Drupal/C3/Controlling-Display-of-Images/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या 'Controlling Display of Images' वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोतः 'Image styles' आणि 'photo gallery view'. |
00:12 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत, 'उबंटु लिनॅक्स ऑपरेटिंग सिस्टीम', 'Drupal' 8 आणि 'Firefox' वेब ब्राउजर. |
00:21 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:25 | आधी तयार केलेली वेबसाईट उघडू. |
00:29 | ड्रुपलमधे साईटच्या गरजेनुसार आपण इमेजचा साईज आणि स्केल बदलू शकतो. |
00:37 | ड्रुपल मूळ इमेज घेतो आणि आपल्याला हवे त्याप्रमाणे त्याची साईज आणि स्केल बदलतो. |
00:43 | नंतर फाईलचे हे वर्जन सेव्ह करतो. |
00:46 | 'Configuration' क्लिक करा. |
00:48 | आपण येथे 2 'image styles' बनवणार आहोत. |
00:51 | खाली स्क्रोल करा आणि 'MEDIA tab' वर जा. |
00:54 | येथे आपण 'Image Styles' पाहू शकतो. यावर क्लिक करा. |
00:58 | आपण 'table' साठी 'Image style' बनवू जे आपण सेटप केले आहे. |
01:03 | तसेच पुढच्या 'view' साठीही करू जो आपण 'logos' च्या ग्रिडसाठी बनवणार आहोत. |
01:09 | 'Add image styles' क्लिक करा. |
01:12 | 'Image style name' मधे आपण टाईप करू "Upcoming Events 150 x 150". |
01:19 | लक्षात घ्या की ड्रुपल आपल्यासाठी 'machine name' भरेल. |
01:23 | हे आपले 'Image style name' आहे. |
01:26 | आता 'Create new style' क्लिक करा. |
01:29 | डाव्या बाजूला, मूळ इमेज, 600 बाय 800 pixels आहे आणि इमेजचे एडिट केलेले वर्जन उजवीकडे आहे. |
01:38 | 'EFFECT' खाली ड्रॉपडाउनमधे 'Select a new effect' क्लिक करा. |
01:42 | या सूचीत अनेक पर्याय दाखवले गेले आहेत. यातील 'Scale and crop' इफेक्ट निवडू. |
01:49 | तुमच्या आवडीनुसार कुठलाही पर्याय निवडू शकता, उदाहरणार्थ, 'Rotate, Resize' किंवा अन्य कोणताही. |
01:56 | 'Add' बटनावर क्लिक करा. |
01:58 | 'Width' '150' आणि 'Height' '150' टाईप करा. |
02:02 | लक्षात ठेवा की मूळ इमेजपेक्षा 'Width' आणि 'Height' जास्त नसावी. |
02:07 | असे केल्याने इमेज पिक्सलेट केली जाते. |
02:11 | 'Add effect' क्लिक करा. |
02:13 | येथे आपली नवी 'Image Style' आहे. उजवीकडील इमेजमधे आपण पाहू शकतो की आता स्केल्ड आणि क्रॉप्ड झाली आहे. |
02:22 | आणखी एक बनवू. 'Image styles' क्लिक करा. आणि नंतर 'Add image styles' बटनावर क्लिक करा. |
02:29 | यावेळी, 'Image style name' मधे टाईप करू: "photo gallery of logos" |
02:35 | 'Create new style' बटनावर क्लिक करा. |
02:38 | ही इमेज तुमच्या मशीनवरील कोणत्याही 'photo gallery' मधे असू शकेल. |
02:42 | हे कोणत्याही इमेजसाठी, कोणत्याही फिल्डमधे आणि कंटेंटमधे करू शकतो. |
02:47 | पुन्हा 'Select a new effect' क्लिक करा. आणि परत 'Scale and crop' पर्याय निवडा. |
02:53 | 'Add' बटनावर क्लिक करा. आता 'Width' '300' आणि 'Height' '300' टाईप करा. |
03:00 | आणि परत 'Add effect' बटनावर क्लिक करा. |
03:03 | लक्षात घ्या की उजवीकडील इमेज आता 300 बाय 300 या नव्या डायमेन्शनमधे आहे. |
03:09 | येथे दिसेल की ड्रुपल प्रत्येक 'Image style' साठी इमेजचे एक वर्जन बनवतो आणि त्यांना 'site' वर संचित करतो. |
03:18 | 'Structure' क्लिक करा. नंतर 'Views' क्लिक करा. |
03:21 | आता Edit क्लिक करा. आपल्या 'Upcoming Events view' ला अपडेट करा. |
03:27 | 'Event Logo' क्लिक करा. आणि 'Image Style' ला 'Upcoming Events' ने बदला. |
03:33 | नंतर 'Apply' क्लिक करा. |
03:36 | प्रिव्ह्यू सेक्शनमधे खाली स्क्रोल करा. आपल्याला दिसेल की सर्व लोगो युनिफॉर्म आहेत. |
03:42 | आता 'Save' क्लिक करा. |
03:45 | 'Back to site' क्लिक करा. हा आपल्या वेबसाइटवरील आपला व्ह्यू आहे. |
03:50 | अशापध्दतीने 'Image Styles' कार्य करतात. |
03:53 | आता या सर्व इवेंट्ससाठी, ग्रिड लेआउट स्वरूपात नवा view बनवू. |
03:59 | असे करण्यासाठी, 'Structures' क्लिक करा. नंतर 'Views' आणि 'Add new view' क्लिक करा. |
04:05 | आपण ह्यास 'Photo Gallery' नाव देऊ. |
04:09 | 'view' सेटिंगला 'Events' प्रकाराचा 'Content' सेट करा. |
04:14 | 'photo-of-the-day' किंवा इमेज गॅलरीसाठी ह्या 'view' चा कोणत्याही इवेंटमधे वापर करता येईल. |
04:22 | 'Create a page' क्लिक करा. |
04:25 | खाली स्क्रोल करा आणि 'fields' साठी 'Grid' क्लिक करा. |
04:29 | लक्षात ठेवा, आपण ड्रॉप-डाउन मधे ड्रुपलने दिलेल्या कोणताही इतर पर्याय निवडू शकतो. |
04:36 | 'Items to display' फिल्ड मधे, '9' निवडा. हा 3 बाय 3 grid दाखवतो. |
04:42 | 'Create a menu link' चेक करा. |
04:46 | 'Menu' ड्रॉप-डाउनमधे, 'Main navigation' पर्याय निवडा. |
04:51 | परत 'Save and Edit' क्लिक करा. |
04:54 | आपले 5 निकष परत तपासू. 'Display' हे 'Page' आहे. |
04:59 | 'Format' हे एक 'Grid' आहे. |
05:01 | येथे 'Title' नावाचे केवळ एक 'Field' आहे. |
05:04 | आणि शेवटीः 'Filter' आणि 'Sort Criteria' |
05:08 | आत्तासाठी आपण ते असेच ठेवू. |
05:12 | खाली स्क्रोल करा. येथे आपल्याला दिसेल की आपल्याकडे 4 'columns' आणि 9 'events' आहेत. |
05:17 | 'Format' मधे कॉलम्सची संख्या बदलण्यासाठी, 'Settings' पर्याय निवडा. |
05:22 | नंतर कॉलम्सची संख्या 3 करा आणि 'Apply' क्लिक करा. |
05:28 | हे आपल्याला 3 बाय 3 ग्रिड देईल. |
05:31 | 'Fields' मधे 'Add' क्लिक करा. |
05:34 | 'Event Logo' वर जाऊ, यावर चेक-मार्क करू आणि परत 'Apply' क्लिक करू. |
05:40 | यावेळी, 'Image style मधे photo gallery of logos' निवडू. |
05:45 | 'Link image to' मधे 'Content' निवडा आणि 'Apply' क्लिक करा. |
05:50 | लगेच खाली प्रिव्ह्यू सेक्शन मधे ग्रिड दाखवले जाईल. |
05:55 | आपल्याला दिसेल की ग्रिड लेआउट 'table' पेक्षा वेगळा आहे. |
06:00 | सर्व 'fields' ज्यांना आपण नोडमधून घेतले आहे, एका सेलमधे आहेत. |
06:05 | आणि आपण ठरवू शकतो की आपल्याला किती सेल्स दाखवायच्या आहेत. |
06:09 | 'Save' क्लिक करा. |
06:12 | 'Back to site' बटनावर क्लिक करा. आणि नंतर 'Photo Gallery' क्लिक करा. |
06:17 | हे चांगले दिसत आहे. |
06:19 | मोबाइलसारख्या छोट्या उपकरणांवर, आपले 3 बाय 3 ग्रिड दाखवण्यासाठी सर्व इमेजेसचे स्केल कमी होते. |
06:26 | आणि हेच ड्रुपल ग्रिडसाठी करतो. |
06:29 | याचबरोबर आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात, |
06:34 | या पाठात शिकलो, 'Image styles' आणि 'photo gallery view' . |
06:44 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
06:53 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
07:00 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:08 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:19 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |