Digital-Divide/C2/How-to-use-FOSSEE-Netbook/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:08, 12 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. IIT मुंबईमधे रूपरेखा तयार केलेल्या कमी किमतीच्या FOSSEE Netbook वरील स्पोकन ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:09 आपण शिकणार आहोत,
00:12 FOSSEE Netbook चा डेस्कटॉप,
00:14 त्या सोबत येणारे काही प्रोग्रॅम्स,
00:17 आणि नव्या रिलीजेससाठी ऑपरेटिंग सिस्टीम अपडेटस.
00:22 आपण याला FOSSEE Netbook म्हणतो कारण,
00:26 FOSSEE Team ने याची स्पेसिफिकेशन्स बनवली आहेत.
00:30 ऑपरेटिंग सिस्टीममधे सुयोग्य बदल केले आहेत.
00:32 त्याचे सॉफ्टवेअर वितरीत केले आहे.
00:35 आणि त्याची अपडेटस आणि ट्रेनिंग पुरवली आहेत.
00:38 ही ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु लिनक्सच्या नव्या आवृत्तीपासून तयार केली आहे.
00:43 FOSSEE Netbook आयआयटी मुंबईत सुरु केलेले कमी किमतीचा लॅपटॉप आहे.
00:49 दिलेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार याचे उत्पादन Basics Comtech Pvt. Ltd ने केले आहे.
00:55 याची रचना शिक्षण आणि संशोधनासाठी केली गेली आहे.
00:57 आयात शुल्क व कर सोडून त्याची अंदाजे किंमत "रू 5,000” असेल.
01:03 हा पाठ रेकॉर्ड करण्यास, FOSSEE Netbook,
01:08 GNU / लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे FOSSEE डिस्ट्रीब्युशन
01:12 आणि Kazam स्क्रीन रेकॉर्डर वर्जन “1.4.5” वापरत आहोत.
01:17 आता FOSSEE Netbook विषयी जाणून घेऊ.
01:20 हे FOSSEE Netbook आहे.
01:24 ह्याचे वजन अंदाजे “700” ग्रॅम आहे.
01:28 डिस्प्ले “10 इंच" असून टचपॅड सुविधा उपलब्ध आहे.
01:31 फ्रंट कॅमेरा आणि दोन बिल्ट इन स्पीकर्स आहेत.
01:35 दोन रेग्युलर USB ports, एक मिनी HDMI port आणि एक LAN port आहे.
01:43 ऑडिओ सपोर्टसाठी हेडफोन आणि माईकचे स्वतंत्र जॅक उपलब्ध आहेत.
01:49 ह्यात “32GB” पर्यंत सपोर्ट करणारा SD card चा “slot” आहे.
01:56 ह्यामधे 5000 mAH ची बॅटरी आहे.
1.58 वापरत असलेल्या प्रोग्रॅमनुसार ती चार ते आठ तासांचा बॅकप देते.
02:04 ह्यामधे 1GB RAM आणि 8GB ROM आहे.
02:07 wi-fi आणि Bluetooth सपोर्ट देखील आहे.
02:11 हार्डवेअरच्या स्पेसिकेशन्सबद्ल अधिक माहितीसाठी http://netbook.fossee.in साईटला भेट द्या.
02:19 FOSSEE OS च्या रिकव्हरी/अपडेट/री-इन्स्टॉलेशन साठी युजरने पुढील गोष्टी कराव्यात.
02:25 netbook.fossee.in/recovery मधे दिलेल्या सूचनांनुसार sdcard तयार करा.
02:33 FOSSEE Netbook बंद करा.
02:35 स्लॉटमधे sdcard घालून, पॉवरचे बटण बराच वेळ दाबून धरा.
02:41 "'Entering recovery mode...'" मेसेज स्क्रीनवर दाखवला गेला पाहिजे.
02:46 पुढील स्क्रीनमधे दाखवलेला योग्य पर्याय निवडा.
02:51 येथे 'FOSSEE OS असलेला FOSSEE Netbook चा डेस्कटॉप दिसेल.
02:57 डिफॉल्ट रूपात डेस्कटॉपवर काही आयकॉन्स दिसतील.
03:01 कुठल्याही संगणकाप्रमाणे आयकॉनवर डबल क्लिक केल्यावर ते ऍप्लिकेशन उघडता येते.
03:09 येथे उजवीकडे खाली Network connection आयकॉन आहे.
03:15 सध्या तो No network connection असे दाखवत आहे.
03:18 network ची जोडणी कशी करायची ते पाहू.
03:21 “wi-fi” कनेक्शनसाठी आयकॉनवर क्लिक करा.
03:25 आधीपासूनच उपलब्ध असलेल्या कनेक्शन्सची सूची दाखवली जाईल.
03:30 तुमच्याकडे wi-fi network चा पासवर्ड असल्यास, यापैकी कोणाशीही कनेक्ट करू शकता.
03:35 आपल्या मशीनवर उपलब्ध असलेल्या नेटवर्कपैकी एक निवडू.
03:40 नंतर पासवर्ड टाईप करून Connect बटणावर क्लिक करू.
03:46 सिस्टीम ट्रेमधील नेटवर्कच्या आयकॉनकडे लक्ष द्या.
03:50 आता आयकॉन बदलला आहे.
03:52 हे आपण ज्या नेटवर्कशी जडलेले आहोत त्याचे नाव दाखवत आहे.
03:57 आता डेस्कटॉपच्या डाव्या बाजूच्या कोप-यात खाली बघा.
04:03 येथे Start मेनू दिसेल, जो मुख्य मेनू आहे.
04:07 Start मेनूमधे उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशनची वर्गवार सूची दिसेल.
04:14 सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशनची सूची बघण्यास प्रत्येक कॅटॅगरीवर क्लिक करा.
04:21 त्यापैकी काही पाहू.
04:24 Education ह्या भागात ही सर्व ऍप्लिकेशन्स आहेत.
04:28 येथे GeoGebra दिसेल.
04:31 बीजगणित आणि भूमितीच्या संकल्पना शिकण्यास, हे एक उत्तम विनामूल्य सॉफ्टवेअर आहे.
04:37 विशेषतः हे इयत्ता सहावी वा पुढील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
04:41 स्पोकन ट्युटोरियल टीमने GeoGebra शिकण्यास उत्तम असे पाठ बनवले आहेत.
04:47 हे http://spoken-tutorial.org वर विनामूल्य उपलब्ध आहेत.
04:53 ही लिंक ब्राऊजर विंडोमधे अशी दिसेल.
04:57 तुम्ही बघू शकता की हे पाठ अनेक भारतीय भाषांमधे उपलब्ध आहेत.
05:03 साईटच्या पानावर दिसत असलेली अशी अनेक विनामूल्य सॉफ्टवेअर्स नेटबुकवर उपलब्ध आहेत.
05:10 आपण ती लवकरच पाहू.
05:13 पुन्हा Start menu वर जाऊ.
05:15 Jmol हे आणखी एक सॉफ्टवेअर पाहू.
05:19 रासायनिक रचना जसे की मूलद्रव्ये, बंध इत्यादी “3D” मधे बघण्यास, हे अतिशय उपयोगी आहे.
05:26 स्पोकन ट्युटोरियलच्या साईटवर Jmol चे पाठ अनेक भाषांमधे उपलब्ध आहेत.
05:33 Start मेनूमधे Graphicsचा भाग पाहू.
05:40 येथे GIMP, Inkscape आणि XFig दिसेल.
05:46 स्पोकन ट्युटोरियलच्या साईटवर GIMP, Inkscape आणि XFig चे अनेक पाठ उपलब्ध आहेत.
05:54 ह्या पाठांचा उपयोग, ही ग्राफिक सॉफ्टवेअर्स शिकण्यास करू शकता.
06:01 आता इंटरनेट हा भाग पाहू. येथे हे पर्याय आहेत.
06:07 येथे Firefox वेब ब्राऊजर आहे.
06:10 येथे Firefox कसे वापरायचे ह्या संदर्भातील पाठ......
06:15 …....अनेक भारतीय भाषांमधे उपलब्ध आहेत.
06:20 Office प्रकाराखाली संपूर्ण LibreOffice Suite आहे-

Writer Calc Impress Base Draw Math

06:31 स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर संपूर्ण LibreOffice Suite वरील पाठ आहेत.
06:37 आता Programming विभागावर जाऊ.
06:40 येथे आपण iPython बघू शकतो.
06:43 वेबसाईटवर Python वरील पाठांची मालिका आहे.
06:47 तसेच येथे Scilab देखील उपलब्ध आहे.
06:50 Scilab शिकण्यास स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर पाठ उपलब्ध आहेत.
06:56 तसेच Code Blocks आणि Geany सारखे IDEs सुध्दा आहेत.
07:01 यासाठीचे पाठ अजून उपलब्ध नाहीत.
07:05 परंतु तुम्ही इंटरनेटवर शोध घेतल्यास, ह्या संदर्भातील उपयुक्त माहिती मिळू शकेल.
07:12 आता Sound & Video मधील ऍप्लिकेशन पाहू.
07:17 आपल्याकडे Audacity आहे जे ऑडिओ ट्रॅक्स रेकॉर्ड करण्यास वापरले जाते.
07:22 हे Audacity वापरण्या संदर्भातील पाठ आहेत.
07:26 Preferences मधे Desktop, Keyboard, Monitor, Network इत्यादी कस्टमाईज करण्याचे पर्याय आहेत.
07:33 Customize look & feel पर्यायावर क्लिक करा.
07:37 डिफॉल्ट रूपात आपण Widget टॅबवर आहोत.
07:40 येथे दाखवलेल्या विंडोजची डिफॉल्ट थीम बदलता येऊ शकते.
07:45 उपलब्ध सूचीतून तुमच्या पसंतीची थीम निवडा.
07:51 इतर सर्व टॅब्स आणि त्यातील पर्यायांबद्दल आपण पुढील पाठांत सविस्तर जाणून घेऊ.
07:57 Logout हा पर्याय शटडाऊन करण्यास, स्क्रीन लॉक किंवा लॉगआऊट करण्यास वापरला जातो.
08:03 Cancel बटणावर क्लिक करू.
08:05 Start मेनूचा बाजूचा आयकॉन, हा डेस्कटॉपवर जाण्याचा शॉर्टकट आहे.
08:10 त्यावर क्लिक करू.
08:12 हे उघडलेल्या सर्व विंडो छोट्या करेल आणि केवळ डेस्कटॉप दाखवेल.
08:18 आता डेस्कटॉपवरील काही आयकॉन्स पाहू.
08:23 येथे Terminal आहे.
08:25 हा कमांड लाईन इंटरफेस आहे.
08:28 Terminal चा वापर शिकण्यास, BOSS Linux वरील स्पोकन ट्युटोरियलवरील चे पाठ पहा.
08:34 File Manager हे विंडोज OS मधील My Computer प्रमाणे कार्य करते.
08:39 या विंडोमधून तुम्ही कुठल्याही फोल्डर किंवा फाईलवर जाऊ शकता.
08:47 Software Center च्या सहाय्याने, हवी असलेली सर्व सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येतात.
08:58 FOSSEE OS सपोर्ट करत असलेल्या सर्व भाषा Language Support मधे दिसतील.
09:05 आपल्याला डेस्कटॉपवर Readme नावाची “pdf” दिसेल.
09:10 ही “pdf” उघडून वाचा.
09:17 ही तुम्हाला Netbook चा थोडक्यात गोषवारा देईल.
09:27 अशाप्रकारे आपण FOSSEE Netbook पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:33 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,कार्यशाळा चालविते परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
09:48 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
09:51 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
09:57 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana