासाठी एक असाईनमेंट.
05:34 Tool box मधून Create circles and ellipses टूल निवडा.
05:38 Ctrl की वापरा, कॅनव्हास वर एक वर्तुळ काढा.
05:42 ह्याला निळा रंग द्या.
05:44 हा माझा वर्तुळ आहे.
05:46 आता या वर्तुळामध्ये बदल कसे करायचे ते शिकू.
05:49 तुम्ही वर्तुळाची आकृती एक कंस किंवा रेषाखंड मध्ये बदलण्यास Start आणि End पॅरमीटर्स बदलू शकता.
05:56 येथे Tool controls bar मध्ये 3 पर्याय आहेत, जे आकृतीमध्ये मध्यभागी जाण्यास मदत करते.
06:03 मी Start पॅरमीटरला 100 आणि End पॅरमीटरला -50 शी बदलते.
06:09 आपण पाहुया की वर्तुळाची आकृती आता रेषाखंडाच्या आकृतीमध्ये बदलली आहे.
06:14 आता मी Arc आइकानवर क्‍लिक करेल आणि आपण आकृतीमध्ये बदल पाहू.
06:19 आपण circle आइकनवर क्‍लिक करून, वर्तुळाच्या आकृतीला पुन्हा बदलू शकता.
06:25 आता, आपल्या canvas वर वर्तुळाची आकृती जवळून पाहू.
06:30 आकृती मध्ये 2 resize हॅंडल्स आणि 2 कंस हॅंडल्स वर लक्ष द्या.
06:37 2 resize हॅंडल्सचा वापर वर्तुळाच्या आकृतीला लंबगोल आकृतीमध्ये बदलण्यास केले जाऊ शकते.
06:44 ह्या हॅंडल्सना वरती-खाली किंवा डाव्या-उजव्या दिशामध्ये ड्रग करा.
06:53 आकृती मध्ये बदल पहा.
06:56 2 कंस हॅंडल्स एक मेकांना ओवरलॅप करतात. कंस हॅंडल वर क्‍लिक करा आणि ह्याला anti-clockwise मध्ये मूव करा.
07:04 आता आपण दोन्ही कंस हॅंडल्स पाहू शकतो.
07:08 आपण हे कंस हॅंडल्स वापरुन वर्तुळाची आकृती कंस किंवा रेषाखंडाच्या आकृतीमध्ये बदलू शकतो.
07:14 त्यांना clockwise किंवा anti-clockwise दिशांमध्ये मूव करून (हलवून) तसेच आकृती मध्ये बदल पाहू शकता.
07:24 आता आपण Tool box मधील आयत टूलवर क्‍लिक करून नंतर चौकोनवर क्‍लिक करू.
07:30 आकृतीच्या वर उजव्या कोपऱ्यात 2 रीसाइज हॅंडल्स आणि 2 कंस हॅंडल्स पहा.
07:40 पूर्वीप्रमाणे, 2 कंस हॅंडल्स एक मेकांवर ओवरलॅप होतात.
07:43 कोणत्याही एका कंस हॅंडल वर क्‍लिक करून clockwise (क्लॉकवाइज़) मूव करा.
07:48 आता, आपण दोन्ही कंस हॅंडल्स पाहू शकतो.
07:51 आपण हे हॅंडल्स वापरुन चौकोनच्या कडांवर गोल करू शकतो.
07:56 त्यांना clockwise किंवा anti-clockwise दिशांमध्ये मूव करून आकृती मध्ये बदल पहा.
08:02 आता Tool box मध्ये Stars आणि polygons टूलवर क्‍लिक करून एक बहुभुजाकृती तयार करू.
08:08 हे circle टूलच्या खाली उजव्या बाजूला आहे. तर त्यावर क्‍लिक करा.
08:13 आपण ह्या सारखेच एक बहुभुजाकृती काढू आणि हिरवा रंग देऊ.
08:20 डिफॉल्ट रूपात, एक 5 बाजू असलेला बहुभुजाकृती म्हणजे पंचकोन काढला आहे.
08:24 Tool controls बारवर पहा. येथे, हे दाखवते की बहुभूजाच्या कोपऱ्यावर संख्या 5 आहे.
08:32 तुम्ही संख्या 4 करून चौकोन आणि ह्याला 3 करून त्रिकोण तयार करू शकता.
08:39 हे वाढवून, आपण पंचकोन, षटकोन आणि इतर तयार करू शकतो.
08:44 बहुभुजाकृती वर रीसाइज हॅंडल पहा.
08:47 आपण ह्याचा वापर बहुभुजाकृतीची आकृती बदलणे किंवा रोटेट करण्यास करू शकतो.
08:52 Tool controls बार मध्ये, polygon आइकानच्या पुढे star आइकनवर क्‍लिक करून ह्याला स्टारची आकृती मध्ये बदलू.
09:00 एक टिप आणि एक संयुक्त स्टारची आकृती वर 2 हॅंडल्स पहा.
09:06 स्टारची आकृती बदलणे किंवा रोटेट करण्यास टिप वर हॅंडल क्‍लिक आणि ड्रग करा.
09:12 आपण इतर हॅंडलचा वापर करून स्टारच्या आकृतीला तिरपा करून बदलू शकतो.
09:17 त्यावर क्‍लिक करा, आणि क्लॉकवाइज़ किंवा एन्टी-क्लॉकवाइज़ दिशांमध्ये मूव करा तसेच आकृती आणि आकारावर लक्ष द्या.
09:25 आपण ह्या ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात.
09:30 आपण Inkscape इंटरफेस बद्दल शिकलो.
09:34 आपण मूलभूत आकृती जसे आयत, चौकोन, वर्तुळ, लंबगोल, बहुभुजाकृती आणि स्टार तयार करणे देखील शिकलो.
09:42 हॅंडल्स चा वापर करून आकृत्यांमध्ये बदल करणे आणि रंग भरणे देखील शिकलो.
09:46 तुमच्यासाठी असाइनमेंट.
09:49 निळ्या रंगासह एक आयतची आकृती तयार करा,
09:52 लाल रंगासह एक वर्तुळाची आकृती तयार करा,
09:54 हिरव्या रंगात 7 बाजू असलेला स्टार तयार करा.
09:58 आपली पूर्ण असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
10:03 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:09 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:22 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
10:28 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:32 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:38 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
10:47 आपण ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:50 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana