Digital-Divide/C2/How-to-use-FOSSEE-Netbook/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:13, 31 July 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
0.01 नमस्कार. IIT मुंबईमधे रूपरेखा तयार केलेल्या कमी किमतीच्या FOSSEE Netbook वरील स्पोकन ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
0.09 आपण शिकणार आहोत,
0.12 FOSSEE Netbook चा डेस्कटॉप,
0.14 त्या सोबत येणारे काही प्रोग्रॅम्स,
0.17 आणि नव्या रिलीजेससाठी ऑपरेटिंग सिस्टीम अपडेटस.
0.22 आपण याला FOSSEE Netbook म्हणतो कारण,
0.26 FOSSEE Team ने याची स्पेसिफिकेशन्स बनवली आहेत.
0.30 ऑपरेटिंग सिस्टीममधे सुयोग्य बदल केले आहेत.
0.32 त्याचे सॉफ्टवेअर वितरीत केले आहे.
0.35 आणि त्याची अपडेटस आणि ट्रेनिंग पुरवली आहेत.
0.38 ही ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु लिनक्सच्या नव्या आवृत्तीपासून तयार केली आहे.
0.43 FOSSEE Netbook आयआयटी मुंबईत सुरु केलेले कमी किमतीचा लॅपटॉप आहे.
0.49 दिलेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार याचे उत्पादन Basics Comtech Pvt. Ltd ने केले आहे.
0.55 याची रचना शिक्षण आणि संशोधनासाठी केली गेली आहे.
0.57 आयात शुल्क व कर सोडून त्याची अंदाजे किंमत "रू 5,000” असेल.
1.03 हा पाठ रेकॉर्ड करण्यास, FOSSEE Netbook,
1.08 GNU / लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे FOSSEE डिस्ट्रीब्युशन
1.12 आणि Kazam स्क्रीन रेकॉर्डर वर्जन “1.4.5” वापरत आहोत.
1.17 आता FOSSEE Netbook विषयी जाणून घेऊ.
1.20 हे FOSSEE Netbook आहे.
1.24 ह्याचे वजन अंदाजे “700” ग्रॅम आहे.
1.28 डिस्प्ले “10 इंच" असून टचपॅड सुविधा उपलब्ध आहे.
1.31 फ्रंट कॅमेरा आणि दोन बिल्ट इन स्पीकर्स आहेत.
1.35 दोन रेग्युलर USB ports, एक मिनी HDMI port आणि एक LAN port आहे.
1.43 ऑडिओ सपोर्टसाठी हेडफोन आणि माईकचे स्वतंत्र जॅक उपलब्ध आहेत.
1.49 ह्यात “32GB” पर्यंत सपोर्ट करणारा SD card चा “slot” आहे.
1.56 ह्यामधे 5000 mAH ची बॅटरी आहे.
1.58 वापरत असलेल्या प्रोग्रॅमनुसार ती चार ते आठ तासांचा बॅकप देते.
2.04 ह्यामधे 1GB RAM आणि 8GB ROM आहे.
2.07 wi-fi आणि Bluetooth सपोर्ट देखील आहे.
2.11 हार्डवेअरच्या स्पेसिकेशन्सबद्ल अधिक माहितीसाठी http://netbook.fossee.in साईटला भेट द्या.
2.19 FOSSEE OS च्या रिकव्हरी/अपडेट/री-इन्स्टॉलेशन साठी युजरने पुढील गोष्टी कराव्यात.
2.25 netbook.fossee.in/recovery मधे दिलेल्या सूचनांनुसार sdcard तयार करा.
2.33 FOSSEE Netbook बंद करा.
2.35 स्लॉटमधे sdcard घालून, पॉवरचे बटण बराच वेळ दाबून धरा.
2.41 "'Entering recovery mode...'" मेसेज स्क्रीनवर दाखवला गेला पाहिजे.
2.46 पुढील स्क्रीनमधे दाखवलेला योग्य पर्याय निवडा.
2.51 येथे 'FOSSEE OS असलेला FOSSEE Netbook चा डेस्कटॉप दिसेल.
2.57 डिफॉल्ट रूपात डेस्कटॉपवर काही आयकॉन्स दिसतील.
3.01 कुठल्याही संगणकाप्रमाणे आयकॉनवर डबल क्लिक केल्यावर ते ऍप्लिकेशन उघडता येते.
3.09 येथे उजवीकडे खाली Network connection आयकॉन आहे.
3.15 सध्या तो No network connection असे दाखवत आहे.
3.18 network ची जोडणी कशी करायची ते पाहू.
3.21 “wi-fi” कनेक्शनसाठी आयकॉनवर क्लिक करा.
3.25 आधीपासूनच उपलब्ध असलेल्या कनेक्शन्सची सूची दाखवली जाईल.
3.30 तुमच्याकडे wi-fi network चा पासवर्ड असल्यास, यापैकी कोणाशीही कनेक्ट करू शकता.
3.35 आपल्या मशीनवर उपलब्ध असलेल्या नेटवर्कपैकी एक निवडू.
3.40 नंतर पासवर्ड टाईप करून Connect बटणावर क्लिक करू.
3.46 सिस्टीम ट्रेमधील नेटवर्कच्या आयकॉनकडे लक्ष द्या.
3.50 आता आयकॉन बदलला आहे.
3.52 हे आपण ज्या नेटवर्कशी जडलेले आहोत त्याचे नाव दाखवत आहे.
3.57 आता डेस्कटॉपच्या डाव्या बाजूच्या कोप-यात खाली बघा.
4.03 येथे Start मेनू दिसेल, जो मुख्य मेनू आहे.
4.07 Start मेनूमधे उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशनची वर्गवार सूची दिसेल.
4.14 सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशनची सूची बघण्यास प्रत्येक कॅटॅगरीवर क्लिक करा.
4.21 त्यापैकी काही पाहू.
4.24 Education ह्या भागात ही सर्व ऍप्लिकेशन्स आहेत.
4.28 येथे GeoGebra दिसेल.
4.31 बीजगणित आणि भूमितीच्या संकल्पना शिकण्यास, हे एक उत्तम विनामूल्य सॉफ्टवेअर आहे.
4.37 विशेषतः हे इयत्ता सहावी वा पुढील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
4.41 स्पोकन ट्युटोरियल टीमने GeoGebra शिकण्यास उत्तम असे पाठ बनवले आहेत.
4.47 हे http://spoken-tutorial.org वर विनामूल्य उपलब्ध आहेत.
4.53 ही लिंक ब्राऊजर विंडोमधे अशी दिसेल.
4.57 तुम्ही बघू शकता की हे पाठ अनेक भारतीय भाषांमधे उपलब्ध आहेत.
5.03 साईटच्या पानावर दिसत असलेली अशी अनेक विनामूल्य सॉफ्टवेअर्स नेटबुकवर उपलब्ध आहेत.
5.10 आपण ती लवकरच पाहू.
5.13 पुन्हा Start menu वर जाऊ.
5.15 Jmol हे आणखी एक सॉफ्टवेअर पाहू.
5.19 रासायनिक रचना जसे की मूलद्रव्ये, बंध इत्यादी “3D” मधे बघण्यास, हे अतिशय उपयोगी आहे.
5.26 स्पोकन ट्युटोरियलच्या साईटवर Jmol चे पाठ अनेक भाषांमधे उपलब्ध आहेत.
5.33 Start मेनूमधे Graphicsचा भाग पाहू.
5.40 येथे GIMP, Inkscape आणि XFig दिसेल.
5.46 स्पोकन ट्युटोरियलच्या साईटवर GIMP, Inkscape आणि XFig चे अनेक पाठ उपलब्ध आहेत.
5.54 ह्या पाठांचा उपयोग, ही ग्राफिक सॉफ्टवेअर्स शिकण्यास करू शकता.
6.01 आता इंटरनेट हा भाग पाहू. येथे हे पर्याय आहेत.
6.07 येथे Firefox वेब ब्राऊजर आहे.
6.10 येथे Firefox कसे वापरायचे ह्या संदर्भातील पाठ......
6.15 …....अनेक भारतीय भाषांमधे उपलब्ध आहेत.
6.20 Office प्रकाराखाली संपूर्ण LibreOffice Suite आहे-

Writer Calc Impress Base Draw Math

6.31 स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर संपूर्ण LibreOffice Suite वरील पाठ आहेत.
6.37 आता Programming विभागावर जाऊ.
6.40 येथे आपण iPython बघू शकतो.
6.43 वेबसाईटवर Python वरील पाठांची मालिका आहे.
6.47 तसेच येथे Scilab देखील उपलब्ध आहे.
6.50 Scilab शिकण्यास स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर पाठ उपलब्ध आहेत.
6.56 तसेच Code Blocks आणि Geany सारखे IDEs सुध्दा आहेत.
7.01 यासाठीचे पाठ अजून उपलब्ध नाहीत.
07.05 परंतु तुम्ही इंटरनेटवर शोध घेतल्यास, ह्या संदर्भातील उपयुक्त माहिती मिळू शकेल.
7.12 आता Sound & Video मधील ऍप्लिकेशन पाहू.
7.17 आपल्याकडे Audacity आहे जे ऑडिओ ट्रॅक्स रेकॉर्ड करण्यास वापरले जाते.
7.22 हे Audacity वापरण्या संदर्भातील पाठ आहेत.
7.26 Preferences मधे Desktop, Keyboard, Monitor, Network इत्यादी कस्टमाईज करण्याचे पर्याय आहेत.
7.33 Customize look & feel पर्यायावर क्लिक करा.
7.37 डिफॉल्ट रूपात आपण Widget टॅबवर आहोत.
7.40 येथे दाखवलेल्या विंडोजची डिफॉल्ट थीम बदलता येऊ शकते.
7.45 उपलब्ध सूचीतून तुमच्या पसंतीची थीम निवडा.
7.51 इतर सर्व टॅब्स आणि त्यातील पर्यायांबद्दल आपण पुढील पाठांत सविस्तर जाणून घेऊ.
7.57 Logout हा पर्याय शटडाऊन करण्यास, स्क्रीन लॉक किंवा लॉगआऊट करण्यास वापरला जातो.
8.03 Cancel बटणावर क्लिक करू.
8.05 Start मेनूचा बाजूचा आयकॉन, हा डेस्कटॉपवर जाण्याचा शॉर्टकट आहे.
8.10 त्यावर क्लिक करू.
8.12 हे उघडलेल्या सर्व विंडो छोट्या करेल आणि केवळ डेस्कटॉप दाखवेल.
8.18 आता डेस्कटॉपवरील काही आयकॉन्स पाहू.
8.23 येथे Terminal आहे.
8.25 हा कमांड लाईन इंटरफेस आहे.
8.28 Terminal चा वापर शिकण्यास, BOSS Linux वरील स्पोकन ट्युटोरियलवरील चे पाठ पहा.
8.34 File Manager हे विंडोज OS मधील My Computer प्रमाणे कार्य करते.
8.39 या विंडोमधून तुम्ही कुठल्याही फोल्डर किंवा फाईलवर जाऊ शकता.
8.47 Software Center च्या सहाय्याने, हवी असलेली सर्व सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येतात.
8.58 FOSSEE OS सपोर्ट करत असलेल्या सर्व भाषा Language Support मधे दिसतील.
9.05 आपल्याला डेस्कटॉपवर Readme नावाची “pdf” दिसेल.
9.10 ही “pdf” उघडून वाचा.
9.17 ही तुम्हाला Netbook चा थोडक्यात गोषवारा देईल.
9.27 अशाप्रकारे आपण FOSSEE Netbook पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
9.33 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
9.40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,

कार्यशाळा चालविते परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते

9.48 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
9.51 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
9.57 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana